• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 156 of 1475

    Pravin Wankhade

    Supreme Court : दिल्ली-NCRमध्ये फटाके बनवण्यास परवानगी, पण विक्रीवर बंदी; सुप्रीम कोर्टाने म्हटले- फक्त ग्रीन फटाके तयार करता येतील

    दिवाळीपूर्वी दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके उत्पादनाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. न्यायालयाने म्हटले आहे की ज्या उत्पादकांकडे हिरव्या फटाक्यांसाठी NEERI आणि PESO परवाने आहेत तेच ते उत्पादन करू शकतात.
    .

    Read more

    दिल में काबा, नजर में मदिना; दुर्गा पूजेच्या मांडवात ममता बॅनर्जींची चाटूकारिता!!

    दिल में काबा, नजर में मदिना; दुर्गा पूजेच्या मांडवात ममता बॅनर्जींची चाटूकारिता!!, असला प्रकार पश्चिम बंगाल मधून एका व्हिडिओतून समोर आला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार बंगाल मधल्या मुस्लिम मतांवर निवडून येते आणि ते टिकून राहते हे काही नवीन नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी मुस्लिम मतांच्या लांगुलचालनासाठी वाटेल त्या स्तरावर खाली उतरतात. अधून मधून त्या हिंदू होऊन मठ मंदिरांमध्ये जातात. तिथल्या घंटा वाजवतात. पण त्यावर राजकीय उतारा म्हणून तिच्या लगेच फुर्फुरा शरीफला सुद्धा जाऊन येतात, हे आत्तापर्यंत अनेकदा दिसले.

    Read more

    Delhi High Court : दिल्ली हायकोर्टाचे मत- समान नागरी कायदा काळाची गरज, पर्सनल लॉमध्ये बालविवाहाला परवानगी, परंतु POCSO अंतर्गत तो गुन्हा

    दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी देशात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याची बाजू मांडली. न्यायालयाने असे नमूद केले की पर्सनल लॉ बालविवाहाला परवानगी देतो, परंतु POCSO कायदा आणि BNS त्याला गुन्हेगार ठरवतात. या कायद्यांमधील वारंवार होणारे संघर्ष लक्षात घेता, स्पष्ट कायदेशीर व्याख्या आवश्यक आहे.

    Read more

    Bareilly : यूपीच्या बरेलीत शुक्रवारच्या नमाजानंतर गोंधळ; आंदोलनाची परवानगी रद्द; संतप्त जमावाची दगडफेक

    शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये “आय लव्ह मोहंमद” वादावरून तीन ठिकाणी गदारोळ झाला. दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. मौलाना तौकीर रझा यांनी शहरातील इस्लामिया मैदानावर मुस्लिमांना आंदोलन करण्याचे आवाहन केले होते, परंतु प्रशासनाने परवानगी नाकारली. शुक्रवारच्या नमाजानंतर जमाव रस्त्यावर उतरला आणि जबरदस्तीने मैदानात प्रवेश करण्याचा आग्रह धरला.

    Read more

    जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून दिली माहिती

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, एरंडोल या तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला

    Read more

    BJP Swadeshi : तरुणांना ‘स्वदेशी’शी जोडणार; भाजप राबवणार विशेष मोहीम; स्वदेशी अवलंबणारे युवा दिसतील सोशल मीडियात

    स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपने सोशल मीडियाद्वारे तरुणांना सहभागी करून घेण्यास सुरुवात केली आहे. “जेन-झी” शेजारील देशांत सत्ता परिवर्तनात व्यस्त असताना पक्ष तरुण पिढीला स्वदेशी उत्पादनांसाठी एक श क्ती म्हणून एकत्रित करत आहे.

    Read more

    याला म्हणतात, बिन बडबडीचा तडाखा; BRICS सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचा न्यूयॉर्कमध्ये धमाका!!

    याला म्हणतात, बिन बडबडीचा तडाखा; BRICS सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचा न्यूयॉर्कमध्ये धमाका!!, अशी आंतरराष्ट्रीय घडामोडी भारताने अमेरिकेत घडवून आणली.

    Read more

    योगींच्या पोलिसांनी आवळल्या मौलाना तौकिर रजा सकट 10 समर्थकांच्या मुसक्या; I love Mohammad च्या निमित्ताने बरेलीत दंगल घडवायचा होता डाव!!

