• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 44 of 1419

    Pravin Wankhade

    ममतांना सुद्धा बाबरीची धास्ती; मशीद बांधायची घोषणा करणाऱ्या आमदाराची पक्षातून हकालपट्टी; एक नवा राजकीय डाव!!

    एरवी मतांसाठी मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्या ममता बॅनर्जींनी सुद्धा बाबरीची धास्ती घेतली. पश्चिम बंगाल मध्ये बाबरी मशीद बांधायची घोषणा करणाऱ्या आमदाराची त्यांनी तृणमूळ काँग्रेस मधून हकालपट्टी करून टाकली.

    Read more

    China : चीनचे पहिले पुनर्वापर करण्यायोग्य रॉकेट प्रक्षेपण अयशस्वी:; ऑर्बिटमध्ये पोहोचले, पण बूस्टर पृथ्वीवर परतताना फुटले

    चीनच्या आघाडीच्या खासगी अंतराळ कंपनी लँडस्पेसने 3 डिसेंबर रोजी आपले पहिले पुनर्वापर करण्यायोग्य रॉकेट ZQ-3 Y1 प्रक्षेपित केले. रॉकेटने यशस्वीरित्या कक्षा गाठली, परंतु पहिल्या टप्प्यातील बूस्टरच्या लँडिंग दरम्यान बिघाड झाला. ते रिकव्हरी साइटच्या वर फुटले.

    Read more

    Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवादी ठार, 3 जवान शहीद; मोदी-शहांच्या स्ट्रॅटेर्जीनंतर चौथ्या दिवशी मोठी चकमक

    छत्तीसगडमध्ये दंतेवाडा-बीजापूर सीमेवर जवानांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. याचवेळी, चकमकीत DRG चे 3 जवान शहीद झाले असून 2 जखमी झाले आहेत. बस्तर रेंजचे IG सुंदरराज पी. यांनी याची पुष्टी केली आहे.

    Read more

    जय पवारच्या लग्नाच्या निमित्ताने पार्थ पवारला बहारीनला नेऊन तिथेच सेटल करण्याचा डाव??

    जय पवारच्या लग्नाच्या निमित्ताने जमीन घोटाळ्यातल्या संशयित पार्थ पवारला बहारीनला नेऊन तिथेच सेटल करण्याचा डाव अजित पवारांनी आखला आहे का??, असा सवाल आता तयार झाला आहे.

    Read more

    Sanchar Saathi App : ‘संचार साथी’ने हेरगिरी शक्य नाही आणि होणार नाही, केंद्राने म्हटले- आदेश बदलण्यास तयार

    केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत सांगितले की, संचार साथी ॲपद्वारे हेरगिरी करणे शक्य नाही आणि हेरगिरी होणारही नाही. केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ॲपबाबत काँग्रेस नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, फीडबॅकच्या आधारावर मंत्रालय ॲप इन्स्टॉल करण्याच्या आदेशात बदल करण्यास तयार आहे.

    Read more

    CM Fadnavis : वृक्षतोड व्हावी असे कुणाचेही मत नाही; पर्यावरण व कुंभमेळा दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या तपोवणातील वृक्षतोडीला विरोध दर्शवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाशिक तपोवनात वृक्षतोड व्हावी असे आमच्यापैकी कुणाचेही मत नाही. या प्रकरणी अधिकाधिक झाडे वाचवण्याचे प्रयत्न केले जातील. आमच्यासाठी पर्यावरण व कुंभमेळा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे ते म्हणालेत.

    Read more

    Uddhav Thackeray : केंद्राने ‘पेगासस’चे नाव बदलून ‘संचार साथी’ केले, उद्धव ठाकरे यांचा आरोप

    स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या सायबर सुरक्षेसाठी केंद्राने आणलेले संचार साथी अॅप हे मुळात हेरगिरीसाठी वापरण्यात येणारे पेगासस तंत्रज्ञान असल्याचा मोठा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सरकारने पेगाससचे नाव बदलून संचार साथी केले. हा जनतेची हेरगिरी करण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मतदान करणाऱ्या लोकांवर पाळत ठेवण्याऐवजी देशावर हल्ले करणाऱ्यांवर जनर ठेवावी, असे ते म्हणालेत.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल म्हणाले-जाती जनगणना देशातील बहुजनांसोबत उघड विश्वासघात, ना आराखडा, ना संसदेत चर्चा; केंद्राने दिले उत्तर

    लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी X पोस्टमध्ये केंद्र सरकारच्या जात जनगणनेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.त्यांनी लिहिले- संसदेत मी सरकारला जात जनगणनेबद्दल प्रश्न विचारला, त्यांचे उत्तर धक्कादायक आहे. ना कोणती ठोस रूपरेषा, ना वेळेनुसार योजना, ना संसदेत चर्चा, आणि ना जनतेशी संवाद. इतर राज्यांच्या यशस्वी जात जनगणनेच्या रणनीतीतून शिकण्याची कोणतीही इच्छा नाही. मोदी सरकारची ही जात जनगणना देशातील बहुजनांसोबत उघड विश्वासघात आहे

    Read more

    Mansukh Mandaviya : नवी कामगार संहिता एप्रिल 2026 पर्यंत लागू होईल; सरकार लवकरच मसुदा नियम पूर्व-प्रकाशित करेल

    कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी सांगितले की, चार नवीन कामगार संहितांचे मसुदा नियम लवकरच पूर्व-प्रकाशित केले जातील. त्यानंतर 5 दिवसांपर्यंत कोणीही सूचना देऊ शकेल आणि नंतर अंतिम अधिसूचना येईल.

