• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 206 of 1427

    Pravin Wankhade

    Maharashtra Municipal Election : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची तयारी सुरू – १४ वर्षांपूर्वीचीच प्रभागरचना पुन्हा लागू

    राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले असून, ती २०११ च्या जनगणनेच्या आधारावर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात २०१७ मध्ये अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसारच नव्याने काही किरकोळ बदल करून ती रचना पुन्हा लागू होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया सुरु केली असून, या प्रभाग रचनेवर आधारित निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.

    Read more

    Israel Support : गाझातील बंडखोर संघटनेला इस्रायलची मदत; हमासशी लढण्यासाठी शस्त्रेही दिली, नेतान्याहूंकडून समर्थन

    इस्रायली सरकारवर असे गंभीर आरोप आहेत की त्यांनी गाझामध्ये हमासशी लढण्यासाठी पॅलेस्टिनी मिलिशियाला शस्त्रे पुरवली आहेत. गेल्या २ दशकांपासून हमासने गाझा ताब्यात घेतला आहे. सर्व प्रयत्न करूनही, इस्रायलला हमास पूर्णपणे संपवता आले नाही.

    Read more

    Shubhanshu Shukla : द फोकस एक्सप्लेनर : शुभांशु शुक्ला अंतराळात करणार 7 प्रयोग; वाचा सविस्तर

    शुभांशु शुक्ला हे फ्लोरिडा (यूएसए) येथून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) कडे रवाना झाले आहेत. त्यांच्या १४ दिवसांच्या प्रवासात ते भारतीय संशोधकांनी तयार केलेले सात महत्वपूर्ण प्रयोग करणार आहेत. हे प्रयोग दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

    Read more

    Karnataka Caste Census : कर्नाटकमध्ये पुन्हा जातीनिहाय जनगणना; खडगे–राहुल यांच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

    कर्नाटक सरकारने राज्यात १० वर्षांनंतर पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही जनगणना पारदर्शक आणि सर्व समाजघटकांचा समावेश असलेली असेल. या प्रक्रियेसाठी वेळापत्रक लवकरच निश्चित होईल आणि ९० दिवसांत अहवाल तयार केला जाईल.

    Read more

    Fadnavis Announces : सर्व लोकल एसी होणार– भाडेवाढ नाही! देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

    राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा करत मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. त्यांनी जाहीर केलं की, मुंबईतील सर्व लोकल ट्रेन लवकरच एसी (AC) केल्या जातील आणि त्यासाठी प्रवाशांकडून कोणतीही भाडेवाढ केली जाणार नाही.

    Read more

    Zeeshan Akhtar : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी झीशान अख्तर कॅनडामध्ये ताब्यात

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी झीशान अख्तरला कॅनडामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.

    Read more

    Prime Minister Modi पंतप्रधान मोदींनी थरूर यांच्यासह सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या सदस्यांचे केले कौतुक, म्हणाले…

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने जगभरात पाकिस्तानाच खोटारडेपणाचा बुरखा फाडण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची आवश्यकता का होती, हे सांगण्यासाठी पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या सदस्यांची भेट घेतली.

    Read more

    Austria : खळबळ! विद्यार्थ्याने शाळेत केला अंदाधुंद गोळीबार, आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू

    ऑस्ट्रियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर ग्राझमधील एका शाळेत गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. ऑस्ट्रिया प्रेस एजन्सी एपीएच्या वृत्तानुसार, ग्राझ शहराच्या महापौरांनी सांगितले की या गोळीबारात ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

    Read more

    QRSAM’ : भारतीय लष्करी सामर्थ्य वाढणार! लवकरच मिळणार अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली ‘QRSAM’

    भारतीय लष्कराला लवकरच एक नवीन हवाई संरक्षण प्रणाली मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शत्रूचे कोणतेही क्षेपणास्त्र, ड्रोन भारताच्या सीमेवरून सहज पाडले जाईल.

    Read more

    Toll Policy : आता एक्सप्रेस वेवर जेवढी चालेल गाडी, तेवढाच आकारला जाणार टोल?

    जर तुम्ही दुर्तगती महामार्गावर गाडीने जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकार लवकरच नवीन टोल धोरण आणण्याची तयारी करत आहे.

