• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 38 of 1418

    Pravin Wankhade

    Mamata Banerjee : SIR वरून ममतांचा महिलांना सल्ला- नाव कापले तर तुमची स्वयंपाकाची भांडी आहेत, त्यांच्याद्वारे लढा

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धोकादायक म्हटले आहे. ममता यांनी गुरुवारी कृष्णानगर येथील सभेत सांगितले की, शहा यांच्या डोळ्यात दहशत आहे. त्यांच्या एका डोळ्यात तुम्हाला दुर्योधन तर दुसऱ्या डोळ्यात दुःशासन दिसेल.

    Read more

    Eknath Shinde : शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार- मुंबई लुटणाऱ्यांनी अमित शहांवर बोलू नये; स्वत:चे पायपुसणे करून घेणाऱ्यांना टीका करायचा अधिकार नाही

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “कोविड काळात मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी आणि मुंबई लुटणाऱ्यांनी अमित शहा यांच्यावर बोलणे ही मोठी शोकांतिका आहे,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. तसेच स्वत:चे पायपुसणे करून घेणाऱ्यांना दुसऱ्यावर टीका करायचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

    Read more

    Delhi HC : इंडिगो संकटावर दिल्ली हायकोर्टाने सरकारला फटकारले; ₹4 हजारांचे तिकीट ₹30 हजारपांर्यंत कसे पोहोचले; तुम्हीच ही परिस्थिती निर्माण होऊ दिली

    इंडिगो संकटावर दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला फटकारले. न्यायालयाने विचारले की, जेव्हा एअरलाइन अयशस्वी झाली होती, तेव्हा सरकारने काय केले? विमानांच्या तिकिटांच्या किमती 4-5 हजार रुपयांवरून 30,000 रुपयांपर्यंत कशा पोहोचल्या? इतर एअरलाइन्सनी याचा फायदा कसा घेतला? तुम्ही काय कारवाई केली? तुम्हीच परिस्थितीला या अवस्थेपर्यंत पोहोचू दिले.

    Read more

    पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर आठवड्याच्या आतच ट्रम्पचा मोदींना फोन; जागतिक सामरिक सहकार्यावर चर्चा!!

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर लादीमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर अवघ्या आठवड्या भराच्या आतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. दोन्ही नेत्यांमध्ये जागतिक सामरिक सहकार्यावर चर्चा झाली.

    Read more

    कायदा खुंटीवर टांगून ममतांच्या TMC खासदाराने संसद परिसरात ओढली इ सिगरेट; वर त्याचे केले समर्थन!!

    संपूर्ण देशात इ सिगरेट वर बंदी असताना कायदा खुंटीवर टांगून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या वयोवृद्ध खासदाराने संसद परिसरात इ सिगरेट ओढली. वर आपल्या कृतीचे समर्थनही केले.

    Read more

    Humayun Kabir : निलंबित TMC आमदार हुमायू म्हणाले- मी बंगालचा ओवैसी; 2026 मध्ये किंगमेकर बनेन, माझ्याशिवाय सरकार बनणार नाही

    बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) मधून निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी मंगळवारी सांगितले की, ते बंगालचे ओवैसी आहेत. हुमायूंनी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशी असलेल्या त्यांच्या जवळच्या संबंधांचे वर्णन करताना विनोदी शैलीत सांगितले – मी त्यांच्याशी बोललो आहे. ते मला म्हणाले आहेत की ते हैदराबादचे ओवैसी आहेत आणि मी बंगालचा ओवैसी आहे.

    Read more

    CJI Surya Kant : रोहिंग्याप्रकरणी CJIच्या समर्थनार्थ 44 माजी न्यायाधीश; म्हणाले- विधानाचा चुकीचा अर्थ काढला

    रोहिंग्या प्रकरणात CJI सूर्यकांत यांच्या टिप्पणीच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालय आणि देशभरातील उच्च न्यायालयांचे 44 न्यायाधीश पुढे आले आहेत. 9 डिसेंबर रोजी सर्व न्यायाधीशांच्या स्वाक्षरीचे पत्र जारी करण्यात आले.

