• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 58 of 1315

    Pravin Wankhade

    Jitendra Awhad : आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? विधिमंडळातील घटनेवर आव्हाडांचा संताप, तर पडळकरांकडून दिलगिरी

    भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आज विधानभवनाच्या लॉबीत एकमेकांना भिडल्याची घटना घडली. या घटनेवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला. तर गोपीचंद पडळकर यांनी या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.

    Read more

    Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप- फक्त 4 सेकंदात भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावर कोट्यवधीची जमीन, जावेद शेखला आयकरची नोटीस

    खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला आयकर विभागाने 150 कोटींची जमीन भेट मिळाल्या प्रकरणी नोटीस पाठवली आहे. ही जमीन हैदराबादमधील सालारजंग कुटुंबाच्या वारसांनी त्याला हिबानामा (देणगी) स्वरूपात दिल्याचे सांगितले जात आहे. एमआयएम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणात मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर अडीच एकर नाही, तर कोट्यवधींची साडेआठ एकर जमीन हिबानामा करून घेतली आहे. फक्त 4 सेकंदात हा सर्व व्यवहार झाला असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.

    Read more

    Mahayuti Govt : महायुती सरकारची मोठी घोषणा- पंढरपुरातील 213 सफाई कामगारांना 600 चौरस फुटांची घरे

    सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांसाठी सदनिका बांधकामांचा समावेश आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही लोकप्रतिनिधींकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पंढरपूर शहरातील 213 सफाई कामगारांना प्रत्येकी 600 चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येतील. त्यासाठी 55 कोटी 61 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य हेमंत रासने यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते.

    Read more

    एकनाथ शिंदेंशी युती करण्यासाठी आर्थिक फायदा मिळालाय का? वंचित बहुजन आघाडीचा आनंदराज आंबेडकर यांना सवाल

    बौद्ध आणि मुस्लिमांविरूद्धच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) गुन्ह्यांना आणि अजेंड्यांना पाठीशी घालण्यासाठी ही युती करण्यात आलीय का? हातचे बाहुले बनण्याच्या बदल्यात काही वैयक्तिक आणि आर्थिक फायदा मिळालाय का? असा सवालही वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिकन सेनेने आनंदराज आंबेडकर यांना केला आहे.

    Read more

    आव्हाड – पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे टीकास्त्र; कठोर कारवाईचे आदेश; पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त

    भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत विधानभवनात हाणामारी झाली.

    Read more

    Gaza Food Center : गाझात फूड सेंटरमध्ये चेंगराचेंगरी, 43 ठार; जमावाने 15 जणांना चिरडले; इस्रायली सैन्यावर नरसंहाराचा आरोप

    बुधवारी गाझा येथील खान युनूस येथील अन्न वितरण केंद्रात ४३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी २१ जणांचा अन्न मिळवण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. तर १५ जणांचा चेंगराचेंगरीत चिरडून मृत्यू झाला. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की ही घटना गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन (GHF) केंद्रात घडली. मंत्रालयाने इस्रायली सैन्य आणि अमेरिकेवर “जाणूनबुजून” भुकेल्या लोकांची कत्तल केल्याचा आरोप केला.

    Read more

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केली होती.

    Read more

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    महागाईपासून दिलासा मिळाला आहे. जूनमध्ये किरकोळ महागाई फक्त २.१% होती. आता कर्जाचे हप्तेही आणखी कमी होऊ शकतात. ऑगस्टमध्ये होणाऱ्या बैठकीत रिझर्व्ह बँक पुन्हा रेपो दर कमी करू शकते.

    Read more

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलवण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस – राष्ट्रवादीत संघर्ष!!, असे एकमेकांशी विसंगत राजकीय चित्र आज समोर आले.

    Read more

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची

    संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी बुधवारी सांगितले की, कालच्या शस्त्रांनी आपण आजच्या लढाया जिंकू शकत नाही. ते म्हणाले की, परदेशातून आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने आपली युद्ध तयारी कमकुवत होते.

    Read more

    Supreme Court :न्यायालयांमध्ये शौचालयांच्या कमतरतेवर सुप्रीम कोर्ट संतप्त; 20 हायकोर्टांना म्हटले- 8 आठवड्यांत अहवाल द्या, अन्यथा गंभीर परिणाम

    देशातील न्यायालयांमधील शौचालयांसारख्या मूलभूत सुविधांच्या स्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. बुधवारी, देशातील २५ पैकी २० उच्च न्यायालयांनी शौचालय सुविधा सुधारण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत हे अद्याप सांगितले नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

    Read more

    NATO : NATOची भारताला 100% कर लादण्याची धमकी; म्हटले- भारताचे PM असोत किंवा चीनचे राष्ट्रपती, रशियाला युद्ध रोखायला सांगा!!

    नाटोने भारत, चीन आणि ब्राझीलवर १००% कर लादण्याची धमकी दिली आहे. नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी बुधवारी सांगितले की, जर तुम्ही चीनचे अध्यक्ष असाल, भारताचे पंतप्रधान असाल किंवा ब्राझीलचे अध्यक्ष असाल, तर तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की रशियासोबत व्यापार सुरू ठेवल्याने मोठे नुकसान होऊ शकते.

    Read more

    जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसमध्ये गोंधळ, महाविकास आघाडी विस्कळीत; माओवाद्यांचे समर्थन करताना विरोधक अडकले कोंडीत!!

    जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसमध्ये गोंधळ महाविकास आघाडी विस्कळीत; माओवाद्यांचे समर्थन करताना विरोधक अडकले कोंडीत!!, हीच खरी महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची अवस्था झाली.

    Read more

    NCERT : NCERTच्या पुस्तकात मुघल काळाचा नवीन आढावा- अकबर ‘क्रूर पण सहिष्णू, औरंगजेब ‘कट्टर धार्मिक’; 8वीच्या अभ्यासक्रमात समावेश

    अकबराचे राज्य ‘क्रूरता आणि सहिष्णुतेचे मिश्रण होते, तर औरंगजेब हा एक लष्करी शासक होता ज्याने गैर-इस्लामी प्रथांवर बंदी घातली होती आणि गैर-मुस्लिमांवर कर लादले होते.’ मुघल काळातील हा नवीन आढावा एनसीईआरटीच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल म्हणाले- जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळावा; पावसाळी अधिवेशनात विधेयक आणा; मोदींना पत्र

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडावे, असे म्हटले आहे.

    Read more

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!

    बैल गेला अन् झोपा केला, या मराठी म्हणीचा प्रत्यय आज आला. महाराष्ट्र विधानसभेने अख्खे जनसुरक्षा विधेयक संमत केले, त्यावेळी काँग्रेसच्या सदस्यांनी त्याच्या विरोधात थोडीफार भाषणे केली, पण त्याला कसून विरोध का केला नाही??

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या घटनेमुळे सध्या महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी बुधवारी औचित्याच्या मुद्याद्वारे हा विषय विधानसभेच्या पटलावर मांडला. तसेच सरकारकडे स्पष्टीकरणही मागितले. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी सरकारला या प्रकरणी योग्य ती दखल घेण्याचे निर्देश दिले.

    Read more

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही

    प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. मी अशा हल्ल्याचा निषेध करतो. त्यांच्यावर जो हल्ला झाला तो आम्हाला मान्य नाही. राहिला प्रश्न दीपक काटेचा तर अडीच वर्षांपूर्वी काटेच्या प्रवेशावेळी मी बोललो की हा चांगले काम करेल यांच्या पाठीशी आम्ही सर्व लोकं आहोत. कुणी पक्षात येत असेल त्यावेळी आपण हे बोलत असतो, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

    Read more

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांना आनंदराज आंबेडकरांची साथ; पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा

    आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन सेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष यांच्या युतीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या युतीची चर्चा होती. आज एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आपल्या युतीची अधिकृत घोषणा केली. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा हा प्रयत्न असल्याचे या वेळी या दोन्ही नेत्यांनी सांगितले.

    Read more

    Awhad-Padalkar : जितेंद्र आव्हाड – गोपीचंद पडळकर यांच्यात राडा; विधान भवनाच्या गेटवरच एकमेकांना शिवीगाळ

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आज विधानभवनाच्या गेटवरच जोरदार बाचाबाची झाली. यावेळी आव्हाड यांनी पडळकर यांच्यावर गाडी अंगावर घालण्याचा आरोप केला. यामुळे या घटनेचे गांभिर्य वाढले आहे. विधानभवनाच्या गेटवरच हा प्रकार घडल्यामुळे तिथे मोठी गर्दी जमली होती.

    Read more

    Ambadas Danve : निरोप समारंभावेळी अंबादास दानवे म्हणाले- मी पुन्हा येईन, चिंता करू नका! माझे काम सुरूच राहील!

    शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. यानिमित्ताने आज विधान परिषदेत त्यांचा निरोप समारंभ पार पडला. निरोपाच्या भाषणावेळी त्यांनी संघातील सुरुवात, शिवसेनेतील वाटचाल आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले नातेसंबंध सांगत आठवणींना उजाळा दिला. तसेच “मी पुन्हा येईन” आणि ” मी मार खाऊन घरी परतरणारा नाही” असे म्हणत लढण्याचा निर्धारही व्यक्त केला.

    Read more

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    एलन मस्क यांची कंपनी xAI ने त्यांच्या AI चॅटबॉट ग्रोकमध्ये “कंपॅनियन्स” नावाचे एक नवे फीचर लाँच केले आहे. त्यात दोन अॅनिमेटेड पात्रांचा समावेश आहे – एक फ्लर्टी जपानी अॅनिम पात्र “अॅनी” आणि एक रागीट लाल पांडा “बॅड रुडी”. हे दोघेही वापरकर्त्यांशी संवाद साधू शकतात, परंतु त्यांच्या वागण्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

    Read more

    Chief Minister : वाढवण बंदरांचा जगातील पहिल्या दहामध्ये गणले जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

    वाढवण बंदर पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये स्थान मिळवेल.वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून हा प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

    Read more

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    भारतीय नर्स निमिषा प्रिया या सध्या येमेनच्या तुरुंगात मृत्यूदंडाची शिक्षा भोगत आहेत. २०१७ साली व्यावसायिक भागीदार तलाल महदीच्या हत्येप्रकरणात दोषी ठरवल्यानंतर शरिया कायद्याअंतर्गत त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

    Read more

    विधान भवनात फोटोसेशनच्या वेळी ठाकरे-शिंदे आमनेसामने; एकमेकांना पाहणेही टाळले

    विधान भवनात आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला. त्यानंतर फोटोसेशनचा कार्यक्रम पार पडला.

    Read more