इस्रायल-इराण युद्धात भारत कोणासोबत? परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले निवेदन
इस्रायल आणि इराणमध्ये तणाव वाढत आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. गेल्या २४ तासांत इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे १३८ लोक मारले गेले.
इस्रायल आणि इराणमध्ये तणाव वाढत आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. गेल्या २४ तासांत इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे १३८ लोक मारले गेले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज(शनिवार) मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रात कॅम्पस स्थापन करण्यासाठी 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना ‘लेटर ऑफ इंटेंट’ (LOIs) प्रदान केले. हा कार्यक्रम ‘मुंबई रायझिंग – क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद-लंडन विमान अपघातसारख्या कठीण प्रसंगी भारताच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल जागतिक समुदायाचे आभार मानले.
दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांची प्रतीक्षा संपवून ICC ट्रॉफी जिंकून इतिहास रचला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आफ्रिकन संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान एआय-१७१ अपघाताच्या २७ तासांनंतर, शुक्रवारी विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) ने ब्लॅक बॉक्स जप्त केला. ते वसतिगृहाच्या छतावर सापडले. याद्वारे आपल्याला अपघातापूर्वीच्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडले हे कळू शकेल.
अहमदाबाद विमान अपघाताने केवळ गुजरातच नाही तर संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. अपघाताला ४८ तास उलटले आहेत, परंतु त्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. १२ जून रोजी दुपारी नेमके काय घडले?
अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातामागे सायबर हल्ला असू शकतो, अशी गंभीर शंका शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांची कॉपी हाणली, पण निदान ती कॉपी करण्याची वडेट्टीवार यांची कारणे तरी मोठी निघाली.
अहमदाबादमधील एअर इंडिया ड्रीमलाइनर विमानाच्या भीषण अपघातात मृतांचा आकडा २७४ वर पोहोचला आहे. यामध्ये २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्स हे विमानात होते, तर उर्वरित ३३ जण बी.जे. मेडिकल कॉलेजच्या आवारात जमिनीवर उपस्थित होते. टाटा समूहाने या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांनाच प्रत्येकी एक कोटी कोटींची भरपाई देण्याची घोषणा केली आहे मग ते प्रवासी असोत किंवा जमिनीवरचे नागरिक जे विमान पडल्याने मृत्युमुखी पडले.
पुण्यात मुसळधार पावसामुळे आणि सध्याच्या आरोग्यविषयक आव्हानांमुळे जनतेला सावध राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. शुक्रवारी रात्री पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये, विशेषतः हिंजवडीमध्ये पाणी साचले होते, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) NCP SP अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप सोडून इतर पक्षांशी युती करायची तयारी केली, त्याबरोबर पवारांच्या आमदारांच्या मनात वेगळीच भीती रुतून बसली.
शुक्रवारी सकाळी इस्रायलने २०० लढाऊ विमानांचा वापर करून ४ अणु क्षेपणास्त्रे आणि इराणच्या २ लष्करी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख, विशेष दल प्रमुख, २ अव्वल अणुशास्त्रज्ञांसह ५ उच्च अधिकारी ठार झाले.
डीजीसीएने शुक्रवारी एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनरची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले. १२ जून रोजी अहमदाबाद विमान अपघातात २४१ जणांचा मृत्यू झाल्यानंतर एका दिवसात हा आदेश जारी करण्यात आला. त्यात म्हटले आहे की बोईंगच्या ७८७-८ आणि ७८७-९ विमानांची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी केली जाईल. सर्व अहवाल डीजीसीएला सादर केले जातील.
महात्मा गांधींचा दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरी विरुद्ध लढा; पण त्यांच्या दिवट्या पणतीला कोट्यावधींच्या फसवणुकीबद्दल तुरुंगवासाची सजा!!, हे खरंच घडले आहे.
ऑपरेशन रायझिंग लायन मधून इजराइलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या अण्वस्त्र केंद्रांचे प्रचंड नुकसान झाले. इराणी लष्कर प्रमुख आणि अणुशास्त्रज्ञ मारले गेले.
