Devendra Fadnavis : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले; फडणवीस म्हणाले- कलम 370 संपवून आंबेडकरांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले!
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले. दोन्ही सभागृहांत सध्या संविधानावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर शेलक्या शब्दांत टीका करून संविधानाचे महत्त्व पटवून दिले. या अधिवेशनात जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर वर्षानिमित्त मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल या विषयावर चर्चा घेण्यात आली. आता विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार 30 जून 2025 रोजी होणार आहे.