• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 12 of 1347

    Pravin Wankhade

    Maharashtra Government : शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी 2 लाख रुपये अनुदान; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली माहिती

    शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी 2 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. या संदर्भात माहिती देताना भरणे म्हणाले, जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषि विभागामार्फत आयोजन केले जाते, अशी माहिती भरणे यांनी दिली आहे.

    Read more

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- वृद्धांना तरुणांना जंगलराजची कहाणी सांगायला लावा; नोकरीच्या बदल्यात जमीन घेणाऱ्यांपासून बिहारला वाचवायचे आहे

    पंतप्रधानांनी बिहारमधील एक कार्यकर्ते ओम प्रकाश यांना विचारले, “तुम्ही जंगल राजवरील प्रदर्शन पाहिले आहे का? ते तुमच्या जिल्ह्यात आहे का?” त्यांनी उत्तर दिले, “हो, ते आमच्या जिल्ह्यातही आहे.” पंतप्रधान म्हणाले, “१८ ते ४५ वयोगटातील लोकांना जंगल राजबद्दल सविस्तरपणे सांगा. वृद्ध लोकांना त्यांना कथा सांगायला सांगा.”

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ मोहिमेअंतर्गत बिहारमधील कार्यकर्त्यांशी व्हर्चुअली संवाद साधला.

    Read more

    Devendra Fadnavis : सीएम फडणवीसांचा पलटवार- एवढे गोंधळलेले विरोधक मी कधीच पाहिले नाहीत, कोणत्या मुद्यावर कुठे जायचे हेच त्यांना माहिती नाही

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीवर निशाणा साधला. एवढे गोंधळलेले विरोधक मी केव्हाच पाहिले नाहीत. कोणत्या मुद्यावर कुठे जावे हे ही या लोकांना माहिती नाही, असे ते विरोधकांची खिल्ली उडवताना म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारने पाऊस आणल्याची टीका करणाऱ्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचाही समाचार घेतला.

    Read more

    मोदी ट्रम्पला घाबरतात, राहुल गांधींचे 5 दावे; मोदींची कृतीतून उत्तरे!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात, अशी 5 उदाहरणे देत राहुल गांधींनी 5 दावे केले. परंतु, त्या दाव्यांना मोदींनी शाब्दिक उत्तरे न देता कृतीतून उत्तरे कशी दिली?? हे लक्षात घ्यायला हवे.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला- सन्नाटा कोणाकडे होता, आमच्याकडे की त्यांच्याकडे? पराभव दिसू लागल्याने त्यांचे अवसान गळाले

    राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागण्यांवर आणि त्यांच्या एकत्रित भूमिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र टीका केली आहे. विरोधकांनी आपला पराभव मान्य केल्याचे आणि त्यांचे अवसान गळाल्याचे दिसत असल्यामुळेच ते एकत्र आले, असे शिंदे म्हणाले. तसेच सन्नाटा कोणाकडे होता? आमच्याकडे की त्यांच्याकडे? असे म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला.

    Read more

    Pakistan : पाकिस्तानचा काबुलवर बॉम्बहल्ला, अफगाणिस्तानचा ड्रोन हल्ला; दोन्ही देशांत 48 तास युद्धविराम, तालिबानचा दावा- पाकने विनंती केली

    बुधवारी संध्याकाळी पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले. अफगाणिस्तानातील माध्यमांनुसार, पाकिस्तानी लढाऊ विमानांनी राजधानी काबूल आणि स्पिन बोल्दाक येथे बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यांमध्ये डझनभर लोक मारले गेल्याचे वृत्त आहे.

    Read more

    Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणाले- आम्ही ECला भेटलो, पण समाधान झाले नाही, चुकीच्या मतदारयाद्या लोकशाहीसाठी घातक

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत आपले कोणतेही समाधान झाले नसल्याचे मत व्यक्त केले आहे. आम्ही राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. पण त्याने आमचे कोणतेही समाधान झाले नाही. आगामी निवडणुका चुकीच्या मतदार याद्यांसह निवडणूक होणार असतील, तर ते निकोप लोकशाहीसाठी घातक आहे, असे ते म्हणालेत.

    Read more

    Durgapur Gangrape : तृणमूल काँग्रेसचा पीडितेवर निर्लज्ज आरोप! ‘दुर्गापूर गँगरेप नव्हे, पीडितेची बनावट कहाणी’

    पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमधील खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवरील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात तृणमूल काँग्रेसने निर्लज्ज आणि धक्कादायक दावा केला आहे.

