• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 7 of 1312

    Pravin Wankhade

    Karnataka Government : कर्नाटक सरकारने म्हटले- राष्ट्रपती व राज्यपाल हे फक्त नाममात्र प्रमुख; केंद्र व राज्यांतील मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्यानुसार कार्य करण्यास बांधील

    राज्य विधिमंडळात मंजूर झालेल्या विधेयकांवर विचार करण्यासाठी न्यायालये राज्यपाल आणि राष्ट्रपतींसाठी वेळ मर्यादा ठरवू शकतात का, अशी विचारणा करणाऱ्या राष्ट्रपतींच्या संदर्भावरील याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आठव्या दिवशी सुनावणी झाली.

    Read more

    Government : 22 सप्टेंबरपासून बिस्किटे-टूथपेस्टसारखी उत्पादने स्वस्त मिळणार; सरकारने कंपन्यांना जुन्या स्टॉकची MRP बदलण्याची परवानगी

    २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होण्यापूर्वी, सरकारने कंपन्यांना त्यांच्या जुन्या न विकल्या गेलेल्या स्टॉकची कमाल किरकोळ किंमत (MRP) बदलण्याची परवानगी दिली आहे. उत्पादक, पॅकर आणि आयातदार आता स्टॅम्पिंग, स्टिकर किंवा ऑनलाइन प्रिंटिंगद्वारे जुन्या स्टॉकवर नवीन किंमती टाकू शकतील.

    Read more

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- सैन्यासाठी आत्मनिर्भर भारत गरजेचा; लोकांनी ऑपरेशन सिंदूरला 4 दिवसांचा कसोटी सामना म्हटले

    मंगळवारी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या कार्यक्रमात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, आत्मनिर्भर भारत हे लष्करासाठी देखील आवश्यक आहे. पूर्वी संघर्षादरम्यान १०० किमीच्या पल्ल्याची शस्त्रे आवश्यक होती, आज ३०० किमीच्या पल्ल्याची शस्त्रे आवश्यक आहेत.

    Read more

    Actor Darshan : अभिनेता दर्शनची तुरुंगात विष प्राशनाची विनंती; कोर्टाला म्हटले- सूर्य पाहून बरेच दिवस झाले, हाताला बुरशी; कपड्यातून दुर्गंधी

    रेणुकास्वामी हत्याकांडात तुरुंगात असलेला कन्नड अभिनेता दर्शनने तुरुंगात विष देण्याची विनंती केली आहे. दर्शन मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ६४ व्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हजर झाला.

    Read more

    Karisma Kapoor : करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली हायकोर्टात धाव; वडील संजय कपूर यांच्या 30,000 कोटींच्या मालमत्तेत वाटा मागितला

    बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरची दोन्ही मुले समायरा आणि कियान यांनी त्यांचे वडील संजय कपूर यांच्या ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेत वाटा मिळवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.बार अँड बेंचच्या म्हणण्यानुसार, मुलांनी त्यांची सावत्र आई प्रिया सचदेव कपूर (संजय कपूरची तिसरी पत्नी) यांच्यावर संजय कपूरच्या मृत्युपत्रात बदल करून संपूर्ण मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

    Read more

    Nafed : नाफेडने कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणल्याने शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची भुजबळांची मागणी

    राज्यात कांद्याचा गहन प्रश्न समोर उभा राहत असतानाच आणि सध्या कांद्याचे भाव उतरलेले असताना नाफेडने कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याचे भाव आणखी पडले आहेत. कांद्याला सरासरी १४०० ते १५०० रुपये भाव असताना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांनी बफर स्टॉकचा कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याचे भाव आणखी खाली आले आहेत आणि यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याची माहिती राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना दिली.

    Read more

    IPS अंजना कृष्णांना केलेल्या दमबाजीचा मुद्दा अजितदादांनी बासनात गुंडाळला; पण त्यांच्याच बहिणीने आणि पुतण्याने तो पुन्हा तापविला!!

    महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना केलेल्या दमबाजीचा मुद्दा अजितदादांनी बासनात गुंडाळला; पण त्यांच्या बहिणीने आणि पुतण्याने तो पुन्हा तापविला

    Read more

    पडले तरी काँग्रेसचे नाक वर, वाढलेल्या टक्केवारीतून केली पराभवाची भलामण!!

    पडले तरी काँग्रेसचे नाक वर; वाढलेल्या टक्केवारीतून केली पराभवाची भलामण!!, अशी काँग्रेसच्या नेत्यांची उपराष्ट्रपती पदाची निवडणूक हरल्यानंतर अवस्था झाली.

