• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 115 of 1423

    Pravin Wankhade

    Nepal : हिंसेचे नेपाळ मॉडेल’ भारतात आणण्याचा काँग्रेसचा हतबल प्रयत्न!

    भारताने कितीही संकटे अनुभवली तरी लोकशाहीचा मार्ग कधीही सोडला नाही. युद्धे, दहशतवाद, नक्षलवाद किंवा अतिरेकी विचारसरणी स्वीकारली नाही. प्रत्येक वेळी सत्तांतर केवळ मतपेटीतूनच झाले. पण आज काँग्रेसकडून घेतली जाणारी हिंसक कलाटणी धोक्याची घंटा मानली जात आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील 12 मराठा मुख्यमंत्र्यांपैकी फक्त देवेंद्र फडणवीसच टार्गेट का? महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न वैजापूरच्या बॅनरवर

    महाराष्ट्रातील 12 मराठा मुख्यमंत्र्यांपैकी फक्त देवेंद्र फडणवीसच टार्गेट का?’ हा तमाम महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न. मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाल्यावर हा प्रश्न आणखी चर्चिला जात आहे. वैजापूर शहरात एका बॅनरवर नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला आहे.

    Read more

    Chhagan Bhujbal : मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, भुजबळांचा पुनरुच्चार

    कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करत मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा पुनरुच्चार केला. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. सुप्रीम कोर्टाने हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. हा समाज EWS मधून आरक्षण घेणार, कुणबीमधूनही घेणार, मग बाकीच्यांनी जायचे कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा समाजातील अभ्यासक व नेते या मुद्यावर बोलत नाहीत, असा टोलाही त्यांनी यावेळी मनोज जरांगे यांना हाणला.

    Read more

    Election Commission : निवडणूक आयोगाने म्हटले- मतदार यादी बनवणे आणि बदलणे आमचे काम, SIR करणे हा विशेष अधिकार

    निवडणूक आयोगाने (EC) सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले. ज्यामध्ये म्हटले आहे की, देशभरात वेळोवेळी विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) करणे हा त्यांचा विशेषाधिकार आहे. जर न्यायालयाने यासाठी आदेश दिला तर तो अधिकारात हस्तक्षेप ठरेल.

    Read more

    PM Modi : मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या 2 वर्षांनंतर पंतप्रधानांचा दौरा; चुराचंदपूरमधील मदत शिबिरात पोहोचले, इम्फाळमधील हिंसाचार पीडितांना भेटले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत. मे २०२३ मध्ये राज्यात हिंसाचार उसळल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधानांनी इम्फाळ आणि चुराचंदपूरमध्ये ८,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, 15 सप्टेंबरपर्यंत मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

    बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: 14 आणि 15 सप्टेंबर रोजी कोकण-गोव्यात अतिवृष्टी होण्याचा धोका असून, 15 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही अतिवृष्टीची शक्यता आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढण्याचा आणि शहरी भागांत पाणी साचण्याचा धोका हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.

    Read more

    लंडन मध्ये बेकायदा स्थलांतरांविरुद्ध लाखो ब्रिटिशांचा मोर्चा; पण बेकायदा स्थलांतरितांमध्ये सर्वाधिक पाकिस्तान्यांचा भरणा!!

    लंडनमध्ये बेकायदा स्थलांतरांविरुद्ध लाखो ब्रिटिशांचा मोर्चा; पण सर्वाधिक बेकायदा स्थलांतरित कोण??, वाचून बसेल धक्का!!, असं खऱ्या अर्थाने म्हणायची वेळ अधिकृत आकडेवारीमुळे आली आहे.

    Read more

    Sushila Karki : सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान; राष्ट्रपतींनी 6 महिन्यांत निवडणुका घेण्याची घोषणा केली

    सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान बनल्या आहेत. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी राष्ट्रपती भवन शीतल निवास येथे त्यांना शपथ दिली.त्यांच्याशिवाय कुलमन घिसिंग, ओम प्रकाश अर्याल, बालानंद शर्मा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात GeN-Z निदर्शकांचा कोणताही नेता समाविष्ट नाही.

    Read more

    ट्रम्प टेरिफच्या अतिरेकामुळे अमेरिकेत महागाईचा कहर; भारतात GST कमी केल्याने स्वस्ताईची लहर!!

    ट्रम्प टेरिफच्या अतिरेकामुळे अमेरिकेत महागाईचा कहर उडाला असून भारतामध्ये मात्र जीएसटी कमी केल्याने स्वस्ताईची लहर आली आहे. भारतातल्या वेगवेगळ्या कंपन्यांनी स्वस्त केलेल्या वस्तूंच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. ट्रम्प टेरिफच्या फाटक्यातून सावरण्यासाठी या कंपन्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत.

