• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 193 of 1427

    Pravin Wankhade

    Irans : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर समोर आली इराणची पहिली प्रतिक्रिया

    अमेरिकेने शनिवारी इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील तीन प्रमुख अणु केंद्रांवर बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स आणि क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यानंतर, इराणच्या अणुऊर्जा संघटनेने (एईओआय) रविवारी पहिले अधिकृत निवेदन जारी केले. एईओआयने म्हटले आहे की आमची सर्व अणु केंद्रे सुरक्षित आहेत. रेडिएशन लीक झालेले नाही आणि तपासात कोणतेही नुकसान झाल्याचे दिसून आले नाही.

    Read more

    Pahalgam attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. पाकिस्तानातून आलेल्या लष्कर-ए-तोयबा (एलईटी) च्या दहशतवाद्यांना आश्रय देण्यात सहभागी असलेल्या दोघांना एजन्सीने अटक केली आहे. दहशतवादी हल्ल्यापूर्वी या दहशतवाद्यांना पूर्ण नियोजन करून आश्रय देण्यात आला होता. धार्मिक ओळखीच्या आधारे पर्यटकांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता, ज्यामुळे हा हल्ला आणखी क्रूर आणि वेदनादायक मानला जात आहे.

    Read more

    काका – पुतण्याच्या महत्त्वाकांक्षांचे फुगेच मोठे; पण राजकीय कर्तृत्वात काटेच काटे!!

    माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करून स्वतःचाच चेअरमन पदाची बेगमी करून ठेवली पण त्याचवेळी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चेची फुसकुली पुन्हा हवेत सोडली गेली.

    Read more

    GST scam : १०० कोटींच्या GST घोटाळ्यात CBIची कारवाई ; बिहार-झारखंडमधील सात ठिकाणी छापे!

    १०० कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी परतावा घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी बिहार आणि झारखंडमधील सात ठिकाणी छापे टाकले. बनावट निर्यात बिलांद्वारे कर परतावा मिळवल्याच्या आरोपांच्या चौकशीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. तपासात सहभागी असलेल्या पाच कस्टम अधिकाऱ्यांमध्ये पाटण्याचे अतिरिक्त जीएसटी आयुक्त रणविजय कुमार यांचाही समावेश आहे.

    Read more

    India 186 Drugs : देशात बनलेल्या 186 औषधांचे नमुने फेल; सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनचा अहवाल

    सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या तपासणीत धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. CDSCO च्या तपासणीत हिमाचल प्रदेशातील ३७ औषध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या ५० औषधां

    Read more

    बारामतीतून कर्जत जामखेड मध्ये “घुसलेल्या” रोहित पवारांची घसरण सुरूच, कर्जत दूध संघाची निवडणूक बिनविरोध राम शिंदेंचा रोहित पवारांना धोबीपछाड!!

    स्वतःचा बारामती मतदारसंघ सोडून कर्जत जामखेड सारख्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मतदारसंघात राजकीय “घुसखोरी” करून आमदारकी मिळवलेल्या शरद पवारांच्या नातवाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पाचव्यांदा धोबीपछाड दिला.

    Read more

    S Jaishankar : एस. जयशंकर यांचं वक्तव्य : शेजारी देशांशी संबंध कायम ठेवणं सोपं नसतं, पण भारताने परिपक्वता दाखवली

    भारतानं आपल्या शेजारी देशांशी कसे संबंध ठेवावेत, यावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच एक महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की शेजारी देशांशी नेहमीच सुलभ संबंध ठेवता येतील, अशी अपेक्षा नको. पण भारतानं परिपक्व धोरण तयार केलं आहे, ज्यामुळे सरकारं बदलली तरी संबंध बिघडत नाहीत.

    Read more

    Omar Abdullah : ओमर म्हणाले- ट्रम्प यांना फक्त स्वतःची काळजी; आम्ही त्यांना मित्र समजत होतो

    जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी म्हटले की, अमेरिका इतर देशांचा मित्र आहे जोपर्यंत त्यांचा फायदा होतो. तो स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकतो.