    Read more

    Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मुलगा झीशानचा सवाल- पोलिस मास्टरमाइंडला का पकडत नाहीत, अनमोल बिष्णोईला घाबरता का?

    राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या तपासावरून त्यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांनी मुंबई पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुख्यात गुंड अनमोल बिष्णोईची चौकशी करण्यात पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत झिशान सिद्दीकी यांनी थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

    Read more

    High Court : हायकोर्टाने म्हटले- सुशिक्षित महिला म्हणू शकत नाही की दिशाभूल झाली; स्वेच्छेने विवाहित पुरुषाशी संबंध ठेवल्यास ती स्वतः जबाबदार

    दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले आहे की, जर एखाद्या सुशिक्षित आणि स्वतंत्र महिलेने स्वतःच्या इच्छेने विवाहित पुरुषाशी संबंध ठेवले, तर ती असा दावा करू शकत नाही की तिची दिशाभूल केली जात आहे किंवा तिचे शोषण केले जात आहे.

    Read more

    दुसरी फाटाफूट दिसायला लागल्याबरोबर बांधबंदिस्ती; उद्धव ठाकरेंनी वाढविल्या शिवतीर्थावरच्या भेटी!!

    दुसरी फाटाफूट दिसायला लागल्याबरोबर बांधबंदिस्ती; उद्धव ठाकरेंनी वाढविल्या शिवातीर्थावरच्या भेटी!!, असेच उद्धव ठाकरेंच्या आजच्या शिवतीर्थ भेटीचे वर्णन करता येईल. उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली

    Read more

    Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मुदतवाढ

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देत उपसा जलसिंचन योजनांसाठी वीजदर सवलतीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही सवलत मार्च 2027 पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

    Read more

    Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटलांनी फेटाळले भुजबळांचे आरोप; आरक्षणाचा GR काढताना कोणताही दबाव नव्हता; भुजबळांचा गैरसमज दूर करणार

    मराठा आरक्षणाचा जीआर सरकारने प्रचंड दबावाखाली काढल्याचा आरोप केल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने त्यांचा आरोप धुडकावून लावला आहे. मराठा आरक्षणाचा जीआर काढताना सरकारवर कोणताही दबाव नव्हता. आमच्या उपसमितीने अतिशय विचाराअंती 3-4 बैठका घेऊन हा निर्णय घेतला. उपसमिती त्यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करेल, असे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले- ओबीसी-मराठ्यांचे ताट वेगळे पाहिजे, मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने म्हटले

    मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण करत समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी लाऊन धरली होती. राज्य शासनाने जीआर काढत मनोज जरांगेंच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्या. परंतु, यानंतर राज्यातील ओबीसी समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या शासन निर्णयाला विरोध केला. आता वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा- जीआरला हात लावल्यास सरकारला शांत बसू देणार नाही

    मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यापूर्वी मला विश्वासात घेतले नाही. मला त्याबाबतची कल्पना दिली नसल्याचे ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तर तुम्हाला कल्पना द्यायला तुम्ही सरकारचे बाप आहात का? असा सवाल मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना केला. तसेच जीआरला हात लावल्यास सरकारला शांत बसू देणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

    Read more

    Chhagan Bhujbal : भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना 8 पानी पत्र- सरकारने मराठा आरक्षणाचा GR प्रचंड दबावाखाली काढला

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मराठा आरक्षणाशी संबंधित काढलेला जीआर हा प्रचंड दबावाखाली काढल्याचा आरोप राज्यातील एक बडे ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे

    Read more

    Devendra Fadnavis : उपराष्ट्रपती निवडणूक निकालावरून CM फडणवीसांचा टोला- विरोधक तोंडावर पडले, त्यांना स्वत:ची मते राखता आली नाहीत

    उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. निवडणुकीआधी विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केले. ते जास्त बोलले. एनडीएचे मते फोडू असे सांगितले. पण उलटेच झाले. विरोधकांना स्वत:ची मते देखील राखता आली नाहीत, हे या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्यांची मोठी संख्या आमच्या एनडीए उमेदवाराला गेली आहे. विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचे आणि तोंडावर पडायचे, अशी अवस्था विरोधकांची आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

    Read more

    CP Radhakrishnan : सीपी राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपती असतील; NDA उमेदवाराला 452 मते मिळाली

    सीपी राधाकृष्णन हे देशाचे १५ वे उपराष्ट्रपती असतील. एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना ४५२ पहिल्या पसंतीची मते मिळाली. तर आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना ३०० पहिल्या पसंतीची मते मिळाली. राधाकृष्णन १५२ मतांच्या फरकाने विजयी झाले.

