• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 138 of 1474

    Pravin Wankhade

    Lakshman Hake : बीडमध्ये ओबीसी नेत्यांचा महाएल्गार! छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात सभा, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल; चौथी नापास म्हणत जरांगेंना डिवचले

    ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज, 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये राज्याच्या समस्त ओबीसी समाजाची एक मोठी महाएल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. सभेच्या आधी छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांच्यात हॉटेल सनराईज येथे बैठक झाली.

    Read more

    Dhananjay Munde : एका व्यक्तीने जाती-जातीत भांडणे लावली:माणसात माणूस राहिला नाही, महाएल्गार सभेतून धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर टीका

    ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज, 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये राज्याच्या समस्त ओबीसी समाजाची एक मोठी महाएल्गार सभा पार पडली. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील जोरदार भाषण केले.

    Read more

    Chhagan Bhujbal : विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला; महाएल्गार सभेतून छगन भुजबळांचा हल्लाबोल

    विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या महाएल्गार सभेत बोलताना केली आहे. तसेच विखे पाटील हे गरज नसताना मनोज जरांगेंकडे जातात. भाजपच्या लोकांना मला सांगायचे आहे की तुमच्या लोकांना आवरा. मराठा समाज आणि आमच्या अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे पडले आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.

    Read more

    PM Modi : मोदी म्हणाले- काँग्रेस माओवादी दहशत लपवायचे; संविधानाचे पुस्तक कपाळी लावणारे माओवाद्यांचे रक्षक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एनडीटीव्ही वर्ल्ड ग्लोबल समिटमध्ये भाषण केले. ते म्हणाले, “त्यांच्या राजवटीत काँग्रेस पक्षाने माओवादी दहशतीला लपवत होते. देशातील जवळजवळ प्रत्येक मोठे राज्य नक्षलवादी हिंसाचार आणि माओवादी दहशतीच्या विळख्यात होते.”

    Read more

    Indonesia : इंडोनेशिया चीनकडून J-10C लढाऊ विमाने खरेदी करणार; 42 विमानांची 75,000 कोटींना खरेदी

    इंडोनेशियाने आपली लष्करी क्षमता वाढवण्यासाठी चीनकडून ४२ J-10C लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडोनेशिया पहिल्यांदाच एखाद्या बिगर-पाश्चिमात्य देशाकडून विमाने खरेदी करत आहे.

    Read more

    Sonam Wangchuk : जोधपूर तुरुंगात वांगचुक यांना लॅपटॉप मिळाला; पत्नी गीतांजलीने 10 दिवसांत तिसऱ्यांदा घेतली भेट, बालविश्वकोश दिला

    जोधपूर मध्यवर्ती कारागृहात बंद असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना गुरुवारी त्यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो यांनी भेट दिली. गीतांजली यांची तुरुंगात वांगचुक यांच्याशी ही तिसरी भेट आहे. गीतांजली यांनी ही माहिती एक्स वर शेअर केली.

    Read more

    Karnataka Congress : कर्नाटक काँग्रेस सरकारची मुजोरी: RSSवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम बनवणार, रस्त्यांवर पथसंचलन आणि शाखा लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार, मंत्रिमंडळाचा निर्णय

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाटक नियम लागू करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी हा निर्णय घेतला. पुढील दोन ते तीन दिवसांत हे नियम लागू होतील.

    Read more

    ज्या जिल्ह्यात जाऊन पवार टाकायचे “डाव”, तिथे जाऊन फडणवीसांची “खेळी”; राष्ट्रवादी झाली “खाली”!!

    ज्या जिल्ह्यात जाऊन पवार टाकायचे डाव, तिथे जाऊन फडणवीसांची खेळी; राष्ट्रवादी झाली “खाली”!!, ही राजकीय घडामोडी सोलापूर जिल्ह्यातून समोर आली.

