• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 209 of 1427

    Pravin Wankhade

    Matai organization : मणिपूर – मतैई संघटनेच्या नेत्याला अटक केल्यानंतर इंफाळमध्ये वाढला तणाव!

    मेतैई संघटना अरामबाई तेंगोलच्या एका नेत्यास अटक केल्यानंतर शनिवारी रात्री मणिपूरची राजधानी इंफाळच्या काही भागात निदर्शने तीव्र झाली. अटक केलेल्या नेत्याचे नाव किंवा त्याच्यावरील आरोपांबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. इंफाळमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्याचवेळी, पाच दिवसांपासून परिसरात इंटरनेट सेवा देखील बंद आहे

    Read more

    Fadnavis : महाराष्ट्र निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग? – राहुल गांधींचा आरोप आणि फडणवीस यांचं प्रत्युत्तर

    काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुका “मॅच फिक्सिंग” असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

    Read more

    Chief Minister : राज-उद्धव ठाकरे युतीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले- दोन भावांमध्ये किती संवाद आहे माहित नाही!

    राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना मी नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीदेखील युतीबाबत मातोश्रीवर बैठक झाली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

    Read more

    अमेरिकेत जाऊन पाकिस्तानी शिष्टमंडळाच्या दंडात बेटकुळ्या; पण सिंधूच्या पाण्यासाठी चार चार वेळा काढताहेत भारताच्या नाकदुऱ्या!!

    पाकिस्तानी शिष्टमंडळाने अमेरिकेत जाऊन पाकिस्तानी दंडात काढल्या बेटकुळ्या, पण सिंधूच्या पाण्यासाठी चार चार वेळा काढताहेत भारताच्या नाकदुऱ्या!!, अशी पाकिस्तानची अवस्था झालीय.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधींची निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा आरोप, EC म्हणाले- हा लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांचा अपमान

    नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर थेट आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, या निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ करण्यात आले होते, ज्यामध्ये भाजपचा विजय आगाऊ सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते.

    Read more

    Donald Trump : ट्रम्प एवढे “उच्च मुत्सद्दी” आहेत की, भारत – पाकिस्तानच्या शस्त्रसंधीचे credit त्यांनी 13 वेळा घेतले, पण एलन मस्कशी आता ते एकदाही बोलायला नाहीत तयार!!

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एवढे “उच्च दर्जाचे मुत्सद्दी” आहेत की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात न झालेल्या शस्त्रसंधीचे credit परस्पर 13 वेळा घेतले, पण आता ते एलन मस्क याच्याशी एकदाही बोलायला तयार नाही!!

    Read more

    bangluru : बंगळुरूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कबरीवर जावून वडील ढसाढसा रडले

    बेंगळुरूमध्ये आरसीबीच्या जल्लोषादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ कुटुंबांनी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले. सरकारने पीडितांच्या कुटुंबियांना भरपाईची रक्कम २५ लाख रुपये केली आहे, परंतु हे पैसे त्यांचे दुःख कमी करू शकत नाहीत.

    Read more

    Indians : जागतिक बँकेचा अहवाल प्रसिद्ध ; भारताला गरिबीमुक्त राष्ट्र बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा

    गेल्या ११ वर्षांत, सुमारे २७ कोटी देशवासीय अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत. २०११-१२ मध्ये २७.१ टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये अत्यंत गरिबीचा दर फक्त ५.३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. भारताला गरिबीमुक्त राष्ट्र बनवण्याच्या दिशेने ही कामगिरी एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्यक्षात, मोदी सरकारच्या दूरदर्शी विचारसरणीमुळे हे सर्व शक्य झाल्याचे दिसत आहे.

