• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 248 of 1481

    Pravin Wankhade

    द फोकस एक्सप्लेनर : पाकिस्तान का गातोय ट्रम्प यांचे गोडवे? क्रिप्टो व्यवसायात दडली मेख; भारतासाठी काय आहे धोका? वाचा सविस्तर

    मेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे नेहमीच त्यांच्या राजकारणासोबतच व्यावसायिक व्यवहारांसाठी चर्चेत असतात. सध्या त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानमध्ये क्रिप्टोकरन्सीशी संबंधित व्यवसायात गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. हा विषय जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे, कारण ट्रम्प हे नेहमी पाकिस्तानविरोधी धोरणांचे पुरस्कर्ते मानले जात होते, मात्र आता तेच कुटुंब पाकिस्तानमध्ये आर्थिक हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    Read more

    Sanjay Raut : ‘’ट्रम्प भारताच्या बाजूने का उभे राहिले नाहीत?’’

    अमेरिकेने आता इराण आणि इस्रायलमधील युद्धात उडी मारली आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांनी विचारले आहे की जेव्हा इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यात सहभागी होण्याची काय गरज आहे?

    Read more

    Election Commission : निवडणूक आयोगाने म्हटले- मतदान केंद्राचे फुटेज सार्वजनिक करता येणार नाही; यामुळे मतदारांसाठी धोका

    निवडणूक आयोगाने शनिवारी म्हटले आहे की, मतदान केंद्रांच्या वेबकास्टिंगचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करणे योग्य नाही. यामुळे मतदार आणि गट ओळखणे सोपे होईल. मतदार आणि गैर-मतदार दोघेही असामाजिक घटकांकडून दबाव, भेदभाव आणि धमक्यांना बळी पडू शकतात.

    Read more

    आयत्या मिळालेल्या सत्तेची अजितदादांच्या राष्ट्रवादीला खुमखुमी, स्वतःचे नाक कापून नागपुरात भाजपचे उमेदवार पाडायची तयारी!!

    आयत्या मिळालेल्या सत्तेची अजितदादांच्या राष्ट्रवादीला खुमखुमी, स्वतःचे नाक कापून नागपुरात भाजपचे उमेदवार पाडायची तयारी!!, अशी चिन्हे खरंच दिसून राहिली आहेत. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कारनामेच तसे चालवले आहेत.

    Read more

    अमेरिकेच्या B 2 स्टेल्थ बॉम्ब विमानांमधून इराणचे 3 आण्विक तळ उद्ध्वस्त, तरीही आण्विक तळ सुरक्षित असल्याचा इराणचा दावा

    अमेरिकेने इराणच्या इस्फहान, नतान्झ आणि फोर्डो या तीन आण्विक तळांवर हल्ला केला. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला. इराणविरुद्धच्या इस्रायलच्या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली. अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांना लक्ष्य केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली. पण इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळला. इराण मधले सर्व आण्विक तळ सुरक्षित असल्याचा दावा केला.

    Read more

    Operation Sindhu : ऑपरेशन सिंधू- इराणमधून आणखी 290 नागरिक भारतात पोहोचले; आतापर्यंत 1,117 भारतीय घरी परतले

    इराण-इस्रायल संघर्षादरम्यान ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत एकूण १,११७ भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे. मशहादहून आणखी एक विमान शनिवारी रात्री ११:३० वाजता २९० नागरिकांना घेऊन नवी दिल्लीत पोहोचले. यापूर्वी, ३१० नागरिकांचा एक गट दुपारी ४.३० वाजता राजधानीत पोहोचला होता.

    Read more

    Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक 2024: भाजपने 1494 कोटी खर्च केले, 620 कोटींसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर

    २०२४च्या लोकसभा आणि त्यासोबतच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वाधिक पैसे खर्च केले. पक्षाने सुमारे ₹१,४९४ कोटी खर्च केले, जे एकूण निवडणूक खर्चाच्या ४४.५६% आहे.

    Read more

    माळेगाव कारखान्यावर वर्चस्वासाठी अजितदादा आणि चंद्रराव तावरे यांच्यातच “टफ फाईट”; शरद पवार + सुप्रिया सुळे स्थानिक राजकारणात पराभवाच्या छायेत?

