सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना ठोकले; त्यांच्या बचावासाठी जयराम रमेश सरसावले!!
राहुल गांधींनी भारत आणि चीन यांच्यातल्या वादात चीनची बाजू उचलून धरल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना ठोकले.
राहुल गांधींनी भारत आणि चीन यांच्यातल्या वादात चीनची बाजू उचलून धरल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना ठोकले.
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले की, आपले खासदार पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी संपूर्ण जगात गेले, पण कोणीही आपले ऐकले नाही. आपण छाती बडवून म्हणालो की पाकिस्तान जबाबदार आहे, पण कोणीही त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही.
नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ३७ आवश्यक औषधांच्या किमती १०-१५% ने कमी केल्या आहेत. यामध्ये हृदय, मधुमेह आणि संसर्गाच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या पॅरासिटामॉल, एटोरवास्टॅटिन आणि अमोक्सिसिलिन सारख्या औषधांचा समावेश आहे.
माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शनिवारी सांगितले की, समान नागरी संहितेची इच्छा संविधानात व्यक्त करण्यात आली आहे. संविधानाच्या ७५ वर्षांनंतर, आता हे ध्येय साध्य करण्याची वेळ आली आहे. देशातील सर्व जाती, समुदाय आणि वर्गांना विश्वासात घेऊनच हे पाऊल उचलले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
तुम्ही खरे भारतीय असता, तर असलं बोलला नसतात, अशा परखड शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींचे वाभाडे काढले. भारतीय सैन्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने फटकारले. चीनने 2000 किलोमीटर जमीन बळकावल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. पण खरा भारतीय असे कधीच म्हणणार नाही
लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते आणि काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी रविवारी निवडणूक आयोगाच्या (EC) निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, मतदार यादीतील दुरुस्तीवर संसदेत खुली चर्चा व्हावी, अशी विरोधकांची इच्छा आहे, परंतु सरकार ते टाळत आहे.
रशियातील कामचटका येथे ६०० वर्षांत प्रथमच क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीचा उद्रेक झाला. कामचटका येथील आपत्कालीन मंत्रालयाने रविवारी सांगितले की, या ज्वालामुखीचा उद्रेक २ ऑगस्ट रोजी झाला.
इस्रायलचे सुरक्षा मंत्री इटामार बेन-ग्वीर यांनी रविवारी जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीच्या कॅम्पसला भेट दिली आणि प्रार्थना केली. एका ज्यू संघटनेने याचा एक व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये ग्वीर काही लोकांसह मशिदीच्या कॅम्पसमध्ये फिरताना आणि प्रार्थना करताना दिसत आहे.
२९ जुलै रोजी बांगला भवनला लिहिलेल्या अधिकृत पत्रात दिल्ली पोलिसांनी बांगला भाषेचे वर्णन बांगलादेशी भाषा असे केले. त्यात लिहिले होते, ‘भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ८ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेली कागदपत्रे बांगलादेशी भाषेत आहेत. अशा परिस्थितीत, पुढील तपासासाठी बांगलादेशी राष्ट्रीय भाषेचा अधिकृत अनुवादक उपलब्ध करून द्या.’
निवडणूक आयोगाने तेजस्वी यादव यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना मतदार कार्डचे दोन EPIC क्रमांक कसे मिळाले, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. बिहारच्या दिघा विधानसभेच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे की, तुम्ही EPIC क्रमांक RAB2916120 दाखवला होता, जो अधिकृतपणे जारी केलेला नाही.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये टॅरिफ जाहीर केल्यानंतर भारताने अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी दुप्पट केली आहे. एप्रिल-जून तिमाहीत, वार्षिक आधारावर त्यात ११४% वाढ […]
विशेष प्रतिनिधी अमरावती : Chief Minister नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा येथे पाठविल्यावर काेल्हापूर परिसरातील नागरिकांमध्ये संताप आहे. याबाबत सह्यांची माेहीम, माेर्चेही काढले जात […]
मुलींवर हात टाकणाऱ्यांची हिंमत वाढली आहे. पण, जे मुलींवर हात टाकतात, त्यांचे हातपाय तोडून नंतर पोलिसांकडे द्या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी केले.
भाेंगे वाजविण्याची परवानगी काेणालाही नाही. मात्र, काही माफिया धर्माच्या नावावर भाेंगे वाजवित हाेते. पुढील तीन महिन्यांत महाराष्ट्र भाेंगेमुक्त हाेणार आहे.