    Read more

    Pankaja Munde : भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष, ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक पडणार नाही, पंकजा मुंडे यांचा ठाम विश्वास

    राजकारणात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असलेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संभाव्य युती, आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाजत आहे. मात्र या एकत्र येण्याने भारतीय जनता पक्षाला कुठलाही धोका नाही, असा ठाम विश्वास भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

    Read more

    Eknath Shinde : ज्यांची उरली नाही पत, ते व्यक्त करतायत आपले मत, गिरे तो भी टांग उपर म्हणत एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

    देशात ज्यांची उरली नाही पत, ते व्यक्त करतायत आपले मत असे म्हणत राहुल गांधी यांचे विधान म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा मानसिकतेचे उदाहरण आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

    Read more

    Radhakrishna Vikhe-Patil : परदेशातच जास्त वेळ घालवल्याने देशातील राजकारण समजायला वेळ लागतो, राहुल गांधींवर राधाकृष्ण विखे-पाटील यांचा हल्लाबोल

    राहुल गांधी यांचा बहुतांश वेळ परदेशात जातो, त्यामुळे देशातील राजकीय परिस्थिती समजून घ्यायला त्यांना वेळ लागतो,” अशा शब्दांत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.

    Read more

    Trump warns Musk : ‘जर मस्कने डेमोक्रॅट्सना मदत केली, तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल’

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कर कपात आणि खर्च विधेयकावरून त्यांचे माजी सहकारी व प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांच्याशी झालेल्या वादात मागे हटण्यास तयार नाहीत. त्यांनी सांगितले की त्यांना त्यांचे संबंध सुधारण्याची कोणतीही इच्छा नाही. एवढंच नाहीतर येत्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सना मदत करण्याचा प्रयत्न केल्यास मस्क यांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकते, असा सूचक इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

    Read more

    Siddaramaiah : बंगळुरू चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबास आता २५ लाख रुपये दिले जाणार

    आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चॅम्पियन झाल्यानंतर, बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एक जल्लोष आयोजित करण्यात आला होता, मात्र त्याचे रूपांतर शोकसागरात झाले. RCB च्या विजयाच्या जल्लोषात सामील होण्यासाठी आलेले काही चाहते त्यांच्या घरी परतू शकले नाहीत. कारण, मोठ्यासंख्येने चाहते जमल्याने या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली व त्यात ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले .

    Read more

    ठाकरे बंधू आणि पवार बहीण – भावांच्या ऐक्यासाठी माध्यमांचीच घायकुती; मुख्य नेते निवांत, इतरांच्याच लुडबूडी!!

    ठाकरे बंधू आणि पवार बहीण – भावांच्या ऐक्यासाठी माध्यमांनीच केली घायकुती; मुख्य नेते निवांत आणि इतरांच्याच लुडबूडी!! अशी खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झाली आहे.

    Read more

    corona patient : भारतात कोरोना रुग्णांची संख्येने ओलांडला पाच हजारांचा टप्पा ; २४ तासांत ४ मृत्यू

    भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी, संपूर्ण भारतात कोरोना रुग्णांची संख्या ५००० च्या पुढे गेली आहे. राज्य सरकारांनी कोरोनाबाबत सूचना देण्यास सुरुवात केली आहे. केंद्राने सुविधा-स्तरीय तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन देखील केले आहे.

    Read more

    Madras High Court : मद्रास हायकोर्टाने म्हटले- समलैंगिक जोडपे कुटुंब बनवू शकतात; लग्न कुटुंब स्थापन करण्याचा एकमेव मार्ग नाही

    मद्रास उच्च न्यायालयाने दोन महिलांना कुटुंब म्हणून एकत्र राहण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की लग्न हा कुटुंब तयार करण्याचा एकमेव मार्ग नाही, समलैंगिक जोडपे कुटुंब तयार करू शकतात.

    Read more

    Mamata Banerjee : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत तृणमूलच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; भाजपने घेतली आक्रमक भूमिका

    एकीकडे पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरवरून भारतावर खोटे आरोप करत आहे, तर दुसरीकडे दुसरीकडे विरोधी पक्षही यात मागे राहिलेले नाहीत. तेही या मुद्य्यावरून सरकारवर सतत निशाणा साधत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते नरेंद्रनाथ चक्रवर्ती यांनी ऑपरेशन सिंदूरवर एक वादग्रस्त विधान केले, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की ऑपरेशन सिंदूर हा पूर्णपणे भाजपने सुरू केलेला युद्ध उन्माद होता.

