• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 263 of 1505

    Pravin Wankhade

    China : सीमावादावर भारताशी चर्चा करण्यास चीन तयार; म्हटले- भारतासोबत जटिल सीमावाद, सोडवण्यासाठी वेळ लागेल

    चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सीमांकनावर भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. चीनने म्हटले आहे की भारतासोबतचा सीमावाद जटील आहे आणि तो सोडवण्यासाठी वेळ लागेल.

    Read more

    कटू इतिहास विसरून ठाकरे बंधू एकत्र; पण भाजप मधले जुने शिवसैनिक अस्वस्थ!!

    कटू इतिहास विसरून ठाकरे बंधू एकत्र, पण भाजप मधले जुने शिवसैनिक अस्वस्थ!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची आता अवस्था झालीय.

    Read more

    Defense Satellites : अंतराळात ताकद वाढवणार भारत, 4 वर्षांत 52 विशेष संरक्षण उपग्रह प्रक्षेपित होणार; चीन-पाकिस्तान सीमेवर देखरेख

    ऑपरेशन सिंदूर नंतर, भारत आता अंतराळात आपली लष्करी शक्ती आणखी मजबूत करणार आहे. सरकारने निर्णय घेतला आहे की २०२९ पर्यंत (पुढील ४ वर्षांत) ५२ विशेष संरक्षण उपग्रह अवकाशात पाठवले जातील, हे सर्व उपग्रह अंतराळात भारताचे डोळे बनतील आणि पाकिस्तान-चीन सीमेवर सतत लक्ष ठेवतील.

    Read more

    India DRDO : भारत अमेरिकेसारखे बंकर बस्टर बॉम्ब बनवणार; DRDO कडून अग्नि-5 क्षेपणास्त्राचे 2 नवीन व्हर्जन

    संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) अग्नि-५ या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या दोन नवीन आवृत्त्या विकसित करत आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या अणुप्रणाली, रडार प्रणाली, नियंत्रण केंद्र, शस्त्रास्त्रांचा साठा जड बंकरमध्ये आणि जमिनीत ८०-१०० मीटर खोलीवर जाऊन नष्ट करेल.

    Read more

    Gopichand Padalkar : ‘पादरी’चे सैराट करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस; गोपीचंद पडळकरांचे ख्रिश्चन धर्मगुरूविरोधात वादग्रस्त विधान

    बैलगाडीच्या शर्यतीत जसे बक्षीस ठेवले जाते, तसेच बक्षीस धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी ठेवले पाहिजे, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात केले आहे. त्यांच्या या विधानामुळे ख्रिश्चन धर्मियांत मोठा रोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी ख्रिश्चन धर्मियानी सोमवारी जालन्यात आक्रोश मोर्चा काढला.

    Read more

    Eknath Shinde : विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका; एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना कानपिचक्या

    मराठी भाषेबाबत आम्ही कधीही तडजोड करणार नाही, मराठी माणसाच्या हक्कांवर गदा आली तर ती सहन केली जाणार नाही, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षातील मंत्र्यांना आणि आमदारांना देखील कानपिचक्या दिल्या. विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका, असे एकनाथ शिंदे मंत्र्यांना म्हणाले.

    Read more

    एच. के. एल. भगत, सुभद्रा जोशी यांच्यासह काँग्रेसचे 150 नेते सोवियत रशियाच्या pay roll वर; CIA आणि मित्रोखिन डायरीतून धक्कादायक खुलासा

    लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मोदी सरकारवर देश विकल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले मित्र आदानी आणि अंबानी यांना देश विकला

    Read more

    Krishnarao Bhegade : माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन; वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    मावळ तालुक्याचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे सोमवार 30 जून रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात असून, मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे.

    Read more

    Fadnavis : फडणवीस म्हणाले- सरकार कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; ठाकरे बंधूंनी एकत्र क्रिकेट खेळावे, स्वीमिंग करावी आम्हाला अडचण नाही!

    हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार कुणाच्याही दबावापुढे झुकणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. सरकारने हिंदीच्या मुद्यावर एक समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य तो निर्णय घेईल. सरकार केवळ कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही, केवळ महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे लक्ष पाहील. आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, असे ते म्हणालेत. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावे, स्वीमिंग करावी आम्हाला काही अडचण नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी ठाकरे बंधूंना हाणला.

