• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 105 of 1422

    Pravin Wankhade

    Maharashtra : राज्यातील पूरग्रस्त बाधित कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ; फडणवीस सरकारकडून मदत जाहीर

    महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा देखील पुराच्या विळख्यात अडकला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. तसेच शेतांमध्ये पुराचे पाणी गेल्याने पिकांची नासाडी झाली असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. अशात आता सरकारने पुढाकार घेतला असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्त बाधित प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ देण्यात येत आहे.

    Read more

    CM Fadnavis : अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; पंचनाम्यासाठी ड्रोन व मोबाईल फोटोंना मान्यता

    महाराष्ट्रात गत काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अमाप नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांचे जवळपास संपूर्ण मंत्रिमंडळ आजपासून अतिवृष्टीग्रस्तांच्या भेटीसाठी राज्याच्या राजधानीबाहेर पडले आहे.

    Read more

    Pahalgam attack : पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या शिक्षकाला अटक

    पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी केली. हा आरोपी शिक्षक असून काही दिवसांपूर्वीच दहशतवायांच्या संपर्कात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव युसूफ कटारिया आहे. २६ वर्षीय हा तरुण कुलगामचा रहिवासी आहे.

    Read more

    Manoj Jarange : अतिवृष्टीच्या संकटातही मनोज जरांगे यांचे राजकारण, महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा

    अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण मंत्रिमंडळ पाहणी दौऱ्यावर असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राजकारण सुरू केले आहे. सरकारने निकष न लावत जेवढे नुकसान झाले आहे, तेवढी मदत द्यावी. अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

    Read more

    Sonam Wangchuk : लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी लेहमध्ये हिंसक निदर्शने, मूर्खपणा थांबवण्याचे सोनम वांगचुक यांचेआवाहन

    लडाख या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी बुधवारी लेहमध्ये हिंसक निदर्शने झाली. विद्यार्थ्यांची पोलिस आणि सुरक्षा दलांशी चकमक झाली, यात चार जणांचा मृत्यू झाला आणि ७० हून अधिक जण जखमी झाले. तरुणान मूर्खपणा थांबवण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकयांनी केले आहे.

    Read more

    Jarange Patil : शेतकऱ्यांना 100% नुकसानभरपाई द्या; अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांचा इशारा

    महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्याला अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा पूराने वेढला गेला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.

    Read more

    India Drone : ऑक्टोबरमध्ये भारताचा ड्रोन- काउंटर-ड्रोन सराव; एअर मार्शल म्हणाले- पाकिस्तान आपल्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतोय

    ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भारत “कोल्ड स्टार्ट” नावाचा एक मोठा लष्करी सराव करणार आहे. या सरावात ड्रोन आणि काउंटर-ड्रोन सिस्टीमची चाचणी घेतली जाईल. या सरावात आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेची ताकद आणि कुठे सुधारणा आवश्यक आहेत याचे मूल्यांकन केले जाईल.

    Read more

    Karunanidhi : करुणानिधी यांच्या पुतळ्याच्या स्थापनेला सर्वोच्च स्थगिती; राजकारण्यांचा गौरव करण्यासाठी सार्वजनिक पैशाचा वापर करू नका

    माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा पुतळा बसवण्याची परवानगी मागणारी याचिका घेऊन राज्याकडे आलेल्या तामिळनाडू सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फटकारले. या याचिकेत राजकारण्यांचे गौरव करण्यासाठी सार्वजनिक पैशाचा वापर का करावा, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- मानहानी गुन्ह्याच्या श्रेणीतून काढून टाकावी; जेएनयूच्या माजी प्राध्यापकांना नोटीस

    सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले की, मानहानीला गुन्हेगारीमुक्त करण्याची वेळ आली आहे. न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर २०१६ मध्ये जेएनयूच्या माजी प्राध्यापक अमिता सिंग यांनी एका माध्यम संस्थेविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी सुरू होती.

    Read more

    Bangladesh : न्यूयॉर्कमध्ये बांगलादेशी विद्यार्थी नेत्यावर अंडी फेकली; हसीनांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दहशतवादी म्हटले

    बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार आणि नोबेल पुरस्कार विजेते प्रोफेसर मुहम्मद युनूस यांच्या ताफ्याला न्यूयॉर्कमध्ये निदर्शनांचा सामना करावा लागला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युनूससोबत असलेल्या विद्यार्थी नेते अख्तर हुसेनवर अंडी फेकली आणि त्यांना दहशतवादी ठरवले. जमावाने युनूसविरुद्ध घोषणाबाजीही केली.

    Read more

    महाराष्ट्र ओल्या दुष्काळात बुडाला तरी राजकारण सुटत नाही; दमबाजी करण्याची हौस काही भागत नाही!!

    महाराष्ट्र ओल्या दुष्काळात बुडाला तरी राजकारण सुटत नाही; दमबाजी करण्याची हौस काही भागत नाही!!, असं म्हणायची वेळ सध्याच्या विरोधकांच्या राजकीय वर्तणुकीमुळे आली.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- हायकोर्टाचे काही न्यायाधीश खटले पुढे ढकलतात, हे धोकादायक

    सर्वोच्च न्यायालयाने २२ सप्टेंबर रोजी म्हटले की, काही उच्च न्यायालयांचे न्यायाधीश त्यांचे कर्तव्य योग्यरित्या पार पाडत नाहीत आणि अशा न्यायाधीशांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले पाहिजे.