    Read more

    Haribhau Rathod : मराठा आरक्षणावरून हरिभाऊ राठोड संतापले- आम्ही ओबीसी येडे आहोत का? भुजबळ एका समाजापुरतेच मर्यादित

    मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाला आता नवा कलाटणी मिळाली आहे. ज्येष्ठ ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी थेट राज्य सरकारवर तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हैदराबाद गॅझेट, कुणबी प्रमाणपत्र, तसेच बंजारा समाजाच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मराठा समाजापेक्षा बंजारा समाजाची ताकद अधिक असल्याचा दावा करत त्यांनी मराठवाड्यात बंजारा समाजाविना कोणी निवडणूक जिंकून दाखवावी, असा थेट इशाराच दिला. राठोडांच्या या विधानामुळे ओबीसी व मराठा समाजातील मतभेद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

    Read more

    Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरे म्हणाले- दसऱ्यापासून राज-उद्धव एकत्र दिसणार, आगामी निवडणुका सोबत लढवणार

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात राजकीय युती निश्चित झाल्याचे संकेत ठाकरे गटाच्या नेत्याकडून मिळत आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची घोषणा ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 864 दिवसांनी मणिपूरला गेले; पण 7300 कोटी रुपयांच्या विकास कामांची सौगात देऊन आले!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 864 दिवसांनी मणिपूरला गेले, पण तिथे जाऊन पेटवा पेटवी करण्यापेक्षा 7300 कोटी रुपयांच्या विकास कामांची सौगात देऊन आले. तिथे त्यांनी जाहीर सभेबरोबरच निवडक नागरिकांशी संवाद आणि रोड शो चे कार्यक्रम देखील केले. पण त्यांनी कुठेही पेटवा पेटवीचे भाषण केले नाही. उलट मी आणि केंद्र सरकार तुमच्या बरोबर आहोत, अशी ग्वाही देऊन ते मणिपूरच्या बाहेर पडले.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाच्या उच्च सुरक्षा क्षेत्रात फोटोग्राफी-रील काढण्यास बंदी; माध्यम कर्मचाऱ्यांनी नियम मोडल्यास महिनाभर प्रवेश नाही

    सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या मुख्य कॅम्पसला उच्च सुरक्षा क्षेत्र म्हणून घोषित करून फोटोग्राफी, सोशल मीडिया रील आणि व्हिडिओग्राफी करण्यास बंदी घातली आहे. १० सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात न्यायालयाने माध्यमांसाठीही सूचना जारी केल्या आहेत.

    Read more

    Kangana Ranaut : कंगनाला दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; महिला शेतकऱ्याला 100 रुपयांत आंदोलन करणारी म्हटले होते

    हिमाचलमधील मंडी येथील भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या टिप्पण्यांवरून दाखल करण्यात आलेला मानहानीचा खटला रद्द करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

    Read more

    Supreme Court : राजकीय पक्षांमध्ये वाढत्या भ्रष्टाचार-मनी लाँडरिंगबाबत सुप्रीम कोर्टात याचिका; कोर्टाने EC आणि केंद्र सरकारला पाठवली नोटीस

    राजकीय पक्षांमध्ये वाढत्या भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंगशी संबंधित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली. न्यायालयाने राजकीय पक्षांच्या कामकाजावर कठोर नियम बनवण्याबाबत उत्तर मागितले आहे.

    Read more

    नेपाळच्या हंगामी पंतप्रधान पहिल्याच दिवशी ठरल्या वेगळ्या; बांगलादेशाच्या हंगामी प्रमुखासारख्या सत्तेच्या खुर्चीला नाही चिकटून राहिल्या!!

    नेपाळच्या हंगामी पंतप्रधान पहिल्याच दिवशी ठरल्या वेगळ्या; बांगलादेशाच्या हंगामी प्रमुखासारख्या सत्तेच्या खुर्चीला नाही चिकटून राहिल्या!!, नेपाळमध्ये शपथविधीच्याच दिवशी घडले.