    Read more

    Tatkal Ticket : तत्काळ विंडो तिकिटासाठी आता OTP आवश्यक; बुकिंग सुरक्षित करण्यासाठी रेल्वेचा निर्णय

    भारतीय रेल्वे तत्काळ तिकिटांच्या काउंटर बुकिंगमध्ये बदल करणार आहे. आता प्रवाशांना तिकीट कन्फर्म करण्यासाठी मोबाईलवर OTP व्हेरिफाय करावा लागेल. ही प्रणाली पुढील काही दिवसांत देशभरातील सर्व गाड्यांवर लागू होईल.

    Read more

    Sheetal Tejwani : शीतल तेजवानीला अखेर अटक; मुंढवा येथील अमेडिया कंपनीच्या व्यवहाराप्रकरणी कारवाई

    पुण्यातील पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा कोट्यवधी रुपयांच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार शीतल किसनचंद तेजवानी हिला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे नाव समोर आल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले होते. शीतल तेजवानी परदेशात पळून गेल्याची चर्चा असतानाच तिला बेड्या ठोकल्याने तपासाला वेग येणार आहे..

    Read more

    KK Muhammed, : मुस्लिमांनी मथुरा-ज्ञानवापीवर दावा सोडून द्यावा:हे हिंदूंसाठी मक्का-मदिनासारखे; ASIचे माजी अधिकारी केके मुहम्मद यांचे प्रतिपादन

    इंडिया आर्कियोलॉजिकल सर्वे (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक केके मुहम्मद यांनी म्हटले आहे की, मुस्लिमांनी आणखी दोन ऐतिहासिक जागा सोडून द्याव्यात, जी मंदिरेदेखील आहेत. पहिली- मथुरा, जे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे. दुसरी- ज्ञानवापी, जे भगवान शिवाशी संबंधित आहे.

    Read more

    गोदावरी वाहणार खळखळ आणि निर्मळ; क्लीन गोदावरी बाँड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टिंग!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे नाशिक महापालिकेच्या ‘एनएमसी क्लीन गोदावरी बाँड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटानादाद्वारे लिस्टिंग करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मंत्र दिला आहे, तो म्हणजे ‘विकास भी और विरासत भी’ आणि 2027 ला होणारा सिंहस्थ कुंभमेळा या मंत्राचे प्रतीक आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन अधिक गतीने विकासकामे करणार आहे, ज्यात पायाभूत सुविधेच्या अंतर्गत “क्लीन गोदावरी” कार्यक्रम हाती घेतला आहे, ज्याने गोदावरी नदीत फक्त प्रकिया केलेलेच स्वच्छ पाणी अखंड वाहत राहील.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे नाशिक महापालिकेच्या ‘एनएमसी क्लीन गोदावरी बाँड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटानादाद्वारे लिस्टिंग करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मंत्र दिला आहे, तो म्हणजे ‘विकास भी और विरासत भी’ आणि 2027 ला होणारा सिंहस्थ कुंभमेळा या मंत्राचे प्रतीक आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन अधिक गतीने विकासकामे करणार आहे, ज्यात पायाभूत सुविधेच्या अंतर्गत “क्लीन गोदावरी” कार्यक्रम हाती घेतला आहे, ज्याने गोदावरी नदीत फक्त प्रकिया केलेलेच स्वच्छ पाणी अखंड वाहत राहील.

    Read more

    Vedamurti Devavrat Rekhe, : 50 दिवसांत कठीण ‘दंडक्रम पारायण’ केले पूर्ण, अहिल्यानगरच्या वेदमूर्ती देवव्रत रेखेंचे PM नरेंद्र मोदींकडून कौतुक

    अहिल्यानगर जिल्ह्यातील एका 19 वर्षीय तरुणाने आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने आणि कठोर साधनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे असे या तरुणाचे नाव असून, त्याने काशी (वाराणसी) येथे अत्यंत कठीण मानले जाणारे ‘दंडक्रम पारायण’ पूर्ण केले आहे. त्याच्या या अद्वितीय कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत त्याचे भरभरून कौतुक केले आहे.

    Read more

    पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात शितल तेजवानीला अटक; पार्थ अजून मोकळाच!!

    पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात पोलिसांनी शितल तेजवानीला मुख्य आरोपी बनवले असून तिला आज अटक केली पण पार्थ पवार अजून मोकळाच राहिला. मुंढव्यातील 40 एकर जमीन घोटाळाप्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. त्यामध्ये, प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी मुख्य सूत्रधार म्हणून शीतल तेजवानीची या आधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई केली.

