पवारांनी दाखवली आपल्या पक्षाच्या खासदारांची एकजूट; पण ते टाळू शकतील का INDI आघाडीतल्या खासदारांची फूट??
शरद पवारांनी दाखवली आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांची एकजूट; पण ते टाळू शकतील का INDI आघाडीतल्या खासदारांची फूट
शरद पवारांनी दाखवली आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांची एकजूट; पण ते टाळू शकतील का INDI आघाडीतल्या खासदारांची फूट
मराठा आरक्षणावर जीआर करणाऱ्या फडणवीस सरकारला आव्हान देणाऱ्या छगन भुजबळ यांचे अवसान अवघ्या दोन दिवसांमध्ये गळाले.
केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रत्यार्पणाच्या अपीलात बेल्जियम सरकारला आश्वासन दिले आहे की भारतात हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला मानवतेने वागवले जाईल. गृह मंत्रालयाने त्यांच्या पत्रात चोक्सीला कोणत्या कक्षात ठेवले जाईल याचाही उल्लेख केला आहे.
मंगळवारी देशाला १५ वे उपराष्ट्रपती मिळणार आहेत. एनडीएने ६८ वर्षीय सीपी राधाकृष्णन यांना तर भारताने ७९ वर्षीय बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ७८१ खासदार संसदेत मतदान करतील. मतमोजणी सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. त्यानंतर निकाल जाहीर केले जातील.
ओबीसी समाजातल्या ताटातले आरक्षण हे दुसऱ्यांच्या ताटात जाणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. मात्र, दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून कोणालाही जात प्रमाणपत्र काढता येत नाही. त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र जमा करावी लागतील. पुरावे द्यावे लागतील, अशा शब्दात भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना सुनावले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबरपर्यंत दिलेल्या इशाऱ्याला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ओबीसी समाजाच्या हक्कासाठी जे देवेंद्रजींनी सोसले आहे तो अन्य कोणीही सोसलेले नाही, असे विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक, वैचारिक आणि वैयक्तिक पातळीवर हल्ले असतील किंवा टार्गेट केले गेले असेल, पण मी जबाबदारीने सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर कोणतीही गदा येणार नाही, अडचण येणार नाही यासाठी मी आश्वस्त करतो, असे आश्वासन गोरे यांनी दिले आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. इतकेच नाही तर हा भ्रष्टाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वरदहस्ताने झाला असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारने अलीकडेच मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला शासकीय निर्णय (जीआर) मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी तीव्र शब्दांत विरोध केला आहे. भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की, हा निर्णय न्यायालयाच्या निकालाविरोधात आहे आणि त्यामुळे ते या जीआरला न्यायालयात आव्हान देणार आहेत.
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येत आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे तसेच विनंती देखील केली आहे की मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या आधी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अन्यथा दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेऊ, असे म्हणत जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पवित्र हजरतबल परिसरातील राष्ट्रीय चिन्हाची झालेली विटंबना आणि त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार तारिक अन्वर यांनी दिलेल्या विधानामुळे नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. अन्वर यांनी “जे झालं ते झालं” असे उद्गार काढले. या वक्तव्यामुळे भाजपने काँग्रेसवर तीव्र हल्लाबोल करत राहुल गांधींनाही थेट लक्ष्य केले आहे.
भारतामध्ये सक्रिय असलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने सोमवारी सकाळपासून मोठी मोहीम उघडली. जम्मू-काश्मीरसह दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या पाच राज्यांमधील एकूण २२ ठिकाणी समांतर धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत अनेक संशयितांवर चौकशी करण्यात आली असून, मोबाईल फोन, लॅपटॉप, हार्डडिस्क, कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची नोंद असलेले पुरावे जप्त करण्यात आले.
आगामी सणासुदीच्या काळात भारतीय वस्तूंना प्राधान्य देऊन देशी उद्योगांना बळकटी मिळवून द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एनडीए खासदारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघात ‘स्वदेशी मेळे’ आयोजित करावेत. यामधून स्थानिक उत्पादक, कारागीर, लघुउद्योग, महिला स्वयं-सहाय्यता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होईल.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोलकाता न्यायालयात सहारा इंडिया ग्रुपविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात १.७४ लाख कोटी रुपयांच्या चिट फंड घोटाळ्याचा उल्लेख आहे.ईडीने सहारा संस्थापक दिवंगत सुब्रत रॉय यांच्या पत्नी सपना रॉय आणि मुलगा सुशांत रॉय यांना आरोपी म्हणून नाव दिले आहे. अनिल वलपारंपिल अब्राहम आणि जितेंद्र प्रसाद (जेपी) वर्मा यांच्यासह समूहाचे अनेक वरिष्ठ अधिकारी देखील आरोपींमध्ये आहेत.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधकांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून बाहेर मोठा बवाल चालवलाय; प्रत्यक्षात विरोधकांपुढे खासदारांचे सध्याचे संख्याबळच टिकवण्याचे खरे आव्हान आहे, हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय सत्य समोर आले.
