• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 32 of 1313

    Pravin Wankhade

    Supreme Court : SC/ST आरक्षणात ‘क्रीमी लेयर’ लागू करण्याची याचिका स्वीकारली; 10 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

    सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एससी/एसटी आरक्षणात ‘क्रीमी लेयर’ लागू करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही याचिका रमाशंकर प्रजापती यांनी दाखल केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की आरक्षणाचा फायदा बहुतेक एससी/एसटीच्या श्रीमंत आणि बळकट वर्गाला मिळत आहे, तर गरीब लोक मागे राहतात.

    Read more

    Karuna Munde : मुंडेंना माझ्या फ्लॅटमध्ये राहू द्या, मी निघून जाईन; करुणा मुंडेंचा टोला; म्हणाल्या – 6 महिन्यात त्यांची आमदारकी रद्द होणार

    धनंजय मुंडे यांनी लाज सोडली आहे. त्यांचे मुंबईत मलबार हिल, हिरानंदानी मध्ये फ्लॅट आहे. माझा फ्लॅट हा देखील त्यांचाच आहे. त्यांना जर हिरानंदानी आणि मलबार हिलच्या फ्लॅटमध्ये रहावे वाटत नसेल तर त्यांनी माझ्या फ्लॅटमध्ये येऊन राहू शकतात, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. तर धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात कधीच येणार नाही. 6 महिन्यांच्या आतमध्ये त्यांची आमदारकी रद्द होणार आहे. कालच त्यांना औरंगाबाद हायकोर्टाने 10 हजार रुपये दंडही ठोठावला आहे.

    Read more

    Fadnavis : समाजाच्या आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे; कबुतरखानाप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

    मुंबईतील कबुतरखान्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, पहिल्यांदा लोकांचे आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे. त्याचसोबत काही आस्थेचे विषय आहेत त्याची पण आपण काळजी घेऊ शकतो. त्यातून आपण मार्ग काढू शकतो. समाजाचे आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टीचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. तसेच हा वादाचा मुद्दा नसून हा समाजाचा प्रश्न असल्याचे फडणवीस म्हणाले.

    Read more

    Manoj Jarange : दिसेल त्या मार्गाने मुंबईत घुसा; मनोज जरांगे यांचा मागे न हटण्याचा निर्धार; महाराष्ट्र कायमचा बंदचाही इशारा

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आत्ता चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी बुधवारी परभणीत बोलताना मराठा समाजाला 29 ऑगस्ट रोजी दिसेल त्या मार्गाने मुंबईत शिरण्याचे आवाहन केले. आमचे आंदोलन शांततेत होईल. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही कुरापत करण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र कायमस्वरुपी बंद राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.

    Read more

    ICICI Bank : ICICI बँकेने किमान शिल्लक मर्यादा ₹15 हजार केली; 4 दिवसांपूर्वी ₹50 हजार होती

    आयसीआयसीआय बँकेच्या खातेधारकांना दिलासा देत, किमान शिल्लक रक्कम १५ हजारांपर्यंत कमी करण्यात आली आहे. यापूर्वी कंपनीने ग्राहकांना किमान ५० हजार रुपये किमान शिल्लक ठेवण्यास सांगितले होते.

    Read more

    Rahul Gandhi : पुणे कोर्टात वकील म्हणाले- राहुल यांच्या जीवाला धोका; सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या- वकिलांनी राहुल यांच्या परवानगीशिवाय विधान केले

    बुधवारी पुणे न्यायालयात राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार म्हणाले – राहुल यांच्या जीवाला धोका आहे. सावरकर मानहानी खटल्याच्या सुनावणीदरम्यान, राहुल यांचे वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयाला लेखी माहिती दिली की “मत चोरी” प्रकरण उघडकीस आल्यानंतर राहुल गांधींना धोका वाढला आहे.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या संमतीविनाच वकिलांनी न्यायालयात केला जिवाला धोका असल्याचा दावा

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी पुणे न्यायालयात लेखी स्वरूपात केला. मात्र, हा दावा करण्यापूर्वी राहुल गांधी यांची संमती घेतली नसल्याचे उघड झाले आहे.

