पुण्यात नवले ब्रीजवर भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 20 जखमी; कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने 25 वाहनांची धडक
पुणे येथील नवले पुलावर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची एक भीषण अपघात घटना घडली आहे, ज्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाल्याचे समजते.
पुणे येथील नवले पुलावर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची एक भीषण अपघात घटना घडली आहे, ज्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाल्याचे समजते.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या 14 नोव्हेंबरला लागणार आहेत पण ते निकाल येण्याच्या दिवशीच बिहारमध्ये “नेपाळ” आणि “बांगलादेश” घडवायची लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाने तयारी केली. तशी धमकीच राष्ट्रीय जनता दलाचे नेते सुनील सिंह यांनी दिली. त्यामुळे बिहार पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केला.
मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. यानंतर वाराणसी विमानतळावर (लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ) विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे ‘सिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या पार्श्वभूमीवर रामकाल पथ विकसन करणे या कामाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना काही विशेष सूचना केल्या. त्याचबरोबर त्यांनी 5000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामांचे भूमिपूजनही केले.
कंगना रणौतविरुद्ध आग्रा येथे देशद्रोह आणि शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा खटला दाखल केला जाणार आहे. बुधवारी विशेष न्यायाधीश, MP-MLA लोकेश कुमार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने कंगनाविरुद्ध दाखल केलेली पुनर्विचार याचिका स्वीकारली.
१० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या गुरुग्राम आणि फरीदाबाद पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. हरियाणाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी मॉड्यूलचा २०० हून अधिक शक्तिशाली आयईडी तयार करण्याचा हेतू होता. म्हणून, २९०० किलो स्फोटके, टायमर आणि इतर बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणण्यात आले.
मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी 2017 मध्ये सर्वपक्षीय 31 मुस्लिम नगरसेवक निवडून आले. त्यामध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष मुस्लिम नगरसेवकांना निवडून आणण्यात आघाडीवर होते. पण आता या दोन्ही पक्षांच्या पोटात गोळा आला आहे. कारण खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया मुक्तहिदा मुसलमीन (AIMIM) याने तब्बल 50 उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी स्वतःच ही घोषणा केली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, देशात अनेक महत्त्वाच्या कामांसाठी पुरेसे प्रतिभावान लोक नाहीत, त्यामुळे परदेशी कुशल कामगारांची गरज आहे. ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले. अँकर लॉरा इंग्राहम यांनी ट्रम्प यांना विचारले की एच-१बी व्हिसाची संख्या कमी केली जाईल का कारण त्याचा अमेरिकन कामगारांच्या वेतनावर परिणाम होतो.
वृत्तसंस्था न्यूयॉर्क : New York Mumbai न्यूयॉर्क शहरातील एक प्रमुख रिअल इस्टेट अब्जाधीश बॅरी स्टर्नलिच्ट यांनी चिंता व्यक्त केली आहे की ममदानी यांच्या नेतृत्वाखाली शहराची […]
सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन (SCBA) ने, अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड प्रज्ञा बघेल यांच्यामार्फत, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, देशाच्या अनेक भागांमध्ये, मासिक पाळीच्या काळात महिलांची प्रतिष्ठा, शारीरिक स्वायत्तता आणि गोपनीयतेचे उल्लंघन केले जात आहे.
देशातील सर्व मोठ्या आणि लहान निर्यातदारांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीम (CGSE) ला मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने आज (१२ नोव्हेंबर) हा निर्णय घेतला.
पुण्यातील जमीन खरेदी गैरव्यवहारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत बरेच खुलासे केलेत. सोबतच या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे व्हावी, यासाठी दमानिया यांनी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अंजली दमानिया यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.
शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत आज अखेर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरूवात झाली. त्यात न्यायालयाने या प्रकरणी दोन्ही पक्षकारांना युक्तिवादासाठी किती वेळ लागेल? अशी विचारणा करत त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर सुनावणी 21 जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकली. कोर्टाने या प्रकरणी 21 व 22 असे सलग दोन दिवस सुनावणी होण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे पुढच्या सुनावणीत न्यायालय दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आपला निकाल देऊ शकते किंवा तो राखून ठेवू शकते. या सुनावणीवरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या युतीने 16 पैकी 12 जागा जिंकून बाजी मारली. “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनी त्या विषयाचे वर्णन पवार – शेलार युतीचा बंपर फायदा, अशा शब्दांनी केले त्यामुळेच पवार – शेलार युतीचा बंपर फायदा; पण पवार अजून किती “खाली” उतरणार??, असा सवाल समोर आला.
\राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत असल्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये संवाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक बोलावली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते. दिल्ली लाल किल्ल्यावर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मोदींनी ही बैठक बोलावली.
सोफ्यावर अदानी, खुर्चीवर फडणवीस; नुसते फोटो शेअर करून काय होणार??, असा असावा विचारण्याची वेळ शरद पवारांनी शेअर केलेल्या फोटो मुळे आली, पण त्या पलीकडे जाऊन पवारांना असले फोटो शेअर करावेसे वाटतात किंबहुना शेअर करावे लागतात, यातूनच सगळे राजकीय रहस्य बाहेर आले!!, असे म्हणायची वेळ ही आली.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विविध पदांवर नवीन चेहऱ्यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव करून विजय मिळवला. तर, सचिव पदासाठी उन्मेष खानविलकर यांनी शाह आलम शेख यांचा पराभव करत बाजी मारली. संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले यांची निवड झाली, त्यांनी गौरव पय्याडे यांना पराभूत केले. दरम्यान, एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची याआधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या संपूर्ण निवडणुकीसाठी एकूण 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी अनुदानाच्या मुद्यावरून मराठवाड्याचा दौरा करत महायुती सरकारवर ‘दगाबाज’ म्हणत टीका केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी बांधली? खरे दगाबाज कोण हे जनतेने ओळखले आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. तसेच, ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा करताना शेतकऱ्यांना ‘एक बिस्किटचा पुडाही’ दिला नाही, अशी खोचक टीका करत ‘फुकटचा ताठा अन् नाव उबाठा’ असा उपरोधिक हल्लाबोलही केला.
इस्लामाबादमधील आत्मघाती हल्ल्यानंतर, श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. वृत्तसंस्था एएफपीच्या म्हणण्यानुसार, संघाचे अर्ध्याहून अधिक खेळाडू मायदेशी परतले आहेत.
केंद्र सरकारने दिल्लीतील कार बॉम्बस्फोटांना दहशतवादी हल्ला म्हणून मान्यता दिली आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला.
मूळ शिवसेना हे नाव कोणाला आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला या विषयाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली
दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमधील धौज आणि फतेहपूर टागा भागात दोन घरांमधून २,९०० किलोग्रॅम स्फोटके सापडल्याच्या गुढतेचा उलगडा होऊ लागला आहे. हा संपूर्ण कट “व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल” चा भाग आहे, जे या प्रकरणात डॉक्टरांसारख्या समाजातील व्यक्तींचा वापर करते.
२००५-२००६ मध्ये नोएडा येथील निठारी हत्याकांडाशी संबंधित खून आणि बलात्काराच्या आरोपातून सुरेंद्र कोलीची सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने सुरेंद्रने त्याच्या शिक्षेविरुद्ध दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका मंजूर केली.
गुजरात एटीएसने अटक केलेल्या तीन दहशतवाद्यांच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. एटीएसचे डीएसपी शंकर चौधरी यांनी सांगितले की, दहशतवाद्यांचे लक्ष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) लखनऊ मुख्यालय होते.