CEC नियुक्ती कायद्यावरील सुनावणी लांबली; सुप्रीम कोर्टाने दिला होळीनंतरचा वेळ
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात पुढे ढकलण्यात आली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने सांगितले की वेळेअभावी या प्रकरणाची सुनावणी होळीच्या सुट्टीनंतर होईल.