    I love Mohammad ही मोहीम चालवून त्यानिमित्ताने बरेली मध्ये आणि त्या पाठोपाठ संपूर्ण उत्तर प्रदेशात मोठ्या जातीय दंगली घडवायचा डाव मौलाना तौकीर रजा त्याच्या समर्थकांनी आखला होता

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधींवर वाराणसी कोर्टात खटला चालणार; अमेरिकेत म्हटले होते- शिखांना भारतात पगडी-कडा घालण्याचा अधिकार आहे?

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. आता शिखांविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल वाराणसी न्यायालयात त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला जाणार आहे. गेल्या वर्षी अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी म्हणाले होते की, “भारतात शिखाला पगडी आणि कडा घालण्याचा अधिकार आहे का, यावर हा लढा आहे.”

    Read more

    Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांना टोला- मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा बसल्या?

    उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यात चांगलाच वाद पेटल्याचे दिसत आहे. मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा काय बसल्या? असे नाव न घेत चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना सवाल केला आहे. तर महसूलमंत्री असताना पुण्यातील 342 कोटींचा भूखंड घोटाळा कसा दाबला गेला? अशी विचारणा जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत केली आहे.

    Read more

    CM Fadnavis : महाराष्ट्रातील पूर स्थितीवर मदतीसाठी मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा, पंतप्रधान मोदींकडे एनडीआरएफ अंतर्गत भरीव मदतीची मागणी

    राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तातडीने दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा तपशील सादर केला

    Read more

    Modi : बिहारच्या तब्ब्बल 75 लाख महिलांना 10-10 हजार मिळाले; मोदींच्या हस्ते महिला रोजगार योजनेचा शुभारंभ

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये “मुख्यमंत्री महिला रोजगार योजना” सुरू केली. पंतप्रधानांनी ७५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले.

    Read more

    Nitesh Rane : नितेश राणे म्हणाले- आमच्या हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेवच चालणार; मी काही पाकिस्तानमध्ये बसून नाही लिहिले

    भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी ‘आय लव्ह महादेव’ अशी पोस्ट केली होती. त्यावर बोलताना राणे म्हणाले, एम फॉर महाराष्ट्र, एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव. हे सरळ स्पष्ट आहे. आमच्या हिंदू राष्ट्रांत आय लव्ह महादेवच चालणार. मी काही पाकिस्तान, कराची इस्लामाबादमध्ये बसून आय लव्ह महादेव लिहिलेले नाही, असे राणेंनी म्हटले आहे.

    Read more

    Hasan Mushrif : मुश्रीफांचा महाडिक-क्षीरसागर यांना टोला; आम्ही लंडनवारीवर असताना मनपाच्या जागा वाटून घेतल्या

    कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. मुश्रीफ म्हणाले की, आम्ही लंडनवारीमध्ये असताना या दोन्ही नेत्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या जागा वाटून घेतल्या आहेत. एकाने 80 जागा घेतल्या तर दुसऱ्याने 81 जागा वाटून घेतल्या.

    Read more

    Sharad Pawar : अतिवृष्टीने केवळ शेतकरीच नव्हे, तर बारा बलुतेदार बाधित; तातडीने उपाययोजना करण्याची शरद पवारांची मागणी

    महाराष्ट्रात सध्या सर्वत्रच अतिवृष्टी सुरू असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच पूर परिस्थितीमुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

    Read more

    Marathwada : नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, धाराशिवला ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

    मराठवाड्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून नांदेड, लातूर, बीड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

    Read more

    भारताचे क्रांति तीर्थ अंदमान बनले आता नैसर्गिक वायु उर्जा तीर्थ!!

    भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अंदमानला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण तिथूनच सावरकरांच्या क्रांतीची ज्वाला संपूर्ण देशभर पसरली. तिच्यामुळे ब्रिटिश साम्राज्य संपुष्टात आले. अनेकानेक भारतीय क्रांतिकारकांनी तिथे कष्ट सोसले म्हणून भारताला स्वातंत्र्याची पहाट पाहता आली. अंदमान करोडो भारतीयांसाठी पूजनीय क्रांति तीर्थ बनले. पण आता भारताचे हे क्रांति तीर्थ अंदमान बनले आहे आता नैसर्गिक वायु उर्जा तीर्थ!!

