मोदींच्या भाषणात सामान्यांना हवे ते मुद्दे जोरावर; विरोधकांचे मुद्दे वाऱ्यावर!!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सर्वसामान्यांना हवेत ते मुद्दे जोरावर आणि विरोधकांचे मुद्दे वाऱ्यावर असाच प्रकार घडला. न
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सर्वसामान्यांना हवेत ते मुद्दे जोरावर आणि विरोधकांचे मुद्दे वाऱ्यावर असाच प्रकार घडला. न
२०२२ पासून अतिरेकी निधी प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा काश्मिरी फुटीरतावादी नेता यासीन मलिकने दिल्ली हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्याने दावा केला आहे की १९९० ते २००६ पर्यंत सात सरकारांनी त्याला काश्मीर चर्चा आणि शांतता प्रक्रियेत सहभागी करून घेतले.
GST Reforms संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केलेल्या भाषणाचे अखिल भारतीय व्यापार महासंघाने स्वागत करून केंद्र सरकारने घोषित केलेल्या जीएसटी कपातीचा लाभ सर्व वर्गांना देण्याचे आश्वासन दिले
हिमाचल प्रदेशात मान्सून सुरू झाल्यापासून, ४६ ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे ९८ पूर आणि १४६ भूस्खलन झाले आहेत. पावसाशी संबंधित घटनांमध्ये ४२४ जणांचा मृत्यू झाला आहे.
अफगाणचा बग्राम हवाई तळ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणाचे केंद्र बनला आहे. लंडनमध्ये ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, आम्ही ते परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण त्यांना (तालिबान) आमच्या वस्तूंची आवश्यकता आहे. ते आमच्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे, कारण ते चीन त्यांची अण्वस्त्रे जिथे बनवते तिथून फक्त एक तासाच्या अंतरावर आहे.
अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळ आयोजित विशेष समारंभात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई रहाटकर यांना “आचार्य तुलसी कर्तृत्व पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
अमेरिका आता एच-१बी व्हिसासाठी १००,००० डॉलर्स (अंदाजे ८.८ दशलक्ष रुपये) अर्ज शुल्क आकारेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी व्हाईट हाऊसमध्ये या आदेशावर स्वाक्षरी केली. पूर्वी, एच-१बी व्हिसासाठी अर्ज शुल्क १००,००० ते ६००,००० रुपयांपर्यंत होते.
जालना जिल्ह्यात झालेल्या दोन हल्ल्यामुळे आज महाराष्ट्रात खळबळ उडाली. यातला एक हल्ला मराठा आरक्षण आंदोलकांनी केला, तर दुसरा हल्ला कुठल्या आंदोलकांनी नाही तर थेट मधमाशांनी केला. त्यामुळे हे दोन्ही हल्ले महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरले.
युरोपातील तीन प्रमुख विमानतळांवर सायबर हल्ले झाले आहेत. यामध्ये लंडनचे हीथ्रो विमानतळ, जर्मनीचे बर्लिन विमानतळ आणि बेल्जियमचे ब्रुसेल्स विमानतळ यांचा समावेश आहे.
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर हल्ल्यांमुळे दहशतवाद्यांना परावृत्त केले आहे. आता, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन खैबर पख्तूनख्वामध्ये नवीन तळ स्थापन करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षांचे झाल्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घ्यावी यासाठी डोळे लावून बसलेल्या विरोधकांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वेगळ्या प्रकारे चपराक हाणली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ आता आम आदमी पक्षाने (आप) निवडणूक आयोगावर मतचोरीचा गंभीर आरोप केला आहे. आप नेते सौरभ भारद्वाज यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन अरविंद केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान कापल्याचा दावा केला.
भारतीय हवाई दलाचा कणा मानले जाणारे मिग-२१ विमान २६ सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहे. ६२ वर्षांच्या सेवेत त्यांनी १९७१ च्या युद्धात, कारगिलमध्ये आणि इतर अनेक मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
सायबर सुरक्षा ते ड्रग्स विरोधात झिरो टॉलरन्स अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांनी सुधारणांचा नवा अध्याय लिहिलाय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, भारत वैश्विक बंधुत्वाच्या भावनेने पुढे जात आहे. जगात आपले कोणीही शत्रू नाहीत. प्रत्यक्षात, जर आपला शत्रू असेल तर तो इतर देशांवरील आपले अवलंबित्व आहे. हा आपला शत्रू आहे. भारताच्या या शत्रूला पराभूत करण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे.