    Read more

    Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांचा जातीयवाद, ब्राह्मण समाजावर टीका करताना पेशव्यांवरही साधला निशाणा

    शिवसेना ठाकरे गटाचे गुहागरमधील आमदार भास्कर जाधव आणि ब्राम्हण सहाय्यक संघात सध्या वाद सुरू आहे. अत्यंत जातीयवादी भूमिका मांडताना जाधव यांनी पेशव्यांवरही निशाणा साधला आहे.

    Read more

    रोहित पवारांनी पाजळली “राजकीय “विद्वत्ता”; 41 आमदारांचा पक्ष 10 आमदारांच्या पक्षात विलीन करायची केली सूचना!!

    शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी पाजळली राजकीय विद्वत्ता; 41 आमदारांचा पक्ष 10 आमदारांच्या पक्षात विलीन करायची केली सूचना!!, असं खरंच घडलं.

    Read more

    Semiconductor : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; सरकार 4,594 कोटी रुपये गुंतवणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये एकूण १८,५४१ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, बैठकीत ४ नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

    Read more

    Asim Munir : माजी अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले- असीम मुनीर सूट घालणारा लादेन; पाक लष्करप्रमुखांनी दिली होती अणुहल्ल्याची धमकी

    अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे (पेंटॅगॉन) माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना सूट घातलेले ओसामा बिन लादेन असे वर्णन केले आहे.

    Read more

    India China : पुढील महिन्यापासून भारत-चीनदरम्यान थेट विमानसेवा; अहवालात दावा- भारताने विमान कंपन्यांना तयारी करण्यास सांगितले

    भारत आणि चीन पुढील महिन्याच्या सुरुवातीला थेट विमानसेवा सुरू करू शकतात. ब्लूमबर्गच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा झाल्याचे हे लक्षण मानले जात आहे.

    Read more

    प्राणी हक्क आणि सार्वजनिक आरोग्य यांच्यातील संघर्ष: न्यायालयाच्या निर्णयांनी देशभर खळबळ!

    प्राणी हक्क आणि सार्वजनिक आरोग्य यांच्यातील तणावाला चालना देणाऱ्या न्यायालयीन निर्णयांनी महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडवली आहे.

    Read more

    भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य; ६४ वर्षे प्रचारक असलेले शशिकांत चौथाईवाले यांचे अभिष्टचिंतन!!

    पूर्वांचलातील समस्यांच्या जाणिवेबरोबरच जनजाती समाजात विश्वास निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांनी केले. तेथील भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य उभे राहिले, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.

    Read more

    दोन लोक भेटल्याचा मुद्दा पवारांच्या अंगलट; दोन वाक्यांत उत्तर देऊन सुप्रिया सुळेंचे हात वर!!

    दोन लोक भेटल्याचा मुद्दा पवारांच्या अंगलट; दोन वाक्यात उत्तर देऊन सुप्रिया सुळेंचे हात वर!!, असला प्रकारात बारामतीत घडला. हुल गांधींच्या मतांच्या चोरीच्या आरोपांना वेगळे वळण देण्यासाठी शरद पवारांनी दोन लोक आपल्याला भेटल्याची स्टोरी माध्यमांना सांगितली होती, पण त्या संदर्भात निवडणूक आयोग आपल्याकडे पुरावे आणि तक्रारीची मागणी करेल हे लक्षात येताच खुद्द पवारांनी नंतर तो विषय “गुंडाळून” टाकला. महाराष्ट्रातील त्यावरची चर्चा देखील त्यांनी “आपल्या पद्धतीने” थांबवली. परंतु, बारामतीत सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी त्या संदर्भात प्रश्न विचारले. त्यावेळी फक्त दोन वाक्यांमध्ये उत्तर देऊन त्यांनी देखील हात वर केले.

    Read more

    Pakistan : पाकिस्तानने भारतीय राजदूतांच्या घरांचा गॅस पुरवठा थांबवला; स्थानिक विक्रेत्यांना गॅस सिलिंडर न देण्याच्या सूचना

    पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांच्या घरांना होणारा गॅस पुरवठा थांबवला आहे. याशिवाय स्थानिक गॅस सिलिंडर पुरवठादारांनाही भारतीय राजदूतांना सिलिंडर न विकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    Read more

    दुधाची तहान ताकावर भागवण्याचा लागला छंद; मोदी + शाहांचा “पराभव” केल्याचा विरोधकांना “आनंद”!

