• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 174 of 1476

    Pravin Wankhade

    कर्नाटकात जातीनिहाय सर्वेक्षणाआधीच हिंदूंमध्ये फूट पाडायची आखणी; सामाजिक ऐक्याच्या टक्केवारीची वेगवेगळे तुकडे करून मांडणी!!

    बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जसा प्रशांत किशोरने गांधी आंबेडकरांच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडायचा फॉर्म्युला मुस्लिमांना दिलाय

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन- मराठा आरक्षण देताना ओबीसींना कोणताही धक्का नाही, तुम्ही मागत रहा, शक्य तेवढे देत राहू

    पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही, मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून त्यांनी मागत राहावे, आम्ही शक्य तेवढे देत राहू, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.

    Read more

    प्रशांत किशोरचा मुस्लिमांसाठी शेखचिल्ली फार्म्युला; गांधी + आंबेडकरांच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडा, हिंदू + मुस्लिम एकता साधा!!

    बिहार विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहार मधल्या विधानसभा निवडणुकीसाठी नवा फॉर्म्युला पुढे आणलाय.

    Read more

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा विश्वास- सरकारचे काम सुरू झाले, आता आरक्षण नक्की, मुंबईचे मालक आम्ही!

    मराठा आरक्षण संदर्भात सरकारने काम सुरू केले आहे. आमचे काम सुरू केले तर सरकारला आम्ही मोठेपण देऊ. तुम्ही जर आमचे कामे केले तर आम्ही सरकारचे कौतुकच करु, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

    Read more

    Minister Shivendra Raje Bhosale : मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले- देवेंद्र फडणवीस हे हिमालयासारखे नेते, राजकारणासाठी त्यांनी कधी समाजाचा वापर केला नाही

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंचितांचे ओबीसींचे नेते नाही तर मराठ्यांचे पण नेते आहेत. त्यांनी ओबीसी विरोधी भूमिका घेतली नाही. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी आरक्षण दिले आहे, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे हिमालयासारखे नेते आहेत, राजकारणासाठी त्यांनी समाजाचा वापर केला नाही, त्यामुळे आरक्षणासाठी कोण बोलत असेल त्याकडे दुर्लक्ष करा, असे भोसले यांनी म्हटले आहे. क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोहळ्यात बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

    Read more

    Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची जहरी टीका- अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता, कारखाना चालवण्याशिवाय दुसरे काय जमते?

    राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबतीतल्या मागण्या मान्य केल्यानंतर राज्यातील ओबीसी समाज दुखावला गेल्याचे बोलले जात आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके हे सातत्याने पवार कुटुंबावर टीका करत आहेत. शरद पवारांनीच जरांगे नावाचे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवले असल्याची टीका त्यांनी शुक्रवारी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

    Read more

    Banjara Community : बंजारा समाजालाही आरक्षण द्यावे:अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, धर्मगुरू जितेंद्र महाराज यांचा इशारा

    शासनाने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटीयर लागू केले त्यानुसारच बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण द्यावे अन्यथा रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा बंजारा समाजाचे धर्मगुरु जितेंद्र महाराज (पोहरादेवी) यांनी रविवारी ता. ७ हिंगोली ेयेथे दिला आहे.

    Read more

    General Chauhan : डिजिटल व तांत्रिक रणांगणावरही ताकद दाखवावी लागणार, जनरल चौहान यांचे आवाहन

    भारताच्या सुरक्षेसमोर उभे ठाकलेले धोके दिवसेंदिवस वाढत असून ते केवळ सीमारेषेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर आता ते बहुआयामी झाले आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी दिलेल्या भाषणात या धोक्यांची सविस्तर चर्चा करत सहा प्रमुख आव्हाने अधोरेखित केली. सीमारेषेवरच नव्हे तर डिजिटल व तांत्रिक रणांगणावरही ताकद दाखवावी लागणार आहे असे आवाहन त्यांनी केले.