झारखंडमध्ये कुडमी समुदायाने शनिवारी निदर्शने केली. अनुसूचित जमाती (एसटी) श्रेणीत समावेश करण्याच्या मागणीसाठी रेल टेका आंदोलन केले.राज्यातील ४० रेल्वे स्थानकांवर निदर्शने सुरूच होती. पारंपारिक पोशाख परिधान करून आणि ढोल-ताशांसह निदर्शक सकाळपासूनच रेल्वे रुळांवर उतरले.
सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई यांनी शनिवारी सांगितले की, न्यायाधीशांनी त्यांच्या अधिकाराचा वापर नम्रतेने आणि जबाबदारीने करावा.दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) २०२५ च्या १० व्या अखिल भारतीय परिषदेत सरन्यायाधीश बोलत होते, ज्यामध्ये देशभरातील न्यायाधीश आणि न्यायाधिकरण सदस्य उपस्थित होते. सरन्यायाधीश म्हणाले, आपल्याकडे प्रचंड शक्ती आहे, परंतु तिचा योग्य वापर केला पाहिजे. आपल्यासमोर येणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांना विश्वास आहे की त्यांना न्याय मिळेल, म्हणून आपले निर्णय निष्पक्ष असले पाहिजेत.
ओबीसी समाजावर लढो या मरो-ची परिस्थिती आली आहे. आतापर्यंत ओबीसींच्या 7 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील ओबीसी समाजामध्ये प्रचंड संताप आहे. दोन समाज आमने-सामने आले आहेत. मराठवाड्यात तर अनेक गावांमध्ये मराठा-ओबीसी वाद सुरू आहे हे सर्व सरकारचे पाप आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
सराईत खोटेपणा आणि माफी वीर ही राहुल गांधी यांची खरी ओळख आहे. आता ज्या निवडणूक आयोगावर अत्यंत खोटे आरोप बेछूट पद्धतीने राहुल गांधी करत आहे त्याबद्दल अनेकांना त्यांच्या खोटेपणाच्या आत्मविश्वासाबद्दल आश्चर्य वाटत आहे. पण ही खोटं बोलण्याची राहुल गांधी यांची पहिली वेळ नाही, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
राज्यात सुरू असलेला पाऊस थांबल्यानंतर शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा मतदार यादीत छेडछाड झाल्याचा गाजावाजा करत निवडणूक आयोगावर आरोप केले.
निवडणूक आयोगाने सहा वर्षांत एकही निवडणूक न लढवलेल्या तब्बल 474 पक्षांची नोंदणी रद्द केली असून आणखी 359 पक्ष रडारवर आहेत.
सध्या भारतात “दुबळे” पंतप्रधान; तर मग यासीन मलिकला हाफिज सईदच्या भेटीला पाकिस्तानात पाठवणारे पंतप्रधान “बळकट” होते का??, असा सवाल विचारायची वेळ राहुल गांधींच्या आजच्या सोशल मीडिया पोस्टमुळे आली.
अमेरिकेच्या न्याय विभाग आणि न्यू जर्सी जिल्ह्याने न्यू जर्सीमधील BAPS मंदिराचा तपास बंद केला आहे. मंदिरावर कामगारांचे शोषण आणि मानवी तस्करीचा आरोप होता. मंदिराच्या बांधकामादरम्यान कामगारांना प्रति तास फक्त $1.20 वेतन देण्यात आले होते असाही आरोप करण्यात आला होता.
बरेली येथील अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी म्हणाले, “मुस्लिमांनी मोदी आणि योगी यांच्यावरील चित्रपट पाहू नये. मुस्लिमांनी चित्रपट पाहणे बेकायदेशीर आहे आणि शरिया कायद्यानुसार निषिद्ध आहे. जो कोणी ते पाहतो तो दोषी ठरेल.”