    Read more

    नवी मुंबईत प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांच्या किंमती कमी करण्याचा प्रस्ताव फडणवीस सरकारच्या विचाराधीन

    सिडको प्राधिकरणाच्या वतीने नवी मुंबई येथे पंतप्रधान आवास योजनेतून बांधलेल्या घरांच्या किंमती कमी करण्याबाबत आज विधानसभेच्या समिती सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल संसद अधिवेशनादरम्यान जर्मनीला जाणार; भाजपने म्हटले- त्यांच्यासाठी LoP म्हणजे लीडर ऑफ पर्यटन

    काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आगामी जर्मनी दौऱ्यावरून राजकारण तापले आहे. भाजपने संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राहुल यांच्या परदेश दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. कंगना रनोट, संजय जयस्वाल यांच्यासह अनेक भाजप खासदारांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    गडचिरोलीत माओवादी नक्षलवादाच्या प्रभावात मोठ्या प्रमाणात घट; सुरक्षा मोहिमेला मोठे यश; अति दुर्गम भागात पोलीस चौक्या नेमण्याचे निर्देश

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसुत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार राज्यस्तरीय गठीत समितीची आढावा बैठक विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात संपन्न झाली.

    Read more

    Adani Group : अदानी समूह भारतात ₹10-12 लाख कोटी गुंतवणार; 6 वर्षांत पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांमध्ये खर्च होईल

    अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी सांगितले की, पुढील 6 वर्षांत ते भारतात ₹10 ते 12 लाख कोटींपर्यंत गुंतवणूक करतील. हा पैसा पायाभूत सुविधा, खाणकाम, अक्षय ऊर्जा, बंदरे आणि इतर क्षेत्रांमध्ये खर्च केला जाईल.

    Read more

    US Soybean : भारतात अमेरिकन सोयाबीन विकण्याची परवानगी मिळण्याची शक्यता; यूएस अधिकारी म्हणाले- पहिल्यांदाच इतकी चांगली ऑफर मिळाली

    भारत आणि अमेरिका यांच्यातील करारावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यानच एक मोठे अपडेट समोर आले आहे. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीयर यांचे म्हणणे आहे की, भारताने कृषी क्षेत्राबाबत आतापर्यंतची ‘सर्वोत्तम ऑफर’ दिली आहे.

    Read more

    Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींवरून विधानसभेत विवाद; विरोधकांचा सरकारला घेरण्याचा प्रयत्न; सत्ताधाऱ्यांचा बहिणींच्या नादी न लागण्याचा इशारा

    राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा विधिमंडळात गाजली. आज (बुधवार, १० डिसेंबर) हिवाळी अधिवेशनादरम्यान या योजनेतील कथित घोटाळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी केवायसी प्रक्रिया आणि बोगस लाभार्थ्यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी आदिती तटकरे आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत विरोधकांवर जोरदार पलटवार केला.

    Read more

    शरद पवारांच्या घरच्या पार्टीत राहुल गांधी + गौतम अदानी सामील; 86 व्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय मैत्री प्रतिमा निर्मिती!!

    शरद पवारांच्या घरच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी काल रात्री सामील झाले. 86 व्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांनी आपली सर्वपक्षीय मैत्री प्रतिमा निर्मिती केली.

    Read more

    Tirupati Temple : तिरुपती मंदिरात लाडूनंतर दुपट्ट्यात घोटाळा; सिल्क असल्याचे सांगून ₹350चे पॉलिस्टरचे दुपट्टे ₹1300ला विकले

    आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात लाडूंच्या नंतर प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या दुपट्ट्यांच्या (अंगवस्त्रम) विक्रीत घोटाळा उघडकीस आला आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, एका कंत्राटदाराने शुद्ध मलबेरी सिल्कच्या दुपट्ट्यांऐवजी सलग 100% पॉलिस्टरचे दुपट्टे पुरवले.

    Read more

    Ajit Pawar : दारू दुकानासाठी आता सोसायटीची NOC बंधनकारक; अजित पवारांची विधानसभेत मोठी घोषणा

    निवासी भागात दारूचे दुकान सुरू करण्यावरून किंवा स्थलांतरित करण्यावरून होणाऱ्या वादावर राज्य सरकारने तोडगा काढला आहे. आता राज्यातील कोणत्याही भागात किरकोळ विदेशी मद्य विक्री (Wine Shop) आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांचे स्थलांतर करायचे असल्यास, संबंधित नोंदणीकृत सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घेणे बंधनकारक असणार आहे. हा नियम संपूर्ण राज्यासाठी एकसमान पद्धतीने लागू केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

    Read more

    CM Fadnavis : मुंढवा जमीन प्रकरणात कुणालाही वाचवले जाणार नाही:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

