• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 136 of 1474

    Pravin Wankhade

    एकनाथ शिंदेंची ठाण्यात सर्वपक्षीय दिवाळी; भाजप + मनसेच्या मंचांवर हजेरी!!

    आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात स्थानिक भाजपचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याची भाषा करीत असले

    Read more

    Ladakh : लडाखचे प्रतिनिधी 22 ऑक्टोबर रोजी केंद्राशी चर्चा करतील; लेह एपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स दोघेही उपस्थित राहतील

    लडाखच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारशी चर्चा करण्यास सहमती दर्शविली आहे. २२ ऑक्टोबर रोजी दिल्लीत ही चर्चा होईल. २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर दोन्ही बाजू आमनेसामने आहेत. मागील चर्चा मे महिन्यात झाल्या होत्या.

    Read more

    Raj Thackeray : महाराष्ट्रात 96 लाख खोटे मतदार भरले; निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झालंय; मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे आक्रमक

    आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव नेस्को ग्राउंडवर आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात सत्ताधारी पक्षांवर आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील सर्व मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख आणि महत्त्वाचे पदाधिकारी या ‘ग्रँड मेळाव्या’साठी उपस्थित होते.

    Read more

    Pune Shaniwarwada : पुण्याच्या शनिवार वाड्यात नमाज पठण, खासदार मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटना आक्रमक, गोमूत्र शिंपडून जागेचे शुद्धीकरण

    पुण्यातील शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठन केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह पतितपावन संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता तिथे असलेली मजार काढण्याची मागणी त्यांनी लाऊन धरली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वारावर करण्यात आला आहे.

    Read more

    Mahadev Jankar : मतचोरीचा मला अनुभव, राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत, विरोधकांचा आरोप योग्यच; महादेव जानकरांची प्रतिक्रिया

    राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी आज बुलढाणा येथे बोलताना ‘देशात मतचोरी होत आहे’ या विरोधकांच्या आरोपाला पाठिंबा दिला. या मुद्द्यावर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यास शेतकऱ्यांनी संपावर जावे, असे आवाहनही त्यांनी केले.

    Read more

    शनिवार वाड्यात नमाज पठण, मोठ्या आंदोलनानंतर पोलिसांना जाग, अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल; पण काँग्रेस + राष्ट्रवादीला नमाजींचा कळवळा!!

    ऐतिहासिक शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांन तिथे मोठे आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांना जाग आली पोलिसांनी नमाज पठण करणाऱ्या अज्ञात महिलांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास काम चालविले

    Read more

    दिव्यांगांचे सशक्तीकरण; दीपावली उजळली,आत्मनिर्भरतेच्या प्रवासाला गती!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता ई – रिक्षा वाटप करण्यात आले.

    Read more

    Devendra Fadnavis : ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ओबीसी समाजासाठी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजात असलेली अस्वस्थता लक्षात घेऊन त्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण विधान केले. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी वसतिगृहांची केवळ घोषणा झाली होती, मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर 60 नवीन ओबीसी वसतिगृहे सुरू केली. तसेच, 10 लाख ओबीसींना हक्काची घरे दिली आणि समाजासाठी असलेली आर्थिक महामंडळेही मजबूत केली.

    Read more

    Sudhir Mungantiwar : राज ठाकरे हे कुशल संघटक, मात्र भूमिकेत सातत्य नाही, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

    राज ठाकरे हे कुशल संघटक आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही, कधी ते मोदींची स्तुती करतात तर कधी लाव रे व्हिडिओ म्हणत मोदींवर टीका करतात असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, त्यांचा राजकीय भरती-ओहोटीचा जो सिद्धांत आहे त्याप्रमाणे ते नवे आरोप करत असल्याची खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

    Read more

    Jayant Patil : ज्यांना बोगस मतदानाचा फायदा झाला ते मोर्चात सहभागी होणार नाहीत; जयंत पाटलांची प्रतिक्रिया, आयोगाने अनेक गोष्टी दडवल्याचा आरोप

    राज्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने याबद्दल तक्रार देखील दाखल केली आहे. आता 1 नोव्हेंबर रोजी मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील देखील सहभागी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे पंख; नागपुरात प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे आज ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर’च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ओबीसी समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्यात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. या मंत्रालयाच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच ओबीसी समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी नवीन योजना राबवून नव्या पिढीला सक्षम करण्याच्या उद्देशाने महाज्योती संस्थेची स्थापना करण्यात आली.

