• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 122 of 1423

    Pravin Wankhade

    Donald Trump : ट्रम्प यांची पुन्हा पलटी; म्हणाले- मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन, संबंध पुन्हा स्थापित करण्यास तयार

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी भारताविरुद्धच्या त्यांच्या विधानावरून सुमारे १२ तासांत माघार घेतली. संध्याकाळी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले – मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन. मी भारताशी संबंध पुन्हा स्थापित करण्यास नेहमीच तयार आहे.

    Read more

    Trump’s Minister : ट्रम्प मंत्र्याच्या भारताला टॅरिफ उठवण्यासाठी 3 अटी; ब्रिक्समधून बाहेर पडा, रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवा आणि अमेरिकेला पाठिंबा द्या!

    शुक्रवारी ब्लूमबर्ग टीव्हीशी बोलताना अमेरिकेचे उद्योग सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी २५% अतिरिक्त कर रद्द करण्यासाठी भारतावर तीन अटी घातल्या. ते म्हणाले की, भारताला रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे लागेल, ब्रिक्सपासून वेगळे व्हावे लागेल आणि अमेरिकेला पाठिंबा द्यावा लागेल.

    Read more

    महिला IPS अधिकाऱ्याला दमबाजी केल्यानंतर स्वतः अजितदादा आणि त्यांचे आमदार मिटकरी नरमले कसे??; कुणी नरमवले??

    बेकायदा खनन आणि मुरुम उपसा प्रकरणी आपल्या कार्यकर्त्यांना वाचवायला गेलेले पण त्याचवेळी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमबाजी करून बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे आमदार अमोल मिटकरी अचानक नरमले कसे आणि त्यांना कोणी नरमवले

    Read more

    PM Thaksin : थायलंडचे माजी PM थाकसिन शिनावात्रा देशातून पळून गेले; उपचाराच्या बहाण्याने दुबईला गेले होते

    माजी थायलंड पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा हे देश सोडून त्यांच्या खासगी विमानाने दुबईला गेले आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याची माहिती दिली. थायलंड न्यायालय ९ सप्टेंबर रोजी थाकसिन यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात निकाल देणार आहे.

    Read more

    Donald Trump भरपूर भडकावू बडबडीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सौम्य सूर; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील बदलला नूर; पण…

    भरपूर भडकावू बडबडीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला सौम्य सूर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील बदलला नूर; पण म्हणून मोदींनी आपली ठाम भूमिका बदलून अमेरिकेचा दौरा करायचे निश्चित केले,

    Read more

    Indian Army : 15 वर्षांत लष्कराला 2200 टँक आणि 6 लाख गोळे मिळतील; नौदलाला एक नवीन विमानवाहू जहाज मिळणार

    पुढील १५ वर्षांत भारतीय लष्कराला २२०० नवीन रणगाडे आणि ६ लाख शेल दिले जातील. लष्कराच्या तिन्ही शाखांना बळकटी देण्यासाठी एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज शस्त्रे आणि रडार देखील खरेदी केले जातील. नौदलाला एक नवीन विमानवाहू जहाज मिळेल.

    Read more

    Nitish Kumar : नितीश कुमार यांची मोठी घोषणा- लवकरच 50 लाख नोकऱ्यांचा आकडा पार होणार, निवडणूक जिंकल्यास 1 कोटी रोजगार

    बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी पाटणा जिल्ह्यातील पालीगंज भागात आयोजित दोन कार्यक्रमांना उपस्थिती लावली. सिकारिया गावात त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले, तर दुल्हिन बाजार ब्लॉकमधील लाला भन्सारा गावात त्यांनी जननायक करपुरी ठाकूर पुस्तकालय भवनाचे उद्घाटन केले

    Read more

    Anil Ambani बँक ऑफ बडोदाकडून अनिल अंबानी, आरकॉम कंपनी फ्रॉड घोषित; तिसऱ्या बँकेची कारवाई

    स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडियानंतर आता बँक ऑफ बडोद्यानेही दिवाळखोरीत गेलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि त्याचे माजी संचालक अनिल अंबानी यांना फ्रॉड घोषित केले आहे. आरकॉमने सांगितले की, त्यांना २ सप्टेंबर रोजी बँक ऑफ बडोदाकडून पत्र मिळाले, ज्यामध्ये कंपनी व अंबानी यांचे कर्ज खाते ‘फ्रॉड’ म्हणून घोषित करण्यात आले. बँकेने कंपनीला १,६०० कोटी रुपये व ८६२.५० कोटींची कर्जमर्यादा दिली होती. २८ ऑगस्टच्या स्थितीनुसार एकूण २,४६२.५० कोटींपैकी ₹१,६५६.०७ कोटी रुपये अजून थकीत आहेत. हे खाते ५ जून २०१७ पासून एनपीए म्हणून घोषित आहे. बँकेचे म्हणणे आहे की हा निर्णय फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टवर आधारित असून नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार आहे.

