India-Pakistan : शहीदांचा अपमान नको; भारत–पाक टी-20 सामना थांबवावा, सर्वोच्च न्यायालयात याचिका
जम्मू–कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारतीय जवानांनी दिलेल्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर भारत–पाकिस्तान आशिया कप टी-20 सामना (१४ सप्टेंबर, दुबई) रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात झाली आहे. या संदर्भात उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली चार विधी विद्यार्थ्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.