महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस
आरोग्य क्षेत्रात राज्याने मोठी गुंतवणूक केली आहे, अशीही माहिती फडणवीसांनी दिली.
आरोग्य क्षेत्रात राज्याने मोठी गुंतवणूक केली आहे, अशीही माहिती फडणवीसांनी दिली.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधांमध्ये सर्वात महत्त्वाचा जो सिंधू जल करार चर्चेत आलाय
जसा आजोबा तसाच नातू; दोघांच्याही धमक्यात तद्दन फालतू!!, असलाच पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा राजकीय व्यवहार राहिलाय. आजोबाने जशी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली होती, तशीच त्याच्या नातवाने भारताला सिंधू नदीत भारतीयांचे रक्त वाहायची धमकी दिली. पण त्याचा आजोबा भारताचा कुठलाच केसही वाकडा करू शकला नाही, उलट त्या आजोबालाच भारतात येऊन भारतीय नेत्यांसमोर नाक घासावे लागले. त्यापेक्षा त्या आजोबाच्या नातवाची अवस्था वेगळी होण्याची शक्यता नाही.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले, परंतु खोऱ्यातील धोका अद्याप संपलेला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर आता आणखी एका हल्ल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुप्तचर संस्थांनी जारी केलेल्या अलर्टनुसार, लोकांना लष्कर-ए-तैयबाच्या धोकादायक मॉड्यूलबद्दल सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे.
पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी कारवायांचे आयोजक, गुन्हेगार आणि वित्तपुरवठा करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी परिषदेच्या सदस्यांनी केली. २२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात २६ जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
सध्या पाकिस्तानवर वॉटर स्टाइक आणि पॉलिटकल स्टाइक झाला आहे आणि पाकिस्तानची भीतीही समोर आली आहे. मात्र पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत, २४ तासांत दुसऱ्याता नियंत्रण रेषेवर गोळीबार केला गेला आहे. तर भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात शुक्रवारी (२५ एप्रिल) हैदराबादमध्ये कँडल मार्च काढण्यात आला, ज्यामध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि इतर अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी, दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्राला पाठिंबा दिला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना योग्य उत्तर देण्याचे आवाहनही केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमा’ची आढावा बैठक पार पडली. बैठकीत मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देशात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. या घटनेनंतर भारत-पाकिस्तान संबंध खूपच कटुतेच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. दरम्यान, पूर्व भारतात, सैनिकांनी लाल दहशतवादाविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) संचालक मंडळाची 91 वी बैठक पार पडली.
भारताच्या लष्करी हालचाली आणि कारवायांचे शत्रूला फायदेशीर ठरणारे बेबंद प्रक्षेपण नको, अशा स्पष्ट सूचना माहिती प्रसारण मंत्रालयाने जाहीर केल्यात
केंद्र सरकारने वक्फ सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आपले उत्तर दाखल केले आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, १९२३ पासून, वक्फ बाय युजर तरतुदी अंतर्गत नोंदणी अनिवार्य झाल्यानंतर, त्याचा गैरवापर केला जात आहे आणि खासगी आणि सरकारी मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. हे थांबवणे आवश्यक होते.
राहुल गांधींनी अपमान केला, पण इंदिरा गांधींनी, तर सावरकरांची धोरणे अंमलात आणली, पाकिस्तान तोडला!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अॅथॉरिटी (UMTA) बिल, 2025’च्या संदर्भात आढावा बैठक पार पडली.
पहलगाम मधला हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातल्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून आपापल्या राज्यातले पाकिस्तानी नागरिक शोधून काढून त्यांना परत त्यांच्या देशात पाठविण्याच्या सूचना केल्या.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हटले आहे. डार म्हणाले- ते देखील स्वातंत्र्यसैनिक असू शकतात याबद्दल आपण आभारी असले पाहिजे. जरी आपल्याला ते कोण आहेत हे माहित नाही. मला वाटतं ते त्यांच्या अपयशासाठी आणि त्यांच्या देशांतर्गत राजकारणासाठी पाकिस्तानला दोष देत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे १५ व्या रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त ५१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रे वाटप करतील.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. कस्तुरीरंगन यांनी बेंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः सगळ्या मुख्यमंत्र्यांना फोन करून आपापल्या राज्यातले पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक शोधून काढून त्यांना त्यांच्या देशात पाठवायच्या सूचना केल्या. त्यापाठोपाठ अहमदाबाद पोलीस ॲक्शन मध्ये आले.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सौदी अरेबिया दौरा आणि अमेरिकन उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांचा भारत दौरा यांचे “पॉलिटिकल टायमिंग” […]
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी कबूल केले आहे की त्यांचा देश गेल्या 30 वर्षांपासून दहशतवाद्यांना पाठिंबा आणि प्रशिक्षण देत आहे. ते म्हणाले की ते अमेरिका आणि पाश्चात्य देशांसाठी हे ‘घाणेरडे काम’ करत आहेत.
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांना नोटीस बजावण्यास दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने नकार दिला. आरोपींची बाजू ऐकल्याशिवाय आम्ही नोटीस बजावू शकत नाही, असे न्यायालयाने शुक्रवारी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फटकारले. शुक्रवारी न्यायालयाने म्हटले की, आम्ही कोणालाही स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध बाष्कळ बोलण्याची परवानगी देऊ शकत नाही. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आणि आपण त्यांच्याशी कसे वागतो आहोत?
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आक्षेपार्ह टिप्पणी बद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फटकारले आहे. आम्ही कोणालाही स्वातंत्र्य सैनिकांविरुद्ध असे बोलण्याची परवानगी देऊ शकत नसल्याचे
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी गुरुवारी रात्री पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.