• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 151 of 1475

    Pravin Wankhade

    तुझ्या सकट अजित पवारचा कार्यक्रम लावीन; मनोज जरांगेंची शेलक्या शब्दांमध्ये टीका

    मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे काल दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांच्यावर शरसंधान साधलेच, पण आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या सकट अजित पवारांना सुद्धा घेरले. धनंजय मुंडे आणि अजित पवारांचे राजकारण संपविण्याची धमकी दिली.

    Read more

    Anjali Damania : अंजली दमानिया यांचा सवाल- पंकजा मुंडेंना वाल्मीक कराडविषयी काय वाटते? दसरा मेळाव्यात झळकले पोस्टर

    मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळावा आज पार पडला. मात्र, यंदाच्या मेळाव्यात एका प्रसंगामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही तरुणांच्या हातात सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडे फोटो झळकले. यावरून अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे यांच्या निशाणा साधला आहे. पंकजा मुंडेंना वैयक्तिकरित्या वाल्मीक कराड यांच्या बाबत काय वाटते? असे प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारले पाहिजे, असे अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांना गॉन केस म्हटले.

    Read more

    Ramraje Warns : रामराजेंचा रणजीत नाईक निंबाळकर यांना इशारा, मनोमिलन एकतर्फी प्रेमातून होत नाही

    मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल, असा इशारा विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांना दिला आहे.

    Read more

    Nitish Kumar : बिहारमध्ये एनडीएसाठी भाजप आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी धोक्याची घंटा

    बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजत आहे. सी व्होटर सर्व्हे नुसार माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि नव्याने स्थापन झालेल्या रणनितीकर प्रशांत किशोर यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.

    Read more

    Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा अमेरिकेला इशारा, तुम्हालाच परिणाम भोगावे लागतील

    शियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेवर भारत आणि चीनला ऊर्जा संबंध तोडण्याचा दबाव टाकल्याबद्दल जोरदार हल्लाबोल केला. पुतिन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की अशा दबावाच्या हालचालींचे आर्थिक परिणाम उलट अमेरिकेलाच भोगावे लागतील.

    Read more

    राहुल गांधींनी संघाचा द्वेष नाही करायचा, तर दुसरे करायचे तरी काय??

    बिहारची निवडणूक तोंडावर आली असताना राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेले. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे संघ आणि भाजपवर जोरदार टीका करणारी भाषणे केली.

    Read more

    Uddhav Thackeray : मी आणि राज एकत्र येणार का? असे कुणीतरी बोलले. मग आम्ही पाच जुलै रोजी काय केले?

    मी आणि राज एकत्र येणार का? असे कुणीतरी बोलले. मग आम्ही पाच जुलै रोजी काय केले? तेव्हा मी बोललो आहे, आम्ही एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल, तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडून देणार नाही, असे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युती होणार असल्याचे स्पष्ट केले.

    Read more

    Uddhav Thackeray : सोनम वांगचुक देशद्रोही तर नवाज शरीफ यांचा केक खाणाऱ्यांना काय म्हणायचे?

    लेह लडाखसाठी लढणारे सोनम वांगचूक हे पाकिस्तान जाऊन आले म्हणून देशद्रोही ठरत असतील तर गुपचूप पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाऊन आलेल्या नरेंद्र मोदी यांना काय म्हणायचे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला आहे.

    Read more

    उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा हक्क नाही, उध्दव ठाकरे यांच्यावर रामदास कदमांचा हल्लाबोल

    उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतरही दोन दिवस उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मृतदेह तसाच ठेवून दिला होता.

    Read more

    Swami Chaitanyanand’ : चैतन्यानंदच्या कॉलेजमधून सेक्स टॉय, पॉर्न सीडी जप्त; नेत्यांसोबत बनावट फोटोही आढळले

    विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला स्वामी चैतन्यनंद सरस्वती उर्फ ​​पार्थ सारथी ज्या कॉलेज कॅम्पसमध्ये शिकवत असे, तिथून पोलिसांनी एक सेक्स टॉय आणि पाच पॉर्न सीडी जप्त केल्या आहेत.

    Read more

    मनोज जरांगेंनी मराठा समाजाला आज शासक + प्रशासक बनायचे सांगितले; मग त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपले मराठा उमेदवार का नव्हते दिले??

    मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी आज दसरा मेळाव्यात भाषण करताना मराठा समाजाला शासक आणि प्रशासक बनायला सांगितले.

    Read more

    राहुल कोलंबियात म्हणाले, चीन बलाढ्य, त्यांच्याशी लढाईचे कसे??, पण तिकीट फाडले परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यावर!!

    चीन बलाढ्य आहे. त्यांच्याशी कसे लढायचे??, असा सवाल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कधी केला नव्हता. पण राहुल गांधींनी मात्र तिकीट त्यांच्यावरच फाडले.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची कडाडून टीका- उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करण्याची गरज, तुम्ही CM असताना काय केले? शेतीच्या बांधावर किती वेळा गेले?

    उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? त्यांनी शेतकऱ्यांना काय दिले? शेतकऱ्यांचे किती अश्रू पुसले? शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले? हे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे आधी उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

    Read more

    दसरा मेळाव्यांची सीमोल्लंघने; राजकीय लाभासाठी भाषणांची पारायणे!!

