• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 185 of 1322

    Pravin Wankhade

    Rohit Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले दहा; पण आजोबा कसे आणि किती लढले, नातवाने सांगितले पाहा!!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले दहा; पण आजोबा कसे आणि किती लढले नातवाने सांगितले पाहा!!, असे आज मुंबईत घडले.

    Read more

    Guru Mandir : गुरूमंदिर अन् पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांना 723 कोटींची मंजुरी

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील गुरूमंदिर तीर्थक्षेत्रासाठी 170 कोटी आणि श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी 553 कोटी, अशा एकूण 723 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली.

    Read more

    Single Window App : कृषी क्षेत्रासाठी एआय आधारित तंत्रज्ञानासह ‘सिंगल विंडो ॲप’

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पीकविमा योजना आणि ई-पीक पाहणीच्या बैठकीत कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुदधीमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एकत्रित सेवा ॲप (सिंगल विंडो ॲप) आणि संकेतस्थळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    Read more

    Bader Khan Suri : अमेरिकेत भारतीय विद्यार्थी बदर खान सुरीला अटक; हमाससाठी प्रचार केल्याचा आरोप

    सोमवारी रात्री अमेरिकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी व्हर्जिनिया येथून बदर खान सुरी या भारतीय विद्यार्थ्याला अटक केली. अमेरिकेत हमासच्या समर्थनार्थ प्रचार केल्याचा आरोप सुरीवर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा निषेध करणाऱ्या विद्यार्थी कार्यकर्त्यांवर कारवाई करत आहेत.

    Read more

    Naxalites : छत्तीसगडमध्ये 2 चकमकींत 30 नक्षलवादी ठार; विजापूरमध्ये 26 मृतदेह आढळले, कांकेरमध्ये 4

    छत्तीसगडच्या बस्तर विभागात गुरुवारी दोन मोठ्या चकमकी घडल्या. यामध्ये ३० नक्षलवादी मारले गेले आहेत. पहिली चकमक विजापूर-दंतेवाडा सीमेवर आणि दुसरी कांकेर-नारायणपूर सीमेवर झाली.

    Read more

    Tamil Nadu : विरोधी पक्षाच्या खासदारांची संसदेबाहेर निदर्शने; पंजाबात शेतकऱ्यांवर पोलिसांची कारवाई, तामिळनाडूत सीमांकनाला विरोध

    गुरुवारी, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी, विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या आवारात केंद्र सरकारविरुद्ध निदर्शने केली. पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील काँग्रेस खासदारांनी निदर्शने केली.

    Read more

    Pakistani पाकिस्तानी हाय कमिशनची इफ्तार पार्टी आणि राष्ट्रीय दिन पडला फिका; तिथे पोहोचले फक्त मणिशंकर अय्यर आणि अभय चौटाला!!

    पाकिस्तानी हाय कमिशनची इफ्तार पार्टी आणि राष्ट्रीय दिन पडला फिका; तिथे पोहोचले फक्त मणिशंकर अय्यर आणि अभय चौटाला!!, असे काल नवी दिल्लीत घडले.

    Read more

    Central government : 54 हजार कोटींचा संरक्षण करार, केंद्र सरकारची मान्यता; लष्कराला मिळणार 307 हॉवित्झर तोफा

    भारताने गुरुवारी सैन्याची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी दोन मोठे निर्णय घेतले. केंद्र सरकारने ₹ ७,००० कोटी खर्चाच्या ३०७ प्रगत तोफा (ATAGS) खरेदीला मान्यता दिली आहे, ज्या पाकिस्तान आणि चीन सीमेवर तैनात केली जातील.

    Read more

    Chhawa एकीकडे औरंगजेबाची कबर वाचवण्याची बौद्धिक कसरत; दुसरीकडे छावा सिनेमावर बंदी घालण्याची मौलानाची मागणी!!

