Mahakumbh महाकुंभासाठी प्रचंड गर्दी, संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद
महाकुंभासाठी प्रयागराजमध्ये अजूनही मोठी गर्दी जमत आहे, गर्दी पाहता प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन आता २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहे.
महाकुंभासाठी प्रयागराजमध्ये अजूनही मोठी गर्दी जमत आहे, गर्दी पाहता प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन आता २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहे.
चित्रपट निर्माती एकता कपूरवर भारतीय सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप आहे. यूट्यूबर विकास पाठक उर्फ ’हिंदुस्तानी भाऊ’ यांनी एकता कपूर, तिचे वडील जितेंद्र, आई शोभा आणि एकताच्या ओटीटी प्लॅटफॉर्म एएलटी बालाजीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
ठेकेदार विकासकामे न करता फक्त बिले सादर करून पैसे उचलत आहेत, असा धक्कादायक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. सातव्या वेतन आयोगाचे लाभ घेता पण जबाबदारी घेत नाही याबद्दल शासकीय अधिकाऱ्यांचीही त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल. या परिसराचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांना भारतात पाठवण्याची प्रक्रिया सुरूच आहे. अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकन लष्करी विमाने येत आहेत. रविवारी देखील, ११२ बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन एक अमेरिकन लष्करी विमान अमृतसर विमानतळावर पोहोचले.
‘भारत टेक्स 2025’ मध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार, 14 फेब्रुवारी) भारत मंडपम येथे पोहोचले. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण जगातील सहाव्या क्रमांकाचे कापड आणि वस्त्र निर्यातदार आहोत. आपली कापड निर्यात 3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 2030 पर्यंत ते 9 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी एलॉन मस्क यांनी भारतातील निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठीचा १८२ कोटी रुपयांचा निधी रद्द केला आहे. मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाने (DOGE) शनिवारी हा निर्णय घेतला.
युद्धात मदत करण्याच्या बदल्यात युक्रेनच्या खनिज साठ्यात वाटा मागण्याची अमेरिकेची ऑफर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी नाकारली आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी रविवारी ही माहिती दिली. या करारांतर्गत अमेरिकेने युक्रेनच्या सर्व खनिज साठ्यांमध्ये ग्रेफाइट, लिथियम आणि युरेनियमसह 50% वाटा मागितला होता.
दिल्लीत आज (सोमवार) होणारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभही १८ फेब्रुवारीऐवजी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. असल्याची माहिती समोर आली आहे.
लालू प्रसाद यादव यांनी ज्या कुंभमेळ्याची संभावना “फालतू या शब्दांनी केली, त्याच कुंभमेळ्यात जाऊन राहुल गांधी आणि प्रियांका गांधी त्रिवेणी संगमात स्नान करणार आहेत. त्यामुळे Indi आघाडीतले मतभेद पुन्हा समोर आले आहेत.
छत्तीसगडमधील 173 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपने सर्व 10 महानगरपालिकांमध्ये महापौर पदे जिंकली आहेत, 35 नगर परिषदांमध्ये आणि 81 नगर पंचायतींमध्ये अध्यक्षपदे मिळवली आहेत.
उत्तर प्रदेशात एक भीषण रस्ते अपघात घडला आहे. रविवारी सकाळी अयोध्येला जाणारी एक मिनी बस एका बिघडलेल्या बसला जोरदार धडकली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत. बाराबंकी येथील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर ही घटना घडली.
जयललिता यांच्या मालमत्तेबाबत बंगळुरूमधील विशेष सीबीआय न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची सर्व जप्त केलेली मालमत्ता तामिळनाडू सरकारला हस्तांतरित करण्याचे आदेश बुधवारी सीबीआय न्यायालयाने दिले.
अमेरिकेतील 14 राज्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे जवळचे सहकारी एलन मस्क यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. एलन मस्क यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) चे प्रमुख बनवण्यात आल्याने ही राज्ये नाराज आहेत. राज्यांच्या मते, एलन यांनी DOGE
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर जोरदार टीका करताना, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी शनिवारी सांगितले की, विरोधी पक्षनेत्याच्या ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांच्या पाकिस्तानी संबंधांची चौकशी करण्यासाठी पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल आणि विशेष तपास पथक स्थापन केले जाईल.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी जर्मनीला सांगितले आहे की, ज्याप्रमाणे अमेरिकेला हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांच्या टीकेला सहन करावे लागले, त्याचप्रमाणे त्यांनी एलन मस्क यांचीही सवय लावली पाहिजे.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन सुरू झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्याच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेला भेट देऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच त्यांच्या प्रशासनाशी आणि अमेरिकन उद्योगपतींशी चर्चा केली
अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीच्या भीतीने अमेरिकेत गेलेले अफगाणी लोक आता पाकिस्तानात अडकले आहेत. कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांबाबत जारी केलेला कार्यकारी आदेश. या आ
महाकुंभाच्या समाप्तीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे काँग्रेस नेत्यांचे कुंभमेळ्याबद्दलचे आकर्षण वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या ३-४ दिवसांत, डीके शिवकुमार, दिग्विजय सिंह आणि सचिन पायलट सारखे काँग्रेसचे दिग्गज महाकुंभात स्नान करताना दिसले असताना, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी देखील कुंभात जाण्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्याच वेळी, महामंडलेश्वर प्रकाशनंद गिरी यांनीही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या कुंभस्नानावर आश्चर्य व्यक्त करून त्यांच्यावर टीका केली आहे.
कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी 17 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या काळात त्यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही असेल. अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळे देखील यात सहभागी होतील.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ६, फ्लॅग स्टाफ रोड येथील बंगल्याची तपासणी केली जाईल. केंद्रीय दक्षता आयोगाने (CVC) 13 फेब्रुवारी रोजी चौकशीचे आदेश जारी केले आहेत. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचा (सीपीडब्ल्यूडी) अहवाल आल्यानंतर हा आदेश देण्यात आला
देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांनी कुंभमेळ्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले, तर कुंभमेळा विनाकारण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लालू म्हणाले ”कुंभ म्हणजे काय? फालतू आहे कुंभ.”
महाराष्ट्रात love jihad विरोधी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केल्यानंतर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांच्या नेत्यांनी आगपाखड केली.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केले. यासोबतच त्यांनी जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली.
कर्नाटकातील बेळगावमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे गोव्याच्या एका माजी आमदाराला रिक्षा चालकाने मारहाण केली आणि घटनेनंतर काही वेळातच माजी आमदाराचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.