    Read more

    Sonia Gandhi : सोनिया म्हणाल्या- इराण जुना मित्र, भारताचे मौन अस्वस्थ करणारे; इस्रायली हल्ल्यांवर सरकारकडून विरोधाची अपेक्षा

    काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इस्रायलने इराणवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी द हिंदूमधील एका लेखात लिहिले आहे की, इस्रायल स्वतः एक अण्वस्त्रसंपन्न देश आहे, परंतु अण्वस्त्रे नसतानाही इराणला लक्ष्य केले जात आहे. हा इस्रायलचा दुटप्पीपणा आहे.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : पाकिस्तान का गातोय ट्रम्प यांचे गोडवे? क्रिप्टो व्यवसायात दडली मेख; भारतासाठी काय आहे धोका? वाचा सविस्तर

    मेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे नेहमीच त्यांच्या राजकारणासोबतच व्यावसायिक व्यवहारांसाठी चर्चेत असतात. सध्या त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानमध्ये क्रिप्टोकरन्सीशी संबंधित व्यवसायात गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. हा विषय जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे, कारण ट्रम्प हे नेहमी पाकिस्तानविरोधी धोरणांचे पुरस्कर्ते मानले जात होते, मात्र आता तेच कुटुंब पाकिस्तानमध्ये आर्थिक हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    Read more

    Sanjay Raut : ‘’ट्रम्प भारताच्या बाजूने का उभे राहिले नाहीत?’’

    अमेरिकेने आता इराण आणि इस्रायलमधील युद्धात उडी मारली आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांनी विचारले आहे की जेव्हा इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यात सहभागी होण्याची काय गरज आहे?

    Read more

    Election Commission : निवडणूक आयोगाने म्हटले- मतदान केंद्राचे फुटेज सार्वजनिक करता येणार नाही; यामुळे मतदारांसाठी धोका

    निवडणूक आयोगाने शनिवारी म्हटले आहे की, मतदान केंद्रांच्या वेबकास्टिंगचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करणे योग्य नाही. यामुळे मतदार आणि गट ओळखणे सोपे होईल. मतदार आणि गैर-मतदार दोघेही असामाजिक घटकांकडून दबाव, भेदभाव आणि धमक्यांना बळी पडू शकतात.

    Read more

    आयत्या मिळालेल्या सत्तेची अजितदादांच्या राष्ट्रवादीला खुमखुमी, स्वतःचे नाक कापून नागपुरात भाजपचे उमेदवार पाडायची तयारी!!

    आयत्या मिळालेल्या सत्तेची अजितदादांच्या राष्ट्रवादीला खुमखुमी, स्वतःचे नाक कापून नागपुरात भाजपचे उमेदवार पाडायची तयारी!!, अशी चिन्हे खरंच दिसून राहिली आहेत. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कारनामेच तसे चालवले आहेत.

    Read more

    अमेरिकेच्या B 2 स्टेल्थ बॉम्ब विमानांमधून इराणचे 3 आण्विक तळ उद्ध्वस्त, तरीही आण्विक तळ सुरक्षित असल्याचा इराणचा दावा

    अमेरिकेने इराणच्या इस्फहान, नतान्झ आणि फोर्डो या तीन आण्विक तळांवर हल्ला केला. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला. इराणविरुद्धच्या इस्रायलच्या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली. अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांना लक्ष्य केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली. पण इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळला. इराण मधले सर्व आण्विक तळ सुरक्षित असल्याचा दावा केला.

    Read more

    Operation Sindhu : ऑपरेशन सिंधू- इराणमधून आणखी 290 नागरिक भारतात पोहोचले; आतापर्यंत 1,117 भारतीय घरी परतले

    इराण-इस्रायल संघर्षादरम्यान ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत एकूण १,११७ भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे. मशहादहून आणखी एक विमान शनिवारी रात्री ११:३० वाजता २९० नागरिकांना घेऊन नवी दिल्लीत पोहोचले. यापूर्वी, ३१० नागरिकांचा एक गट दुपारी ४.३० वाजता राजधानीत पोहोचला होता.

    Read more

    Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक 2024: भाजपने 1494 कोटी खर्च केले, 620 कोटींसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर

    २०२४च्या लोकसभा आणि त्यासोबतच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वाधिक पैसे खर्च केले. पक्षाने सुमारे ₹१,४९४ कोटी खर्च केले, जे एकूण निवडणूक खर्चाच्या ४४.५६% आहे.

    Read more

    माळेगाव कारखान्यावर वर्चस्वासाठी अजितदादा आणि चंद्रराव तावरे यांच्यातच “टफ फाईट”; शरद पवार + सुप्रिया सुळे स्थानिक राजकारणात पराभवाच्या छायेत?