    Read more

    Raje Mudhoji Bhosale : मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण देण्यात यावे, ओबीसीतून नको; राजे मुधोजी भोसले यांची मागणी

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर 5 दिवस उपोषण केले. त्यांच्या या उपोषणाला यश आले व महायुती सरकारने आरक्षणाबाबतचा शासन निर्णय घेतला. त्यानुसार हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचे सरकारने मान्य केले. आता यावर नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देता मराठा म्हणून सरसकट स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

    Read more

    Mitkari : मिटकरींकडून डीएसपी अंजना कृष्णांच्या चौकशीची मागणी; IPS अधिकाऱ्याला छळले तर कोर्टात खेचेन, दमानियांचा इशारा

    सोलापूरमध्ये करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून जोरदार वाद झाला. प्रत्यक्षात, डीएसपी अंजली कृष्णा रस्ते बांधकामासाठी बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी माढा तालुक्यातील कुर्डू गावात पोहोचल्या होत्या. गावकरी आणि घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. या वादातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना कॉल लावला होता. त्यानंतर अजित पवारांनी या महिला अधिकाऱ्याला दम भरल्याचे समोर आले.

    Read more

    Heavy Rain : अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यांत शेती पिकाचे नुकसान; बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्यात, तातडीने मदत देणार; कृषी मंत्री भरणेंची माहिती

    महाराष्ट्रात दरवर्षी अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.

    Read more

    Ajit Pawar : महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर; माझ्यासाठी कायद्याचे राज्य महत्त्वाचे, अजितदादांची महिला IPS वादावर स्पष्टोक्ती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Ajit Pawar सोलापूर जिल्ह्यात महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा यांच्या सोबत बोलताना अजित पवार यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच […]

    Read more

    Howard Lutnick अमेरिकेला एक ट्रम्प नाही पुरला म्हणून दुसरा पुढे आला; भारत अमेरिकेला sorry म्हणेल, असा दावा केला!!

    अमेरिकेला एक ट्रम्प नाही पुरला म्हणून दुसरा पुढे आला; भारत अमेरिकेला sorry म्हणेल, असा त्याने दावा केला!! ट्रम्प प्रशासनाचे डोके फिरलेले आहे असेच म्हणायची वेळ वेगवेगळ्या दाव्यांमुळे आली.

    Read more

    West Bengal : पश्चिम बंगाल विधानसभेत गदारोळ, भाजपचे मुख्य प्रतोद निलंबित; बाहेर जाण्यास नकार दिल्यावर मार्शलनी जबरदस्तीने काढले

    गुरुवारी पश्चिम बंगाल विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. बंगाली स्थलांतरितांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत सत्ताधारी पक्षाने आणलेल्या ठरावावर चर्चा सुरू होती. यावेळी विरोधी पक्षाने (भाजप) घोषणाबाजी केली.

    Read more

    CM Siddaramaiah : CM सिद्धरामय्या यांचा राष्ट्रपतींना प्रश्न- तुम्हाला कन्नड येते का? भाजपचा पलटवार- सोनियांना विचारण्याची हिंमत आहे का?

    १ सप्टेंबर रोजी म्हैसूर येथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग (AIISH) चा सुवर्ण महोत्सवी समारंभ पार पडला. प्रमुख पाहुण्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होत्या. प्रोटोकॉलनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील उपस्थित होते. स्वागत भाषणादरम्यान सिद्धरामय्या यांनी राष्ट्रपतींना विचारले की त्यांना कन्नड भाषा येते का, कारण ते कन्नडमध्ये भाषण देणार होते.

    Read more

    डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशिया यांना चीनच्या खोल आणि अंधाऱ्या गर्तेत “गमावले” की “ढकलले”??

    भारताबरोबर टेरिफ युद्ध सुरू केलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या ट्रूथ सोशल मीडिया अकाउंट वर सत्य बोलले, पण ते अर्धसत्य ठरले!! 5 सप्टेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ अकाउंट वर अमेरिकेने भारत आणि रशिया यांना चीनच्या खोल आणि अंधाऱ्या गर्तेतत गमावले. त्यांचे संबंध तिथे तरी दीर्घकाळ चांगले राहोत, असे लिहिले.