    Read more

    Sanjay Raut : मतदार याद्यांमधील त्रुटींवर सर्वपक्षीय विरोधकांचा 1 नोव्हेंबरला मुंबई मोर्चा, संजय राऊतांची घोषणा

    राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि बोगस मतदारांची नावे असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला आहे. या गंभीर त्रुटींविरोधात आवाज उठवण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

    Read more

    Laxman Hake : लक्ष्मण हाकेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना भावनिक पत्र- जरांगे मुखवटा, क्रूर मराठा राजकीय नेत्यांचा हेतू साध्य, स्पर्धेत मूळ ओबीसी कसा टिकेल?

    राज्यात मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक झाला असून, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन आदेशामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आले असून, ओबीसी समाजाची मसलत संपल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

    Read more

    maharashtra: महाराष्ट्रातील अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून 1,566 कोटींचा निधी मंजूर; गृहमंत्रालयाकडून कर्नाटक राज्यालाही 384 कोटींची मदत जाहीर

    मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरसंकटाचा मोठा फटका बसलेल्या महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र सरकारने १५६६.४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत केंद्राची ही दुसऱ्या टप्प्यातील मदत आहे. अतिवृष्टी तसेच पूरग्रस्तांची तत्काळ मदत आणि पुनर्वसनाच्या कार्यात हा निधी दिलासा देणारा ठरणार आहे.

    Read more

    Rajnath Singh : राजनाथ म्हणाले- ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक ट्रेलर होता; लखनौहून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची पहिली खेप रवाना

    दिल्ली उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे की, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम जोडीदाराला पोटगी देता येत नाही. कायमस्वरूपी पोटगी हे सामाजिक न्यायाचे साधन आहे, सक्षम व्यक्तींना समृद्ध करण्याचे किंवा आर्थिकदृष्ट्या समानतेचे साधन नाही, असेही म्हटले आहे.

    Read more

    Delhi High Court : दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी- सक्षम जोडीदाराला पोटगी देता येत नाही, ते न्यायाचे साधन, लोकांना श्रीमंत बनवण्याचे नाही

    दिल्ली उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे की, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम जोडीदाराला पोटगी देता येत नाही. कायमस्वरूपी पोटगी हे सामाजिक न्यायाचे साधन आहे, सक्षम व्यक्तींना समृद्ध करण्याचे किंवा आर्थिकदृष्ट्या समानतेचे साधन नाही, असेही म्हटले आहे.

    Read more

    धाराशिव मधल्या अतिवृष्टीग्रस्तांना मदत देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दिवाळी साजरी!!

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दिवाळी साजरी केली. दिवाळी पूर्वसंध्येला आज ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी खास स्वरदीपावली या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    Read more

    Dhaka Airport : ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग, सर्व उड्डाणे थांबवली; कार्गो क्षेत्र जळून खाक, परिसरात विषारी वायू पसरण्याचा धोका

    बांगलादेशची राजधानी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो क्षेत्रात आज आग लागली. अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही. आग इतक्या वेगाने पसरली की विमानतळ अधिकाऱ्यांना सर्व उड्डाणे तात्काळ थांबवावी लागली. दिल्लीहून ढाका जाणारे विमान कोलकात्याकडे वळवण्यात आले.

    Read more

    सारसबागेपाठोपाठ शनिवार वाड्यात नमाज पठण; पुण्यातले हिंदुत्ववादी लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन झोपलेय का??

    तळ्यातला गणपती सारसबाग इथे नमाज पठणाचा संतप्त प्रकार घडल्यानंतर त्या पलीकडे जाऊन काही जिहाद्यांनी हिंदवी स्वराज्य आणि मराठा साम्राज्याचे प्रतीक असलेल्या शनिवार वाड्यात जाऊन नमाज पठण केले. भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शनिवार वाड्यातला नमाज पठणाचा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर त्यांच्याच नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी शनिवार वाड्यासमोर आंदोलन केले शनिवार वाड्यात नमाज पठण होत असताना पोलीस प्रशासन झोपले होते का??, असा परखड सवाल केला.