    दुधाची तहान ताकावर भागवण्याचा लागला छंद; मोदी + शाहांचा पराभव केल्याचा विरोधकांना “आनंद”!!, असे म्हणायची वेळ विरोधी पक्षांच्या राजकीय वर्तणुकीतून पुढे आली.

    Read more

    15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा चव्हाण + पवारांचा निर्णय 1988 पासून लागू; पण 2025 मध्ये आव्हाड + राऊतांनी उकरून काढला वाद!!

    स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1988 मध्ये झाला.

    Read more

    Trump : ट्रम्प म्हणाले- भारतावरील कर, रशियासाठी धक्का; या आठवड्यात पुतिन यांना भेटणार

    रशियाकडून तेल खरेदी करण्यावर लादण्यात आलेल्या अतिरिक्त २५% शुल्काला अमेरिकेने मॉस्कोसाठी धक्का असल्याचे म्हटले आहे. सोमवारी व्हाईट हाऊसमधून बोलताना ट्रम्प म्हणाले की, जेव्हा अमेरिका त्यांच्या सर्वात मोठ्या (चीन) किंवा दुसऱ्या क्रमांकाच्या (भारत) तेल खरेदीदारावर ५०% कर लादण्याची चर्चा करते, तेव्हा तो रशियासाठी मोठा धक्का असतो. अमेरिकेच्या शुल्कामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे, असा दावाही त्यांनी केला.

    Read more

    Rahul Gandhi : बिहारमधील 50 विधानसभा जागांवर राहुल गांधींची यात्रा; 23 जिल्ह्यांचा समावेश

    राहुल गांधी यांची बिहारमधील आतापर्यंतची सर्वात मोठी यात्रा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मतदार पडताळणी आणि निवडणुकीत मत चोरीच्या आरोपांवर आधारित काँग्रेस नेत्याची मतदान अधिकार यात्रा २३ जिल्ह्यांमधून जाईल, ज्यामध्ये ५० विधानसभा जागा समाविष्ट असतील.

    Read more

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटलांनी सुनावल्यावर अजित पवारांनी दिले महाराष्ट्रातील साखर कारखानदारी वाचविण्याचे मोदी- शहा यांना श्रेय

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारी वाचविण्याचे श्रेय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवा, अशा शब्दांत त्यांना सुनावले होते.

    Read more

    Justice Verma : जस्टिस वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर; अध्यक्षांनी समिती केली स्थापन

    लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी रोख घोटाळा प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर केला. अध्यक्ष म्हणाले, ‘मला रविशंकर प्रसाद आणि विरोधी पक्षनेते यांच्यासह एकूण १४६ सदस्यांनी स्वाक्षरी केलेला प्रस्ताव मिळाला आहे.’

    Read more

    Fadnavis : फडणवीस सरकारचे निर्णय- महाराष्ट्रात 15 हजार पोलिसांची भरती; विविध कर्ज योजनांतील जामीनदाराची अटही शिथिल

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात तब्बल 15 हजार पोलिसांची भरती करण्याच्या महत्त्वकांक्षी प्रस्तावाला मंजुरी दिली. राज्यातील हजारो तरुण गत अनेक वर्षांपासून या पोलिस भरतीची प्रतिक्षा करत होते. अखेर सरकारने हा निर्णय हातावेगळा करून त्यांची मागणी पूर्ण केली आहे. प्रस्तुत निर्णयामुळे राज्यातील हजारो तरुणांचे पोलिस बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

    Read more

    Lakshman Hake : मनोज जरांगेंचा मुंबईत दंगल घडवण्याचा डाव; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा दावा, त्यांना आंतरवाली सराटीत रोखण्याचे आवाहन

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत जाळपोळ व दंगल घडवण्याचा कट आहे. त्यामुळेच ते ऐण सनावारांच्या दिवसांत मुंबईला जात आहेत, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी केला. या प्रकरणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगेंना आंतरवाली सराटीतच रोखण्याचे आवाहनही केले आहे.

    Read more

    Mahayuti MLA Sanjay Gaikwad : आमदारांना 10 महिन्यांपासून निधी नाही; लोकप्रिय योजनांचा फटका, संजय गायकवाड यांचा दावा; मंत्री सरनाईकांनी फेटाळला

    महायुती सरकारच्या काही लोकप्रिय योजनांमुळे आमदारांना मागील 10 महिन्यांपासून कोणताही निधी मिळाला नसल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.

    Read more