• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 46 of 1314

    Pravin Wankhade

    Jaishankar : कान उघडे ठेवून ऐका, मोदी – ट्रम्प यांच्या दरम्यान एकही फोन कॉल नाही, एस. जयशंकर यांनी विरोधकांना सुनावले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी -अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यान २२एप्रिल ते जून १६ दरम्यान एकही फोन कॉल झालेला नव्हता. विरोधकांनी हे कान उघडे ठेवून ऐकावे असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले आहे.

    Read more

    Russia : रशियात 8.8 तीव्रतेचा महाभूकंप; त्सुनामीच्या 4 मीटर उंच लाटा, जपानची फुकुशिमा अणुभट्टी रिकामी करण्यात आली

    बुधवारी सकाळी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाजवळ 8.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कामचटका येथे ४ मीटर उंचीपर्यंत त्सुनामी आली आहे. यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.

    Read more

    Suresh Dhas : बीड कारागृहात वाल्मीक कराडकडे स्पेशल फोन, आमदार सुरेश धस यांचा दावा

    वाल्मीक कराड प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. बीड जिल्हा कारागृहात एक स्पेशल फोन सापडला आहे. हा फोन आका अर्थात वाल्मीक कराड वापरत होता. या फोनचे कॉल डिटेल्स काढले तर सर्व काही काळेबेरे बाहेर येईल, असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला.

    Read more

    डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताची कुरापत; 25% टेरिफ सह लादला दंड; रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदीचे दाखविले कारण!!

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताची कुरापत काढली. आत्तापर्यंत त्यांनी 25 पेक्षा जास्त वेळा भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धबंदीचे क्रेडिट ओढून घेतले. त्यानंतर आज त्यांनी भारतावर 25% टेरिफ सह दंडही लादला.

    Read more

    Maharashtra Govt : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराचे नवे नियम; महाराष्ट्र शासनातर्फे निर्देश जारी

    सोशल मीडियाचा वापर सर्वत्रच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर लोक आपले खासगी आयुष्यातील क्षण तसेच फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. परंतु, आता महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापरासाठी काही नियमावली व महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने (GAD) नुकतेच हे दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यामुळे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला सरकारवर टीका करणे किंवा धोरणांबद्दल नकारात्मक टिप्पणी करणे महागात पडणार आहे.

    Read more

    चुकार मंत्र्यांना झापले की नाही??, फडणवीस म्हणाले, मंत्रिमंडळात जे बोललो, ते बाहेर सांगणार नाही!!

    मंत्रिमंडळातल्या चार चुकार मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झापले की नाही??, याच्यावर मराठी माध्यमांनी बराच खल केला. विरोधी पक्षांनी टीका टिप्पण्या केल्या पण स्वतः फडणवीसांनी मात्र मंत्रिमंडळात जे बोललो, ते बाहेर सांगणार नाही

    Read more

    “पप्पू” नंतर राहुल गांधींची आज झाली “बढती”; राज्यसभेतून मिळाली “चायना गुरु”ची पदवी!!

    आज 30 जुलै 2025. ही तारीख भारतीय राजकीय इतिहासाच्या पानांवर नोंदली गेली कारण पप्पू नंतर राहुल गांधींची आज झाली “बढती”; राज्यसभेतून मिळाली “चायना गुरू”ची पदवी!!

    Read more

    Priyanka Chaturvedi : ऑपरेशन सिंदूर यशस्वी मोहीम- ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींकडून कौतुक

    शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, ऑपरेशन सिंदूर हे एक यशस्वी मोहीम होती. यात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. राजनाथ सिंह हे एक आदरणीय संरक्षण मंत्री आहेत. ते देशाला काय घडले याची माहिती देऊ शकले असते. प्रत्येक प्रश्न विरोधी पक्षाकडून येत नसतो. काही प्रश्नांची उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देशातील जनतेच्या मनातील प्रश्न विरोधी पक्षाने उपस्थित केले आहेत. याचे मी स्वागत करते. सत्ताधारी पक्ष त्यांचे उत्तर देईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज चर्चा होईल, मला आशा आहे की पंतप्रधान दोन्ही सभागृहांना उपस्थित राहतील, असेही त्या म्हणाल्या.

    Read more

    Donald Trump : पाकिस्तानवंशीय लंडनचे महापौर सादिक खान यांच्यावर ट्रम्प यांची टीका, म्हणाले- त्यांनी खूप वाईट काम केले

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा लंडनचे महापौर सादिक खान यांच्यावर हल्लाबोल केला आहे. स्कॉटलंडमध्ये ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी खान यांना एक वाईट व्यक्ती म्हटले आणि त्यांच्या कामावर टीका केली.