    माळेगाव साखर कारखान्यावर वर्चस्वासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे या दोघांच्या पॅनेलमध्येच टफ फाईट आहे. या दोघांच्या टफ फाईट मध्ये बारामतीचे सर्वेसर्वा मानले गेलेले शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे स्थानिक राजकारणात तरी पराभवाच्या छायेत आलेत. तिथे आज मतदान होत आहे.

    Read more

    Thiruvananthapuram : ब्रिटिश टीम F-35 लढाऊ विमानांची तपासणी करणार; केरळच्या तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6 दिवसांपासून उभे

    ब्रिटिश रॉयल एअर फोर्सचे एफ-३५बी लाइटनिंग II स्टेल्थ हे लढाऊ विमान १४ जूनच्या रात्रीपासून केरळच्या तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे आहे. इंधनाअभावी या विमानाचे येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. तपासादरम्यान तांत्रिक त्रुटीही उघड झाल्या.

    Read more

    Putin states : पुतीन म्हणाले- युक्रेन आमचे, दोन्ही देशांचे लोक एक; सुमी शहर ताब्यात घेण्याचा इशारा

    रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी सांगितले की, संपूर्ण युक्रेन आमचे आहे आणि बफर झोन तयार करण्यासाठी युक्रेनियन शहर सुमीवर कब्जा करण्याची धमकी दिली.

    Read more

    Aditya Thackeray : हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंकडून भाजपवर ‘मराठी विरोधी अजेंडा’चा आरोप

    राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयावरून वाद चिघळला असून, या निर्णयाला मराठी अस्मिता विरोधात राबवला जाणारा कट ठरवत शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

    Read more

    Hemant Biswa Sarma : इस्लामिक देशांतील ‘हँडलर’ काँग्रेसच्या प्रचारासाठी सक्रिय; ५ हजार सोशल मीडिया खात्यांमागे विदेशी हात? मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचा गंभीर आरोप

    आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी एक गंभीर आरोप करत म्हटले आहे की, इस्लामिक देशांतील काही ‘हँडलर’ काँग्रेसच्या समर्थनार्थ ५ हजारांहून अधिक सोशल मीडिया अकाऊंट्स चालवत आहेत. २०२६ मध्ये होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वी हा सर्वात मोठा परकीय हस्तक्षेप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून, केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणा या प्रकाराची चौकशी करत आहेत, असेही सरमा यांनी स्पष्ट केले.

    Read more

    Akshar Yoga : आंतरराष्ट्रीय योग दिनी अक्षर योग केंद्राने तब्बल १२ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स करून रचला इतिहास

    आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ निमित्त, बेंगळुरूस्थित अक्षर योग केंद्राने १२ नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रस्थापित करून ऐतिहासिक कामगिरी केली. केंद्राचे संस्थापक आणि आध्यात्मिक प्रमुख हिमालयन सिद्ध अक्षरजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही अभूतपूर्व कामगिरी साध्य झाली.

    Read more

    Air balloon : Video – आकाशात पेट घेतलेल्या हॉट एअर बलूनचा थरार! आठ जणांचा मृत्यू, १३ जण जखमी

    ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना राज्यात उडणाऱ्या एका हॉट एअर बलुनला आग लागली. त्यानंतर, तो बलुन थेट आकाशातून खाली पडला. ज्यात आठ जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही दुर्घटना शनिवारी घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यासंबंधीचे फुटेज प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये आग लागलेल्या हॉट एअर बलूनमधून धूर निघताना दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अपघातातून १३ जण वाचले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Read more

    दहशतवादी देशाच्या शिफारशीवर, ट्रम्पचा डोळा नोबेलवर; पण “पाकिस्तानी कबूतर” शिटले शस्त्रसंधीच्या credit वर!!

    दहशतवादी देशाच्या शिफारशीवर, ट्रम्पचा दावा नोबेलवर!!, असे अमेरिकेच्याही इतिहासातले रसातळाचे राजकारण आज घडले. अमेरिकेनेच शस्त्रास्त्रे देऊन पोसलेलेल्या पाकिस्तान सारख्या मंडलिक राष्ट्राने अमेरिकेच्या अध्यक्षाला नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी शिफारस पत्र दिले. आणि ते मिळवणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

    Read more

    भक्तीभाव आणि ऐक्य भावनेने गोदावरी घाट उजळला; श्रीकर परदेशी आणि दादा वेदक यांच्या हस्ते गोदावरी आरती; एकादशीनिमित्त गीता पठण

    पावन गंगा-गोदावरीच्या तीरावर दररोज भक्तिभावाने संपन्न होणारी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची महाआरती आज विशेष उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात झाली.