    Read more

    Siddaramaiah : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी आपल्याच राजकीय सल्लागाराला पदावरून काढले!

    बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. न्यायालयाने चारही आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

    Read more

    PNB manager : लाचखोरी प्रकरणात सीबीआयने PNBच्या माजी व्यवस्थापकास केली अटक

    सीबीआयने एका मोठ्या लाचखोरी प्रकरणात दोघांना अटक केली आहे, ज्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) दिमापूर शाखेचे तत्कालीन वरिष्ठ व्यवस्थापक आणि दिमापूरमधील एका खासगी कंपनीचे मालक यांचा समावेश आहे. बँक व्यवस्थापकाला गुवाहाटी (आसाम) येथून अटक करण्यात आली आहे, तर कंपनी मालकाला दिमापूर (नागालँड) येथून अटक करण्यात आली आहे.

    Read more

    Election Commission : ‘महाराष्ट्र निवडणुकीत हेराफेरी’च्या राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोग कडक भूमिकेत!

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत आरोप करत काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तर निवडणूक आयोगाने या आरोपांवर कडक भूमिका घेत सर्व प्रश्नांना अगदी मुद्देसूद आणि सडेतोड उत्तर दिले आहे.

    Read more

    Dino Morea : मिठी नदी भ्रष्टाचार प्रकरणात EDने बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला समन्स

    मिठी नदीच्या स्वच्छतेतील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला समन्स बजावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने त्याला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून चौकशीत सामील होण्यास सांगितले आहे. ईडीने पाठवलेल्या वेळेत, त्याला पुढील आठवड्यात चौकशीसाठी येण्यास सांगितले आहे. शुक्रवारी ईडीने दिनो मोरियाच्या घरावर छापा टाकला.

    Read more

    “डॉक्टर” गजानन कीर्तिकरांनी तपासली “नाडी”; शिवसेना एकसंध न होण्यामागे “अदृश्य शक्ती”; पण त्या “अदृश्य शक्तींवर” मात करायची जबाबदारी कुणाची??

    शिवसेना एकसंध न होण्यामागे “अदृश्य शक्तींचा हात असल्याचे सांगून “डॉक्टर” गजानन किर्तीकर यांनी शिवसेनेच्या राजकीय दुखण्याचे अचूक निदान केले

    Read more

    J. P. Nadda : भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण अन् निवड कधी होणार? तीन नेत्यांची नावे चर्चेत

    भारतीय जनता पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांबाबत चर्चा जोर धरू लागली आहे. पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची औपचारिक प्रक्रिया या महिन्यात म्हणजेच जूनच्या मध्यापर्यंत सुरू होऊ शकते.

    Read more

    महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंगची तयारी; याचा अर्थ राहुल गांधींच्या आरोपातच पराभवाची कबुली!!

    महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंगची तयारी याचा अर्थ राहुल गांधींच्या आरोपातच पराभवाची कबुली!! असे म्हणायची वेळ राहुल गांधींच्या लेखाने आणली.

    Read more

    Modi government : मोदी सरकारची 11 वर्षे- 17 कोटी नोकऱ्या; मोदी म्हणाले- विकसित भारताच्या संकल्पात युवक महत्त्वाचे भागीदार

    मोदी सरकार ९ जून रोजी ११ वर्षे पूर्ण करत आहे. याआधी, केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षांच्या कामगिरीची यादी देणारे एक ई-पुस्तक प्रकाशित केले आहे. त्याला ‘विकसित भारताच्या अमृत काळातील ११ वर्षे सेवा, सुशासन आणि गरिबांचे कल्याण’ असे नाव देण्यात आले आहे.

    Read more