• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 66 of 1420

    Pravin Wankhade

    Election Commission : स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ‘स्टार’ प्रचारकांची मर्यादा दुप्पट

    राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पक्षांच्या मागणीचा विचार करून प्रमुख किंवा स्टार प्रचारकांच्या संख्येत वाढ केली आहे. यापूर्वी प्रत्येक पक्षाला केवळ 20 प्रचारकांची नावे देण्याची परवानगी होती, मात्र आता ही मर्यादा वाढवून 40 प्रचारकांपर्यंत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पक्षांना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना, प्रभावी वक्त्यांना आणि जनसंपर्कात कौशल्य असलेल्या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी उतरवणे अधिक सोयीचे होणार आहे.

    Read more

    1 रुपयाही न घेता शीतल तेजवानीचा पार्थच्या कंपनीशी 300 कोटींचा व्यवहार; की पार्थला 42 कोटी रुपये भरावे लागू नयेत म्हणून यंत्रणांची दिशाभूल करायचाच प्रकार??

    बापाने 70 हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही. पार्थ पवार 1500 कोटींच्या घोटाळ्यात सापडले. पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न 2 चित्रपट बनावा, अशी उपरोधिक मागणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

    Read more

    VVPAT : स्थानिक स्वराज्य निवडणुकांत व्हीव्हीपॅटचा मुद्दा न्यायालयात; आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस; 18 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश

    राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आता न्यायालयीन निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईव्हीएम यंत्रणेसोबत व्हीव्हीपॅट बसविण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने आयोगाला 18 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मतदान प्रक्रियेबाबतचा हा वाद तापण्याची शक्यता आहे.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स;10 नोव्हेंबरला हजर राहण्याचे निर्देश; आझाद मैदान आंदोलनातील कथित उल्लंघनाचे प्रकरण

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या असून, मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. जरांगे पाटील यांना येत्या 10 तारखेला (नोव्हेंबर) चौकशीसाठी आझाद मैदान पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी ही नोटीस जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी विरेंद्र पवार यांना देखील पाठवली आहे.

    Read more

    Radhakrishna Vikhe Patil : आधी सोसायटी काढायची,मग कर्ज घ्यायचं, नंतर ते माफ करून घ्यायचं; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

    भाजपचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शेतकरीविरोधी वादग्रस्त वक्तव्यामुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आधी सोसायटी काढायची, मग कर्ज घ्यायचं, नंतर ते माफ करून घ्यायचं आणि पुन्हा नवीन कर्ज मागायचं, हे वर्षानुवर्षं सुरू आहे, असं विधान विखे पाटील यांनी केल्याने शेतकरी संघटनांकडून आणि विरोधकांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी हे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

    Read more

    Sharad Pawar : मनसेला आघाडीत घेण्यास पवारांची अनुकूल भूमिका, काँग्रेस पक्षाच्या राज्यातील नेत्यांना फटकारले

    मनसेला मविआत घेण्याविषयी काँग्रेसने टोकाची भूमिका घेऊ नये, अशा शब्दांत शरद पवारांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना फटकारले आहे. मनसेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सोबत घेण्याविषयी शरद पवार अनुकूल असल्याचे संकेत त्यांनी यातून दिले आहेत.

    Read more

    Parth Pawar, : पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचा आणखी एक घोटाळा; पुण्यात जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार, 22 दस्त नोंदणीची चौकशी- मंत्री पाटील

    पार्थ पवारांनी घेतलेल्या जागेचीच नाही तर पुण्यातील अन्य २२ जमिनींच्या व्यवहारांच्या फायलींची तपासणी सुरू असून स्टॅम्प खरेदीही उघड होईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याने पुण्यातील जमिनीचे मोठे घोटाळे समोर येण्याची चिन्हे आहेत. पार्थ पवारांच्या कंपनीला विकलेल्या जागेबरोबरच पुण्यातील बोपोडी येथील शासकीय दूध डेअरीची जागा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याच्या प्रकरणाचाही त्यात समावेश आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग कार्यालयातील सहायकाच्या समितीकडून २२ भूखंडांवरील व्यवहाराची कसून तपासणी सुरू झाली आहे. पार्थ पवारांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माहिती घेऊन निर्णय घेतील, चुकीचे असेल तर ते कुणालाही माफ करणार नाहीत, असेही ते म्हणाले.

