• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 265 of 1430

    Pravin Wankhade

    Gargai Dam : मुंबईच्या भविष्यासाठी गारगाई धरणाच्या कामाला गती

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची 24 वी बैठक संपन्न झाली. यावेळी गारगाई धरण प्रकल्पासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरण विषयक मंजुरी देण्यासाठी सहमती देण्यात आली. तसेच परिवेष पोर्टलवरील नकाशा प्रमाण मानून व्याघ्र भ्रमंती मार्ग निश्चित करणे आणि या मार्गावरील खासगी जमिनी शेतकऱ्यांच्या स्वेच्छेने संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    Read more

    Devendra Fadnavis : ‘आपले सरकार’ सेवांतील विलंबावर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांवर दररोज दंड लावण्याचे निर्देश

    ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे विविध सामाजिक क्षेत्रांसंदर्भातील वॉररूम बैठक पार पडली. बैठकीमध्ये ‘आपले सरकार’ पोर्टलवरील नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवा वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की, सेवा वेळेत न पुरवणाऱ्या संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दररोज 1000 इतका दंड आकारण्यात यावा. तसेच, यासंदर्भात मुख्य सचिवांनी तात्काळ परिपत्रक जारी करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

    Read more

    Sangram thopte संग्राम थोपटेंना काँग्रेसने दिले तोकडे बळ, पवारांनी नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!!

    संग्राम थोपटे यांना काँग्रेसने दिले तोकडे बळ, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; त्यामुळे संग्राम थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!

    Read more

    Waqf सुधारणा कायद्याला दाऊदी बोहरा समुदायाचा पाठिंबा; पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी जाऊन मानले त्यांचे आभार!!

    केंद्रातल्या मोदी सरकारने देशात आणलेल्या waqf सुधारणा कायद्याला दाऊदी समुदायाने पाठिंबा दिला असून त्या समाजाच्या प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आभार मानले.

    Read more

    Durgesh Pathak : AAP नेते दुर्गेश पाठक यांच्या घरावर CBIचा छापा!

    आम आदमी पक्ष गुजरात निवडणुकीची तयारी सुरू करत आहे. दरम्यान, सीबीआय गुजरातचे सह-प्रभारी दुर्गेश पाठक यांच्या घरी छापा टाकण्यासाठी पोहोचले. याबाबत दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या आतिशी, मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.

    Read more

    Murshidabad मुर्शिदाबाद हिंसाचाराची चौकशी SIT करणार ; नऊ सदस्यीय पथक स्थापन

    वक्फ कायद्याविरुद्धच्या हिंसक निदर्शनांमध्ये देशभरात मुर्शिदाबाद हिंसाचाराचा मुद्दा जोर धरू लागला आहे. दरम्यान, हिंसाचाराच्या चौकशीसाठी एसआयटी टीम स्थापन करण्यात आली आहे. या पथकात ९ सदस्य असतील, जे हिंसाचारग्रस्त भागाला भेट देतील आणि त्यांचा अहवाल तयार करतील.

    Read more

    Digvijay Singh दिग्विजय सिंह यांच्या अडचणी वाढणार! सरला मिश्रा प्रकरणाची २८ वर्षांनंतर पुन्हा होणार चौकशी

    मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह अडचणीत येऊ शकतात. कारण २८ वर्षीय काँग्रेस नेत्या सरला मिश्रा प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा उघडली जाणार आहे.

    Read more

    Supreme Court : हैदराबाद विद्यापीठातील झाडे तोडल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने तेलंगणा सरकारला फटकारले

    हैदराबाद विद्यापीठाशेजारील भूखंडावरील झाडे तोडण्याच्या घाईघाईच्या कृतीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तेलंगणा सरकारला फटकारले. न्यायालयाने निर्देश दिले की, जर त्यांना त्यांच्या मुख्य सचिवांना कोणत्याही गंभीर कारवाईपासून संरक्षण हवे असेल, तर त्यांनी १०० एकर वनजमीन पुनर्संचयित करण्याची योजना तयार करावी.

    Read more

    Mahadev app : महादेव अॅप प्रकरणात EDची मोठी कारवाई, दिल्ली-मुंबईसह तब्बल ५५ ठिकाणी छापे

    महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि मुंबईसह देशातील विविध राज्यांमधील ५५ ठिकाणी छापे टाकले.

    Read more

    राहुल गांधींना सेवा दल करायचे कार्यकर्त्यांचे मोहोळ; पण त्या मोहोळाल्या मधमाशा कमळातला मध चाखायला निघून गेल्यात त्याचे काय??

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी एकीकडे National herald case तुरुंगाच्या वाटेवर आहेत

    Read more

    BJP Modi : भाजपमध्ये मोठ्या बदलाची तयारी? मोदींच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा

    दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली बुधवारी भाजपची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. ज्यामध्ये अनेक वरिष्ठ भाजप नेते सहभागी झाले होते, त्यामुळे भाजपला नवा अध्यक्ष मिळण्याबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेत्यांनी संघटनात्मक बदल आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक घेतली.

    Read more

    Major news : ट्रम्प यांना थेट कव्हर करू शकणार नाहीत मोठ्या वृत्तसंस्था; व्हाईट हाऊसने रॉयटर्स, ब्लूमबर्ग व एपीला प्रेस पूलमधून वगळले

    अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने रॉयटर्स, ब्लूमबर्ग आणि एपी वृत्तसंस्थांना व्हाईट हाऊसच्या प्रेस पूलमधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. व्हाईट हाऊसने १५ एप्रिल रोजी सांगितले की, या वृत्तसंस्थांना यापुढे प्रेस पूलमध्ये कायमचे स्थान मिळणार नाही.