    माळेगाव साखर कारखान्यावर वर्चस्वासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे या दोघांच्या पॅनेलमध्येच टफ फाईट आहे. या दोघांच्या टफ फाईट मध्ये बारामतीचे सर्वेसर्वा मानले गेलेले शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे स्थानिक राजकारणात तरी पराभवाच्या छायेत आलेत. तिथे आज मतदान होत आहे.

    Read more

    Thiruvananthapuram : ब्रिटिश टीम F-35 लढाऊ विमानांची तपासणी करणार; केरळच्या तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6 दिवसांपासून उभे

    ब्रिटिश रॉयल एअर फोर्सचे एफ-३५बी लाइटनिंग II स्टेल्थ हे लढाऊ विमान १४ जूनच्या रात्रीपासून केरळच्या तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे आहे. इंधनाअभावी या विमानाचे येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. तपासादरम्यान तांत्रिक त्रुटीही उघड झाल्या.

    Read more

    Putin states : पुतीन म्हणाले- युक्रेन आमचे, दोन्ही देशांचे लोक एक; सुमी शहर ताब्यात घेण्याचा इशारा

    रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी सांगितले की, संपूर्ण युक्रेन आमचे आहे आणि बफर झोन तयार करण्यासाठी युक्रेनियन शहर सुमीवर कब्जा करण्याची धमकी दिली.

    Read more

    Aditya Thackeray : हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंकडून भाजपवर ‘मराठी विरोधी अजेंडा’चा आरोप

    राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयावरून वाद चिघळला असून, या निर्णयाला मराठी अस्मिता विरोधात राबवला जाणारा कट ठरवत शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

    Read more

    Hemant Biswa Sarma : इस्लामिक देशांतील ‘हँडलर’ काँग्रेसच्या प्रचारासाठी सक्रिय; ५ हजार सोशल मीडिया खात्यांमागे विदेशी हात? मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचा गंभीर आरोप

    आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी एक गंभीर आरोप करत म्हटले आहे की, इस्लामिक देशांतील काही ‘हँडलर’ काँग्रेसच्या समर्थनार्थ ५ हजारांहून अधिक सोशल मीडिया अकाऊंट्स चालवत आहेत. २०२६ मध्ये होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वी हा सर्वात मोठा परकीय हस्तक्षेप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून, केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणा या प्रकाराची चौकशी करत आहेत, असेही सरमा यांनी स्पष्ट केले.

    Read more

    Akshar Yoga : आंतरराष्ट्रीय योग दिनी अक्षर योग केंद्राने तब्बल १२ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स करून रचला इतिहास

    आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ निमित्त, बेंगळुरूस्थित अक्षर योग केंद्राने १२ नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रस्थापित करून ऐतिहासिक कामगिरी केली. केंद्राचे संस्थापक आणि आध्यात्मिक प्रमुख हिमालयन सिद्ध अक्षरजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही अभूतपूर्व कामगिरी साध्य झाली.

    Read more

    Air balloon : Video – आकाशात पेट घेतलेल्या हॉट एअर बलूनचा थरार! आठ जणांचा मृत्यू, १३ जण जखमी

    ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना राज्यात उडणाऱ्या एका हॉट एअर बलुनला आग लागली. त्यानंतर, तो बलुन थेट आकाशातून खाली पडला. ज्यात आठ जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही दुर्घटना शनिवारी घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यासंबंधीचे फुटेज प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये आग लागलेल्या हॉट एअर बलूनमधून धूर निघताना दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अपघातातून १३ जण वाचले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Read more

    दहशतवादी देशाच्या शिफारशीवर, ट्रम्पचा डोळा नोबेलवर; पण “पाकिस्तानी कबूतर” शिटले शस्त्रसंधीच्या credit वर!!

    दहशतवादी देशाच्या शिफारशीवर, ट्रम्पचा दावा नोबेलवर!!, असे अमेरिकेच्याही इतिहासातले रसातळाचे राजकारण आज घडले. अमेरिकेनेच शस्त्रास्त्रे देऊन पोसलेलेल्या पाकिस्तान सारख्या मंडलिक राष्ट्राने अमेरिकेच्या अध्यक्षाला नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी शिफारस पत्र दिले. आणि ते मिळवणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

    Read more

    भक्तीभाव आणि ऐक्य भावनेने गोदावरी घाट उजळला; श्रीकर परदेशी आणि दादा वेदक यांच्या हस्ते गोदावरी आरती; एकादशीनिमित्त गीता पठण

    पावन गंगा-गोदावरीच्या तीरावर दररोज भक्तिभावाने संपन्न होणारी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची महाआरती आज विशेष उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात झाली.

    Read more