    Read more

    Pakistan : पाकने श्रीलंकेला एक्सपायर झालेले मदत साहित्य पाठवले; पूरग्रस्तांना पाठवलेल्या फूड पॅकेटचे फोटे व्हायरल

    पाकिस्तानने श्रीलंकेला मुदत संपलेली (एक्सपायर्ड) मदत सामग्री पाठवली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेत आलेल्या ‘दितवाह’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने मदत पाठवली होती, परंतु त्या फूड पॅकेट्सवर ऑक्टोबर २०२४ ची समाप्तीची तारीख (एक्सपायरी डेट) होती.

    Read more

    Rubaiya Sayeed : मेहबूबा मुफ्तींच्या बहिणीच्या अपहरणाचा आरोपी 35 वर्षांनी अटकेत; तेव्हा व्ही.पी. सिंह सरकारने सुटकेच्या बदल्यात 5 दहशतवाद्यांना सोडले होते

    तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबैया सईद यांचे 1989 मध्ये घरातून अर्धा किलोमीटर दूर अपहरण करण्यात आले होते. रुबैया या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या बहीण आहेत.

    Read more

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- जग मोदींचे लक्षपूर्वक ऐकते, यातून भारताची वाढती ताकद दिसते; आता देशाला योग्य स्थान मिळत आहे

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे प्रमुख मोहन भागवत यांनी सोमवारी सांगितले की, आज जागतिक स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले जाते आणि हे भारताची वाढती जागतिक ताकद दर्शवते. भारत आता जगात आपले योग्य स्थान प्राप्त करत आहे.

    Read more

    Pakistan : मुनीर यांची पदोन्नती थांबवून लंडनला गेले शाहबाज; 3 दिवसांनंतरही CDF बनले नाही पाक लष्करप्रमुख

    पाकिस्तानमध्ये 27व्या घटनादुरुस्तीनंतरही फील्ड मार्शल आसिम मुनीर चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस (CDF) बनू शकले नाहीत. यासाठी 29 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी होणार होती, परंतु 3 दिवसांनंतरही हे पद रिक्त आहे.

    Read more

    कुत्र्यापायी सत्ता गेली, तरी काँग्रेस नेत्यांची जिरली नाही मस्ती; कॅमेऱ्यासमोर भुंकल्या रेणुका चौधरी!!

    कुत्र्यापायी सत्ता गेली, तरी काँग्रेस नेत्यांची जिरली नाही मस्ती; कॅमेऱ्यासमोर भुंकल्या रेणुका चौधरी!!, असेच चित्र संसदेच्या परिसरात दिसले.

    Read more

    Apple : ॲपलने अमर सुब्रमण्य यांना AI टीमचे उपाध्यक्ष केले; मशीन लर्निंग रिसर्चचे नेतृत्व करणार

    ॲपलने अमर सुब्रमण्य यांना त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (कृत्रिम बुद्धिमत्तेचे) उपाध्यक्ष बनवले आहे. कंपनीने त्यांना 1 डिसेंबर रोजी कामावर घेतले आहे. सुब्रमण्य हे जॉन जियानँड्रिया यांची जागा घेतील, जे मे 2026 मध्ये निवृत्त होत आहेत.

    Read more

    Indian Navy Chief : भारतीय नौदल प्रमुख म्हणाले- ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू; अरबी समुद्रात सतत ऑपरेशन्स

    नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. मे 2025 मध्ये सुरू झालेल्या या ऑपरेशनदरम्यान भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाविरुद्ध मजबूत तैनाती केली. यामुळे पाकिस्तान नौदल आपली जहाजे बंदरांमधून बाहेर काढू शकले नाही आणि अरबी समुद्राजवळच्या मकरान किनारपट्टीपर्यंतच मर्यादित राहिले.’

    Read more

    इकडे महाराष्ट्रात महायुती फुटण्याकडे डोळे लावून बसले; तिकडे झारखंडमध्ये Indi आघाडीच्या पायाचे दगड हादरले!!

    इकडे महाराष्ट्रात महायुती फुटण्याकडे डोळे लावून बसले; तिकडे झारखंडमध्ये Indi आघाडीच्या पायाचे दगड हादरले!!, असेच राजकीय चित्र आज दिसून आले.

    Read more

    Rajnath Singh : राजनाथ म्हणाले- नेहरूंना सरकारी पैशातून बाबरी बांधायची होती, सरदार पटेलांनी त्यांना असे करण्यापासून रोखले

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी दावा केला की, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू बाबरी मशिदीचे बांधकाम सरकारी पैशातून करू इच्छित होते, परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांना तसे करू दिले नाही.

    Read more

    Prithviraj Chavan : सरकारला मतपेट्यांमध्ये घालमेल करण्यासाठी 15 दिवस मिळतील, निवडणूक निकाल लांबणीवर पडल्याने पृथ्वीराज चव्हाणांना संशय

    राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र सावळागोंधळ सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडले आहेत. यामुळे आता मतपेट्या पुढील 15-16 दिवस गोडाऊनमध्ये पडून राहतील. हा कालावधी सरकारला त्यामध्ये काही ‘घालमेल’ किंवा फेरफार करण्यासाठी पुरेसा आहे,” अशी भीती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

    Read more