Pawan Kalyan ‘भारताला फक्त दोन नव्हे तर अनेक भाषांची गरज आहे’,
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण Pawan Kalyan यांनी भारतात भाषिक विविधतेला प्रोत्साहन देण्याची बाजू मांडली आहे.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण Pawan Kalyan यांनी भारतात भाषिक विविधतेला प्रोत्साहन देण्याची बाजू मांडली आहे.
द्रमुकने आरोप फेटाळले ; द्रमुक सरकारने अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला त्याच दिवशी हे आरोप समोर आले
तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुका साधारण एक वर्षांवर आल्या असताना केवळ त्या निवडणुकीत राजकीय लाभ मिळावा म्हणून सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध वातावरण तापवायचे म्हणून वाटेल तसे प्रयत्न चालवले आहेत.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीन, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे ५९ परदेशी दहशतवादी असे एकूण ७६ दहशतवादी सक्रिय आहेत.
४ मार्च रोजी, होळी आणि रमजानची शुक्रवारची नमाज एकत्र आहे. उत्तर प्रदेशातील ७ जिल्ह्यांमध्ये, मशिदी, मदरसे आणि थडग्यांना रंगांपासून संरक्षण देण्यासाठी ताडपत्री आणि फॉइलने झाकण्यात आले आहे.
२०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान आग्नेय दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये झालेल्या हिंसाचारातील एका आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मोहम्मद हनीफ (४२) हा शाहीन बागचा रहिवासी आहे. तो न्यायालयात हजर न झाल्यामुळे त्याला गुन्हेगार घोषित करण्यात आले.
गृह मंत्रालयाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध चौकशीला मान्यता दिली आहे. मंत्रालयाने गुरुवारी उपराज्यपालांच्या सचिवालयाला कळवले की, भ्रष्टाचार प्रकरणात दोघांविरुद्ध चौकशीला मंजुरी देण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी यांनी ममता सरकारविरुद्ध दंड थोपटले आहेत. ते म्हणाले की, रामनवमीनिमित्त एक कोटी हिंदू सुमारे दोन हजार रॅलींमध्ये सहभागी होतील.
मुंबईतील लीलावती रुग्णालयाच्या सध्याच्या विश्वस्तांनी माजी विश्वस्तांवर १५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापन लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या हाती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’चा शुभारंभ 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेल्या जयंत पाटलांना बाहेर बोलायची झाली चोरी बारामतीत जाऊन स्वतः दिली कबुली!!, असे आज बारामतीत घडले.
ओला आणि उबेरसारख्या कॅब कंपन्या आयफोन आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांकडून वेगवेगळे भाडे आकारत असल्याच्या आरोपांवर सरकारने बुधवारी संसदेत प्रतिक्रिया दिली.
नेपाळ प्रजासत्ताकाच्या स्थापनेला १६ वर्षे लोटली. परंतु आता राजधानी काठमांडूत राजेशाहीची पुनर्स्थापना व्हावी या मागणीसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी (आरपीपी) व इतर अनेक राजेशाही समर्थक संघटनांकडून ही निदर्शने झाली होती. नेपाळमधील राजेशाही व्यवस्था पुन्हा यावी असा त्यांचा त्यामागील उद्देश आहे. माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांनी लोकशाहीदिनी एक संदेश दिला.
शरद पवारांनी केलेले वेगवेगळे संस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या कृतीमधून रोज महाराष्ट्र समोर उघड्यावर येत आहेत असाच पवारांचा एक संस्कार अहिल्या नगरात उघड्यावर आला आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर पैसे उकळण्याचा गुन्हा दाखल झाला.
गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिलधारकरांनी चुका केल्या होत्या. त्यांच्यावर कारवाईही झाली होती. आता तशाच कारवाया परत करण्याची धमकी त्यांना दिली जात आहे. सभागृहात लक्षवेधी लावून आम्ही तुमच्यावर कारवाई करू. तुमची राईस मिल बंद करू. तुम्हाला जेलमध्ये टाकू, अशा प्रकारचे इशारे राईस मिलधारकांना दिले जात असल्याचा आरोप भाजपचे विधान परिषदेतील भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. इतकेच नाही तर आमदार फुके यांनी याबाबत एजंटासोबत झालेल्या कॉलची ऑडिओ क्लिपही विधिमंडळात सादर केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) लवकरच दिल्लीत लागू होणार आहे. १८ मार्च रोजी, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्ली सरकार आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) यांच्यात एक सामंजस्य करार (एमओयू) होईल.
इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी व्यवसाय आणि उद्योजकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी माणसांसारखे वागण्याचे आवाहन केले आहे. कंपन्यांमधील सर्वात कमी आणि सर्वाधिक पगारातील फरक देखील कमी केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. टीआयई कॉन मुंबई २०२५ मध्ये टीआयई मुंबईचे संस्थापक अध्यक्ष हरीश मेहता यांच्याशी झालेल्या संभाषणात मूर्ती यांनी हे सांगितले.
बुरा न मानो, होली है!! होळीच्या दिवशी वेगवेगळ्या रंगात रंगून कोण कुठले विनोद करेल काही सांगता येत नाही त्यातच राजकारण्यांच्या विनोदांना असा काही बहर येतो, की ज्याचे नाव ते!!
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हणे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांना भाजपपासून दूर होत काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होण्याची “ऑफर” दिली.
अमेरिकेतील लाचखोरी आणि फसवणूक प्रकरणात गौतम अदानी यांना यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (यूएस एसईसी) ने समन्स बजावले आहे.
मोगल बादशहा औरंगजेबाविषयी वक्तव्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांना अटकेपासून संरक्षण देताना सत्र न्यायालयाने कानउघाडणी केली आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ राजकारण्याचे कोणतेही बेजबाबदार विधान दंगली भडकवू शकते. त्यामुळे आझमींनी प्रसिद्धिमाध्यमांना मुलाखती देताना संयम आणि सावधगिरी बाळगावी, अशी ताकीद न्यायालयाने त्यांना दिली.
२०२५-२६ च्या अर्थसंकल्पासाठी तामिळनाडू सरकारने तयार केलेल्या प्रचारात्मक साहित्यात रुपयाचे चिन्ह तमिळ अक्षराने बदलण्यात आले. या मुद्द्यावरून आता राजकारण तापले आहे. भाजप याला राष्ट्रीय चिन्हाचा अनादर म्हणत आहे, तर द्रमुक सरकार हा बदल तमिळ भाषेचा आदर म्हणून सादर करत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर आम आदमी पक्षाला आता आणखी एक धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आणि माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे ‘वेव्ह्स 2025’ संदर्भात परराष्ट्र मिशनचे राजदूत आणि उच्चायुक्तांसाठी आयोजित करण्यात आलेले सत्र संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वित्त आयोग निधी यासंबंधी चर्चा केली.