• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 187 of 1322

    Pravin Wankhade

    Raosaheb Danve : रावसाहेब दानवे म्हणाले- नागपूर घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यामुळे हिंसाचार घडला

    औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण तापले असून मंगळवारी रात्री नागपूर शहरात हिंसाचार उसळला होता. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे

    Read more

    Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला कोर्टाचा दणका; अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; पोलिसांना शरण येण्याशिवाय पर्याय नाही

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी तथा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने मंगळवारी कथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

    Read more

    अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून वेगळ्याच संशयाची पेरणी; पण प्रत्यक्षात नागपूरचा दंगा ही तर मास्टर माईंड फहीम खानची करणी!!

    नागपुरात औरंगजेब प्रेमींनी केलेल्या दंगली बाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून वेगळ्याच संशयाची पेरणी झाली. नागपूरच्या दंगलीमागे प्रशांत कोरटकर तर नाही ना, असा संशय अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.

    Read more

    न्यूझीलंडचे पंतप्रधान अन् दिल्लीच्या रस्त्यावर क्रिकेटची धमाल!!

    न्यूझीलंडचे पंतप्रधान अन् दिल्लीच्या रस्त्यावर क्रिकेटचे धमाल!! असे अनोखे दृश्य दिल्लीच्या रस्त्यावर दिसले.

    Read more

    Udayanraje Bhosale : औरंगजेबाची कबर देशाच्या बाहेर फेकली पाहिजे; उदयनराजे भोसलेंची मागणी, नागपूर हिंसाचारावरून काँग्रेसवर आरोप

    दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा ही विकृती ठेचून कशी काढता येईल हे बघा, असे उदयनराजे भोसले म्हणाले. काँग्रेसच्या काळात अनेक दंगली झाल्या. त्याला मोठ्या प्रमाणावर आळा घालण्याचे काम भाजप सरकारने केले. काँग्रेसने द्वेष पसरवण्याचे काम केले, असा आरोपही उदयनराजे भोसले यांनी केला. औरंगजेबाची कबर काढली, तर ती या देशाच्या बाहेरच फेकून दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.

    Read more

    नागपूर दंगलीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे निवेदन; धार्मिक मजकूर जाळल्याच्या अफवेने हिंसाचार झाला

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत नागपूर दंगलीवर विस्तृत भाष्य केले. त्यात त्यांनी जनतेला एकमेकांप्रती आदरभाव बाळगून संयम राखण्याचे आवाहन केले. तसेच कुणी दंगल करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जात, धर्म न पाहता कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला. विशेषतः पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सरकार सोडणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

    Read more

    Sunita William : 9 महिने 14 दिवसांनी पृथ्वीवर परतल्या सुनीता विल्यम्स; तापमान वाढीमुळे अंतराळयानाचा 7 मिनिटांसाठी संपर्क तुटला

    भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ९ महिने आणि १४ दिवसांनी पृथ्वीवर परतले आहेत. त्यांच्यासोबत क्रू-९ चे आणखी दोन अंतराळवीर आहेत, अमेरिकेचे निक हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव्ह. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान १९ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ३:२७ वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत नागपूर हिंसाचारावर भाष्य करताना ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली. विशेषतः त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व अनिल परब यांना चांगलेच धारेवर धरले. वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही. तुमचे साहेब मोदींकडे जावून त्यांची माफी मागून आलेत. तुमचाही इतिहास मला ठावूक आहे. त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका, असे ते म्हणालेत.

    Read more

    Devendra Fadnavis : कोयता गँगच्या महिमा मंडनातून गुन्हेगारीचे आकर्षक; पण दिशा उपक्रमातून अल्पवयीन गुन्हेगारांचे पुनर्वसन!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अलीकडच्या घटनांमध्ये 9 गुन्हे नोंद झाले असून, त्यामध्ये 19 आरोपींपैकी 13 आरोपी हे विधि संघर्षित बालक आहेत.

    Read more

    सुनीता विल्यम्स यांना पंतप्रधान मोदींचे पत्र; अंतराळातून परतण्यापूर्वी लिहिले- तुम्हाला लवकरच भारतात भेटायचे आहे!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहून भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. १ मार्च रोजी लिहिलेले हे पत्र नासाचे माजी अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांनी पाठवले होते. हे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी X वर शेअर केले आहे.

    Read more

    आमिष दाखवणाऱ्या व्याजाच्या योजनांतून फसवणूक टाळण्यासाठी राज्यात स्थापणार फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट!!

    नियमानुसार देण्यात येणाऱ्या व्याजापेक्षा दुपटीने व्याज देणाऱ्या योजनांच्या जाहिराती, भरमसाठ व्याजाच्या योजनांचे आमिष दाखवून पतसंस्थांमधील अथवा बँकांमधील ठेवीदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आता फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येईल.

    Read more

    Israel : इस्रायलचा पुन्हा गाझावर हल्ला, २०० जणांचा मृत्यू!

    गाझामध्ये युद्धबंदी असताना, इस्रायलने पुन्हा एकदा हल्ला केला आहे. या हल्ल्यात २०० हून अधिक लोक मारले गेल्याचा दावा केला जात आहे. मृतांमध्ये अनेक मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत.

    Read more

    George Soros : जॉर्ज सोरोसशी संबंधित असलेल्या OSF या संघटनेवर EDची कारवाई

    अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्या समर्थित संघटना ओएसएफ (ओपन सोसायटी फाउंडेशन) आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांवर कारवाई केली आहे. मंगळवारी ईडीने बंगळुरूमधील ओएसएफ आणि त्याच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली हा छापा टाकण्यात आला.