    Read more

    Indian youth : भारतीय तरुण मतपेटीची ताकद मानतो..नेपाळसारखा उठाव अशक्य!!

    नेपाळमध्ये जनरेशन झेडच्या आंदोलनाने ओली सरकारचा पाडाव केला आणि संपूर्ण देश हादरला. भारतातही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र तज्ज्ञांच्या मते भारतीय तरुणाईची मानसिकता, सामाजिक रचना आणि संस्थात्मक ताकद यामुळे नेपाळसारखा उठाव भारतात होणे जवळपास अशक्य आहे.

    Read more

    Generation Z explosion in Nepal: नेपाळात जनरेशन Z चा स्फोट: बलेंन शाह आणि सुधान गुरूंग यांच्या नेतृत्वाखाली ओली सरकारचा पाडाव

    नेपाळच्या राजकारणात इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर युवक रस्त्यावर उतरले आणि अवघ्या काही दिवसांत देशाचे राजकीय समीकरण पालटले. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल या दोघांनी जनआंदोलनासमोर झुकून राजीनामा दिला. या नाट्यमय घडामोडींच्या केंद्रस्थानी दोन चेहरे झळकत आहेत: काठमांडूचे महापौर बलेंन शाह आणि ‘हामी नेपाळ’ या संस्थेचे संस्थापक सुधान गुरूंग.

    Read more

    PM Modi पंजाबला पंतप्रधान मोदींकडून १,६०० कोटींचं मदत पॅकेज

    पंजाबमध्ये झालेल्या ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ सप्टेंबर रोजी राज्याच्या दौर्‍यावर गेले.

    Read more

    BRICS : ब्रिक्स शिखर परिषदेत चीनची हाक : “टॅरिफ युद्धाला तोंड देण्यासाठी एकजूट आवश्यक”

    चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकत्याच झालेल्या ब्रिक्स (BRICS – ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांच्या बैठकीत जागतिक अर्थव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, काही देशांनी उभारलेल्या टॅरिफ युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेला मोठा फटका बसतोय आणि जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण होतेय.

    Read more

    सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदी; मोदी सरकार पाडण्यासाठी राहुल बाबा उंगल्या करायला गेले; पण INDI आघाडीच्या खासदारांचीच एकजूट नाही टिकवू शकले!!

    केंद्रातले मोदी सरकार पाडण्यासाठी वेगवेगळ्या उंगल्या करायला गेले, ‌पण साधी INDI आघाडीच्या खासदारांची एकजूट नाही टिकवू शकले!!, अशी राहुल गांधींच्या राजकीय कर्तृत्वाची आज पुन्हा एकदा नोंद झाली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली INDI नुसती हरलीच नाही तर फुटली सुद्धा. कारण काँग्रेस सकट बाकीच्या विरोधी पक्षांची अपेक्षित असलेली 324 मते बी‌. सुदर्शन रेड्डी या उमेदवारांना मिळू शकली नाहीत. त्यांना फक्त 300 मते मिळू शकली. NDA आघाडीचे उमेदवार सी‌. पी. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, INDI आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना फक्त 300 मते मिळाली. याचा अर्थ INDI आघाडीची 25 ते 30 मते फुटली.

    Read more

    मातोश्री भेटीनंतर काँग्रेसचे नेते गेले फडणवीसांकडे; विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी घातले साकडे; महाराष्ट्राचे राजकारण 360° मध्ये फिरल्याचे चिन्ह दिसले!!

    मातोश्री भेटीनंतर काँग्रेसचे नेते पोहोचले फडणवीसांकडे; विधान परिषदेतल्या विरोधी पक्ष नेते पदासाठी त्यांना घातले साकडे!! महाराष्ट्राचे राजकारण काँग्रेसी प्रवृत्तीच्या नेत्यांच्या हातातून निसटल्याचे चिन्ह या भेटींमधून दिसले.

    Read more

    Elite Force : भारत तयार करणार अमेरिका – इस्रायलप्रमाणे विशेष एलिट फोर्स; शत्रूच्या घरात घुसून करणार कारवाई

    सशस्त्र दलांच्या एलिट कमांडो फोर्सचा संयुक्त युद्ध सिद्धांत तयार करण्यात आला आहे. हा सामान्य दस्तऐवज लष्कराच्या विशेष दलांसाठी, हवाई दलाच्या गरुड कमांडो फोर्ससाठी आणि नौदलाच्या मार्कोस कमांडोसाठी तयार करण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर आयोजित केलेल्या या सरावात, तिन्ही सैन्याच्या एलिट फोर्सच्या तयारीचे प्रत्येक पैलू स्पष्ट करण्यात आले आहे.

    Read more