पाकिस्तानमधील नैसर्गिक संसाधनांबद्दल केल्या जाणाऱ्या दाव्यांवर बलुचिस्तानचे नेते मीर यार बलुचिस्तानी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, या प्रदेशात असलेले प्रचंड तेल आणि खनिज साठे प्रत्यक्षात ‘बलुचिस्तान रिपब्लिक’चे आहेत, पाकिस्तानचे नाहीत. मीर यार बलुचिस्तान म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाला पाकिस्तानी लष्कराने, विशेषतः लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी ‘पूर्णपणे दिशाभूल’ केली आहे. त्यांनी पाकिस्तानला दहशतवादाला आश्रय देणारा देश म्हटले आणि त्यांच्या लष्करी नेतृत्वाच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रात्रीच्या पार्ट्यांमध्ये जाऊ नका, बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार होऊ शकतो… मित्रांसोबत अंधारात, निर्जन ठिकाणी जाऊ नका. सामूहिक बलात्कार होऊ शकतो… शुक्रवारी सकाळी अहमदाबादच्या रस्त्यांवर या वादग्रस्त शब्दांचे पोस्टर दिसले. तथापि, वादानंतर, काही वेळातच हे पोस्टर्स काढून टाकण्यात आले.
बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस म्हणाले की, भारत अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यात अपयशी ठरला आहे. ते म्हणाले की, कराराच्या अभावामुळे, भारताला आता २५% शुल्क द्यावे लागेल, जे बांगलादेशपेक्षा जास्त आहे.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभेतले विरोधी पक्षनेते एकाच कॅटेगरीत आले. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी आरोपांचे हिट अँड रन केले, पण निवडणूक आयोगाने त्यांना बरोबर कायद्याच्या कचाट्यात अडकवले!!
लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बिहार मधल्या मतदार यादीच्या मुद्द्यावर संपूर्ण देशभर गाजावाजा केला निवडणूक आयोगापासून ते भाजप पर्यंत सगळ्यांना ठोकून काढले. पण राहुल गांधी नेमके काय आहेत??, याची पोल प्रशांत किशोर यांनी खोलली.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर शेतकरी कायद्याला आणि सरकारला विरोध केल्याबद्दल धमकी दिल्याचा आरोप केला. राहुल म्हणाले की, मला आठवते की जेव्हा मी शेतकरीविरोधी कायद्यांविरुद्ध लढत होतो तेव्हा अरुण जेटलींना मला धमकावण्यासाठी पाठवण्यात आले होते.
शनिवारी, दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने हरियाणातील गुरुग्रामच्या शिकोहपूर गावात जमीन व्यवहार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि इतर आरोपींना नोटीस बजावली. पुढील सुनावणीपूर्वी न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यासाठी आरोपींना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होईल.
लांडगा आला रे आला म्हणून एकनाथ शिंदेंच्या हातून शिवसेना घेताहेत काढून हेच सत्य वकील असीम सरोदे यांच्या वक्तव्यातून समोर आले. पुढच्या महिन्यात शिवसेनेचा निकाल सुप्रीम कोर्टात लागतोय एकनाथ शिंदे यांच्या हातातून शिवसेना निसटते आहे त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार नाही, असा दावा असीम सरोदे यांनी केला.
शनिवारी गुरुग्राममध्ये केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राहुल गांधी यांच्या निवडणुकीत झालेल्या हेराफेरीच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचे पुरावे निवडणूक आयोगाला द्यावेत. खट्टर म्हणाले की, केवळ २०२४ मध्येच नाही, तर २०१९ मध्येही राहुल गांधी हेच बोलत होते आणि २०२९ च्या निवडणुकांबद्दलही ते हेच म्हणतील.
कोलंबियामध्ये दोन माजी पॉर्नस्टार्सना उपमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी अलेजांड्रा उमाना आणि जुआन कार्लोस फ्लोरियन यांची समानता मंत्रालयात नियुक्ती केली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटातले सगळे आरोपी निर्दोष सुटले. सोनिया गांधी प्रणित काँग्रेसचा हिंदू दहशतवादाचा narrative उद्ध्वस्त झाला. याबद्दलचा संताप काँग्रेस पेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त उमटला. त्यामुळे तामिळनाडूचे वारे महाराष्ट्रात आणले आणि पवार बुद्धीचे शिलेदार सनातन हिंदू धर्माला शिव्या देऊ लागले, असे महाराष्ट्रात घडून आले.