• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 26 of 1418

    Pravin Wankhade

    Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची मारहाण करून हत्या; 7 दिवसांत दुसरी घटना

    बांगलादेशात पुन्हा एकदा जमावाच्या हल्ल्यात एका हिंदू तरुणाचा जीव गेला आहे. राजबारी जिल्ह्यातील पांगशा परिसरात २९ वर्षीय अमृत मंडलला जमावाने मारहाण करून ठार केले. ही घटना दीपू चंद्र दास यांच्या मृत्यूनंतर ७ दिवसांनी घडली आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू; ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

    मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईत महापौर कोणाला करायचं, यासाठी आमची लढाई नाही, तर महायुतीची सत्ता आणून मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना पुन्हा संधी द्यायची आहे, असा ठाम दावा करत फडणवीसांनी भावनिक राजकारणावरही निशाणा साधला. भ्रष्टाचार, विश्वासघात आणि स्वहिताच्या राजकारणाचा ट्रॅक रेकॉर्ड जनता विसरणार नाही, असा इशारा देत त्यांनी आगामी बीएमसी निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे, तर विचारांची लढाई असल्याचं स्पष्ट केलं आहे.

    Read more

    Raosaheb Danve : मी खरा वाघ, ठाकरे बंधू केवळ कागदी, उद्धव ठाकरे शेपटी खाली घालून विधान परिषदेवर गेल्याची रावसाहेब दानवे यांची टीका

    भाजप नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मी ठाकरे बंधूंसारखा कागदी वाघ नाही. मी खरा वाघ आहे. मी डरकाळ्या मारत विधानसभा व लोकसभेत गेलो. आताच्या निवडणुकीनंतर ठाकरेंचे पक्ष अस्तित्वातही राहणार नाहीत, असे ते म्हणालेत.

    Read more

    Nylon Manja : नायलॉन मांजावर हायकोर्टाची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना; वापरणाऱ्यांना 50 लाखांचा तर विक्रेत्यांवर अडीच लाखांच्या दंड!

    देशभरात सर्वत्र मकर संक्रांत उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. संक्रांत सण जवळ आला की आकाशात पतंगांची अक्षरशः गर्दी दिसायला लागते. मात्र, हा पतंग उडवण्यासाठी नायलॉन दोऱ्याचा वापर गेल्या काही वर्षात वाढला असून यामुळे अनेक अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळे देखील चिरल्याच्या घटना घडत आहेत. या नायलॉन मांजाच्या विरोधात नागरिकांनी आता थेट न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने देखील याची गंभीर दखल घेत महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

    Read more

    Indian Army : सैन्य जवानांना सोशल मीडिया वापरण्याची परवानगी; इंस्टाग्रामवर कमेंट करण्यास मनाई; व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकतील

    भारतीय लष्कराने जवानांच्या सोशल मीडिया ॲप्सच्या वापराबाबत नवीन धोरण जारी केले आहे. इंस्टाग्रामवर रील्स, फोटो आणि व्हिडिओ पाहता येतील, मात्र कमेंट करण्याची परवानगी नाही.

    Read more

    एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात मुंबई पालिकेच्या जागावाटपाची चर्चा, भाजपला सुप्त इशारा!!

    मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेना भाजप यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे सावध पवित्रा घेत एकनाथ शिंदे यांनी छोट्या पक्षांशी देखील वाटाघाटी सुरू ठेवल्यात.

    Read more

    निवडणुका जिंकणे युती किंवा आघाडीवर अवलंबून नाही; ते कार्यकर्त्यांच्या बळावर अवलंबून; प्रकाश आंबेडकरांचा वंचितला मंत्र

    महापालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षाशी युती झाली किंवा नाही झाली, तरी स्वतःची हिंमत हरता कामा नये. अनेकांचे सूर निघतात युती झाली नाही, तर आता काय करायचे?? असे म्हणणारे लोकं हे निवडणुकीच्या काळात निराश करण्याचे काम करतात. युती झाली नाही तरी मी जिंकू शकतो, ही मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केले.

    Read more

    Oxford Union : ऑक्सफर्डमध्ये भारतीय-पाकिस्तानी विद्यार्थ्यांमध्ये डिबेट; भारतीय विद्यार्थी म्हणाला- निर्लज्ज देशाला लाजवू शकत नाही, मुंबई हल्ल्यातून कटू धडा मिळाला

    ब्रिटनच्या प्रसिद्ध ऑक्सफर्ड युनियन सोसायटीमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांमध्ये डिबेट झाला होता. या वादविवादात भारतीय बाजूने मुंबईचा विद्यार्थी विरांश भानुशाली आणि पाकिस्तानी बाजूने मूसा हर्राज यांनी भाग घेतला होता.