    दसरा मेळाव्यांची सीमोल्लंघने; राजकीय लाभासाठी भाषणांची पारायणे!!, असेच आजच्या दसऱ्याच्या राजकीय मेळाव्यांचे वैशिष्ट्य ठरले. सकाळी झालेला संघाचा मेळावा हा शताब्दी मेळावा ठरला. त्यामध्ये संघ + सेवाभाव + समर्पण या विषयावर अधिक चर्चा झाली. त्याचबरोबर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सध्या प्रचलित झालेल्या आर्थिक नीतीचा फेरविचार करायचे आवाहन सरकारसह सर्व समाजाला केले कारण सध्याच्या प्रचलित अर्थनितीत शोषकांना शोषणाचा सुरक्षित अधिकार देण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे गंभीर निरीक्षण त्यांनी नोंदविले.

    Read more

    Maharashtra ZP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग; जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणाची 13 ऑक्टोबरला सोडत

    दिवाळीनंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडण्याची शक्यता आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 336 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

    Read more

    Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल- जयंत पाटलांनी जिल्ह्यातील कारखाने हाणले; राष्ट्रवादी पक्ष नव्हे, लुटारूंची टोळी

    भाजप आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. म्हैसवाड येथे बोलताना खोत यांनी जयंत पाटील यांनी जिल्ह्यात अनेक साखर कारखाने हाणले असल्याचा गंभीर आरोप करत, राष्ट्रवादी हा पक्ष नसून लुटारूंची आणि गुंडांची टोळी आहे, अशी थेट टीका केली.

    Read more

    Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता हॉटेल्स, दुकाने आणि आस्थापना 24 तास सुरू ठेवता येणार

    राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना आता 24 तास उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाने यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील व्यापारी व्यवहारांना नवे बळ मिळण्याची आणि ग्राहकांना दिवस-रात्र सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

    Read more

    RBI : RBIचा खुलासा- UPI मोफत, कोणतेही शुल्क लागणार नाही; IPO कर्ज मर्यादा ₹25 लाखांपर्यंत वाढवली

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बुधवारी (१ ऑक्टोबर) अनेक मोठे निर्णय जाहीर केले ज्यामुळे कंपन्या आणि व्यक्तींना बँक कर्ज मिळवणे सोपे आणि स्वस्त होईल. UPI शुल्काबद्दलच्या चिंता देखील दूर केल्या. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी चलनविषयक धोरण समिती (MPC) च्या बैठकीनंतर सर्व निर्णयांची घोषणा केली.

    Read more

    GST Collection : सप्टेंबरमध्ये ₹1.89 लाख कोटी GST संकलन; गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.1% वाढ

    नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर, केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यातील जीएसटी संकलनाचे आकडे जाहीर केले आहेत. सप्टेंबरमध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन ₹१.८९ लाख कोटी झाले, जे मागील वर्षीच्या तुलनेत ९.१% वाढले आहे.

    Read more

    स्वदेशी आणि स्वावलंबन यांना पर्याय नाही; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा संघ शताब्दी संदेश!!

    दुसऱ्या देशांवरची आपली निर्भरता कमी करण्यासाठी स्वदेशी आणि स्वावलंबन यांना पर्याय नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज संघ शताब्दीचा संदेश दिला.

    Read more

    Delhi Education : दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये सावरकर, RSS आणि स्वातंत्र्यसैनिकांवरील प्रकरणे जोडणार; इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत बदल

    दिल्लीच्या सरकारी शाळांमधील मुलांना लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) बद्दल माहिती मिळेल. राज्याचे शिक्षणमंत्री आशिष सूद यांनी मंगळवारी घोषणा केली की, विनायक दामोदर सावरकर, श्यामा प्रसाद मुखर्जी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील धडे लवकरच इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जातील.

    Read more

    Mallikarjun Kharge : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल; डॉक्टरांचा पेसमेकर बसवण्याचा सल्ला, प्रकृती स्थिर

    काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे (८३) यांना मंगळवारी बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे पुत्र आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी बुधवारी सांगितले.

    Read more

    Mohan Bhagwat : संघाचा शताब्दी विजयादशमी सोहळा- सरसंघचालक भागवत यांनी हेडगेवार यांना वाहिली श्रद्धांजली; शस्त्रपूजन केले

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) गुरुवारी विजयादशमीला संघटनेची शताब्दी साजरी करत आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सर्वप्रथम आरएसएस संस्थापक डॉ. हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहिली. प्रमुख पाहुणे माजी राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनीही श्रद्धांजली वाहिली.

    Read more

    Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे राष्ट्रपतींना पत्र; म्हणाल्या- आदिवासी असल्याने लडाखच्या लोकांच्या भावना समजून घ्या

    लडाखी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून तुम्ही आदिवासी असल्याने लडाखच्या लोकांच्या भावना समजून घ्या असे आवाहन केले.

    Read more

    PoK Protest : PoKत पाक सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार; 10 ठार, 100 जखमी; हिंसक निदर्शने सुरूच, सरकारकडे 38 मागण्या

    पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये सरकारविरुद्ध हिंसक निदर्शने सुरूच आहेत. निदर्शने शांत करण्यासाठी सुरक्षा दलांनी बुधवारी निशस्त्र लोकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जण जखमी झाले.

    Read more