    Read more

    Omar Abdullah : CM ओमर म्हणाले- जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे:भाजपशी कोणताही तडजोड नाही; मोदींनी कधीही म्हटले नाही की हे भाजप सरकारच्या काळात होईल

    जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी राज्याचा दर्जा पुनर्संचयित करण्याची मागणी केली. मोदी सरकारने कधीही भाजप सत्तेत आल्यासच राज्याचा दर्जा दिला जाईल असे म्हटले नव्हते, असे त्यांनी म्हटले.

    Read more

    96 लाख लोक मतदार याद्यांमध्ये घुसविल्याचे गौडबंगाल; राज ठाकरेंना महाविकास आघाडीला निवडणुकीवर बहिष्कार घालायच्या दिशेने खेचायचेय काय??

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज एक खळबळजनक आरोप करून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक वेगळ्याच दिशेने न्यायचा घाट घातल्याची चुणूक दाखविली. राज ठाकरे यांनी गोरेगाव मध्ये मनसेच्या मेळाव्यात निवडणूक आयोगाने भाजप यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी 96 लाख मतदार हे मतदार याद्यांमध्ये घुसविल्याचा दावा केला. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात तब्बल 96 लाख मतदार याद्यांमध्ये घुसविले आहेत. त्याबद्दल तुम्ही सावध राहा. ठिकठिकाणी जाऊन मतदार याद्या तपासा. खोट्या मतदारांना जाळ्यात ओढा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले.

    Read more

    Prince Andrew : ब्रिटिश राजाच्या धाकट्या भावाने शाही पदवी सोडली, एपस्टाईन सेक्स स्कँडलमध्ये नाव आले होते

    ब्रिटिश राजा चार्ल्स तिसरा यांचे धाकटे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांनी त्यांच्या सर्व शाही पदव्या सोडण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी एका निवेदनात अँड्र्यू म्हणाले की, ते आता “ड्यूक ऑफ यॉर्क” सारख्या पदव्या वापरणार नाहीत.

    Read more

    Sabarkantha : गुजरातच्या साबरकांठात हिंसा, 10 जखमी; अनेक घरांची तोडफोड, ३० वाहने जाळली; पोलिसांनी 20 आरोपींना ताब्यात घेतले

    गुजरातमधील साबरकांठा येथील माजरा गावात शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारात सुमारे १० जण जखमी झाले. तीस वाहने जाळण्यात आली आणि अनेक घरांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत २० जणांना ताब्यात घेतले आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    Read more

    Girish Mahajan : मराठा आरक्षणाच्या जीआरचा निर्णय सरकारचा; कोणाला टार्गेट करणे योग्य नाही, भुजबळांच्या टीकेनंतर विखेंच्या साथीला गिरीश महाजन

    राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील महाएल्गार सभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तिखट टीका केली होती. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला, असे भुजबळ म्हणाले होते. आता यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत राधाकृष्ण विखे पाटलांची बाजू घेतली. जीआरचा निर्णय हा वैयक्तिक नसून समितीचा सामूहिक निर्णय होता. त्यामुळे कोणालाही टार्गेट करणे योग्य नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.

    Read more

    Pankaja Munde : बीडच्या ओबीसी मेळाव्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या- भुजबळांनी याआधीही असे मेळावे घेतलेत, त्यांनी त्यांची बाजू मांडली असावी

    बीड जिल्ह्यात नुकताच झालेला ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा गाजला. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी सरकारवर आणि विशेषतः मराठा आरक्षणाच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला. भुजबळांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तीव्र टीका केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या भाषणाविषयी विचारले असता, पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. मी त्यांची भाषणे पाहिली नाहीत, थोड्या वेळाने पाहील, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच भुजबळ साहेबांनी त्यांची बाजू मांडली असावी, असेही त्या म्हणाल्या.

    Read more