Modi government मोदी सरकारने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कारवाई केली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध सतत कारवाई करत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध सतत कारवाई करत आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याच्या तपासात एक मोठा खुलासा समोर आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) तपासादरम्यान असे पुरावे मिळाले आहेत, की या हल्ल्यात पाक-पुरस्कृत दहशतवाद्यांना स्थानिक ओव्हरग्राउंड वर्कर (ओजीडब्ल्यू) किंवा आतल्या व्यक्तीने मदत केली होती.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध २ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांची पत्रकार परिषद. नवज्योत सिंग सिद्धू यांनी बुधवारी एक खास पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेद्वारे सिद्धू यांनी त्यांच्या नवीन इनिंगची घोषणाही केली.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत निर्माण झालेल्या तणावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी ९ मे रोजी मॉस्कोमध्ये होणाऱ्या विजय दिनाच्या समारंभाला उपस्थित राहणार नाहीत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी ही माहिती दिली आहे.
नवी दिल्लीत झालेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीला माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातल्या संबंधांमध्ये तणाव वाढला असताना संपूर्ण देशाचेच नाही, तर जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्या संभाव्य युद्धाकडे लागले होते.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने एक मोठे आणि धोरणात्मक पाऊल उचलले आहे. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची (NSAB) पुनर्रचना केली आहे, ज्यामध्ये रिसर्च अँण्ड अँनालिसिस विंगचे (RAW) माजी प्रमुख आलोक जोशी यांची मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्या जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांनी देशभरामध्ये गदारोळ केला होता
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि पुतण्या सागर अदानी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या अमेरिकन न्याय विभागाच्या चौकशीत कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असूनही संभाव्य टंचाईची शक्यता लक्षात घेता पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांनी राज्यातील धरणसाठा व पाणीपुरवठ्याबाबत सादरीकरण केले.
सरकार कोणत्याही आघाडीचे असो, अर्थमंत्री म्हणून अजितदादांचीच आतापर्यंत निधी वाटपात “दादागिरी” चालायची आता या दादागिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावलाय.
मंगळवारी पाकिस्तानी हॅकर्सनी राजस्थान शिक्षण विभागाची वेबसाइट हॅक केली. वेबसाइटच्या होम पेजवर ‘पाकिस्तान सायबर फोर्स’. ‘पुढचा हल्ला गोळ्यांनी नाही तर तंत्रज्ञानाने होईल’, असे लिहिले होते. शिक्षण विभागाकडून वेबसाइट पुनर्प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे पाकिस्तानला धडा शिकवायच्या बेतात आलेत, पण शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते मोदींच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना “मार्गदर्शन” करण्याऐवजी दहशतवाद्यांच्या धर्मांधतेच्या चिखलातच अडकलेत!!
पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यात मोठे बदल झाले आहेत. एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी हे भारतीय हवाई दलाचे (IAF) नवे उपप्रमुख असतील. ते १ मे रोजी एअर मार्शल सुजीत पुष्पकर धारकर यांची जागा घेतील. ४० वर्षांहून अधिक काळ सेवेनंतर धारकर ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.
अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम या वर्षी 5 जूनपर्यंत पूर्ण होईल. बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंगळवारी दुपारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मंदिराच्या वरच्या बाजूला 42 फूट उंच धार्मिक ध्वजस्तंभ देखील स्थापित करण्यात आला आहे. आता ध्वज सर्वात वरच्या भागात ठेवला जाईल.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश जारी केले होते. २४ एप्रिल ते २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७८६ पाकिस्तानी अटारी-वाघा सीमेवरून परतले.
कॅनडात लिबरल पक्षाचे मार्क कार्नी पंतप्रधान राहतील. सोमवारी कॅनडामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाने विजय मिळवला आहे. पक्षाने १६७ जागा जिंकल्या आहेत. तथापि, पक्षाला १७२ चा बहुमताचा आकडा गाठता आला नाही.
पहलगाम हल्ल्यानंतर देशात सुरू असलेल्या प्रचंड राजकीय धकाधकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे 7, लोककल्याण मार्ग या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीला पोहोचले.
मंगळवारी रात्री कोलकात्यातील फलपट्टी मासेमारी क्षेत्रातील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत चौदा जणांचा मृत्यू झाला. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. २२ जणांना वाचवण्यात आले. अजूनही काही लोक आत अडकले असण्याची शक्यता आहे. बचाव कार्य सुरू आहे.
पाकिस्तानी लष्कराने भारतावर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे मंगळवारी रात्री श्री वराह लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिराच्या भिंतीचा २० फूट लांबीचा भाग कोसळला. वरिष्ठ अधिकारी विनय चान यांच्या मते, या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आणि ४ जण जखमी झाले.
पहलगाम हल्ल्यावर PM म्हणाले- दहशतवादाला चिरडून टाकणे आमचा राष्ट्रीय संकल्प; लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यामध्ये ‘मूल्यवर्धन 3.0 उपक्रम’ राबविण्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाजनको, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड, व अवाडा ग्रुप यांच्यामध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. या करारांच्या माध्यमातून 8,905 मेगावॅट वीजनिर्मिती, 57,260 कोटींची गुंतवणूक आणि 9200 रोजगार संधी निर्माण होणार आहेत.