• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 220 of 1504

    Pravin Wankhade

    Vice President : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक- NDAचा उमेदवार आज निश्चित होणार; 21 ऑगस्टला नामांकन

    उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवाराचे नाव १७ ऑगस्ट रोजी अंतिम केले जाईल. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, भाजप संसदीय मंडळाची बैठक रविवारी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे, ज्यामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे नाव अंतिम केले जाऊ शकते.

    Read more

    Trump Putin : ट्रम्प-पुतिन यांच्यात 3 तासांची बैठक, कोणताही करार नाही;12 मिनिटांच्या पत्रकार परिषदेनंतर दोघेही निघून गेले

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची अलास्कामध्ये भेट झाली. युक्रेन युद्ध संपवण्याबाबत त्यांची सुमारे ३ तास बैठक झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी फक्त १२ मिनिटे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.

    Read more

    Ajit Pawar : अजितदादांचे रोहित पवारांना खडेबोल- काही लोकांना महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्याकडे आल्याचे वाटते; दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसू नका!

    काही लोकांना वाटते की आपण लईच मोठे झालो आहोत. सगळ्या महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्याकडे आले आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या पक्षाचे बघावे. आम्ही आमच्या पक्षाचे बघतो. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावले आहे. अजित पवार यांचा पक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष हायजॅक केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावरून अजित पवार यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

    Read more

    Sharad Pawar : शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता, मोदी नेहरू यांचे नाव घेत नाही ही गोष्ट अस्वस्थ करणारी

    लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची जगात महती वाढवण्याचे काम करणाऱ्या माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेत नाही ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

    Read more

    जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व आणि आम्ही काही देखणे नाही का? अजित पवार यांचा टोला

    जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व आणि आम्ही काही देखणे नाही का? कार्यक्रमाला वाळव्यात बोलवायचे आणि आमचीच बिन पाण्याने करायची,” असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना लगावला.

    Read more

    होय, मीच वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, शरद पवारांची जाहीर कबुली

    माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा शरद पवार यांच्यावर आरोप केला जातो. पुण्यातील एका कार्यक्रमात खुद्द शरद पवारांनीच आपण वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची कबुली दिली आहे.

    Read more

    यूट्यूबर ‘Travel With Jo’ ज्योती मल्होत्राचा चा गुप्त चेहरा उघड! पाकसाठी हेरगिरी, २५०० पानी आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

    लोकप्रिय यूट्यूबर म्हणून जगभरात प्रवासविषयक व्हिडिओंमुळे चर्चेत असलेली ज्योती मल्होत्रा उर्फ Travel With Jo आता गंभीर आरोपांमुळे तुरुंगात आहे.

    Read more

    Jeff Bezos : अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या आईचे निधन; वयाच्या 78व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या आई जॅकलिन गाईज बेझोस यांचे काल वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. बेझोस फॅमिली फाउंडेशनने एक निवेदन जारी करून ही बातमी दिली आहे.

    Read more

    Narendra Modi : ‘जीएसटी’ भार होणार हलका, सामान्यांना दिलासा देणारा अर्थ मंत्रालयाचा दोनस्तरीय दर रचनेचा प्रस्ताव

    सामान्यांवरील वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) भार कमी करीत दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त करून यंदा दिवाळीत मोठी भेट देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लाल किल्ल्यावरून केली. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर लगेचच, अर्थ मंत्रालयाने राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटाला दोनस्तरीय जीएसटी दर रचना आणि निवडक वस्तूंसाठी विशेष दर प्रस्तावित केले आहेत.

    Read more

    MLA Satish Sail : कर्नाटकात काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.41 कोटी, 6.75 किलो सोने जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई

    कर्नाटक काँग्रेसचे आमदार सतीश कृष्णा साईल यांच्या घरातून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १.४१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ईडीने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या बँक लॉकरमधून ६.७५ किलो सोन्याचे दागिने आणि बिस्किटे जप्त केली आहेत.

