• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 42 of 1314

    Pravin Wankhade

    Yunnus : युनूस म्हणाले- भारत ट्रम्पसोबत ट्रेड डील करण्यात फेल; आम्ही 17% टॅरिफ कमी केला, बांगलादेशी कापड उद्योगाला फायदा

    बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस म्हणाले की, भारत अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यात अपयशी ठरला आहे. ते म्हणाले की, कराराच्या अभावामुळे, भारताला आता २५% शुल्क द्यावे लागेल, जे बांगलादेशपेक्षा जास्त आहे.

    Read more

    राहुल गांधी आणि तेजस्वी यादवांनी आरोपांचे हिट अँड रन केले; पण निवडणूक आयोगाने बरोबर कायद्याच्या कचाट्यात अडकवले!!

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभेतले विरोधी पक्षनेते एकाच कॅटेगरीत आले‌. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी आरोपांचे हिट अँड रन केले, पण निवडणूक आयोगाने त्यांना बरोबर कायद्याच्या कचाट्यात अडकवले!!

    Read more

    राहुल गांधी म्हणजे पावसाळ्यातला बेडूक, फक्त निवडणुका आल्या की बिहारमध्ये येतात; प्रशांत किशोर यांचे शरसंधान!!

    लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बिहार मधल्या मतदार यादीच्या मुद्द्यावर संपूर्ण देशभर गाजावाजा केला निवडणूक आयोगापासून ते भाजप पर्यंत सगळ्यांना ठोकून काढले. पण राहुल गांधी नेमके काय आहेत??, याची पोल प्रशांत किशोर यांनी खोलली.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- शेतकरी कायद्यावर अरुण जेटलींनी धमकावले होते; जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर- त्यांच्या मृत्यूनंतर एक वर्षाने कायदा आला

    काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर शेतकरी कायद्याला आणि सरकारला विरोध केल्याबद्दल धमकी दिल्याचा आरोप केला. राहुल म्हणाले की, मला आठवते की जेव्हा मी शेतकरीविरोधी कायद्यांविरुद्ध लढत होतो तेव्हा अरुण जेटलींना मला धमकावण्यासाठी पाठवण्यात आले होते.

    Read more

    Robert Vadra : गुरुग्राम लँड डीलप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांना न्यायालयाची नोटीस; ईडीचे आरोपपत्र; 7.5 कोटींची जमीन 58 कोटींना विकल्याचा आरोप

    शनिवारी, दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने हरियाणातील गुरुग्रामच्या शिकोहपूर गावात जमीन व्यवहार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि इतर आरोपींना नोटीस बजावली. पुढील सुनावणीपूर्वी न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यासाठी आरोपींना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होईल.

    Read more

    लांडगा आला रे आला म्हणून लिबरल लोक शिंदेंच्या हातातून शिवसेना घेताहेत “काढून”!!

    लांडगा आला रे आला म्हणून एकनाथ शिंदेंच्या हातून शिवसेना घेताहेत काढून हेच सत्य वकील असीम सरोदे यांच्या वक्तव्यातून समोर आले. पुढच्या महिन्यात शिवसेनेचा निकाल सुप्रीम कोर्टात लागतोय एकनाथ शिंदे यांच्या हातातून शिवसेना निसटते आहे त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार नाही, असा दावा असीम सरोदे यांनी केला.

    Read more

    Manohar Lal Khattar : खट्टर म्हणाले- राहुल गांधींनी ECला निवडणुक हेराफेरीचे पुरावे द्यावेत, संसदेत व्यत्यय आणणे विरोधकांचा एकमेव उद्देश

    शनिवारी गुरुग्राममध्ये केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राहुल गांधी यांच्या निवडणुकीत झालेल्या हेराफेरीच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचे पुरावे निवडणूक आयोगाला द्यावेत. खट्टर म्हणाले की, केवळ २०२४ मध्येच नाही, तर २०१९ मध्येही राहुल गांधी हेच बोलत होते आणि २०२९ च्या निवडणुकांबद्दलही ते हेच म्हणतील.

    Read more

    Colombia : कोलंबियाच्या राष्ट्रपतींनी दोन माजी पॉर्न स्टार्सना मंत्रिपदी नियुक्त केले; उपराष्ट्रपतींची नाराजी

    कोलंबियामध्ये दोन माजी पॉर्नस्टार्सना उपमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी अलेजांड्रा उमाना आणि जुआन कार्लोस फ्लोरियन यांची समानता मंत्रालयात नियुक्ती केली आहे.

