• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 21 of 1313

    Pravin Wankhade

    Mumbai High Court : योगींवर बनवलेल्या चित्रपटाला मुंबई हायकोर्टाची मंजुरी; CBFCला कोणताही कट न करता प्रदर्शित करण्याचे निर्देश

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आधारित ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ या चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयाने प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने सोमवारी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ला चित्रपटात कोणतेही कट किंवा बदल न करता प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले.

    Read more

    Donald Trump : चेंगट व्यापारी ते असीम मुनीरची अमेरिकन आवृत्ती!!

    चेंगट व्यापारी ते असीम मुनीरची अमेरिकन आवृत्ती!!, असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय प्रवास झालेला दिसतोय. तो “अत्यंत वेगवान” आहे. अमेरिकेच्या इतिहासात आत्तापर्यंत एवढा वेगवान राजकीय प्रवास केलेला राष्ट्राध्यक्ष सापडणे कठीण आहे.

    Read more

    Rohit Pawar : मंत्री शिरसाटांच्या अडचणीत भर; 12 हजार पानांचे सुटकेस भरून पुरावे रोहित पवारांकडून सादर

    सिडकोतील तब्बल ५ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “पुरावे द्या” असे खुले आव्हान दिले होते. हे आव्हान स्वीकारत रोहित पवार सोमवारी पत्रकार परिषदेत तब्बल १२ हजार पानांचे दस्तऐवज घेऊन मैदानात उतरले. या पुराव्यांच्या बॅगमुळे शिरसाट यांच्यावरील संकट अधिक गडद झाले आहे.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाचे आदेश- वनताराच्या चौकशीसाठी SIT, प्राण्यांची खरेदी व मनी लाँड्रिंगच्या आरोपांची दखल

    रिलायन्स फाउंडेशनच्या जामनगर (गुजरात) येथील वनतारा ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू एंड रिहॅबिलिटेशन सेंटरविरुद्धच्या आरोपांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एसआयटी स्थापन केली. न्या.पंकज मित्तल आणि न्या. प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठाने सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. प्राण्यांची अवैध खरेदी, त्यांच्याशी गैरवर्तन, आर्थिक अनियमितता आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांवर दाखल याचिकांवर हा आदेश देण्यात आला.

    Read more

    Jarange Patil : जरांगे म्हणाले- मराठा आरक्षण द्या, अन्यथा सरकार उलथवून टाकू, मुंबईत बेमुदत उपोषणाला बसणार

    मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात १० टक्के आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा सरकार उलथवून टाकू, असा अल्टिमेटम मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी सोमवारी दिला. आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मुंबईत २९ तारखेपासून आपण व मराठा कार्यकर्ते बेमुदत उपोषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    Read more

    Donald Trump : ट्रम्प यांनी कॅरेबियन समुद्रात 3 युद्धनौका पाठवल्या; अमेरिकेत ड्रग्ज कार्टेल चालवल्याचा व्हेनेझुएलावर आरोप

    व्हेनेझुएला आणि अमेरिकेदरम्यान नवी आघाडी उघडली आहे. ७ ऑगस्टला ट्रम्प सरकारने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरोंवर ड्रग्ज कार्टेल चालवल्याचा आरोप लावत सुमारे ४१७ कोटी रुपयांचे बक्षीस जारी केले होते. आता स्थिती आणखी बिघडली आहे, जेव्हा अमेरिकेने कॅरेबियन समुद्रात ३ युद्धनौका उतरवल्या आहेत. हे गायडेड क्षेपणास्त्र विनाशक आहे. त्यात ४५०० नाविक आणि २,२०० मरीनचा समावेश आहे. एक पाणबुडीही तैनात केली जात आहे.

    Read more

    Ajit Pawar : अजितदादा म्हणाले- शिंदेंच्या खात्यावर सीएम नाराज नाहीत; 1445 कोटींचा अंबाबाई मंदिर पुनर्विकास प्रकल्प

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नगरविकास खात्यावर नाराज असल्याचा दावा केला जात आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी हा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे. मुख्यमंत्री नगरविकास खात्यावर नाराज असल्याची माहिती धांदात खोटी आहे, असे ते म्हणाले.