    Read more

    Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा दिला इशारा!

    महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा उसळी घेणार असल्याचे दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी दीर्घकाळ सक्रिय असलेले मनोज जरांगे आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. जर लवकरच तोडगा निघाला नाही तर राज्यभर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. शिवाय मंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या भेटीत जरांगे यांनी हे सांगितले.

    Read more

    Anti-Israel : पाकिस्तानात इस्रायलविरोधी निदर्शने, KFC कर्मचाऱ्याची हत्या; अतिरेक्यांनी दुकानात घुसून गोळ्या झाडल्या

    पाकिस्तानमध्ये इस्रायलविरोधी निदर्शकांनी अमेरिकन फास्ट फूड चेन केएफसीच्या आउटलेटची लूटमार आणि तोडफोड केली. कट्टरपंथी इस्लामी गट तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) च्या हल्ल्यात KFC चा एक कर्मचारी ठार झाला. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.

    Read more

    Robert Vadra : ED कडून आज रॉबर्ट वाड्रांची चौकशी होणार

    ईडी लवकरच रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करू शकते, ज्याची एजन्सी गेल्या अनेक वर्षांपासून चौकशी करत आहे. बुधवारी सूत्रांनी सांगितले की, आरोपपत्र दाखल केल्यानंतर, ईडी संबंधित न्यायालयांना त्याची दखल घेण्याची आणि खटला सुरू करण्याची विनंती करेल.

    Read more

    Justice BR Gavai : न्यायमूर्ती बीआर गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश होतील; 14 मेपासून सर्वोच्च न्यायालयाचे काम हाती घेतील

    भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या नावाची अधिकृतपणे शिफारस केली आहे. त्यांचे नाव केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. यासह, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत.

    Read more

    Supreme Court : वक्फ कायद्याला स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार; केंद्राला सवाल- हिंदू धार्मिक ट्रस्टमध्ये मुस्लिमांना स्थान देतील का?

    केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दोन तास सुनावणी झाली. या कायद्याविरुद्ध १०० हून अधिक याचिका दाखल झाल्या आहेत.

    Read more

    Sarsanghchalak : सरसंघचालकांचा संदेश- हिंदू कुटुंबांनी एकत्र जेवण करावे, पाणी वाचवा-पॉलिथीन हटवा, पर्यावरणाचे रक्षण करा!

    कानपूरमधील त्यांच्या चौथ्या दिवसाच्या प्रवासादरम्यान, सकाळी कोळसा नगर येथील शाखेचे कामकाज पूर्ण केल्यानंतर, संघ प्रमुख मोहन भागवत यांनी कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण संरक्षण उपक्रमांबाबत संघ कार्यालयात अखिल भारतीय प्रचारक प्रमुख, क्षेत्र प्रचारक, प्रांत प्रचारकांशी बैठक घेतली.

    Read more

    JD Vance : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स जयपूरला येण्याची शक्यता; आमेर आणि जंतरमंतरला भेट देऊ शकतात

    अमेरिकेचे उपाध्यक्ष जेम्स डेव्हिड (JD) व्हॅन्स हे त्यांच्या भारत भेटीदरम्यान (२१ ते २४ एप्रिल) जयपूरला भेट देऊ शकतात. त्यांच्या भेटीमुळे जयपूरमध्ये सुरक्षा यंत्रणांच्या हालचाली वाढल्या आहेत. गेल्या २४ तासांत जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकन हवाई दलाची दोन विमाने उतरली आहेत.

    Read more

    Devendra Fadnavis क्रीडाप्रेम अन् संघभावना जोपासण्यासाठी प्रभावी पायाभूत सुविधांची निर्मिती!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘प्रधानमंत्री उषा’ योजनेंतर्गत संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती येथील ‘बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारती’चे भूमिपूजन केले.

    Read more

    Devendra Fadnavis : पूर्वी पोलिसांना अतिशय वाईट अशा खोपट्यासारख्या घरांमध्ये राहण्याची वेळ येत होती – फडणवीस

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे अमरावती ग्रामीण पोलीस प्रशासकीय इमारती, निवासस्थान इमारती तसेच शासकीय वाहनांचे उद्घाटन व लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

    Read more

    White House डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्थापित माध्यमांची मक्तेदारी मोडल्या बरोबर अमेरिकेत अविष्कार स्वातंत्र्याचा नावाने आरडाओरडा सुरू!!

    जेव्हा बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेअर वगैरेंनी जगात लेफ्ट लिबरल सिस्टीम सुरू केली, तेव्हा त्यांना मोठे लोकशाहीवादी “स्टेट्समन” म्हणून गौरविण्यात आले

    Read more

    Chief Minister : जिथे संपादन होणार, तिथल्या जमिनी विकू नका, दलालांच्या भानगडीत पडू नका; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन

    जिथे जमिनीचे संपादन होणार आहे, तेथील शेतकऱ्यांनी जमीन विकली नाही पाहिजे, दलालांच्या भानगडीत पडले नाही पाहिजे, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले. कोणीतरी अचानक तुमची जमीन विकत घेतोय तर हा जमीन का घेतोय याची माहिती घ्या. कारण जमिनीचा पैसा हा थेट शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे, अशी आमची भावना असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

    Read more