Air India : मध्य पूर्वेतील युद्धाचा हवाई सेवांवर परिणाम; कतारचे पूर्णपणे हवाई क्षेत्र बंद!
इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. यादरम्यान, कतारची राजधानी दोहामध्ये प्रचंड गोंधळ उडाला. इराणच्या हल्ल्यानंतर कतारचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. यानंतर, एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा यांनी मध्य पूर्वेला जाणारी त्यांची सर्व उड्डाणे तात्काळ प्रभावाने स्थगित केली आहेत.