    Read more

    Pakistan Floods : पाकिस्तानात पुरामुळे 24 तासांत 189 जणांचा मृत्यू; बचाव कार्यादरम्यान हेलिकॉप्टर कोसळले, 5 जणांचा मृत्यू

    पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या भूस्खलन आणि पुरामुळे २४ तासांत १८९ जणांचा मृत्यू झाला, ज्यात १६३ पुरुष, १४ महिला आणि १२ मुले यांचा समावेश आहे.

    Read more

    गणेशोत्सवात गोदावरी महाआरतीचा नासिकचा अभिमान; रामतीर्थ गोदावरी सेवा समितीला देशभरातून आमंत्रणाची पर्वणी

    महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा परमोच्च बिंदू म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव. 10 दिवस चालणारा हा उत्सव भक्तिभाव, आनंद, समाजसेवा आणि एकात्मतेचा महामहोत्सव म्हणून साजरा होतो.

    Read more

    ब्रिटिशांनी भारत सोडताना नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बसविले सत्तेवर; पण काँग्रेस नेत्यांनी फाळणीचे खापर फोडले सावरकर + मुखर्जींवर!!

    ब्रिटिशांनी भारत सोडताना काँग्रेसला नेहरुंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बसविले सत्तेवर; पण काँग्रेस नेत्यांनी फाळणीचे खापर फोडले. सावरकर + मुखर्जींवर!!, हे दारूण राजकीय सत्य आज समोर आले.

    Read more

    CJI Gavai : CJI गवई म्हणाले- सुप्रीम कोर्ट हायकोर्टापेक्षा मोठे नाही; दोन्ही समान; जज नियुक्तीसाठी SC कॉलेजियम विशिष्ट शिफारस करू शकत नाही

    भारताचे सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई म्हणाले की, कॉलेजियम प्रणालीमध्ये सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयापेक्षा मोठे नाही. दोन्हीही संवैधानिक न्यायालये आहेत आणि त्यापैकी कोणीही दुसऱ्यापेक्षा मोठे किंवा लहान नाही.

    Read more

    आजी म्हणाली, रोहित उगवता तारा; पण काकाने सांगितले, भावकीने पडता पडता वाचाविला!!

    आजी म्हणाली, रोहित उगवता तारा; काकाने सांगितले भावकीने पडता पडता वाचविला!!, हे राजकीय सत्य सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या ईश्वरपुरातल्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातून उघड्यावर आले.

    Read more

    मानकरांचे राजकीय भवितव्य अधांतरी; निवडणुकीतील कमबॅकबाबत साशंकता

    पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यालय उद्घाटनात माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे अचानक बाहेर पडणे चर्चेचा विषय ठरले आहे.

    Read more

    PM Modi : पीएम मोदींचे स्वातंत्र्यदिनाचे सर्वात मोठे भाषण; 103 मिनिटे, त्यांचाच 98 मिनिटांच्या भाषणाचा विक्रम मोडला

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ७९व्या स्वातंत्र्यदिनी १०३ मिनिटांचे भाषण दिले. १०० मिनिटांपेक्षा जास्त काळ भाषण देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून भारताच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी दिलेले हे सर्वात मोठे भाषण आहे.

    Read more

    पवार काका + पुतण्यांचे कमी पडले “संस्कार”; म्हणून पुढच्या पिढ्यांवर काढावा लागला राग!!

    नाशिक : काका + पुतण्यांचे कमी पडले “संस्कार”; म्हणून पुढच्या पिढ्यांवर काढावा लागला राग!!, असं म्हणायची वेळ पवार काका + पुतण्यांच्या कमी पडलेल्या “राजकीय संस्कारांमुळे” […]

    Read more

    डोनाल्ड ट्रम्पना “गुंडाळून” व्लादिमीर पुतिन अलास्का मधून पुन्हा मॉस्कोत; युद्ध थांबवायची जबाबदारी झेलेन्सकीवर!!