    एकीकडे औरंगजेबाची कबर वाचवण्याची बौद्धिक कसरत; तर दुसरीकडे छावा Chhawa  सिनेमावर बंदी घालायची मौलानाची मागणी!! असला प्रकार देशात सुरू झालाय.

    Read more

    Delimitation : ना ठाकरे + पवारांना निमंत्रण, ना महाराष्ट्राची दखल; पण DMK ला पाठिंबा द्यायची सुप्रिया सुळेंची धावपळ!!

    ना उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना निमंत्रण, ना घेतली महाराष्ट्राची दखल, पण तरी देखील केवळ प्रसिद्धीसाठी DMK ला पाठिंबा द्यायची सुप्रिया सुळेंची धावपळ!!, असला प्रकार समोर आला.

    Read more

    Turkey : विरोधी पक्षनेत्याच्या अटकेनंतर तुर्कीत निदर्शने; इस्तांबूलमध्ये 100 हून अधिक लोक ताब्यात, रस्ते-मेट्रो स्टेशन बंद

    इस्तांबूलचे महापौर आणि विरोधी पक्षनेते एकरेम इमामोग्लू यांच्या अटकेनंतर तुर्कीमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. निदर्शक रस्त्यावर, विद्यापीठांमध्ये आणि मेट्रो स्थानकांवर सरकारविरोधी घोषणा देत आहेत.

    Read more

    Elon Musk : एलन मस्क यांच्या Xचा भारत सरकारविरुद्ध खटला; भारतीय अधिकारी कंटेंट ब्लॉक करत असल्याचा आरोप

    एलन मस्कच्या कंपनी एक्सने कर्नाटक उच्च न्यायालयात भारत सरकारविरुद्ध याचिका दाखल केली आहे. आयटी कायद्याच्या कलम ७९(३)(ब) चा वापर कसा केला गेला आहे, याला ते आव्हान देते

    Read more

    Philippines : फिलीपिन्सने भारताला स्क्वाडमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले; क्वाडचे 3 देश देखील त्याचे सदस्य

    दक्षिण चीन समुद्रात चीनच्या विस्तारवादी धोरणांना तोंड देण्यासाठी फिलीपिन्सने भारत आणि दक्षिण कोरियाला ‘स्क्वॉड ग्रुप’मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे.

    Read more

    CM Devendra Fadnavis : मायक्रोसॉफ्टकडून डिजिटल गव्हर्नन्स मॉडेलला सहकार्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-बिल गेट्स यांच्यात चर्चा

    राज्यातील शासकीय कामामध्ये एआयचा वापर सुरू झाला आहे. डिजिटल गव्हर्नन्स आणि राइट टू सर्व्हिसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशनकडून सहकार्य मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला स्वयंरोजगाराच्या २५ लाख लखपती दीदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी गेट्स फाउंडेशनने महिलांना उद्योजक बनवण्यासाठी भागीदारी करण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक, प्रख्यात उद्योजक आणि गेट्स फाउंडेशनचे बिल गेट्स यांच्यात गुरुवारी सकारात्मक चर्चा झाली.

    Read more

    Nagpur riots : नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खानसह 6 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा

    नागपुरात भडकलेल्या हिंसेचे उदात्तीकरण करीत हिंसा पुन्हा भडकावी यासाठी दंगलीच्या व्हिडिओवर देशविघातक कॅप्शन लिहून व्हायरल करणारा नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान याच्यासह सहा आरोपीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Read more

    Supriya sule शरद पवारांचे “हे” टेक्निक आत्मसात करायचा सुप्रिया सुळेंचा डाव, पण…!!

    शरद पवारांचे “हे” टेक्निक आत्मसात करायचा (शप) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya sule यांचा डाव, पण…!!, हे शीर्षक वाचून कोणते टेक्निक आणि ते का आत्मसात करायचा कोणता डाव??