    Read more

    PM Modi : ट्रम्प टॅरिफवर पीएम मोदींची स्पष्टोक्ती; कितीही दबाव आणला तरी आत्मनिर्भर भारत झुकणार नाही

    कुणी कितीही दबाव आणला तरी स्वावलंबी भारत झुकणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. सोमवारी अहमदाबादमध्ये एका रोड शो आणि जाहीर सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील लघु उद्योजक, शेतकरी किंवा पशुपालकांचे हित सर्वोपरी आहे. आजकाल जगभरात आर्थिक हिताच्या नावाखाली राजकारण केले जात आहे

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधींचे मतचोरीचे आरोप फोल; सात दिवसांची मुदत संपूनही सादर केले नाही शपथपत्र

    काँग्रेस नेते राहुल गांधी आणि “मत चोर”, “निवडणूक आयोग भाजपच्या खिशात”, “मतदार वंचितीकरण” असे नवे नारे देत संस्थात्मक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अगदी “लहान मुले सुद्धा माझ्याकडे येऊन म्हणतात, ‘मत चोर गद्दी छोड’” अशा विधानांनीही त्यांनी वातावरण ढवळून काढले.या आरोपांना प्रत्युत्तर देताना निवडणूक आयोगाने १७ ऑगस्ट रोजी राहुल गांधींना सरळ शब्दात सांगितले होते की, “सात दिवसांत शपथपत्र द्या नाहीतर देशाची माफी मागा, अन्य पर्याय नाही”. २५ ऑगस्ट ही मुदत संपूनही राहुल गांधींनी शपथपत्र सादर केले नाही किंवा माफीही मागितली नाही.

    Read more

    RSS centenary : संघाच्या शताब्दीच्या वर्षात diplomatic mission जोरात!!

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षात पंच परिवर्तनाचा सूत्रपात केला असला, तरी संघाने तेवढ्यापुरताच शताब्दी वर्षाचा उपक्रम मर्यादित ठेवलेला नाही.

    Read more

    आगमना आधीच गणरायाची कृपादृष्टी; सरकारी नोकरदार‌ + एसटी कर्मचाऱ्यांचा आज 26 ऑगस्टलाच पगार; फडणवीस सरकारचा निर्णय

    राज्य सरकारी कर्मचारी आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवापूर्वी होणार आहे. राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या सुमारे 83000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेश उत्सवापूर्वी देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला

    Read more

    Kolkata Gangrape: कोलकाता गँगरेपच्या आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडिओ बनवले; 58 दिवसांनी 650 पानांचे आरोपपत्र दाखल

    ५८ दिवसांनंतर, पोलिसांनी शनिवारी कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरणात ६५० पानांचे पहिले आरोपपत्र दाखल केले. त्यात मुख्य आरोपी मनोजित मिश्रा, त्याचे दोन साथीदार जैब अहमद आणि प्रमित मुखर्जी आणि कॉलेज सुरक्षा रक्षक पिनाकी बॅनर्जी यांची नावे आहेत.

    Read more

    Syrian National : गुजरातेत सीरियन नागरिकाला अटक; 3 साथीदारांचा शोध; गाझा पीडितांच्या नावाने निधी गोळा केला

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदाबाद, गुजरात दौऱ्यापूर्वी, गुन्हे शाखेने शनिवारी एलिसब्रिज रीगल हॉटेलमधून एका सीरियन नागरिकाला अटक केली. त्याचे नाव २३ वर्षीय अली मेघाट अल-अझहर असे आहे.

    Read more

    Postal Service : युरोपीय देशांनी अमेरिकेसाठी टपाल सेवा बंद केली; भारतानंतर ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इटलीचा निर्णय

    भारतानंतर, अनेक युरोपीय देशांनीही अमेरिकेला जाणारी टपाल सेवा बंद केली आहे. यामध्ये भारत, इटली, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया आणि इतर अनेक देशांचा समावेश आहे. सेवा ठप्प करण्याचे कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन टॅरिफ नियम आहेत.

    Read more

    Jeevan Krishna Sah : ED छापा टाकताच पळून जाण्यासाठी आमदाराची कुंपणावरून उडी; याला म्हणतात शूर ममतांच्या पक्षाची लढाईची तयारी!!

    ED ने छापा टाकताच पळून जाण्यासाठी आमदाराची कुंपणावरून उडी; याला म्हणतात शूर ममतांच्या पक्षाची लढाईची तयारी!!, असे म्हणायची वेळ ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या आमदाराच्या कृत्याने आणली. Jeevan Krishna Sah

    Read more

    Princess Diana : एपस्टाइन सेक्स स्कँडलशी जोडले प्रिन्सेस डायनाचे नाव; डायना आणि एपस्टाईन डेटवर गेल्याची चर्चा

    अमेरिकन लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनच्या प्रकरणात आता ब्रिटनच्या दिवंगत राजकुमारी डायना यांचे नाव जोडले गेले आहे. खरं तर, जेफ्री एपस्टाईनची सहकारी मॅक्सवेलने दावा केला आहे की, लंडनमधील एका कार्यक्रमात राजकुमारी डायनाची एपस्टाईनशी ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मॅक्सवेल म्हणाले की, हा कार्यक्रम डायनाची जवळची मैत्रीण रोझा मोंकटनने आयोजित केला होता.