    Read more

    Owaisi’s : ओवैसींचा इंडिया आघाडीला पाठिंबा, काँग्रेसच्या गोटात खळबळ, ‘भाजपची बी टीम’ म्हणणाऱ्यांना आता काय उत्तर?

    उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणांमध्ये मोठी हलचल. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना दिलेला पाठिंबा काँग्रेससाठी वरदान की अडचण, यावरच आता चर्चा रंगली आहे.

    Read more

    नवभारताचा रोडमॅप : पायाभूत सुविधांमध्ये होणार क्रांती

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला मूर्त स्वरूप देण्यासाठी केंद्र सरकारने २०२९ पर्यंत देशभरात भव्य पायाभूत सुविधा उभारण्याचा आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्याला ‘नवभारताचा रोडमॅप’ असे संबोधण्यात आले

    Read more

    Pakistan : पाकिस्तान बाॅम्बस्फाेटाने हादरले, खैबर पख्तूनख्वा प्रांतात क्रिकेट सामन्यादरम्यान भीषण स्फोट

    पाकिस्तान पुन्हा एकदा बाॅम्बस्फाेटाने हादरले असून बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यातील कौसर क्रिकेट मैदानात शनिवारी संध्याकाळी सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक बॉम्बस्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून मुलांसह अनेक प्रेक्षक जखमी झाले आहेत.

    Read more

    ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुन्हा ग्वाही

    मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही, मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार आहे

    Read more

    Vadettiwar : काॅंग्रेसकडून आरक्षणाच्या प्रश्नाला राजकीय रंग, वडेट्टीवार यांचा नागपुरात ऑक्टोबरमध्ये ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा इशारा

    मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी ताेडगा काढल्यानंतर आता ओबीसींना भडकावत आरक्षणाच्या प्रश्नाला राजकीय रंग देण्याची तयारी काॅंग्रेसने केली आहे. काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात ऑक्टोबरमध्ये ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा इशारा दिला नागपुरात ऑक्टोबरमध्ये ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर राजकीय रंग देत आहेत. स्वतःच्या पक्षीय हितासाठी समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका भाजप व शिंदे गटाकडून केली जाते.

    Read more

    Modi : मोदी व्हर्च्युअल BRICS शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत, जयशंकर सहभागी होणार

    ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ८ सप्टेंबर रोजी बोलावलेल्या ब्रिक्स नेत्यांच्या व्हर्च्युअल शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींऐवजी भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री एस जयशंकर करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.

    Read more

    भारताच्या लॉबिंग नंतर डोनाल्ड ट्रम्पची खरंच चुकीची कबुली की तात्पुरती उपरती??

    भारताच्या लॉबिंग नंतर डोनाल्ड ट्रम्पची खरंच चुकीची कबुली की तात्पुरती उपरती??, असा सवाल विचारायची वेळ डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमच्या वर्तणुकीतून समोर आली.

    Read more

    सत्ताधारी NDA खासदारांच्या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले शेवटच्या रांगेत!!

    सत्ताधारी NDA खासदारांच्या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले शेवटच्या रांगेत!!, असे चित्र आज दिसून आले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची दोन दिवसांची कार्यशाळा संसदेत असणाऱ्या जी एम सी बालयोगी सभागृहात आज सुरू झाली.

    Read more

    Trump : ट्रम्प म्हणाले- पत्रकार परिषद घेतली नाही, म्हणूनच मृत्यूची अफवा पसरली, सोशल मीडियावर ट्रेंड झाले ‘ट्रम्प इज डेड’​​​​​​​

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी त्यांच्या मृत्यूच्या अफवांची खिल्ली उडवली. ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले की, ते पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकत नाहीत आणि म्हणूनच त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या.