    Read more

    Defence Secretary : संरक्षण सचिव म्हणाले- ऑपरेशन सिंदूर सैन्यासाठी रिॲलिटी चेक बनले; आपल्याला ताकद वाढवायची गरज

    संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर हे सशस्त्र दलांसाठी एक रिॲलिटी चेक ठरले आहे. यातून असे दिसून आले की, भविष्यात आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये आपली ताकद आणखी मजबूत करण्याची आवश्यकता आहे.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा पलटवार- छगन भुजबळ पूर्णपणे पागल झालेत, मी अशिक्षित असूनही त्यांना रडकुंडीला आणले; आंबेडकरांनाही आवाहन

    मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारी ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आपल्या डावपेचांमुळे पूर्णतः वेडेपिसे झाल्याचा दावा केला. मी अशिक्षित आहे. पण त्यानंतरही छगन भुजबळांना मी सरकारकडून काढून घेतलेल्या जीआरमध्ये कोणतीही सुधारणा करता येत नाही. यामुळे ते अक्षरशः वेडेपिसे झालेत झालेत, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना कोणत्याही एका जातीची बाजू घेऊन न बोलण्याची विनंती केली.

    Read more

    Aditya Thackeray : पाकिस्तानसह खेळणे राष्ट्र- मानवविरोधी; आदित्य ठाकरेंची बीसीसीआयवर जोरदार टीका

    आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआय आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरही बीसीसीआय पैशासाठी हा सामना खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. बीसीसीआयची ही भूमिका देशाच्या आणि सैनिकांच्या बलिदानाचा अपमान करणारी असल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हे ‘राष्ट्रविरोधी’ आणि ‘अमानुष’ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

    Read more

    Zilla Parishad : 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; विषय समित्यांच्या सभापतींचेही आरक्षण जाहीर

    राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण आज जाहीर झाले. त्यात ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार असून, छत्रपती संभाजीनगरची जागा सर्वसाधारण गटासाठी सुटली आहे. सरकारने जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सभापतींचे आरक्षणही जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता निर्माणि झाली आहे.

    Read more

    Union Minister Bittu : केंद्रीय मंत्री बिट्टू यांनी CM मान यांचे डिबेटचे चॅलेंज स्वीकारले; म्हणाले- शिवीगाळ केली नाही, प्रश्नांची उत्तरे द्या

    आज पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पूर मदत निधीबाबत विधान करताना म्हटले आहे की, राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू, सुनील जाखड यांच्यासह काही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांना शिवीगाळ केली. मुख्यमंत्री मान यांनी सर्व नेत्यांना पंजाबच्या मुद्द्यांवर कधीही त्यांच्याशी चर्चा करण्याचे आव्हान दिले.

    Read more

    Israel Attacks : इस्रायलचा 72 तासांत 6 मुस्लिम देशांवर हल्ला; 200 जणांचा मृत्यू, 1000 जखमी

    गेल्या ७२ तासांत इस्रायलने ६ देशांवर हल्ले केले आहेत. यामध्ये गाझा (पॅलेस्टाईन), सीरिया, लेबनॉन, कतार, येमेन आणि ट्युनिशिया यांचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये २०० हून अधिक लोक ठार झाले आहेत आणि १००० हून अधिक जखमी झाले आहेत.

    Read more

    Disha Patani : अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार; गोदरा-ब्रार गँगने घेतली जबाबदारी

    उत्तर प्रदेशातील बरेली येथे बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी एकापाठोपाठ दोन राउंड फायर केले. त्यानंतर ते पळून गेले.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- पूर्ण देशाला स्वच्छ हवेचा अधिकार; फक्त दिल्ली-NCRमध्येच का, देशभरात फटाक्यांवर बंदी घाला

    गुरुवारी, सर्वोच्च न्यायालयात दिल्लीत फटाक्यांवर बंदी घालण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश बीआर गवई म्हणाले की, जर दिल्ली-एनसीआरमधील शहरांना स्वच्छ हवा मिळवण्याचा अधिकार आहे, तर इतर शहरांतील लोकांना तो अधिकार का नाही?

    Read more

    Chhagan Bhujbal : भुजबळांचा सवाल- आम्ही लहान समाजात जन्मलो हे आमचे पाप आहे का? ओबीसींना आत्महत्या न करण्याचे आवाहन

    राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आपला संताप व्यक्त केला. आम्ही लहान समाजात जन्मलो हे आमचे पाप आहे का? आमच्या लेकराबाळांनी शिक्षण व नोकऱ्या करायच्या नाही का? असे उद्विग्न प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केले. आरक्षणाच्या लढ्यात अगोदर आम्ही संपू, त्यानंतर तुम्हाला काय करायचे ते करा. पण आता कुणीही आत्महत्या करू नका, असेही ते यावेळी ओबीसी तरुणांना उद्देशून म्हणाले.

    Read more