    Read more

    2030 Commonwealth : २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन भारतात! अहमदाबादला मिळाली ‘कॉमनवेल्थ गेम्स’च्या शताब्दी सोहळ्याची संधी

    भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. २०३० च्या शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन भारतातील अहमदाबाद शहरात होणार असल्याची शिफारस कॉमनवेल्थ स्पोर्टच्या कार्यकारी मंडळाने केली आहे. यामुळे भारत पुन्हा एकदा जागतिक क्रीडा नकाशावर तेजाने झळकणार आहे.

    Read more

    Pakistan : पाकिस्तानची नाचक्की, अफगाण हल्ल्यांनंतर पाकिस्ताननेच केली युद्धबंदीची याचना

    : भारताकडून आधीच धडा शिकलेला पाकिस्तान, आता तालिबानकडूनही दणका खात नम्र झाला आहे. दक्षिण आशियात ‘कमकुवत राष्ट्र’ ठरल्याचे चित्र अधिक स्पष्ट होत आहे. तालिबानसमोरही पाकिस्तानचे गुडघे टेकले आहेत. बुधवारी अफगाणिस्तानवर केलेल्या बॉम्बहल्ल्यांनंतर झालेल्या प्रत्युत्तर हल्ल्यांनी पाकिस्तानचे लष्कर हादरले आणि अखेर पाकिस्तानलाच युद्धबंदीची भीक मागावी लागली.

    Read more

    Osama Shahab : बिहारमध्ये पुन्हा ‘जंगल राज’ची चाहूल! शहाबुद्दीनचा मुलगा ओसामा शहाब ‘राजद’चा उमेदवार

    बिहारच्या सियवान जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘जंगल राज’ परतल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. कारण, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी कुख्यात शहाबुद्दीन यांचा मुलगा ओसामा शहाब याला रघुनाथपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

    Read more

    Raj Thackeray : मतदान गोपनीय, मतदार यादी गोपनीय कशी? राज ठाकरे यांचा सवाल, पत्रकार परिषदेत आयोगाला बरसले विरोधक

    राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काल वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आज पुन्हा एकदा विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांसोबत सुमारे तासभर बैठक झाली.

    Read more

    Jayant Patil : जयंत पाटलांचा दावा- एकेका मतदाराला 8-8 वेळा मतदानाचा हक्क; आयोगाचे सर्व्हर दुसरेच कुणीतरी ऑपरेट करत असल्याचा आरोप

    महाराष्ट्रात एकेका मतदाराला 8-8 वेळा मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व्हर महाराष्ट्रात दुसरेच कुणीतरी ऑपरेट करत असल्याचा संशय आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला.

    Read more

    Army Vice Chief : लष्कर उपप्रमुख म्हणाले- 1990 पासून लाखो लोक जम्मू-काश्मीर सोडून गेले, 15,000 नागरिक आणि 3,00 सुरक्षा कर्मचारी मारले गेले

    भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, १९९० पासून, ६०,००० अल्पसंख्याक कुटुंबांसह १,००,००० हून अधिक लोकांना जम्मू आणि काश्मीर सोडण्यास भाग पाडण्यात आले आहे. १५,००० हून अधिक नागरिक आणि ३,००० सुरक्षा कर्मचारी मारले गेले आहेत.

    Read more

    IMF : FY 26 मध्ये भारताचा जीडीपी 6.6% दराने वाढणार; IMF ने वाढवला जीडीपी वाढीचा अंदाज, म्हटले- भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

    २०२६ या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ६.६% दराने वाढेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मंगळवारी (१४ ऑक्टोबर) भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) वाढीचा अंदाज वाढवला. यापूर्वी जुलैमध्ये, IMF ने आर्थिक वर्ष २६ साठी भारताचा GDP विकास दर ६.४% राहण्याचा अंदाज वर्तवला होता.

    Read more

    India Record : देशात जन्मदर घटला, 2023 मध्ये 2.5 कोटी बाळांचा जन्म, 2022च्या तुलनेत 2.32 कोटी कमी; मृत्यूदरात वाढ

    नागरी नोंदणी प्रणाली (CRS) वर आधारित ‘व्हायटल स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडिया’ ने १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, ‘भारतात २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये जन्मदर कमी झाला, परंतु मृत्यूदर वाढला.’