    Read more

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भारतातील मुस्लिम-ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू; कदाचित ते विसरले असतील; संघाचे एकमेव उद्दिष्ट समाजाला एकत्र करणे

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी सांगितले की, भारताचा आत्मा हिंदू संस्कृती आहे. संघ सत्तेसाठी काम करत नाही, तर समाजाच्या सेवेसाठी आणि संघटनेसाठी काम करतो.

    Read more

    RSS Chief Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- केवळ कायद्यांनी समाज मजबूत होत नाही, लोकांमध्ये संस्कृतीशी आपलेपणाची भावना असणे महत्त्वाचे

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, समाज केवळ कायद्यांवर चालत नाही. समाजाला बळकटी देण्यासाठी लोकांनी संवेदनशीलता, त्यांच्या संस्कृतीशी संबंध आणि आपलेपणाची भावना विकसित केली पाहिजे. या गोष्टी समाजात परस्पर बंधुता वाढवतात.

    Read more

    पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात थेट पंतप्रधान मोदींना घेरायची काँग्रेसची तयारी, राहुल गांधींपाठोपाठ काँग्रेसच्या दलित खासदाराचाही पाठपुरावा

    पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडचणीत आणण्याबरोबरच राज्यातले फडणवीस सरकार आणि केंद्रातले मोदी सरकार यांना घेरायची तयारी काँग्रेसने केली. राहुल गांधींनी हा मुद्दा उचलून मोदींना टार्गेट केले. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या दलित खासदाराने पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून महार वतनाची मूळ जमीन परत करायची आग्रही मागणी केली. त्यामुळे काँग्रेसने हा मुद्दा महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत तापवायचा डाव खेळल्याचे स्पष्ट झाले.

    Read more

    Indonesia : इंडोनेशियात नमाजच्या वेळी मशिदीत स्फोट, 54 जखमी; शस्त्रे आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त, पोलिस तपास सुरू

    इंडोनेशियातील जकार्ता येथील एका मशिदीत शुक्रवारच्या नमाजदरम्यान स्फोट झाला. यामध्ये किमान ५४ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Read more

    Gaza : गाझाच्या बोगद्यात 200 हमास सैनिक अडकले; इस्रायलने बाहेर येण्याचा मार्ग बंद केला

    गाझामधील रफाह सीमेजवळील एका बोगद्यात जवळजवळ २०० हमास सैनिक अडकले आहेत आणि ते बाहेर पडू शकत नाहीत. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांना सुरक्षितपणे बाहेर पडू दिले जाणार नाही असे सांगितले आहे.

    Read more

    Siddaramaiah : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बैठकीची मागणी

    कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून उत्तर कर्नाटकातील सुरू असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली.

    Read more

    भूखंडाचे श्रीखंड : पार्थ पवार व्यवहार रद्द करून “ती” जमीन सरकारला नव्हे, तर शितल तेजवानींना करणार परत; वाचा, यातली खरी game!!

    पुण्याच्या कोरेगाव पार्क / कोंढव्यातील 300 कोटींची जमीन खरेदी करून पूर्ण अडचणीत आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित व्यवहार रद्द झाल्याची माहिती पत्रकारांना दिली.

    Read more

    Kalyan Banerjee : TMC खासदाराच्या खात्यातून 56 लाख लंपास; बनावट आधार आणि पॅन वापरून व्यवहार

    तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या जुन्या बँक खात्यातून जवळपास ₹५.६ दशलक्ष (अंदाजे ₹५.६ दशलक्ष) पैसे काढण्यात आले आहेत. बँक अधिकाऱ्यांनी कोलकाता पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.

    Read more

    Kolhapur Sugarcane : कोल्हापुरात ऊस दर आंदोलन चिघळले; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, दोन्ही गटांत जोरदार बाचाबाची

    कोल्हापूरमध्ये दत्त दालमिया साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले ऊस दर आंदोलन चिघळले आहे. ऊस वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नात असताना, कारखाना समर्थकांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना “ऊस वाहतूक रोखून दाखवाच” अशी धमकी देत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले, आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

    Read more

    पार्थ पवारांना दणका; आधी 21 कोटी भरा, मगच व्यवहार रद्द; निबंधक कार्यालयाने घातली अट

    व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांच्या कंपनीला 21 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क भरावा लागणार असल्याची अट सह दुय्यम निबंधक कार्यालयाने घातली.