भारताने पुरुष हॉकी आशिया कप २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे. रविवारी बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव केला. भारताने हे विजेतेपद चौथ्यांदा जिंकले. या विजयासह भारताने २०२६ च्या विश्वचषकातही स्थान मिळवले.
गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने पुढील सात वर्षांत (आर्थिक वर्ष २०३२ पर्यंत) वीज उत्पादन, अक्षय ऊर्जा आणि ट्रान्समिशन-वितरणात सुमारे ६० अब्ज डॉलर्स (सुमारे ५.३४ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. या गुंतवणुकीचा उद्देश भारताची वेगाने वाढणारी वीज मागणी पूर्ण करणे आणि देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनविण्यास मदत करणे आहे.
भाजप खासदारांची दोन दिवसांची कार्यशाळा रविवारी सुरू झाली. पंतप्रधान मोदींनीही त्यात सहभाग घेतला. यादरम्यान ते सभागृहातील शेवटच्या रांगेत बसले. फोटो शेअर करताना पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, संसद कार्यशाळेत, देशभरातील सहकारी संसद सदस्य आणि वरिष्ठ नेत्यांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. एकमेकांकडून शिकण्यासाठी आणि जनतेची चांगली सेवा करण्यासाठी असे व्यासपीठ खूप महत्वाचे आहे.
सगळ्यांचेच संख्याबळ तोकडे, म्हणूनच कुठे काय मिळते का बघायला मातोश्रीवर भेटले!!, अशी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची अवस्था आली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि आमदार अमिन पटेल हे आज उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले होते. तिथे त्यांनी राज्याच्या राजकारणा संदर्भात विविध अंगांनी चर्चा केली. या चर्चेची माहिती बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली. या भेटीचे फोटो सगळ्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वर शेअर केले.
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी रविवारी राजीनामा दिला. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) मधील फूट टाळण्यासाठी इशिबा यांनी हे पाऊल उचलले आहे. जपानी माध्यमांनी एनएचकेने हे वृत्त दिले आहे.
कॅनडाच्या सरकारने कबूल केले आहे की खलिस्तानी दहशतवादी संघटना देशाच्या भूमीवर सक्रिय आहेत. त्यांना कॅनडामध्येही निधी मिळत आहे. त्यांचे उद्दिष्ट नवीन राजकीय व्यवस्था निर्माण करणे किंवा हिंसाचाराद्वारे विद्यमान व्यवस्था बदलणे आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातले पवार खानदान राजकीय मखलाशा करण्यात आणि कोलांट उड्या मारण्यात कसे “तयार” आहे, याचे वर्णन परस्पर वैचारिक विरोधक असलेले भाऊ तोरसेकर आणि राजू परुळेकर हे दोन ज्येष्ठ पत्रकार एकमताने करत असतात.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले आहे की, १ लाख लोक गाझा शहर सोडून गेले आहेत. जेरुसलेममध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, नेतन्याहू म्हणाले की, हमास लोकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून त्यांचा मानवी ढाल म्हणून वापर करता येईल. इस्रायली पंतप्रधानांच्या मते, हमासने महिला आणि मुलांना गोळ्या घालून रोखण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले- लव्ह जिहाद आणि धर्मांतर हे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक सौहार्दासाठी गंभीर धोका आहे. ते म्हणाले- बळजबरीने, प्रलोभनाने किंवा फसवणुकीने केलेले धर्मांतर अयोग्य आहे. यामुळे समाजात अशांतता निर्माण होऊ शकते. आमचे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत हे थांबवणे आहे. या समस्येचे निराकरण ही एक दीर्घ प्रक्रिया आहे, परंतु आम्हाला विश्वास आहे की लवकरच अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.
टेस्लाचे मालक एलन मस्क यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या फॅक्ट चेक फीचरने ट्रम्प सल्लागार पीटर नवारो यांच्या भारताने रशियन तेल खरेदी केल्याच्या दाव्यांचे खंडन केले आहे.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून यामुळे राज्यातील ओबीसी समाज नाराज असल्याचे बोलले जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली आहे. तसेच ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यासह पवार कुटुंबावर देखील हल्लाबोल सुरू केला आहे. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.