    Read more

    FSSAI : अन्न-पेय उत्पादनांवर ORS लेबलिंगचे नियम सरकारने बदलले; WHO ने सूत्र मंजूर केल्यानंतर कंपन्या लेबलिंग करू शकतील

    केंद्र सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने म्हटले आहे की जर एखाद्या अन्न किंवा पेय उत्पादनाच्या फॉर्म्युलाला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिली नसेल, तर कंपनी त्यावर ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स (ORS) असल्याचे लेबल लावू शकत नाही. सर्व कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांमधून ORS लेबल काढून टाकण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

    Read more

    Harini Amarasuriya : श्रीलंकेच्या पंतप्रधान म्हणाल्या- देशांमध्ये भिंतींऐवजी पूल बांधा; तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणाले- पंतप्रधान मोदींनी कच्चाथीवू बेट परत घेण्याबाबत श्रीलंकेशी बोलावे

    श्रीलंकेच्या पंतप्रधान हरिनी अमरसुरिया यांनी देशांमधील भिंतींऐवजी पूल बांधण्याचे आवाहन केले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधील विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, घरे, कार्यालये आणि देश यांच्यात नेहमी पूल बांधा, भिंती नाही.

    Read more

    ठाकरे + पवारांनी आपले 13 खासदार लोणच्यासारखे मुरवत ठेवलेत का??

    उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत निवडून आणलेले आपले 13 खासदार लोणच्यासारखे मुरवत ठेवलेत का??, असा सवाल विचारायची वेळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांच्या राजकीय वर्तनामुळे आली.

    Read more

    PM Modi : PM मोदी म्हणाले- 21वे शतक 140 कोटी भारतीयांचे असेल; आत्मनिर्भर भारताचे व्हिजन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे १३,४३० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, २०४७ मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्याचा १०० वा वर्धापन दिन साजरा करेल, तेव्हा तो “विकसित भारत” असेल. “मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की २१ वे शतक हे भारताचे १४० कोटी भारतीयांचे शतक असेल,” असे ते म्हणाले.

    Read more

    POCSO “: भारतात मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये 94% वाढ; रिपोर्टमध्ये दावा- 2022 मध्ये 64,469 गुन्हे नोंदवले गेले, 90% प्रकरणांमध्ये शिक्षा

    २०१७ ते २०२२ पर्यंत भारतात मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये ९४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून बाल संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत नोंदवलेल्या अशा प्रकरणांची संख्या ३३,२१० वरून ६४,४६९ झाली आहे.

    Read more

    बारामतीत अजितदादांनी अनुभवला विविध क्रीडा स्पर्धांचा थरार; पण स्वतः खेळले कॅरम!!

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत अनुभवला विविध क्रीडा स्पर्धांचा थरार आणि स्वतः खेळले काय तर कॅरम!!, हा प्रकार आज समोर आला.

    Read more

    कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला, घराघरात शिवसेना पोहोचवा; रत्नागिरीतून एकनाथ शिंदेंचे आवाहन; उद्धव सेनेवर प्रहार, पण भाजपला आव्हान

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर घराघरामध्ये शिवसेना पोहोचवा, महायुतीच्या योजना जनतेपर्यंत न्या

    Read more

    काँग्रेसचे विरोधकांबरोबर जाऊन निवडणूक आयोगापुढे रडगाणे; पण काँग्रेसचे 13 + 1 खासदार काय गवत उपटताहेत??

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर होण्याअगोदर काँग्रेसच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांबरोबर निवडणूक आयोगाकडे जाऊन रडगाणे गायले.

    Read more

    Babanrao Taywade : सरकारच्या GRनंतर कुणबीचे केवळ 27 दाखले जारी; बबनराव तायवाडेंनी दिली आकडेवारी; जरांगेंना धक्का!

    2 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयाविरोधात राज्यातील वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी एक धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे. तायवाडे यांच्या मते, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 2 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत फक्त 73 अर्ज प्राप्त झाले, आणि त्यापैकी फक्त 27 अर्ज मंजूर झाले आहेत. बबनराव तायवाडेंनी सादर केलेल्या आकडेवारीमुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांना जोरदार धक्का बसणार आहे.

