पार्थ पवार जमीन घोटाळ्यात अमेडिया कंपनीने काय आणि कोणते झोल केले??
पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्री पदाचा 24 तासांत त्यांचा राजीनामा द्यावा. देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा ताबडतोब घ्यावा.
पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्री पदाचा 24 तासांत त्यांचा राजीनामा द्यावा. देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा ताबडतोब घ्यावा.
इस्त्रायलने भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये राहणाऱ्या बनेई मेनाशे समुदायाच्या उर्वरित ५८०० ज्यूंना आपल्या देशात स्थायिक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना पुढील ५ वर्षांत इस्त्रायलमध्ये नेले जाईल.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भारतीय लष्करातील ख्रिश्चन अधिकारी सॅम्युअल कमलेसन यांची बडतर्फी योग्य ठरवली. त्या अधिकाऱ्यावर आरोप होता की त्यांनी आपल्या रेजिमेंटच्या साप्ताहिक धार्मिक संचलनांमध्ये आणि मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यास नकार दिला होता.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले की, गायक जुबीन गर्ग यांचा मृत्यू अपघात नसून हत्या होती. सरमा म्हणाले की, ही अनवधानाने झालेली हत्या किंवा गुन्हेगारी कट नव्हता, तर स्पष्टपणे खून होता. मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, एका आरोपीने गायकाचा जीव घेतला, तर इतर लोकांनी हत्येत त्याला मदत केली.
राज्याच्या फडणवीस मंत्रिमंडळातले मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मालेगाव मधले नेते दादा भुसे यांना राष्ट्रवादीच्या संस्कारांचे लागण झाल्याची चिन्हे दिसली. एकनाथ शिंदेंच्या पेक्षा दादा भुसे यांनाच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची तहान लागली.
पुण्यातल्या कोरेगाव पार्कच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवारच्या अमेडिया कंपनीने बरेच झोल केले. याची सगळी यादी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविली.
केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून संविधानाला धोका असल्याचा ढोल काँग्रेस, कम्युनिस्ट आणि बाकीच्या सगळ्या विरोधी पक्षांनी पिटला. प्रत्यक्षात असा कुठलाही धोका कुठे निर्माण झाल्याचे किंवा सुप्रीम कोर्टाने तसे ताशेरे ओढल्याचे कुठे दिसले नाही. पण म्हणून विरोधकांनी आपल्या भाषणांमध्ये संविधानाला धोका असल्याचा narrative तयार करणे थांबविले नाही.
कॅनडातील ओटावा येथे रविवारी खालिस्तान जनमतसंग्रहादरम्यान, खलिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय ध्वज ‘तिरंग्याचा’ अपमान केला. या लोकांनी भारतीय पंतप्रधान आणि अधिकाऱ्यांना ठार मारण्याच्या घोषणा दिल्या.
दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात पतीला घटस्फोटाची परवानगी देताना म्हटले की, गर्भधारणेला पतीवर झालेल्या क्रूरतेविरुद्ध ढाल बनवता येणार नाही. न्यायालयाने असे मानले की, पत्नीच्या वागण्यामुळे पतीने मानसिक छळ सोसला आणि यामुळे वैवाहिक संबंधही पूर्णपणे तुटले.
चीनने अरुणाचल प्रदेशात जन्मलेल्या भारतीय महिला पेम वांगजॉम थांगडॉक यांच्यासोबत शांघाय विमानतळावर गैरवर्तन केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.
28 वर्षांनंतर लालू कुटुंबाला राबडी निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस मिळाली आहे. गृहनिर्माण विभागाने नोटीस पाठवून 10 सर्कुलर रोड येथील सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले आहे.
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेवर मंगळवारी एकाच दिवशी काँग्रेस अध्यक्ष, कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची विधाने आली. उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले- मी मुख्यमंत्री बदलावर सार्वजनिकरित्या काहीही बोलणार नाही, हा आमच्या 4-5 लोकांच्या मधला गुप्त करार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 25 नोव्हेंबर रोजी हरियाणाच्या दौऱ्यावर आहेत. कुरुक्षेत्र येथे त्यांनी ज्योतिसर अनुभव केंद्राचे लोकार्पण केले आणि पाञ्चजन्य शंख स्मारकाचे उद्घाटन केले. यानंतर पंतप्रधान श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोहोचले. त्यांनी श्री गुरु तेग बहादूर यांना समर्पित पुस्तकाचे प्रकाशन केले आणि नाणेही जारी केले.