    मुंढवा जमीन प्रकरणात कुणालाही वाचवण्याची सरकारची भूमिका नाहीये. जो दोषी असेल, त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे या संदर्भात आतापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार याची सगळी माहिती आम्ही उच्च न्यायालयाला देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

    Read more

    Parth Pawar : एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का नाही? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाचा पुणे पोलिसांना सवाल

    मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना हा सवाल उपस्थित केला आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी यांना सध्या अटक करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. मात्र, पार्थ पवार यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याचे पाहायला मिळत होते. आता मुंबई उच्च न्यायालयानेच पार्थ पवारांचे नाव का नाही असा सवाल उपस्थित केल्याने प्रकरणी नवे वळण मिळणार असल्याचे दिसत आहे.

    Read more

    Bawankule : जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द; महसूलमंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय, कोट्यवधी नागरिकांना दिलासा

    राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. अकृषिक परवानगीची अट रद्द केल्यानंतर आता त्यापुढील ‘सनद’ घेण्याची क्लिष्ट अटही रद्द करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक २०२५’ विधानसभेत मांडले, ज्याचे सत्ताधारी आणि विरोधकांकडून स्वागत करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रात भीक मागण्यावर बंदी येणार विधानसभेनंतर विधान परिषदेतही विधेयक मंजूर; मंजूरीवेळी गोंधळ

    राज्यात भीक मागण्यास प्रतिबंध घालणारे बहुचर्चित विधेयक मंगळवारी विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही मंजूर करण्यात आले. मात्र, हे विधेयक मंजूर होताना सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. विधेयकातील त्रुटी, शीर्षकातील संदिग्धता आणि प्रशासनाच्या स्पष्टीकरणावर खुद्द तालिका सभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, महिला अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्याने पाठवलेले ‘शक्ती विधेयक’ केंद्र सरकारने नाकारल्याची महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

    Read more

    Amit Shah : शहा म्हणाले-73 वर्षे PMनीच निवडणूक आयुक्त निवडले; राहुल यांचे भाषण लिहिणारे तथ्य पाहत नाहीत

    लोकसभेत निवडणूक सुधारणा, SIR आणि मतचोरीवरील चर्चेदरम्यान मंगळवारी राहुल गांधींनी सरकारला 3 प्रश्न विचारले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी आज बुधवारी त्यांची उत्तरे दिली.

    Read more

    Supreme Court : BLOच्या सुरक्षेबाबत सुप्रीम कोर्टाची ECI ला नोटीस; CJI म्हणाले- परिस्थिती हाताळा नाहीतर अराजकता पसरेल

    सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये एसआयआर (SIR) आणि बीएलओ (BLO) यांच्या आत्महत्येसंबंधी एका प्रकरणावर सुनावणी केली. न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे.

    Read more

    Amit Shah, : शहा म्हणाले- वंदे मातरमला विरोध काँग्रेसच्या रक्तात; इंदिरा गांधी घोषणा दिल्याबद्दल तुरुंगात पाठवायच्या

    राज्यसभेत “वंदे मातरम” या राष्ट्रीय गीतावर बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ज्यांना वंदे मातरमचे महत्त्व समजत नाही ते ते निवडणुकांशी जोडत आहेत. एक दिवस आधी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी लोकसभेत विचारले की हे गाणे १५० वर्षांपासून देशाच्या आत्म्याचा भाग आहे. “मग आज त्यावर चर्चा का होत आहे?” “मी तुम्हाला सांगतो: कारण बंगालच्या निवडणुका येत आहेत. मोदी त्यात भूमिका बजावू इच्छितात.”

    Read more

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाच्या जागतिक दर्जाच्या विकासाला फडणवीस सरकारची मंजुरी

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथील विधानभवन स्थित मंत्री परिषद सभागृहात शिखर समितीची बैठक झाली. यामध्ये स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ (तुळापूर) आणि समाधी स्थळ (वढू बुद्रुक) यांच्या सुधारित विकास आराखड्यास अंतिम मंजुरी देण्यात आली.

    Read more

    राहुल गांधींना प्रत्युत्तर देताना अमित शाहांनी लोकसभेत वाचून दाखविली भाजप हरल्याची यादी!!

    मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR च्या मुद्द्यावर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत भाजप हरल्याची यादी वाचून दाखविली.

    Read more