    Read more

    Salman Khan : सलमान खान पंजाब पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला, बचाव कार्यासाठी 5 बोटी पाठवल्या, गावेही दत्तक घेणार

    पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुढे आला आहे. अभिनेत्याच्या फाउंडेशनने पूरग्रस्त मदतीसाठी ५ बोटी पाठवल्या आहेत. आम आदमी पक्षाचे सरचिटणीस आणि पंजाब पर्यटन अध्यक्ष दीपक बाली यांनी पूरग्रस्त फिरोजपूर गावाला भेट दिली आणि सलमान खानच्या स्वयंसेवी संस्थेने पाठवलेल्या बोटी प्रशासनाला सुपूर्द केल्या. यापैकी २ बोटी फिरोजपूर सीमेवर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित बोटी राज्यभरातील बचाव कार्यात वापरल्या जातील.

    Read more

    Rashid Engineer : तिहारमध्ये रशीद इंजिनिअरवर हल्ला, पोलिसांनी सांगितले- तृतीयपंथीयांशी झटापट झाली

    बारामुल्ला लोकसभा खासदार रशीद इंजिनियर यांच्यावर दिल्लीच्या तिहार तुरुंगात हल्ला करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी ते त्यांच्या बॅरेकमध्ये असताना एका ट्रान्सजेंडरने त्यांच्यावर हल्ला केला. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की रशीद यांना किरकोळ दुखापत झाली आहे. ते सुरक्षित आहेत.

    Read more

    Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या 22 जणांच्या वारसांसाठी 2.20 कोटींचा निधी

    हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या 22 जणांच्या वारसांना मदतीसाठी 2.20 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून पुढील काही दिवसांतच आवश्‍यक पडताळणी करून सदर मदतीचे त्यांच्या वारसांना वाटप केले जाणार आहे.

    Read more

    केलेल्या कामाच्या फडणवीसांच्या जाहिराती; पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांना पोटदुखी!!

    केलेल्या कामाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिराती झाल्या. त्यामुळे पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांना पोटदुखी झाल्याचे समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली मनोज जरांगे यांचे आंदोलन संपले. ते मुंबईतून आंतरवली सराटीत गेले. त्यामुळे अनेकांचे पापड मोडले. कारण मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधायचे अनेकांची कारस्थाने उधळली गेली.

    Read more

    Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ दुर्घटना, अज्ञात वाहनाने चिरडल्याने 2 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

    गणेशोत्सवाच्या उत्साहातच मुंबईतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. लालबाग च्या राजाच्या विसर्जन मिरवणूकी दरम्यान एका अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. या अपघातात चंद्रा वजणदार (वय 2) या बालिकेचा मृत्यू झाला, तर तिचा भाऊ शैलू वजणदार (वय 11) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    Read more

    OBC Community : मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींचा एल्गार, ऑक्टोबरमध्ये नागपुरात काढणार महामोर्चा

    मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता राज्यात ओबीसी समाजाचे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे आहेत. सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला असून, या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. नागपूरमध्ये झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत महामोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीला विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमधील ओबीसी नेते उपस्थित होते.

    Read more

    Trump : ट्रम्प म्हणाले- भारतासोबत संबंध रिसेट करण्यास तयार, नेहमीच मोदींचा मित्र राहील; PM म्हणाले- मी त्यांच्या विचारांचे कौतुक करतो

    शुक्रवारी भारताविरुद्ध वक्तव्य केल्यानंतर सुमारे १२ तासांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युटर्न घेतला. व्हाईट हाऊसमध्ये सायंकाळी ६ ते ७ वाजता पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले – ‘मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन. भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यास मी नेहमीच तयार आहे.’

    Read more

    Laxman Hake : ओबीसी आक्रमक : हाके यांचे बारामतीत आंदोलन, फक्त गॅझेटवर प्रमाणपत्र मिळणार नाही- बावनकुळे

    मराठा आरक्षण जीआरविरुद्ध ओबीसी समाजाने एल्गार सुरू केला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून गेले दोन दिवस जीआरची होळी करण्यात आली. जीआर फाडण्यात आला. शुक्रवारी सकल ओबीसी समाजातर्फे औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावरील येळी फाटा येथे शुक्रवारी ३ तास रास्ता रोको करण्यात आला. त्याआधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी करण्यात आली होती.

    Read more