    Read more

    Nitish Kumar : बिहार विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमार सरकारने घेतला मोठा निर्णय

    बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि विधवा, वृद्ध आणि अपंगांचे पेन्शन वाढवले आहे. सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत आता या लोकांना दरमहा ११०० रुपये मिळतील. पूर्वी त्यांना दरमहा ४०० रुपये मिळत होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

    Read more

    Operation Sindhu : ऑपरेशन सिंधू – २९० भारतीय विद्यार्थ्यांची दुसरी तुकडी इराणहून दिल्लीला पोहोचली

    गेल्या नऊ दिवसांपासून इस्रायल आणि इराणमधील युद्ध सुरू आहे. त्यामुळे इराणमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. या विद्यार्थ्यांना घरी परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. ज्या अंतर्गत आतापर्यंत दोन गट भारतात पोहोचले आहेत.

    Read more

    Omar Abdullah : ‘अमेरिका एखाद्या मित्र तोपर्यंतच राहतो, जोपर्यंत…’ ; उमर अब्दुल्लांनी साधला निशाणा

    अलीकडेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये जेवण केले. यासंदर्भात जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी अमेरिकेच्या वृत्तीवर भाष्य केले. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले, अमेरिका इतर देशांचा तोपर्यंतच ‘मित्र’ आहे जोपर्यंत त्याचा फायदा होतो आणि अमेरिका त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काहीही करू शकते.

    Read more

    Israel : इस्रायलने इराणच्या “इस्फहान अणुऊर्जा केंद्रावर” केला मोठा हल्ला

    इस्रायलने इराणच्या इस्फहान अणुऊर्जा केंद्र आणि क्षेपणास्त्र ठिकाणावर मोठा हल्ला केला आहे. यासोबतच, इस्रायली सुरक्षा दलांनी (आयडीएफ) इराणी रिवोल्यूशनरी गार्ड्सचे (आयआरजीसी) कुद्स फोर्समधील पॅलेस्टिनी विभागाचे प्रमुख सईद इजादी यांनाही ठार केलं आहे.

    Read more

    एकीकडे पाकिस्तानचे अनेक तुकडे स्वतंत्र व्हायच्या बेतात; दुसरीकडे सत्ताधारी मंत्र्यांचीच निदान वेगळी राज्ये करायची मागणी!!

    आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या रगड्यात आपल्या देशाचे तुकडे होतील, याची खात्री दहशतवादी देश पाकिस्तानला पटत चालली आहे

    Read more

    Ahmedabad plane crash : अहमदाबाद विमान अपघातात प्रकरणी एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांचं निलंबन

    अहमदाबाद विमान अपघातासाठी एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला त्यांच्या तीन अधिकाऱ्यांना सर्व पदांवरून तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. फ्लाइट क्रू शेड्यूलंगशी संबंधित ‘गंभीर आणि वारंवार उल्लंघन’ केल्यामुळे DGCA ने एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे.

    Read more

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील ‘या’ जिल्ह्यातील २० हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी रचला इतिहास

    आंध्र प्रदेशमधील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील २०,००० हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी विशाखापट्टणम येथे एका भव्य योग सत्रात भाग घेतला आणि एक नवीन विश्वविक्रम रचला. या विक्रमाची अधिकृत घोषणा आज होऊ शकते.

    Read more

    Marathi actor : मराठी अभिनेत्याने केली आत्महत्या, काम न मिळाल्याने उचलले टोकाचे पाऊल

    मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनयाद्वारे प्रसिद्धी मिळवणाऱ्या तुषार घाडीगावकरने शुक्रवारी आत्महत्या केली. काम न मिळाल्याच्या ताणामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. त्याच्या अचानक निधनाने मराठी मनोरंजन विश्वासह त्याचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.

    Read more

    Operation Sindhu : ‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत मोठा दिलासा; इराणकडून भारतासाठी हवाई मार्ग खुला, १,००० भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

    इराण-इस्त्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत भारतासाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. इराणने भारतासाठी अपवादात्मक निर्णय घेत, आपले हवाई क्षेत्र खुलं केल्याने ‘ऑपरेशन सिंधू’च्या दुसऱ्या टप्प्यास गती मिळाली असून, सुमारे १,००० अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या भारतात पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

    Read more