    Read more

    Maharashtra : मंदिर-धर्मादाय संस्था आता म्युच्युअल फंड, ETF, कॉर्पोरेट बॉण्ड्समध्ये 50% निधी गुंतवू शकणार, राज्य सरकारची परवानगी

    महाराष्ट्र सरकारने राज्यातील सार्वजनिक ट्रस्टसाठी मोठी आर्थिक क्रांती घडवणारा निर्णय नुकताच घेतला गेला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार, आता सार्वजनिक ट्रस्ट त्यांच्या निधीपैकी 50 % पर्यंत रक्कम म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF), कॉर्पोरेट बॉण्ड्स आणि इतर सध्याच्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवू शकतात.

    Read more

    जयशंकर राज्यसभेत म्हणाले, विरोधकांनी कान खोलून ऐकावे, ट्रम्पचा मोदींना एकही फोन कॉल नाही; तरी संसदेबाहेर राहुल गांधींची जुनीच रेकॉर्ड!!

    परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर राज्यसभेत म्हणाले, विरोधकांनी कान खोलून ऐकावे, अमेरिकेचे अध्यक्ष 2018 यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना 22 एप्रिल ते 16 जून या काळात एकही फोन कॉल आला नाही!!

    Read more

    Operation Sindoor वरून लोकसभेत मार खाल्ला; म्हणून पुन्हा लावून धरला यादीबाह्य मतदारांचा SIR चा मुद्दा!!

    केंद्रातल्या मोदी सरकार खऱ्या अर्थाने घेरण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने अडचणीत आणण्यासाठी किंवा पेचात पकडण्यासाठी विरोधकांकडे कुठला मुद्दाच नसल्याने ऑपरेशन सिंदूरवर तरी सरकारला ठोकून काढू या हेतूने त्या विषयावर चर्चा घेण्यात विरोधक यशस्वी झाले पण ऑपरेशन सिंदूरवरच्या मुद्द्यावर चर्चा करताना विरोधकांनी सरकारवर कुठलेही नवे आरोप केले नाहीत जे आरोप केले, ते जुनेच केले, फक्त जरा नवीन भाषेत केले.

    Read more

    Mahadev Munde : महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री फडणवीसांनी भेटीसाठी बोलावले; 21 महिन्यांपासून न्यायाची प्रतीक्षा

    परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा 21 महिन्यांपूर्वी अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला होता. या घटनेला 21 महिन्यांचा काळ लोटला तरी देखील मुंडे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेकवेळा न्याय मिळवा यासाठी प्रयत्न केले. परंतु, बीडमधील पोलिसांनी देखील याची हवी तशी दखल घेतली नाही. अखेर आता मुख्यमंत्र्यांनी मुंडे कुटुंबाला गुरुवारी (31 जुलै) मुंबईत बोलावले आहे.

    Read more

    Rajan Salvi : राजन साळवी म्हणाले- वेदना, याचना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचत नाहीत, लोक सोडून का जातात याचे आत्मचिंतन करा!

    उद्धव ठाकरे यांना लोक सोडून जात आहेत, याचे आत्मचिंतन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावे, असा सल्ला माजी आमदार राजन साळवी यांनी दिला आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. परंतु, फेब्रुवारी महिन्यातच राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता पुन्हा एकदा राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तसेच त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांवर टीका केली आहे. वेदना, याचना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, असा आरोप साळवी यांनी केला आहे.

    Read more

    Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; राज्यातील 10 जिल्ह्यांत उमेद मॉल, महिलांसाठी गोंदिया, रत्नागिरी-वाशीम येथे विशेष न्यायालयाची स्थापना

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये प्राथमिक तत्त्वावर राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर महिलांचे प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशीम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

    Read more

    China : चीनमध्ये मुलाला जन्म दिल्याबद्दल ₹1.30 लाख देणार सरकार; वन चाइल्ड पॉलिसीमुळे 7 वर्षांत जन्मदर निम्म्यावर

    चीनमध्ये सरकारने मुलाला जन्म दिल्याबद्दल पालकांना १.३० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जन्मदरात सतत घट होत असल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे. चायना डेलीमधील एका वृत्तानुसार, मुलाच्या जन्मानंतर, सरकार सलग तीन वर्षे पालकांना दरवर्षी ३,६०० युआन (अंदाजे ४४,००० रुपये) देईल.