    Read more

    ऐतिहासिक!! 6 कोटींच्या बक्षिसाचा माओवादी कमांडर सोनू भुपती 60 माओवाद्यांसह मुख्यमंत्री फडणवीसांसमोर शरण!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथे ₹6 कोटींचे बक्षीस असणाऱ्या वरिष्ठ माओवादी कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू भूपती यांचे इतर 60 माओवादी सदस्यांसह आत्मसमर्पण केले.

    Read more

    Sundar Pichai : गुगल भारतात 1.33 लाख कोटींची गुंतवणूक करणार; आंध्रात उभारणार पहिले AI हब; CEO पिचाई यांचा PM मोदींशी संवाद

    गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मंगळवारी (१४ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. संभाषणादरम्यान, पिचाई यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की त्यांची कंपनी पुढील पाच वर्षांत भारतात १५ अब्ज डॉलर्स अंदाजे १.३३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.

    Read more

    Rajnath Singh : राजनाथ म्हणाले- काही देश आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करत आहेत; काही जण वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात

    मंगळवारी दिल्लीत झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सैन्य योगदान देणाऱ्या देशांच्या (UNTCC) प्रमुखांच्या परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले, “काही देश आंतरराष्ट्रीय नियमांचे उघडपणे उल्लंघन करत आहेत.”

    Read more

    ठाकरे बंधू एकत्र; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाच लावला सुरुंग!!

    ठाकरे बंधू एकत्र, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाच लावला सुरुंग!!, असला प्रकार आज मुंबईतून दिसून आला. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा मोठा गाजावाजा माध्यमांनी केला.

    Read more

    Supreme Court : ईडीच्या छाप्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; तामिळनाडू दारू घोटाळा प्रकरणात म्हटले- तपास यंत्रणा राज्याच्या अधिकारात हस्तक्षेप करत नाही का?

    तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (TASMAC) मध्ये दारू दुकानांच्या परवान्यांशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) तामिळनाडूमध्ये टाकलेल्या छाप्यांवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायालयाने ईडीला विचारले, “तुम्ही राज्य पोलिसांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत नाही का?”

    Read more

    Amit Shah : अमित शहा म्हणाले- NSG 6 झोनमध्ये विभागले जाईल; पोलिसांनाही अशाच प्रकारे प्रशिक्षण दिले जाईल

    हरियाणातील गुरुग्राम येथे केंद्रीय गृहमंत्र्यांनी एनएसजीमध्ये मोठे बदल जाहीर केले. त्यांनी सांगितले की, एनएसजी सहा झोनमध्ये विभागले जाईल, ज्याचे मुख्यालय मानेसर येथे असेल. त्यांनी गुरुग्राममध्ये ब्लॅक कॅट स्पेशल ऑपरेशन्स ट्रेनिंग सेंटरची पायाभरणी देखील केली.

    Read more

    Congress : काँग्रेसने म्हटले- जागावाटपावर तडजोड करणार नाही; राहुल तेजस्वी यांना भेटले नाहीत

    बिहार विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसने सांगितले की, महाआघाडीतील जागावाटपाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. जागावाटपाबाबत राजदसोबतचा वाद सुरूच आहे.

    Read more

    मराठा आरक्षणाचा राजकीय डाव उघड; 96 कुळी म्हणवणाऱ्यांची कुणबी दाखले काढून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवायची तयारी!!

    मनोज जरांगे यांनी आंदोलन करून मिळवलेल्या मराठा आरक्षणाचा राजकीय डाव आता उघड्यावर आला असून आत्तापर्यंत गावचे राजकारण “सरकार”, 96 कुळी, 92 कुळी मराठे म्हणून हाताळणाऱ्या गाव पुढार्‍यांनी कुणबी दाखले काढून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवायची तयारी चालविल्याचे समोर आले आहे.

    Read more

    समोर अजितदादांचे भाषण सुरू, तरीही माणिकराव कोकाटे मोबाईल पाहण्यात मग; नवाब मलिक + धनंजय मुंडे यांना पहिल्या रांगेत स्थान!!

    समोर अजितदादांचे भाषण सुरू, तरीही माणिकराव कोकाटे मोबाईल पाहण्यात मग; नवाब मलिक + धनंजय मुंडे यांना पहिल्या रांगेत स्थान!!, असे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार – खासदारांच्या बैठकीत पाहायला मिळाले.

    Read more