    Read more

    Milind Deora : आझाद मैदानावरील आंदोलनास बंदीच्या मागणीवर मिलिंद देवरा यांची माघार

    आझाद मैदानात आंदोलनं होऊ नयेत अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिल्यानंतर, शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा चौफेर टीकेच्या भोवऱ्यात सापडले. विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केल्यामुळे आता त्यांनी आपल्या भूमिकेवरून माघार घेतली आहे.

    Read more

    महिला IPS अधिकाऱ्याला अजितदादांची दमदाटी फोनवरून; पण सारवासारव मात्र x हँडल वरून; इतरांपुढे बुद्धी पाजळणारे रोहित पवारही सरसावले अजितदादांच्या समर्थनात!!

    महिला IPS अधिकाऱ्याला अजित पवारांनी दमदाटी फोनवरून केली. पण हे प्रकरण अंगलट आलेले पाहताच सारवासारव मात्र x हँडल वरून केली. एरवी महाराष्ट्रात कुठल्याही खुसपटी कारणावरून स्वतःची बुद्धी पाजळणारे आमदार रोहित पवार सुद्धा अजितदादांच्या समर्थनासाठी पुढे आले

    Read more

    Vladimir Putin : पुतिन ट्रम्प यांना म्हणाले- मोदी-जिनपिंग यांच्याशी असे बोलू नका; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते- भारत युक्रेन युद्धाला प्रोत्साहन देत आहे

    रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी ट्रम्प यांना सांगितले की, ‘तुम्ही भारत किंवा चीनशी अशा प्रकारे बोलू शकत नाही.’ ते म्हणाले की अमेरिका अधिक टॅरिफ आणि निर्बंध लादून या देशांवर दबाव आणू इच्छित आहे. बुधवारी चीनच्या विजय दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना पुतिन यांनी ट्रम्प प्रशासनावर आशियातील दोन सर्वात मोठ्या शक्तींना कमकुवत करण्याचा आरोप केला.

    Read more

    Bihar Voting : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका जाहीर होऊ शकतात; दिवाळी-छठनंतर बिहारमध्ये मतदानाची शक्यता

    निवडणूक आयोग ऑक्टोबरमध्ये बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा करू शकते. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये दोन किंवा तीन टप्प्यात मतदान शक्य आहे. नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये मतदान होईल.

    Read more

    भारतीय कम्युनिस्ट दिग्गज नेत्याचा बडा भांडवलदार पुतण्या डोनाल्ड ट्रम्पच्या CEO गाला डिनर पार्टीत सामील!!

    भारताबरोबर टेरिफ युद्ध मांडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या CEO गाला डिनर पार्टीत भारतीय कम्युनिस्ट दिग्गज नेत्याचा बडा भांडवलदार पुतण्या सामील झाला होता, पण त्याकडे भारतीय माध्यमांचे किंवा जागतिक माध्यमांचे नेमकेपणाने लक्ष गेले नाही.

    Read more

    Aircraft : भारत अमेरिकेकडून 5व्या पिढीतील विमान इंजिन खरेदी करणार; 14000 कोटींचा करार

    टॅरिफ वॉरच्या वाढत्या वाढीदरम्यान, भारतातील विमान उत्पादक कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक (GE) यांच्यातील जेट इंजिनसाठीचे अनेक संरक्षण करार अंतिम टप्प्यात आहेत.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेंवर; म्हणाले- कुणाच्याही ताटातील दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही

    मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर, ओबीसी समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठा शेतकऱ्यांना कुणबी, म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला असून, जीआरची होळी करत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

    Read more

    PM Modi : PM मोदी 13 सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट देऊ शकतात​​​​​; मिझोरममध्ये रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट देऊ शकतात. तथापि, अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पंतप्रधान मिझोरममध्ये रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करतील. मणिपूर हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे.

    Read more

    ममता बॅनर्जी बनल्या आणीबाणीतल्या इंदिरा गांधी; बंगाल फाइल्स सिनेमावर राज्यात आणली प्रदर्शना आधीच अघोषित बंदी!!

    ममता बॅनर्जी बनल्या आणीबाणीतल्या इंदिरा गांधी; बंगाल फाइल्स सिनेमावर पश्चिम बंगालमध्ये आणली प्रदर्शना आधीच अघोषित बंदी!!, असले राजकारण पश्चिम बंगाल मध्ये घडले. विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची निर्मिती असलेल्या बंगाल फाइल्स सिनेमाचा उद्या प्रारंभ होत आहे.

    Read more