    Read more

    Dwarka : दिल्लीतील द्वारका येथील एका अपार्टमेंटमध्ये भीषण अग्नितांडव

    दिल्लीतील द्वारका Dwarka येथे आज (मंगळवार) सकाळी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. येथील एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली.

    Read more

    Tej Prataps : तेजप्रताप यांची लालू यादव यांच्याबद्दल आणखी एक भावनिक पोस्ट, म्हटले..

    राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी एका नवीन पोस्टद्वारे सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. यावेळी तेज प्रताप यांनी त्यांच्या वडिलांबद्दल पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये तेजप्रताप यांनी एक फोटो शेअर केला आहे आणि एका ओळीचे कॅप्शन लिहिले आहे. फोटोमध्ये भिंतीवर लालू यादव यांचा फोटो बनवलेला दिसत आहे, ज्याला तेजप्रताप यादव मिठी मारताना दिसत आहेत.

    Read more

    Jersey airport : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याशी अमानुष वागणूक; न्यू जर्सीमधील विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल

    येथील नेवार्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याला अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केले, हातकड्या घालून जमिनीवर पाडले आणि नंतर अमेरिकेतून हद्दपार केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. हा व्हिडिओ प्रथम एका साक्षीदार आणि भारतीय-अमेरिकन उद्योजक कुणाल जैन यांनी रेकॉर्ड केला होता. यामध्ये अमेरिकन अधिकारी विद्यार्थ्याशी गुन्हेगारासारखे वागताना दिसत आहेत.

    Read more

    पुण्यातून पवारांचा आणि कोलकत्यातून ममतांचा मोदींवर हल्ला; पण दोघांनीही काँग्रेसच्या पायाखालच्या सतरंज्या खेचल्या!!

    पुण्यातून शरद पवारांचा आणि कोलकत्यातून ममता बॅनर्जींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला, पण दोघांनीही काँग्रेसच्याच पायाखालच्या सतरंज्या खेचल्या हेच राजकीय वास्तव चित्र आज समोर आले.

    Read more

    Manipur violence : मणिपूर हिंसा- राष्ट्रीय महामार्ग बंद, जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा; 5 जिल्ह्यांत इंटरनेट बंद

    मणिपूरमधील हिंसाचारानंतर, महामार्ग अडथळे आणि वाहतूक मार्गांमध्ये व्यत्यय आल्याने सामान्य लोकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. विशेषतः चुराचांदपूर आणि राजधानी इम्फाळमध्ये अन्नधान्य आणि औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

    Read more

    Air Force : वायूदलाला मिळणार 3 आधुनिक I-STAR स्पाय एअरक्राफ्ट; शत्रूच्या ठिकाणांची अचूक माहिती देतील

    भारतीय हवाई दलाला (IAF) लवकरच तीन आधुनिक I-STAR (गुप्तचर, पाळत ठेवणे, लक्ष्य अधिग्रहण आणि शोध) गुप्तचर विमाने मिळणार आहेत. या प्रकल्पाची किंमत १०,००० कोटी रुपये आहे.

    Read more

    Bengaluru : बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी हायकोर्ट RCBच्या याचिकेवर सुनावणी करणार; फौजदारी खटला रद्द करण्यासाठी अपील

    चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध दाखल केलेला फौजदारी खटला रद्द करण्याबाबतची सुनावणी उद्या होणार आहे. या प्रकरणात त्यांना गोवण्यात आले आहे, असे म्हणत फ्रँचायझीने सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

    Read more

    Sharad Pawar : उलटा चोर कोतवालावर उलटला; पण बांगलादेशाचा हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस विषयी पवारांना कळवळा; पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला!!

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात अचानक शरद पवारांना बांगलादेशच्या नोबेल पारितोषिक विजेता अर्थतज्ञ हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याच्या विषयी कळवळा आला. त्या कळवळ्यातूनच पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला चढाविला.

    Read more

    Nitin Gadkari : दिल्लीत हवाई बस, नागपूरमध्ये फ्लॅश चार्जिंग इलेक्ट्रिक बस तर डोंगराळ भागांसाठी डबल-डेकर बस

    देशात उडणाऱ्या बसेसचे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याच्या अगदी जवळ आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, भारत सरकार सार्वजनिक वाहतुकीचे पूर्णपणे रूपांतर करण्यासाठी अनेक क्रांतिकारी प्रकल्पांवर काम करत आहे. यामध्ये हवाई बसेस, फ्लॅश चार्जिंग इलेक्ट्रिक बसेस आणि डोंगराळ राज्यांसाठी डबल-डेकर फ्लाइंग बसेस यांचा समावेश आहे.