    Read more

    Pakistan, Bangladesh : पाकिस्तान-बांगलादेशात 6 करारांवर स्वाक्षऱ्या; राजदूतांना व्हिसाशिवाय एकमेकांच्या देशांमध्ये भेट देता येईल

    पाकिस्तान आणि बांगलादेशने रविवारी सहा करारांवर स्वाक्षरी केली. यामध्ये व्यापार, अर्थव्यवस्था, राजनैतिक प्रशिक्षण, शिक्षण, माध्यमे आणि संस्कृती या क्षेत्रात सहकार्य मजबूत करणे समाविष्ट आहे.पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मुहम्मद इशाक डार आणि बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांच्यात झालेल्या प्रतिनिधीमंडळ पातळीवरील चर्चेनंतर हे करार झाले.

    Read more

    Ukraine : युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युक्रेनने 95 ड्रोन डागल्याचा रशियाचा आरोप

    रशियन माध्यमांनुसार, शनिवारी रात्री उशिरा रशियाच्या कुर्स्क प्रदेशातील अणुऊर्जा प्रकल्पावर युक्रेनने ड्रोन हल्ला केला. युक्रेन आपला ३४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ही घटना घडली. रशियाने आरोप केला आहे की, या हल्ल्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पात आग लागली.

    Read more

    मनोज जरांगेंच्या तोंडी सरकार उलथवण्याची भाषा; ते विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार देणार होते त्याचे काय झाले??

    ऐन गणेशोत्सवात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवून थेट मुंबई गाठायचा बेत केलेल्या मनोज जरांगे यांनी आज अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातले फडणवीस सरकार उलथवण्याची भाषा केली.

    Read more

    Amit Shah : अमित शहांच्या हस्ते सभापती परिषदेचे उद्घाटन; म्हणाले- भारतात रक्ताचा एक थेंबही न सांडता सत्ता परिवर्तन

    रविवारी दिल्ली विधानसभेत अखिल भारतीय सभापती परिषदेचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ही परिषद दोन दिवस चालेल. २९ राज्यांच्या विधानसभांचे सभापती आणि सहा राज्यांच्या विधानपरिषदांचे अध्यक्ष आणि उपसभापती यात सहभागी झाले आहेत.

    Read more

    India : भारत जर्मनीकडून 70 हजार कोटींत 6 पाणबुड्या खरेदी करणार; सरकार इस्रायलकडून रॅम्पेज क्षेपणास्त्रही घेणार

    भारत सरकारने हवाई दल आणि नौदलाची ताकद वाढवण्यासाठी दोन मोठे करार करण्यास सहमती दर्शविली आहे. पहिला करार संरक्षण मंत्रालय आणि माझगाव डॉकयार्ड्स लिमिटेड यांनी जर्मनीकडून ६ पाणबुड्या खरेदी करण्याचा आहे. प्रोजेक्ट 75 इंडिया अंतर्गत भारतात बांधल्या जाणाऱ्या या पाणबुड्यांच्या खरेदीसाठी वाटाघाटी सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. हा करार ७० हजार कोटी रुपयांमध्ये होऊ शकतो.

    Read more

    HD Ranganath : डीके शिवकुमार यांच्यानंतर काँग्रेस आमदाराने गायली RSSची प्रार्थना; म्हटले- मला यात काहीही चुकीचे वाटत नाही

    कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यानंतर आता आणखी एका काँग्रेस आमदाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) प्रार्थना गायली आहे.तुमकुरु जिल्ह्यातील कुनिगलचे आमदार एचडी रंगनाथ यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ या ओळी वाचल्या आणि ते खूप चांगले गाणे असल्याचे म्हटले. ते म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ते गायले तेव्हा मी पहिल्यांदाच ते ऐकले. मला त्यात काहीही चुकीचे वाटत नाही. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि आपण इतरांकडून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत.

    Read more

    Amit Shah : मोदींनी स्वतःच्या विरोधातच घटना दुरुस्ती कायदा आणला, पंतप्रधान जेलमध्ये गेले, तर राजीनामा द्यावा लागेल, पण विरोधकांना जेलमधून सरकार चालवायचेय!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या विरोधातच घटना दुरुस्ती कायदा आणला. पंतप्रधान जर जेलमध्ये गेले, तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल पण विरोधकांना जेलमध्ये गेल्यावर देखील तिथून सरकार चालवायचे आहे

    Read more

    Supriya Sule : मांसाहाराच्या वक्तव्यावरून भाजपची सुप्रिया सुळेंवर टीका, आचार्य तुषार भोसले म्हणाले- असे विधान निव्वळ मूर्खपणा

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या “मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला काय अडचण आहे?” या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भाजपने या वक्तव्याचा तीव्र निषेध करत सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका केली आहे. मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, असे भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी म्हटले.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका, मतदारयाद्या तपासण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना

    उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. तसेच, शिंदे गटावर सडकून टीका करत त्यांना ‘काळे मांजर’ असे संबोधले. शिवाय धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    Read more