    Read more

    तामिळनाडूचे वारे महाराष्ट्रात आणले; पवारांचे शिलेदार सनातन हिंदू धर्माला शिव्या देऊ लागले!!

    मालेगाव बॉम्बस्फोटातले सगळे आरोपी निर्दोष सुटले. सोनिया गांधी प्रणित काँग्रेसचा हिंदू दहशतवादाचा narrative उद्ध्वस्त झाला. याबद्दलचा संताप काँग्रेस पेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त उमटला. त्यामुळे तामिळनाडूचे वारे महाराष्ट्रात आणले आणि पवार बुद्धीचे शिलेदार सनातन हिंदू धर्माला शिव्या देऊ लागले, असे महाराष्ट्रात घडून आले.

    Read more

    Iranian : 2000 इराणी धर्मगुरूंची ट्रम्प यांच्या हत्येची मागणी; म्हणाले- ट्रम्प यांना मारणे हलाल, सुलेमानींच्या मृत्यूचा बदला प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य

    इराणमधील २००० हून अधिक धर्मगुरूंनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची उघडपणे मागणी केली आहे. या धर्मगुरूंनी ट्रम्प यांचे रक्त हलाल असल्याचे म्हटले आहे, म्हणजेच जर कोणी त्यांना मारले तर तो गुन्हा नाही.

    Read more

    Amarnath Yatra : अमरनाथ यात्रा एक आठवडा आधीच बंद; मुसळधार पावसामुळे बालटाल व पहलगाम दोन्ही मार्ग खराब

    अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. ही यात्रा ९ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार होती, परंतु मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे ३ ऑगस्ट रोजीच ती थांबवण्यात आली.काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी म्हणाले की, पावसामुळे यात्रा मार्गांचे बरेच नुकसान झाले आहे. बालटाल आणि पहलगाम दोन्ही मार्गांवर दुरुस्तीचे काम केले जाईल, त्यामुळे यात्रा थांबवावी लागली आहे. मार्गांवर सतत मशीन आणि कर्मचारी तैनात असल्याने यात्रा पुन्हा सुरू करणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.

    Read more

    Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांचा आरोप- माझे आणि पत्नीचे नाव मतदार यादीतून काढले; आयोगाने फेटाळला दावा

    विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. शनिवारी पाटणा येथे पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव यांनी स्वतः ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की बीएलओने येऊन आमची पडताळणी केली. तरीही आमचे नाव मतदार यादीत नाही.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- भारताची निवडणूक व्यवस्था मृत झाली; लोकसभा निवडणुकीत 15 जागांवर हेराफेरी

    राहुल गांधी यांनी गेल्या १० दिवसांत तिसऱ्यांदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. राहुल म्हणाले, भारताची निवडणूक व्यवस्था मृतप्राय झाली आहे. लोकसभा निवडणुकीत कशी धांधली होऊ शकते हे आम्ही येत्या काळात तुम्हाला सिद्ध करू आणि ते घडलेही आहे.

    Read more

    CM Fadnavis : पुण्यातील दादागिरी विकासातील सर्वात मोठा अडथळा; मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘दादांना’ इशारा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांच्या वाढत्या दादागिरी बद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, पुण्याच्या विकासातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. तसेच, अशा दबावामुळे उद्योगपतींच्या खर्चावर आणि व्यवसाय धोरणावर परिणाम होतो, ज्यामुळे ते जागतिक स्पर्धेत टिकू शकत नाहीत.

    Read more

    Prithviraj Chavan : भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा, माजी CM पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य; शिंदेंच्या शिवसेनेचा मुंबईत मोर्चा

    भगव्या दहशतवादाला भगवा दहशतवाद न म्हणता सनातन किंवा हिंदुत्ववादी दहशत वाद म्हणा, असे विधान करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्या वादाला फोडणी दिली आहे. त्यांच्या या विधानाचे देशाच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. विशेषतः मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेने मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला आहे.