    Read more

    Deoghar : देवघर येथील इंडियन ऑइल प्लांटमध्ये भीषण आग

    झारखंडमधील देवघरमधील जसिडीह येथील इंडियन ऑइल प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. आगीने इंडियन ऑइल प्लांटच्या संपूर्ण कॅम्पसला वेढले आहे. आगीचे भीषण रूप पाहून पोलीस आजूबाजूची गावे रिकामी करत आहेत.

    Read more

    Voter ID : मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार!

    मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ विभागाचे सचिव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव आणि यूआयडीएआयचे सीईओ आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञांसोबत बैठक घेतली.

    Read more

    Sunita Williams : पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स भारतात येणार!

    आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) जवळजवळ नऊ महिने घालवल्यानंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतणार आहेत. स्पेसएक्सचे कॅप्सूल क्रू-९ सुनीता आणि विल्मोर यांना आयएसएसमध्ये घेऊन निघाले आहे. तर पृथ्वीवर परतल्यानंतर, सुनीता विल्यम्स लवकरच भारतात येऊ शकतात. पंतप्रधान मोदींनी त्यांना पत्र लिहून भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे.

    Read more

    Trump : युक्रेन युद्ध रोखण्याबाबत ट्रम्प पुतिनशी चर्चा करणार; रशियाने म्हटले- नाटो देशांनी युक्रेनला सदस्यत्व देणार नसल्याचे वचन द्यावे!

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी युक्रेन युद्ध संपवण्यासाठी चर्चा करतील. अमेरिकेने रशियाला ३० दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव दिला आहे.

    Read more

    नागपूरच्या हिंदूंच्या घरांवर पेट्रोल बॉम्बचे गोळे; फडणवीस केव्हा आवरणार अस्तनीतले निखारे??

    नागपूरच्या हिंदूंच्या घरावर पेट्रोल बॉम्बचे गोळे; फडणवीस केव्हा आवरणार अस्तनीतले निखारे??, असे विचारायची वेळ नागपूरमध्ये औरंगजेब प्रेमींनी दंगल घडवून आणल्यानंतर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दंगलीबाबत विधानसभेत निवेदन केले. त्यावेळी त्यांनी दंगलीची सगळी भयानकता वर्णन केली संबंधित दंगल कशी पूर्वनियोजित होती तिथे पेट्रोल बॉम्ब, ट्रॉली भरून दगड, लाठ्या काठ्या तलवारी कुऱ्हाडी कसे आणले गेले, शेकडोंचा जमाव तिथे कसा जमवला गेला, याची तपशीलवार माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

    Read more

    Eknath Shinde : ”उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली होती, भाजपसोबत सरकार स्थापन करायचे होते”

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा खुलासा केला आहे. विधान परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. तेव्हा त्यांची माफी मागितली होती. आम्ही तुमच्यासोबत सरकार स्थापन करायचे आहे असे सांगितले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी या विषयावर आपले मत बदलले होते.

    Read more

    CM Saini : हरियाणात महिलांना दरमहा 2100 रुपये; मुख्यमंत्री सैनी म्हणाले- 5 हजार कोटींची तरतूद; 2 लाख कोटींहून अधिकचे बजेट सादर

    हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी अर्थमंत्री म्हणून त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी २ लाख ५ हजार १७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी १.८९ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी अर्थसंकल्पात १३.७% म्हणजेच सुमारे १६ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

    Read more

    महाराष्ट्राचा “मणिपूर” करायची दाखवून भीती; औरंगजेबाची कबर वाचवायची विरोधकांची तयारी!!

    नागपूर मध्ये औरंगजेब समर्थकांनी केलेल्या दंगलीची मणिपूरच्या दंगलीशी तुलना करून महाराष्ट्रात मणिपूर करायची भीती विरोधकांनी दाखवली पण यातून औरंगजेबाची कबर वाचवायची त्यांची तयारीच उघड दिसली.

    Read more

    February : फेब्रुवारीत व्यापार तूट कमी घटून 1.21 लाख कोटींवर; ऑगस्ट 2021 नंतरची सर्वात कमी तूट

    निर्यातीत वाढ झाल्यामुळे, भारताची मर्चेंडाइज ट्रेड डेफिसिट म्हणजेच व्यापार तूट फेब्रुवारी २०२५ मध्ये १४.०५ अब्ज डॉलर्स (१.२१ लाख कोटी रुपये) पर्यंत कमी झाली. गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये ते २२.९९ अब्ज डॉलर (१.९९ लाख कोटी रुपये) होते. ही तूट ऑगस्ट २०२१ नंतरची सर्वात कमी आहे.

    Read more

    Tulsi Gabbard : अमेरिकेच्या गुप्तचर संचालक तुलसी गब्बार्ड म्हणाल्या- भारतात पाक-पुरस्कृत हल्ले इस्लामिक दहशतवाद!

    अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गब्बार्ड यांनी भारतात सतत होणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांना इस्लामिक दहशतवाद म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, हा दहशतवाद भारत आणि अमेरिकेसह अनेक मध्यपूर्वेतील देशांसाठी धोका बनत आहे.

    Read more

    Devendra fadnavis पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन; पण प्रत्यक्षात कारवाई कधी??, नागपूरकरांचा सवाल!!

    नागपुरातील दंगली दरम्यान पोलिसांवर हल्ला करणाऱ्या कुठल्याही आरोपीला सोडणार नाही. त्यांना कठोर शासन करणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलून दाखवला‌.

    Read more