    Read more

    United Airlines : अमेरिकेतील ड्रीमलायनर विमानातून मेडे कॉल; बोइंग 787च्या इंजिनात हवेतच बिघाड

    अमेरिकेत, युनायटेड एअरलाइन्सच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनरच्या डाव्या इंजिनमध्ये उड्डाणादरम्यान बिघाड झाला. अपघाताच्या वेळी विमान ५००० फूट उंचीवर होते, त्यानंतर वैमानिकांनी “मेडे कॉल” (आणीबाणीचा संदेश) पाठवला.

    Read more

    Rohini Khadse : पतीसाठी काळा कोट घालून रोहिणी खडसे कोर्टात, प्रांजल खेवलकरांना महिला आरोपींनी अडकवल्याचा संशय व्यक्त

    रेव्ह पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे मंगळवारी स्वतः काळा कोट घालून कोर्टात पोहोचल्या. यावेळी त्यांनी प्रांजल यांच्यावतीने युक्तिवाद केला नाही. पण त्या पूर्णवेळ कोर्टात हजर होत्या. दरम्यान, प्रांजल यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी ईशा सिंग नामक तरुणीच्या माध्यमातून प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

    Read more

    Devanand Sonatakke : बारमध्ये मद्य पिऊन शासकीय फायलींवर सह्या; चामोर्थीच्या उपविभागीय अभियंत्यावर निलंबनाची कारवाई

    नागपूरमधील एका बारमध्ये बसून सरकारी फायलींवर सह्या करताना आढळलेल्या अधिकाऱ्याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के याच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

    Read more

    Shrikant Shinde : विरोधकांच्या ‘50 खोके’ घोषणांवर श्रीकांत शिंदेंचा पलटवार- मॅच्युअर व्हा, तुम्ही आता महापालिकेत नाहीत, त्यातून बाहेर या!

    सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, सभागृहात ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर तीव्र चर्चा रंगली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेवेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार चकमक होत आहे. आज लोकसभेत शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जोरदार भाषण करत काँग्रेसवर आणि विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली. श्रीकांत शिंदेंचे भाषण सुरू असताना विरोधकांनी ‘50 खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी केली. यामुळे श्रीकांत शिंदे संतापल्याचे पाहायला मिळाले.

    Read more

    Amit Shah लोकसभेत शहांनी सांगितली अतिरेक्यांच्या खात्म्याची कहाणी, अशी पटली ओळख, 3 महिने माग काढला, नंतर केले ठार

    मंगळवारी लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरवर १ तास १४ मिनिटे भाषण दिले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार मारल्याची माहिती दिली

    Read more

    पीएम मोदींचे संसदेतील संपूर्ण भाषण; काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले- इतकी चर्चा करा की शत्रू घाबरेल!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत भाग घेतला. ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्या १ तास ४० मिनिटांच्या भाषणात म्हटले की, “ऑपरेशन सिंदूर दरम्यान, जगातील कोणत्याही देशाने भारताला स्वतःच्या सुरक्षेसाठी कारवाई करण्यापासून रोखले नाही

    Read more

    जगातल्या कुठल्याही नेत्याने Operation Sindoor थांबवायला सांगितले नाही; डोनाल्ड ट्रम्पच्या 25 दाव्यांना मोदींचा एकच फटका

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आव्हान स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 25 दाव्यांना एकच फटका दिला. जगातल्या कुठल्याही नेत्याने Operation Sindoor थांबवायला सांगितले नसल्याचे मोदींनी लोकसभेत स्पष्ट केले.

    Read more

    Bihar SIR : बिहारमध्ये SIR वर तूर्त बंदी नाही; SCने ECला विचारले- आधार कार्ड व मतदार ओळखपत्र का समाविष्ट करत नाही?

    बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणा (SIR) बाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने SIR ला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यासोबतच, निवडणूक आयोगाला विचारण्यात आले आहे की – मतदार ओळखपत्रासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड का स्वीकारले जात नाही.

    Read more

    Shashi Tharoor : ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, थरूर म्हणाले – मौन व्रत; संसदेत काँग्रेसच्या विचारसरणीवर बोलण्यास नकार दिल्याची चर्चा

    काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोमवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत भाग घेण्याचा प्रश्न टाळला. त्यांनी माध्यमांना सांगितले, ‘मौनव्रत…मौनव्रत’. खरं तर, यापूर्वी अशी बातमी होती की ते संसदेच्या चर्चेत भाग घेऊ शकतात.

    Read more