    Read more

    Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात जन्मठेप; कोर्टाने काल दोषी ठरवले होते; मोलकरणीचे केले होते शोषण

    बंगळुरूमधील एका विशेष न्यायालयाने माजी जेडीएस खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला मोलकरीण बलात्कार प्रकरणात शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रेवण्णाला ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने शुक्रवारी रेवण्णाला दोषी ठरवले. रेवण्णाने आपण काहीही चुकीचे केले नाही असा दावा करत कमी शिक्षेसाठी न्यायालयात अपील केले होते.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान- अटक करून दाखवाच; फडणवीसांचेही प्रत्युत्तर- अर्बन नक्षलीसारखे वागाल तर तुम्हालाही अटक होईल

    अर्बन नक्षली म्हणून अटक करून दाखवाच, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यावरून फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. जो कायद्याने राहतो, त्याला अटक करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, कायदा न वाचता आलेली ही कॉमेंट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तुम्ही अर्बन नक्षली सारखे वागाल तर तुम्हालाही अटक होईल, अशा शब्दात फडणवीसांनी सुनावले आहे.

    Read more

    Prime Minister Narendra Modi : “व्होकल फॉर लोकल” या मंत्राला कृतीत आणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासियांना स्वदेशीचे आवाहन

    भारतीयांच्या घामातून, मेहनतीतून आणि कौशल्यातून तयार होणाऱ्या प्रत्येक वस्तूला ‘स्वदेशी’ म्हणतात,” अशी साधी आणि प्रभावी व्याख्या करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमध्ये नागरिकांना “व्होकल फॉर लोकल” या मंत्राचे महत्त्व समजावून देत, स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे आवाहन केले.

    Read more

    Robert Vadra : गुरुग्राम जमीन व्यवहार प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांना कोर्टाची नोटीस; मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांवर २८ ऑगस्टला सुनावणी

    काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना हरियाणातील गुरुग्राममधील शिकोहपूर गावातील संशयित जमीन व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोर्टाने नोटीस बजावली आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने वाड्रा आणि इतर १० आरोपींना ही नोटीस पाठवली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

    Read more

    मोदी, योगी, मोहन भागवत यांची नावे घेतल्याशिवाय मारहाण थांबवली नाही, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा एटीएसवर गंभीर आरोप

    मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महाराष्ट्र एटीएसवर गंभीर आरोप करताना खळबळजनक खुलासा केला आहे. “२४ दिवस अमानुष मारहाण झाली.

    Read more

    पृथ्वीराज बाबांना झालंय काय??, ते एकदम सुशीलकुमार + चिदंबरम + दिग्विजय यांच्या रांगेत जाऊन का बसले??

    पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या मुरब्बी आणि प्रगल्भ नेत्याला नेमकं झालंय काय??, ते एकदम सुशीलकुमार शिंदे + पी. चिदंबरम आणि दिग्विजय सिंह यांच्या रांगेत जाऊन का बसलेत??, असा सवाल पृथ्वीराज बाबांच्या वक्तव्यामुळे समोर आला.

    Read more

    पृथ्वीराज चव्हाणांच्या सनातनी आतंकवाद या विधानावरुन प्रकाश महाजनांनी त्यांना सुनावले; शिंदे सेनाही आक्रमक

    राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन झालेल्या विशेष न्यायालयाने 2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचा निकाल दिला. पुराव्याअभावी या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली.

    Read more

    मुंबईत ठाकरे बंधूंना स्ट्राईक, पुण्यात दादागिरीचा बाउन्सर; फडणवीसांच्या खेळीने काँग्रेस + पवार क्लीन बोल्ड!!

    मुंबईत ठाकरे बंधूंना स्ट्राईक, पुण्यात दादागिरीचा बाऊन्सर; फडणवीसांच्या खेळीने काँग्रेस + पवार क्लीन बोल्ड!!, असे महाराष्ट्राच्या राजकारणातले चित्र निर्माण झालेय.

    Read more

    GST Collection जुलैमध्ये GST संकलन 1.96 लाख कोटी रुपये; गतवर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ; जूनमध्ये GST मधून 1.85 लाख कोटी

    जुलै २०२५ मध्ये वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) सरकारने १.९६ लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. वार्षिक आधारावर त्यात ७.५% वाढ झाली आहे. शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, एक वर्षापूर्वी म्हणजेच जुलै २०२४ मध्ये सरकारने १.८२ लाख कोटी रुपये जीएसटी गोळा केले होते.

    Read more

    National Film Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर : शाहरुख खान आणि विक्रांत मॅसी सर्वोत्तम अभिनेता, राणी मुखर्जी सर्वोत्तम अभिनेत्री, ‘१२वी फेल’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

    भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा ७१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार केंद्र सरकारने जाहीर केले आहेत. २०२३ सालातील उत्कृष्ट चित्रपट, अभिनय, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजूंना या पुरस्कारांमधून गौरवण्यात आले आहे.

    Read more