    Read more

    Yunus Government : हादीची हत्या युनूस सरकारने घडवल्याचा भावाचा आरोप; निवडणूक थांबवण्यासाठी केले; बांगलादेशात 2 महिन्यांत निवडणुका

    भारत आणि शेख हसीना विरोधी बांगलादेशी नेते उस्मान हादी यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे बंधू शरीफ उमर हादी यांनी युनूस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

    Read more

    US Report : अमेरिकन अहवाल- बांगलादेशात लष्करी तळ उभारू इच्छितो चीन; जगातील सागरी मार्गांवर नजर

    चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) बांगलादेश आणि पाकिस्तानसह जगातील 21 देशांमध्ये नवीन लष्करी तळ (मिलिट्री बेस) उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे. याचा उद्देश चीनच्या नौदल आणि हवाई दलाला दूरच्या देशांमध्ये ऑपरेशन्स करण्यास मदत करणे आणि तेथे सैन्य तैनात करणे हा आहे.

    Read more

    Delhi High Court : दिल्ली हायकोर्टाने म्हटले-हवा आणीबाणीसारखी, एअर प्युरिफायरवर 18% GST का? हा स्वच्छ नसेल तर कर कमी करा

    दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांना विचारले की, राजधानीत हवेची स्थिती आणीबाणीसारखी असताना, एअर प्युरिफायरवर 18% जीएसटी का लावला जात आहे. न्यायालयाने म्हटले की, जर सरकार लोकांना स्वच्छ हवा उपलब्ध करून देऊ शकत नसेल, तर किमान एअर प्युरिफायरवरील कर तरी कमी करावा.

    Read more

    भाजप आणि पवारांच्या वेगवेगळ्या बेरजेच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या वजाबाकीचा धोका; मतदारांना गृहीत धरल्याचा सुद्धा बसू शकतो फटका!!

    भाजप आणि दोन्ही पवारांनी चालविलेल्या वेगवेगळ्या बेरजेच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या वजाबाकीचा धोका उद्भवला, इतकेच नाहीतर मतदारांना गृहीत धरल्याचा फटका सुद्धा बसू शकतो, याची शक्यता वाढल्याच्या खुणा आज दिसल्या.

    Read more

    Rajasthan : राजस्थानात सीमेजवळ नवीन एअरबेस तयार होणार; पाकिस्तानच्या 3 मोठ्या सुरक्षा ठिकाणांवर काही सेकंदात पोहोचतील फायटर जेट

    राजस्थानला लागून असलेल्या भारत-पाक सीमेवर आता हवाई तळ (एयरबेस) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन हवाई तळावरून पाकिस्तानच्या 3 मोठ्या हवाई तळांपर्यंत भारतीय लढाऊ विमाने लवकर पोहोचू शकतील.

    Read more

    Delhi Metro : दिल्ली मेट्रोच्या फेज 5 (A) ला सरकारची मंजुरी; 13 नवीन मेट्रो स्टेशन बांधले जातील, दिल्ली-NCRमध्ये नेटवर्क 400 किमीच्या पुढे जाईल

    दिल्लीत बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, दिल्ली-एनसीआरमध्ये मेट्रोच्या विस्तारासाठी दिल्ली मेट्रोच्या फेज 5A ला सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी ₹12015 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

    Read more

    PM Modi : मोदींनी VB-G RAM G कायद्याचे समर्थन केले; म्हटले – गावांमध्ये रोजगारासोबत संपत्ती निर्माण होईल; नवीन कायदा मनरेगाची जागा घेईल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विकसित भारत हमी रोजगार आणि उपजीविका अभियान (ग्रामीण) कायदा (VB-G RAM G) 2025 ला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, हा कायदा केवळ ग्रामस्थांना मजुरी देण्यापुरता मर्यादित नाही, तर यामुळे गावांमध्ये कामासोबतच कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण होतील, शेतीला बळकटी मिळेल आणि दीर्घकाळात ग्रामीण भागाची उत्पादकता वाढेल.

    Read more

    ठाकरे बंधूंची युती झाल्यावर नाशिक मध्ये शिवसेना, मनसेच्या दोन माजी महापौरांचा जल्लोष, आज भाजपमध्ये प्रवेश; पण भाजपच्या निवडणूक प्रमुखांचा विरोध!!

    ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर नाशिक फार मोठे राजकीय नाट्य घडले. शिवसेना आणि मनसेच्या दोन माजी महापौरांनी काल‌ मोठा जल्लोष केला.

    Read more

    US Warns : अमेरिकेचा भारताला इशारा- चीन दुहेरी चाल खेळत आहे; एकीकडे दिल्लीशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न, दुसरीकडे पाकिस्तानला शस्त्रपुरवठा

    अमेरिकेने भारताला चीनच्या दुहेरी रणनीतीबद्दल इशारा दिला आहे. पेंटागनच्या 2025 च्या अहवालानुसार, चीन एका बाजूला भारतासोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसोबत लष्करी सहकार्य वाढवत आहे.

    Read more

    Sanjay Gaikwad : दोन्ही भाऊ एकत्र आले तरी मुंबईत महायुती जिंकेल; संजय गायकवाड यांचा दावा; ठाकरेंची युती स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी – जयकुमार गोरे

    आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर युतीची अधिकृत घोषणा केली आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, खूप वर्षांनी दोघे भाऊ एकत्र आले आहेत.

    Read more

    Supriya Sule : नाराजी घरी चालते, समाजात काम करताना नाही; सुप्रिया सुळेंचे प्रशांत जगपात यांना खडेबोल

    पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची युती होण्याची शक्यता आहे. पण शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. नाराजी घरी चालते, समाजात काम करताना नाही, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानावर जगपात काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही; अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेत

    उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीचा समाचार घेतला आहे. “काही प्रसारमाध्यमे हे दृश्य असे दाखवत आहेत की जणू रशिया आणि युक्रेनची युती होत आहे. एकीकडून पुतीन आणि दुसरीकडून झेलेन्स्की निघाले आहेत, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, ही युती केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेले आहेत. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही,” अशा शब्दांत फडणवीस यांनी राज-उद्धव यांच्या युतीची खिल्ली उडवली.

    Read more

    Eknath Shinde : आपली पोरं सांभाळू शकली नाहीत ते मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंच्या युतीवर टोला

    मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याची अधिकृत घोषणा केली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. आता झालेली युती ही सत्तेसाठी असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच ज्यांना आपली पोरं सांभाळता आली नाही ते राज्य काय सांभाळणार? असा तिखट सवालही शिंदेंनी उपस्थित केला.

    Read more

    Aravalli Range : अरावली पर्वतरांगेत नवीन खाणकाम पट्टे जारी करण्यावर बंदी; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

    केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने संपूर्ण अरवली पर्वतरांगेत नवीन खाणकाम पट्टे जारी करण्यावर बंदी घातली आहे. केंद्राने राज्य सरकारांना अरवलीमध्ये कोणत्याही प्रकारचे नवीन खाणकाम पट्टे देण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे निर्देश जारी केले आहेत.

    Read more

    Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार- मी खरा वाघ, त्यांच्यासारखा कागदी नाही, माझे बोलणे त्यांच्या जिव्हारी लागले

    राज्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतर सुरू झालेला शाब्दिक कलगीतुरा आता शिगेला पोहोचला आहे. ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि निवडणूक निकालांवरून जोरदार निशाणा साधला. माझे बोलणे त्यांच्या जिव्हारी लागल्यानेच त्यांनी माझ्यावर टीका केली, असे दानवे यावेळी म्हणाले.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंनी मांडली भूमिका- मराठी माणसाच्या अस्तित्वावर उठलेल्यांना गाडून टाकण्यासाठी युती केली

    मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, या दोन पक्षांची आगामी महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष म्हणून मी आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे अशी आम्ही दोघांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली, अशी माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत युती संदर्भात तसेच आगामी महापालिकेच्या अनुषंगाने आपले मत व्यक्त केले आहे. तसेच मराठी माणसाच्या अस्तित्वावर उठलेल्यांना गाडून टाकण्यासाठी युती केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    K Kavitha : के. कविता यांची घोषणा- नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार; 2029ची विधानसभा निवडणूकही लढवणार

    भारतीय राष्ट्र समिती (BRS) नेत्या के. कविता यांनी सोमवारी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. कविता या माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या कन्या आहेत. कविता म्हणाल्या की, त्यांची संघटना ‘तेलंगणा जागृती’ 2029 ची विधानसभा निवडणूक नक्की लढवेल. त्यांनी स्पष्ट केले की, त्या आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या BRS पक्षात परतणार नाहीत.

    Read more