    डोनाल्ड ट्रम्पला “गुंडाळून” व्लादिमीर पुतिन अलास्का मधून पुन्हा मॉस्कोत; युद्ध थांबवायची जबाबदारी झेलेन्सकीवर!!, ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातल्या बहुचर्चित अलास्का वाटाघाटींची फलश्रुती ठरली. दोन्ही नेते अलास्का मध्ये साधारण सहा तास भेटले. त्यातल्या तीन तास द्विपक्षीय वाटाघाटी केल्या. परंतु, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबविण्यासंदर्भात दोघांमध्ये कुठलाही करार झाला नाही. युद्ध थांबविण्यासंदर्भात चर्चेतून “प्रगती” झाली. आम्ही पुढचे पाऊल टाकले, एवढेच दोघांनी एकमेकांना आणि नंतर पत्रकारांना सांगितले. युद्ध थांबविण्यासंदर्भात पुतिन यांनी ट्रम्प यांना कुठलाही “शब्द” दिला नाही. उलट युरोपने युक्रेन मध्ये लुडबुड करणे थांबवावे, असे त्यांनी ट्रम्प यांच्या समोर सुनावून घेतले.

    Read more

    PM Modi : मोदींची महत्त्वाची घोषणा; दिवाळीत भारतीयांना GST सुधारणांची भेट, सर्वसामान्यांसाठी काय बदल होईल?

    स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून 2 घोषणा केल्या आहेत. त्यांनी ‘पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजना’ सुरू केली. दिवाळीपर्यंत कर कमी करणारी जीएसटी सुधारणा योजना आणण्याबद्दलही त्यांनी सांगितले.

    Read more

    Pranjal Khewalkar : संमतीशिवाय महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढले; एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ

    राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई व रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. परवानगीशिवाय ,महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात पुण्यातील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यात आता आणखी एका नवीन प्रकरणामुळे त्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

    Read more

    Girish Mahajan : गिरीश महाजनांची ठाकरेंवर टीका- मराठी मताची आमचीही, पण आम्ही जनतेत भेदाभेद करत नाहीत

    भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. तसेच ठाकरे बंधू एकत्र येत मराठी मतांची वज्रमूठ बांधणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, यावर निवडणुका जवळ आल्या की मराठी मराठीचा नारा लावायचा आणि मराठी मते काय आमची नाहीत का? असा सवाल उपस्थित करत टोला लगावला आहे.

    Read more

    Kishtwar : किश्तवाड आपत्तीत 65 मृतदेह बाहेर काढले, 21 जणांची ओळख पटली; 200+ अजूनही बेपत्ता

    जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी गावात ढगफुटी झाल्यानंतर पूर आणि ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २१ जणांची ओळख पटली आहे. आतापर्यंत १६७ जणांना वाचवण्यात आले आहे.

    Read more

    Khalistani Supporters : ऑस्ट्रेलियात खलिस्तानी समर्थकांनी भारतीय ध्वज फडकवण्यापासून रोखले; भारतीय दूतावासाबाहेर स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्यांना धमकावले

    ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर स्वातंत्र्य दिन साजरा करणाऱ्या भारतीय नागरिकांना खलिस्तानी समर्थकांनी रोखण्याचा प्रयत्न केला आणि गोंधळ घातला. द ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, भारतीय नागरिक शांततेत स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना काही खलिस्तानी समर्थकांनी झेंडे फडकावून आणि गोंधळ घालून वातावरण बिघडवले.

    Read more

    पहिल्यांदाच भारतीय एक्वानॉट्स समुद्रात 5,000 मीटर खाली; भारताच्या सागरी यानाच्या तयारीचा एक भाग

    शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर जवळजवळ एक महिना झाल्यानंतर, दोन भारतीय अंतराळवीरांनी महासागरातील सर्वात खोल खोली गाठण्याचा विक्रम केला.

    Read more