    Read more

    पवारांच्या राष्ट्रवादीला वर्धापन दिनीच गळती; जयंत पाटील देखील प्रदेशाध्यक्ष पदापासून दूर पळती!!

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वर्धापन दिनीच गळती; जयंत पाटील देखील प्रदेशाध्यक्ष पदापासून दूर पळती!!, अशी अवकाळा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 26 व्या वर्धापनदिनी प्राप्त झाली. पक्षाच्या गळतीच्या आणि जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा छायेखालीच राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात बंदिस्त वातावरणात वर्धापन दिन साजरा करावा लागला.

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वर्धापन दिनीच गळती; जयंत पाटील देखील प्रदेशाध्यक्ष पदापासून दूर पळती!!, अशी अवकाळा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 26 व्या वर्धापनदिनी प्राप्त झाली. पक्षाच्या गळतीच्या आणि जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा छायेखालीच राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात बंदिस्त वातावरणात वर्धापन दिन साजरा करावा लागला.

    Read more

    Sharad Pawar : ‘’ऑपरेशन सिंदूरवर विशेष सत्र बोलवण्याची गरज नाही, हे प्रकरण…’’

    ऑपरेशन सिंदूरवरील राजकारण थांबता दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ऑपरेशन सिंदूरवर विशेष सत्र बोलवण्याची गरज नाही. ही एक अतिशय संवेदनशील बाब आहे आणि त्यावर खुली चर्चा शक्य नाही. विरोधकांची अशी मागणी योग्य नाही.

    Read more

    Singapore cargo ship : केरळमध्ये सिंगापूरच्या मालवाहू जहाजाला आग; 22 पैकी 4 क्रू मेंबर्स बेपत्ता; 18 जणांना वाचवले

    केरळमधील कोची येथे सोमवारी सकाळी सिंगापूरचे मालवाहू जहाज MV WAN HAI 503 मध्ये आग लागली. घटनेच्या वेळी कार्गोमध्ये 22 क्रू मेंबर्स होते. आग लागल्यानंतर त्यापैकी 18 जणांनी समुद्रात उड्या मारल्या. त्यापैकी काहींना भाजून दुखापत झाली. तथापि, सर्वांना वाचवण्यात आले आहे. परंतु, 4 क्रू मेंबर्स बेपत्ता असल्याची माहिती आहे.

    Read more

    Railway Minister Vaishnav : मुंब्रा दुर्घटनेनंतर मुंबईकरांसाठी लोकल डब्यांच्या तीन नव्या डिझाईन, रेल्वेमंत्री वैष्णव यांचा मोठा निर्णय

    ठाण्यातील मुंब्रा येथे सोमवारी घडलेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेने पुन्हा एकदा मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. या अपघातात 13 प्रवासी खाली पडले असून त्यातील 4 जणांचा मृत्यू झाला. कसारा आणि कल्याण लोक पास होताना दारात लटकणारे प्रवासी रुळांवर पडल्याने आता सरकारला जाग आली आहे. या घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे संपूर्ण डिझाईनच बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आहे.

    Read more

    एकीकडे सुप्रिया सुळेंचे victim card, दुसरीकडे teaser मधून अजितदादांवर वार; तरीही सत्तेच्या वळचणीला जायला पवारांची राष्ट्रवादी तयार!!

    एकीकडे सुप्रिया सुळे यांचे victim card, दुसरीकडे टीचर मधून अजितदादांवर वार आणि तरीही सत्तेच्या वळसणीला जायला पवारांची राष्ट्रवादी तयार!! असला प्रकार राष्ट्रवादीच्या 26 व्या वर्धापन दिनी समोर आला.

    Read more

    JP Nadda : जेपी नड्डा म्हणाले- आधीचे सरकार भ्रष्टाचार-नकारात्मकतेने भरलेले होते; मोदी सरकारने ही भावना बदलली

    सोमवारी मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप मुख्यालयात सरकारचे काम, निर्णय आणि धोरणे यावर पत्रकार परिषद घेतली.

    Read more