थायलंडमधील फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमान AI-379 चे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. विमानात 156 लोक होते. हे विमान फुकेतहून दिल्लीला येत होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्यास पक्ष सकारात्मक असल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही पर्याय असणार आहे. यामुळे काका-पुतणे एकत्र येणार का? याची चर्चा सुरू आहे.
अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. या विमानाला जगभरात बंदी असताना भारतात डीजीसीएने आधीच कारवाई का केली नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर कोणत्याही दबावाला बळी न पडता आता तरी तात्काळ या विमानांची सेवा खंडित करून देण्यात आलेल्या ऑर्डर रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी तर वाहने अक्षरशः पाण्यात वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. दिवे घाटात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले, तर पुण्याच्या आयबी गेस्ट हाऊसमध्येही पाणी शिरले होते.
नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. पुढील वर्षी २०२६ पर्यंत कारखाना सुरु होण्याची शक्यता आहे. ८ हजार कोटींची ही गुंतवणूक येत्या आठ वर्षात टप्प्प्याटप्याने होणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
जिल्ह्यातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानने एक मोठा निर्णय घेतला असून, त्यांच्या १६७ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमागे हिंदुत्ववादी संघटनांचा दबाव असल्याचा आरोप केला जात आहे, कारण या संघटनांनी नुकतीच या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा इशारा दिला होता.
मध्य पूर्वेतील भू-राजकीय (geopolitical) घडामोडींचा जागतिक ऊर्जा बाजारावर नेहमीच मोठा परिणाम होतो. इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आणि आता प्रत्यक्ष हल्ल्यांच्या सत्रामुळे जागतिक बाजारात तीव्र अस्थिरता निर्माण झाली आहे. १३ जून २०२५ रोजी मिळालेल्या वृत्तानुसार, इस्रायलने इराणच्या अणु आणि लष्करी तळांवर हवाई हल्ले केले आहेत, ज्यामुळे या दोन देशांमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. या वाढीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः भारतासारख्या तेल आयातदार देशांवर गंभीर परिणाम होतील.
राम मंदिराभोवती उंच इमारती बांधण्यास बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या विकास प्राधिकरणाने (ADA) मास्टर प्लॅन-२०३१ अंतर्गत हे पाऊल उचलले आहे. या अंतर्गत, अयोध्येतील राम मंदिराभोवती फक्त कमी उंचीची घरे बांधता येतील.
Operation sindoor मधून भारताने पाकिस्तान मध्ये खोलवर केलेले हल्ले आणि इजरायलने इराणवर केलेले हल्ले याचे आंतरराष्ट्रीय राजकारणातले मायने काही प्रमाणात वेगळे असले, तरी एका बाबतीत विलक्षण साम्य आहे
आसाममधील धुबरी जिल्ह्यात अलिकडेच झालेल्या जातीय तणावानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी सांगितले की, यावेळी बकरी ईदच्या दिवशी धुबरीच्या हनुमान मंदिरात गोमांस फेकून काही समाजकंटकांनी घृणास्पद आणि निंदनीय गुन्हा केला आहे. आमच्या मंदिरांना नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने एक विशिष्ट वर्ग सक्रिय झाला आहे, म्हणून आम्ही पोलिसांना बेकायदेशीर कृत्य दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासाठी १२०६ हा नंबर खूप लकी मानला जात होता. त्यांच्या स्कूटर आणि कारच्या नंबर प्लेटवर १२०६ हा नंबर होता. तो त्यांच्यासाठी चांगल्या उर्जेचा स्रोत होता, परंतु १२ जून २०२५ रोजी, हा नंबर एक क्रूर योगायोग बनला. जेव्हा ते या दिवशी म्हणजे काल अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट एआय-१७१ मध्ये होते आणि त्यांचे विमान टेकऑफ केल्यानंतर अवघ्या ४ मिनिटांतच कोसळले.