    Read more

    राज ठाकरेंना छळ करून पक्षाबाहेर घालविले तेव्हा कोठे गेले होते तुमचे प्रेम? नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

    त्रिभाषा सक्तीविरोधात शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांनी ५ जुलै रोजी विजयी निर्णय घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.

    Read more

    पंजाबच्या फिरोजपूर मध्ये भारतीय हवाई दलाची जमीन परस्पर विकली; तब्बल 28 वर्षांनंतर आई आणि मुलाविरुद्ध केस झाली

    पंजाबच्या फिरोजपूर मध्ये भारतीय हवाई दलाच्या हवाई पट्टीची जमीन परस्पर विकली. त्याबद्दल 28 वर्षांनंतर आई आणि मुलाविरुद्ध केस रजिस्टर झाली.

    Read more

    Gunaratna Sadavarte : 5 जुलैचा मेळावा म्हणजे शैक्षणिक हत्येचे तांडव:गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

    राज्य सरकारने हिंदी सक्तीचे शासन निर्णय रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर 5 जुलै रोजी नियोजित ठाकरे गट आणि मनसेचा मोर्चा ‘विजयी मेळावा’ म्हणून साजरा केला जाणार आहे. मात्र, या विजयी मोर्चावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका करत हा उत्सव म्हणजे “शैक्षणिक हत्येचे तांडव” असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मनसेवर “विद्यार्थ्यांची हत्या करणारी सेना” अशी कठोर टीका केली असून, राज आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण गल्लीपुरते व दळभद्री आहे, असेही म्हटले.

    Read more

    Soviet Union: काँग्रेसचे १५० खासदार सोव्हिएत युनियनचे एजंट; भाजप खासदाराचा खळबळजनक आरोप

    भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर गंभीर आणि खळबळजनक आरोप करताना दावा केला आहे की, काँग्रेसच्या काळात तब्बल १५० खासदार हे सोव्हिएत युनियनचे एजंट म्हणून कार्यरत होते. त्यांना थेट सोव्हिएत युनियनकडून निधी मिळत होता.

    Read more

    The Kerala Story :उत्तर प्रदेशात ‘द केरला स्टोरी’ वास्तवात: दलित मुलीचे अपहरण करून केरळमध्ये जिहादी बनवण्याचा प्रयत्न

    ‘द केरला स्टोरी’ चित्रपटातील वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एका १५ वर्षीय दलित मुलीचे अपहरण करून तिला केरळला नेण्यात आले, जिथे तिच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा आणि जिहादी कारवायांसाठी प्रशिक्षण घेण्याचा दबाव टाकण्यात आला.

    Read more

    Indias Agni-5 भारताचे अग्नि-५ क्षेपणास्त्र आता येणार नवीन आधुनिक रूपात

    भारत सतत आपली लष्करी क्षमता वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने अग्नि-५ क्षेपणास्त्राची नवीन नॉन-न्यूक्लियर आवृत्ती बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

    Read more

    सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी महात्म्याचे दस्तावेजीकरण; रामतीर्थ गोदावरी सेवा समिती प्रकाशित करणार ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ

    २०२६ – २७ मध्ये होणारा नाशिक आणि त्रंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने एक ऐतिहासिक, सांस्कृतिक उपक्रम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी महात्म्याचे दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे.

    Read more

    Nitish Kumar : कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून ‘जेडीयू’ने साधला ममता बॅनर्जींवर निशाणा

    कोलकाता येथील एलएलबी विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाने प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी (३० जून २०२५) जेडीयू नेते नीरज कुमार यांनी या प्रकरणावर म्हटले की, केवळ आरोपीला अटक करणे हीच सरकारची जबाबदारी नाही. कारण तो एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे, म्हणून तृणमूल काँग्रेसने केवळ शिस्तभंगाची कारवाई करावी असे नाही तर जनतेची अपेक्षा आहे की तुम्ही वेळेच्या आत आरोपपत्र निश्चित करावे. जलदगतीने खटला चालवा, जेणेकरून न्याय मिळण्याची आशा अबाधित राहील.