    Read more

    याला म्हणतात, अनुभवी काँग्रेसी झटका; योगींना मोदींचे वारस ठरवून मल्लिकार्जुन खर्गेंनी दिला शेजारी बसलेल्याला राजकीय फटका!!

    याला म्हणतात, अनुभवी काँग्रेसी झटका; योगींना मोदींचे वारस ठरवून मल्लिकार्जुन खर्गेंनी दिला शेजारी बसलेल्याला राजकीय फटका!!, असे म्हणायची वेळ काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका वक्तव्यामुळे आली.

    Read more

    Ranbir Kapoor : रणबीर कपूरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश; आर्यन खानच्या शोमधील ई-सिगारेट दृश्याबद्दल नोटीस

    राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) मुंबई पोलिसांना अभिनेता रणबीर कपूर आणि आर्यन खान यांच्या “द बॅडीज ऑफ बॉलीवूड” या वेब सिरीजच्या निर्मात्यांवर आणि नेटफ्लिक्सवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, कारण हा शो इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा, २०१९ चे उल्लंघन करतो असा आरोप केला आहे.

    Read more

    Asaram : सुरतच्या सरकारी रुग्णालयात आसारामची पूजा-आरती; वरिष्ठ डॉक्टरसह कर्मचारी सामील; पण शिक्षा सुरक्षा रक्षकाला

    बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी आसाराम बापूची पूजा आणि आरती करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गुजरात राज्यातील सुरतमधील एका सरकारी रुग्णालयातील आहे.

    Read more

    निकष आणि नियमांचा अडथळा न आणता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी सर्व मदत; शेतीच्या बांधावरून मुख्यमंत्र्यांची घोषणा

    मदतीचे निकष आणि नियम यांचा कुठलाही अडथळा न आणता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी सर्व मदत देऊ, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरून मदतीची घोषणा केली

    Read more

    झेडपी- पंचायत समिती निवडणुकीचे बिगूल, मतदार यादी कार्यक्रम जाहीर

    राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे.

    Read more

    मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री अतिवृष्टीग्रस्त भागात दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मंत्री संजय शिरसाट आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आज संपूर्ण राज्याचा दौरा करत असून

    Read more

    Italy : इटलीमध्ये पॅलेस्टिनी समर्थकांनी तोडफोड-जाळपोळ केली; 60 पोलिस जखमी; पॅलेस्टाईनला मान्यता न दिल्याबद्दल संताप

    पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांच्या सरकारने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यास नकार दिल्यानंतर इटलीमध्ये हजारो लोक हिंसक निदर्शने करत आहेत.सोमवारी निदर्शने सुरू झाल्याने मिलानसह अनेक प्रमुख शहरांमध्ये रस्ते रोखण्यात आले आणि बंदरे बंद करण्यात आली. मिलान आणि राजधानी रोममध्ये सर्वात जास्त गर्दी दिसून आली.

    Read more

    संयुक्त राष्ट्रसंघात जणू काही शांततेचा मसीहा अवतरला; पण महत्त्वाच्या मुद्द्यांवर मूग गिळून गप्प बसला!!

    संयुक्त राष्ट्रसंघात जणू काही शांततेचा मसीहा अवतरला; पण महत्त्वाच्या मुद्द्यांवर मूग गिळून गप्प बसला!!, असाच भास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणामुळे झाला.

    Read more

    Macron : न्यूयॉर्क पोलिसांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची गाडी रोखली:मॅक्रॉन यांनी ट्रम्पला फोन केला, म्हणाले- तुमच्यामुळे रस्ता बंद, लवकर रस्ता मोकळा करा

    सोमवारी रात्री संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण दिल्यानंतर विश्रांतीसाठी फ्रेंच दूतावासाकडे जात असताना न्यूयॉर्कमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची गाडी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मोटार ताफ्याने अडवली.

    Read more

    Trump : ट्रम्प यांच्या पक्षाचा नेता बरळला- हनुमानजी खोटे भगवान; आपण ख्रिश्चन देश, येथे मूर्ती का बसवू देत आहात?

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते अलेक्झांडर डंकन यांनी भगवान हनुमानाच्या पुतळ्याबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे आणि ते खोट्या देवाची खोटी मूर्ती असल्याचे म्हटले आहे.

    Read more

    Sharad Pawar : पीक नाही तर जमिनीचेही नुकसान भरून काढा] शरद पवारांचे राज्य सरकारला आवाहन

    राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, जनावरे आणि जनजीवन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या संसारावर संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडे ठोस मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून या संकटाकडे पाहून शेतकऱ्यांना तातडीची आणि दीर्घकालीन मदत द्यावी, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वास्तव पाहणी केली जावी, अशी त्यांची आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे.

    Read more

    BJP Workers : मोदींचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग, भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्याला भररस्त्यात साडी नेसवून केला सत्कार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसलेला मॉर्फ केलेला फोटो व्हायरल केल्याने डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. याचा बदला घेण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपने मोदींचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा भररस्त्यात साडी नेसवून सत्कार केला. यापुढे कोणत्याही वरिष्ठ नेत्याची बदनामी केल्यास अशीच परिस्थिती होईल, असा इशाराही भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.

    Read more

    Ayodhya : बाबरीच्या जागी मशीद बांधण्याची योजना नाकारली; अयोध्येत 8 विभागाची 6 वर्षांनंतरही NOC नाही

    अयोध्येतील बाबरी मशिदीच्या जागेवर मशीद बांधण्याची योजना नाकारण्यात आली आहे. राम मंदिरापासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या सोहावल तहसीलमधील धनीपूर गावात ही मशीद प्रस्तावित आहे.

    Read more