    Read more

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- 1937 मध्ये वंदे मातरमचे तुकडे झाले, त्याने विभाजनाचे बीज पेरले; दहशत नष्ट करण्यासाठी दुर्गा कसे बनायचे हे नवीन भारताला माहिती

    राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ला शुक्रवारी १५० वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये या निमित्ताने आयोजित सभेला संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले, “वंदे मातरम् हा एक मंत्र, एक स्वप्न, एक संकल्प, एक ऊर्जा आहे. हे गाणे भारत मातेची पूजा आहे.”

    Read more

    India Says : भारताने म्हटले- पाकिस्तान वर्षानुवर्षे अण्वस्त्रांची तस्करी करतोय; आम्ही नेहमीच याबद्दल बोललो

    परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी सांगितले की, पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून गुप्तपणे अणु कारवाया करत आहे. यामध्ये तस्करी, नियमांचे उल्लंघन, गुप्त भागीदारी आणि एक्यू खान नेटवर्कचा समावेश आहे.

    Read more

    नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संकल्प

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे नवीन फौजदारी कायद्यांच्या (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा) अंमलबजावणी संदर्भात बैठक पार पडली.

    Read more

    Ajit Pawar : अजित पवार म्हणाले- जमीन व्यवहार रद्द, रजिस्ट्रेशन कसे झाले, कोणी केले? जबाबदार कोण याची चौकशी होणार

    अजित पवार यांच्या कुटुंबाशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणाने मोठं वादळ निर्माण केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून 1,800 कोटी रुपये किंमतीची जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या व्यवहारामुळे शासनाची सुमारे 152 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. आता यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले आहेत.

    Read more

    Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर म्हणाले- शरद पवारांची पुढील 6 महिन्यात खासदारकी संपणार, 10 आमदारांवर राज्यसभेत कसे जाणार?

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची सध्याची राज्यसभा खासदारकीची मुदत पुढील सहा महिन्यांत संपत आहे, परंतु त्यांच्या या सदस्यपदाची चिंता चक्क भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना लागून राहिली आहे. पवार कुटुंबावर सातत्याने टीका करणारे पडळकर यांनी, 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, असे म्हणत शरद पवार यांच्या खासदारकीबाबत वक्तव्य करत पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. शरद पवार यांनी 2019 मध्ये राज्यसभेतून खासदारकी स्वीकारली होती.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाचे निर्देश- शाळा-कॉलेज, रुग्णालये, हायवेवरून 8 आठवड्यांत मोकाट कुत्री हटवा, पुढील सुनावणी 13 जानेवारीला

    देशातील भटक्या कुत्र्यांच्या धोक्याच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने शाळा-महाविद्यालये, रुग्णालये, बसस्टँड आणि रेल्वेस्थानकांवर कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. आठ आठवड्यांच्या आत या ठिकाणांहून कुत्रे कोंडवाड्यात हलवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवरून भटके प्राणी आणि गुरेढोरे हटवण्याचे निर्देशही कोर्टाने एनएचएआयला दिले.

    Read more

    Taliban : तालिबानने पाकविरुद्ध तयार केले 600 मानवी बॉम्ब; काबूल विद्यापीठामध्ये भरती, सीमेवर गोळीबार

    \

    पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव वाढतच आहे. शुक्रवारी चर्चेचा एक नवीन टप्पा सुरू होताच, पाक-अफगाण सीमेवरील चमन सीमेवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनी धक्कादायक दावा केला आहे की अफगाण तालिबानने पाकिस्तानविरुद्ध ६०० हून अधिक आत्मघाती बॉम्बरना प्रशिक्षण दिले आहे. हे बॉम्बर काबुल विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थांमधून भरती केले जात आहेत. या तरुणांमध्ये मोठ्या संख्येने उच्चशिक्षित विद्यार्थी आहेत ज्यांना पाकिस्तानमधील लष्करी आणि सामरिक लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.

    Read more

    अजितदादांच्या पंखांना कात्री, पण देवेंद्र फडणवीसांचे वेगळे वैशिष्ट्य टिकून राहिले का??

    पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात अजितदादांच्या महत्त्वाकांक्षी पंखांना कात्री लावली हे खरे, पण तेवढेच करून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचे वेगळे वैशिष्ट्य टिकून राहिले का??, हा गंभीर आणि कळीचा सवाल या संपूर्ण प्रकरणात समोर आला.

    Read more