    Read more

    T Raja Singh : तेलंगणात भाजप आमदार टी राजा सिंह यांनी दिला राजीनामा

    तेलंगणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोशामहलचे आमदार टी राजा सिंह यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. असे सांगितले जात आहे की टी राजा सिंह तेलंगणा भाजप अध्यक्षपदाची निवडणूक लढवू इच्छित होते. त्यांनी तेलंगणा भाजप अध्यक्ष जी किशन रेड्डी यांना राजीनामा पाठवला आहे. टी राजा सिंह यांनी धक्का आणि निराशेचे कारण देत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

    Read more

    Finance Minister Sitharaman : भारत-अमेरिका व्यापार करारावर अर्थमंत्री सीतारामन यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या..

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच भारतासोबतच्या व्यापार कराराबद्दल विधान केले आहे. त्यांनी सांगितले की भारतासोबत लवकरच व्यापार करार होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे की भारताला अमेरिकेसोबत नक्कीच चांगला करार करायचा आहा, परंतु त्यासाठी काही अटी असतील

    Read more

    Maharashtra to Telangana : महाराष्ट्रापासून तेलंगणापर्यंत ५ राज्यांमध्ये भाजपने अध्यक्षांची केली नियुक्ती

    उत्तराखंड आणि मिझोराम भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी निवडणूक झाली. उत्तराखंडमध्ये, विद्यमान अध्यक्ष महेंद्र भट्ट पुन्हा अध्यक्ष झाले. त्याच वेळी, माजी मंत्री आणि आमदार के. बेचुआ यांची मिझोराममध्ये नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली. तसेच आज ६ राज्यांमध्ये भाजप अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आणि आतापर्यंत वीस राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. पुढील दोन दिवसांत १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही निवडणुका होतील.

    Read more

    हरित सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे उपक्रम; स्टीलची 30 लाख ताटे, ग्लास वाटपासह गोदावरी महात्म्याचे दस्तावेजीकरण

    २०२६ – २७ मध्ये होणारा नाशिक आणि त्रंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी शासकीय स्तरावरून होणाऱ्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने विविध उपक्रम सुरू करायचे ठरविले असून सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरण पूरक आणि हरित व्हावा यासाठी सेवा समितीने पुढाकार घेतला आहे.

    Read more

    MP Chandrashekhar : प्रयागराजमध्ये हिंसाचार : खासदार चंद्रशेखर यांना रोखल्याने उपद्रवींचा धुडगुस; पोलिस अन् लोकांवर दगडफेक

    यूपीतील प्रयागराजमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. प्रयागराजच्या रस्त्यांवर २ तासांपासून उपद्रवींच्या जमावाने उघडपणे गोंधळ घातला आहे. जमावाने पोलिसांच्या वाहनांवर हल्ला केला, दगडफेक केली आणि डायल ११२ वाहनास उलटवले. बदमाशांनी पोलिस पथकावरही दगडफेक केली. रोडवेज बसेसची तोडफोड करण्यात आली आणि अनेक दुचाकी जाळण्यात आल्या.

    Read more

    Varsha Gaikwad : मुंबई काँग्रेसमध्ये मोठा वाद, वर्षा गायकवाड यांच्या विरोधात वरिष्ठ नेते एकवटले

    महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, निवडणुकीपूर्वीच मुंबई काँग्रेसमधील वाद खूप वाढला आहे. मुंबई काँग्रेसमधील वरिष्ठ नेते मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात एकवटले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शनिवारी मुंबई काँग्रेसने एक समिती स्थापन केली. मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना या समितीत स्थान मिळाले नाही, त्यामुळे पक्षाचे काही वरिष्ठ नेते संतप्त झाले आहेत.

    Read more

    Supreme Court : कोलकाता लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

    कोलकाता येथे एलएलबीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील सत्यम सिंह यांनी सोमवारी (३० जून २०२५) न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.

    Read more

    Trump : ट्रम्प यांनी नेतन्याहूंवरील भ्रष्टाचाराच्या खटल्यांना राजकीय षड्यंत्र म्हटले; म्हणाले- आम्ही हे सहन करणार नाही

    इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली आहे. त्यांनी याला राजकीय षड्यंत्र म्हटले. ट्रम्प म्हणाले की, यामुळे हमाससोबत सुरू असलेल्या चर्चेला आणि इराणच्या आण्विक धोक्याला तोंड देण्याच्या प्रयत्नांना नुकसान होऊ शकते.

    Read more