    Read more

    Gujarat : गुजरातेत भूपेंद्र सरकारच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा; आज 11.30 वा. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी

    गुजरात सरकारमधील सर्व १६ मंत्र्यांनी गुरुवारी राजीनामा दिला. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल लवकरच राज्यपालांना मंत्र्यांचे राजीनामे सादर करतील. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ आज सकाळी ११:३० वाजता गांधीनगर येथे होणार आहे.

    Read more

    Gunratna Sadavarte : मुंबई ST बँकेतील हाणामारीवर गुणरत्न सदावर्ते संतप्त; आदिवासी महिलेला बेअब्रू करण्याचा आरोप

    मुंबई एसटी बँकेतील बैठकीत झालेल्या राड्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी शिंदे गटाच्या संचालकांवर बैठकीला उपस्थित आदिवासी महिलांना कथितपणे बेअब्रू करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदावर्ते यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाची दाहकता वाढली आहे.

    Read more

    Congress : बिहार: काँग्रेसच्या पहिल्या यादीत 48 उमेदवारांची नावे; यादीत 5 महिला, 4 मुस्लिम, शकील अहमद कडवा येथून लढणार

    काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये ४८ उमेदवारांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष राजेश राम कुटुंबा येथून निवडणूक लढवतील, तर ज्येष्ठ नेते शकील अहमद कडवा येथून निवडणूक लढवतील. पक्षाने राजापाकर येथून प्रतिमा दास यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे.

    Read more

    India Census 2027 : 10-30 नोव्हेंबरदरम्यान जनगणनेची प्री-टेस्ट; जूनमध्ये राजपत्र जारी, पुढील वर्षी सुरू होईल जनगणना

    भारताच्या रजिस्ट्रार जनरलने गुरुवारी २०२७ च्या जनगणनेच्या पूर्व-चाचणीच्या पहिल्या टप्प्याची घोषणा केली. ही चाचणी घरांची यादी आणि गृहसंख्या गणना यावर केंद्रित असेल. ही चाचणी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १० ते ३० नोव्हेंबर दरम्यान चालेल.

    Read more

    Rohit Pawar : रोहित पवारांचा दावा- महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी खोट्या मतदारांची नोंदणी; डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचे आधार कार्ड!

    महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मतदार यादी तसेच मतचोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर तसेच निवडणूक आयोगावर टीका केली होती. यावेळी प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत दिसले. त्यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी स्क्रीनवर मतदारांची खोटी नावे टाकण्यात आल्याचे सांगत थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या नावे देखील आधार कार्ड असल्याचे दाखवले.

    Read more

    Donald Trump : रशियन तेल खरेदीबाबतचा ट्रम्प यांचा दावा फेटाळला; US राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते- मोदींनी आश्वासन दिले; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- दोघांत कोणताही संवाद नाही

    भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी सांगितले की, बुधवारी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात कोणताही संवाद झाला नाही.

    Read more

    अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले- कुणी मिमिक्री केल्याने अंगाला भोकं पडत नाहीत, मी काम करणारा माणूस!

    राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मिमिक्री’द्वारे केलेली टीका धुडकवून लावली आहे. कुणी माझी मिमिक्री केल्यामुळे माझ्या अंगाला भोकं पडत नाही.

    Read more

    नको नको ते खाल्ले, म्हणून कंबरडे मोडले आणि आता हंबरडा फोडू लागले; एकनाथ शिंदेंचा उद्धव सेनेवर निशाणा

    नको नको ते खाल्ले, म्हणून कंबरडे मोडले आणि आता हंबरडा फोडू लागले, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव सेनेवर निशाणा साधला. शिवसेना सातारा जिल्हा शाखेच्या वतीने शहरातील जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित राहून मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे त्यांनी आवाहन केले.

    Read more