बनावट आयएएस कल्पना भागवतचे अफगाणिस्तान-पाकिस्तान कनेक्शनचे धागेदोरे समोर येत आहेत. अफगाणी मित्र अशरफच्या भावाच्या पाकिस्तानातील रेस्टॉरंटसाठी कल्पनाने ३ लाख रुपये हवालामार्फत पाठवल्याचे तपासात उघड झाले आहे. ही रक्कम तिने आधी अशरफला दिल्लीत पाठवली. तेथून त्याने मित्राच्या मदतीने ती हवालामार्फत पाकमध्ये पोहोचवली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मतदार याद्यांचे शुद्धीकरण अर्थात special intensive revision SIR विरोधात जोरदार आगपाखड केली. त्यांनी एकाच वेळी सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोग यांना धारेवर धरले. त्याचवेळी त्यांनी बंगाल जिंकायच्या नादात भाजप गुजरात हरून बसेल. मी देशभरात फिरून भाजपचा पाया हादरवून टाकेन, अशी दमबाजीची भाषा वापरली.
रशियासोबत सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी युक्रेन ट्रम्प यांच्या शांतता प्रस्तावावर सहमत झाला आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, हा दावा एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने केला आहे. आता फक्त काही छोटे मुद्दे सोडवणे बाकी आहे.
२५२ कोटी रुपयांच्या ‘मेफेड्रोन’ ड्रग्ज जप्ती प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद सलीम उर्फ मोहम्मद सुहैल शेख याच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे, अभिनेता-दिग्दर्शक सिद्धांत कपूर यांची मंगळवारी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षासमोर (एएनसी) ५ तास चौकशी केली गेली. सिद्धांत हा ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा पुत्र आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे.
इथिओपियाच्या ज्वालामुखीतील राख पूर्वेकडे सरकू लागल्याने, भारतात एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली, जर राखेचे कण विमानांवर आदळले तर हवाई अपघात होण्याची भीती होती. ज्वालामुखीची राख ४५,००० फूट उंचीपर्यंत पोहोचत होती, विमाने त्या पातळीपेक्षा खाली उडत असली तरी. भारतात अशा परिस्थितीचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे सरकारने रिअल-टाइम ज्वालामुखी राख प्रतिसाद प्रोटोकॉल सक्रिय केला. एव्हिएशन मंत्रालय, एअर ट्रॅफिक कंट्रोल, हवामान विभाग, एअरलाइन्स आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक एजन्सींच्या देखरेखीखाली एकत्र काम केले.
बहुप्रतीक्षित मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच मतदार यादीतील घोळ आता गंभीर पातळीवर पोहोचला आहे. नुकत्याच २० नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये तब्बल ११ लाख दुबार मतदारांची नावे असल्याची बाब समोर आली आहे. काही मतदारांची नावे चक्क १०३ वेळा नोंदवली गेल्याचेही यादीतून दिसून येते.
गौरी ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. ती पेशाने डॉक्टर होती. इतरांचे प्राण वाचवणारी होती. स्वतःचं आयुष्य संपवेल असं कधी वाटलं नव्हतं. तिने आत्महत्या केली नाही तर ही तिची हत्याच आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.
मोदी निघाले मेकॉले निर्मित मानसिक गुलामगिरी संपवायला; उदयनिधी आणि ठाकरे बंधू निघाले भाषिक युद्ध लढायला!!, असे चित्र आज देशात दिसून आले.
सोमवारी सकाळी पाकिस्तानातील पेशावर येथील फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयावर झालेल्या दोन आत्मघातकी हल्ल्यांमध्ये तीन कमांडो आणि तीन हल्लेखोरांसह सहा जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले.
राजनाथ सिंह म्हणाले, “हा गीतेचा देश आहे.” पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करताना राजनाथ सिंह म्हणाले की, दहशतवादी हे विसरले आहेत की भारत हा गीतेचा देश आहे, जिथे करुणा आणि युद्धात धर्माचे रक्षण करण्याची प्रेरणा दोन्ही आहे. संरक्षण मंत्री म्हणाले की, जर आपल्याला शांतीची भावना जिवंत ठेवायची असेल, तर त्यातील शक्तीची भावना आवश्यक आहे. निष्पापांचे रक्षण करण्यासाठी, त्याग करण्याचे धाडस देखील तितकेच आवश्यक आहे.
अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरावर फडकलेला धर्मध्वज भगव्या रंगाचा आणि त्यावर कोविदार वृक्ष अंकित आहे. कारण भगवा रंग हा धर्माचे प्रतीक आहे तर कविता वृक्ष हा रघुकुलाचे म्हणजेच श्रीरामांच्या वंशाचे प्रतीक आहे. याचे महत्त्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आजच्या कार्यक्रमात विशेषत्वाने सांगितले.
जामखेडच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना केले. त्याचवेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.