    Read more

    Central government : केंद्र सरकारने ऑनलाइन बेटिंग, गेमिंगशी संबंधित १२९८ ब्लॉकिंग ऑर्डर केले जारी

    ऑनलाइन गेमिंगमुळे निर्माण होणारे धोके आणि व्यसन रोखण्यासाठी, केंद्र सरकारने २०२२-२४ या काळात ऑनलाइन बेटिंग/जुगार/गेमिंग वेबसाइट्स (मोबाइल अॅप्लिकेशन्ससह) संबंधित १,२९८ ब्लॉकिंग निर्देश जारी केले आहेत.

    Read more

    दिल्लीत रंगली मुस्लिम लीगची इफ्तार पार्टी; सोनिया + जया बच्चन + अखिलेशची “रिझर्व्ह” टेबलावर दिसली घट्ट मैत्री!!

    रमजानचा महिना चालू असताना दिल्लीत रंगली मुस्लिम लीगची इफ्तार पार्टी; सोनिया गांधी, जया बच्चन, अखिलेश यांची “रिझर्व्ह” टेबलवर दिसली घट्ट मैत्री!! इंडियन नॅशनल मुस्लिम लीगने आज राजधानी नवी दिल्ली इफ्तार पार्टी दिली. मुस्लिम लीगने मागितलेले पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर देखील त्या पक्षाचे भारतात अस्तित्व उरलेच. ते केरळमध्ये वाढत गेले. पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर मुस्लिम लीगने इंडियन नॅशनल मुस्लिम लीग असे नवे नाव धारण केले. त्या पक्षाचे वर्षानुवर्षे केरळमधून खासदार आणि आमदार निवडून आले.

    Read more

    दोन शिवसेनांच्या वादाचा संपेना घोळ; म्हणून दिशा सालियन + पूजा चव्हाण प्रकरणांचा चालवलाय खेळ!!

    विधिमंडळाने विधिमंडळाच्या बाहेर आज दिवसभर दिशा सालियन + आदित्य ठाकरे प्रकरणावर राजकीय गदारोळ झाला. जुनेच आरोप – प्रत्यारोप पुन्हा उगळले गेले.

    Read more

    Disha initiative : ‘दिशा’ उपक्रमाच्या माध्यमातून अल्पवयीन गुन्हेगारांचे पुनर्वसन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अलीकडच्या घटनांमध्ये 9 गुन्हे नोंद झाले असून, त्यामध्ये 19 आरोपींपैकी 13 आरोपी हे विधि संघर्षित बालक आहेत.

    Read more

    Maharashtra : औष्णिक केंद्रातील राखेच्या वितरणासाठी महाराष्ट्राचे आता नवे धोरण

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात औष्णिक केंद्रातील राखेच्या विक्रीसंदर्भात नव्या सर्वंकष धोरणाची घोषणा केली. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार सध्या 100 टक्के लिलावाची अंमलबजावणी होत असली तरी स्थानिक उद्योगांना प्राधान्य देऊन त्यांचावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

    Read more

    Satyendra Jain : सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा आणखी एक खटला; 571 कोटींच्या सीसीटीव्ही प्रकल्पात घोटाळा

    दिल्लीतील ५७१ कोटी रुपयांच्या सीसीटीव्ही प्रकल्प घोटाळ्यात भ्रष्टाचार आणि लाचखोरीचा आरोप करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आप नेते आणि माजी आमदार सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    Read more

    महाराष्ट्रात 25 लाख उद्योजिका लखपती दीदी बनविण्यात बिल गेट्स फाउंडेशन उचलणार वाटा; मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा!!

    महाराष्ट्रातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणिराईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य दिले जाईल.

    Read more

    MPSC exam : MPSC परीक्षांचे वेळापत्रक UPSC प्रमाणे स्थिर करणार

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक (कॅलेंडर) यूपीएससीप्रमाणे निश्चित करणार असल्याचे विधानपरिषदेत सांगितले. गेल्या पाच-सात वर्षांपासून विविध न्यायालयीन आदेशांमुळे वेळापत्रक बदलावे लागत असल्याचे सांगत त्यांनी यापुढे पारदर्शक आणि नियोजित पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

    Read more

    Ram Sutar ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

    महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

    Read more