    Read more

    Maharashtra : छत्रपती संभाजीनगर, पुणे, नगरसह तीन ठिकाणी होणार संरक्षण कॉरिडॉर; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींसमोर केले सादरीकरण

    संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रात महाराष्ट्र भक्कम भागीदार म्हणून काम करत आहे. महाराष्ट्रात १० ऑर्डिनन्स फॅक्टरीज आहेत. देशाला लागणाऱ्या एकूण शस्त्र आणि दारूगोळ्यापैकी ३० टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते.

    Read more

    Sonam Wangchuk, : सोनम वांगचुक यांच्यावर NSA, अटक करून जोधपूर तुरुंगात नेले; लेहमध्ये सलग चौथ्या दिवशी कर्फ्यू

    लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शुक्रवारी दुपारी त्यांच्या उल्याक्टोपो या गावात पोलिसांनी अटक केली. त्यांना राजस्थानमधील जोधपूर मध्यवर्ती कारागृहात विमानाने नेण्यात आले. वांगचुक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो जामिनाविना दीर्घकाळ ताब्यात ठेवण्याची परवानगी देतो.

    Read more

    Laxman Hake : ओबीसी, भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून मी प्रामाणिकपणे भांडतोय, लक्ष्मण हाके यांची भावनिक पोस्ट

    ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून मी प्रामाणिकपणे भांडतोय. आपले हक्क आणि अधिकार टिकले पाहिजेत, अशी भावनिक पोस्ट ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष होताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केल्यानंतर सरकारने मराठा आरक्षणाबाबत जीआर काढला आहे. मात्र मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण देऊ नये, अशी ओबीसी समाजाची मागणी कायम आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत जीआर काढल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मेळावा आणि दौऱ्यांमधून ओबीसींना एकत्र करण्याचं काम करत आहेत. याचपार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील दैत्यानांदूर येथे शनिवारी ओबीसी मेळावा होणार आहे. मात्र या मेळाव्याआधी लक्ष्मण हाके यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

    Read more

    भारतासारख्या हिंदूराष्ट्रात I love Mahadev हेच उद्गार चालणार; नितेश राणेंचा एल्गार

    भारतासारख्या हिंदूराष्ट्रात I love Mahadev हेच उद्गार चालणार, अशा शब्दांमध्ये राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी एल्गार केला.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- न्यायालयांनी गंभीर प्रकरणांची दररोज सुनावणी करावी; आरोपपत्र दाखल केल्यानंतर 2 महिन्यांच्या आत बलात्कार प्रकरणांची सुनावणी पूर्ण करा

    सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, विशेषतः संवेदनशील प्रकरणांमध्ये दैनंदिन सुनावणीची पद्धत पूर्णपणे सोडून देण्यात आली आहे आणि न्यायालयांनी ती पुन्हा सुरू करावी. बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन देण्याच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

    Read more

    Sonia Gandhi : सोनिया म्हणाल्या- पॅलेस्टाईन प्रश्न सोडवण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा; मोदी-नेतान्याहूंच्या मैत्रीवरून परराष्ट्र धोरण ठरवू नका

    काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाबाबत मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आणि म्हटले की, पॅलेस्टाईन प्रश्न सोडवण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा.

    Read more

    एमपीएससीचा मोठा निर्णय… संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली; जाहीर केली नवी तारीख

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ ही परीक्षा २८ सप्टेंबर रोजी राज्यभरातील जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होते.

    Read more

    I love Mohammad वादावरून बरेलीमध्ये मौलाना तौकिर रझाच्या समर्थकांची दगडफेक; पोलिसांनी लाठीचार्ज करून आणले वठणीवर

    I love Mohammad वादातून उत्तर प्रदेशातल्या बरेलीत मौलाना तौकिर रझाच्या समर्थकांनी दगडफेक करून तीन ठिकाणी दंगल माजवली. पण योगींच्या पोलिसांनी लाठीचार्ज करून दंगलखोरांना अद्दल घडवली.

    Read more