Dalai Lama : दलाई लामा म्हणाले- आणखी 30-40 वर्षे जगेन; काही दिवसांपासून उत्तराधिकाऱ्याबद्दल अफवा, तिबेटी प्रशासनाने फेटाळल्या
दलाई लामा यांनी शनिवारी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा करताना म्हटले की, ते लोकांची सेवा करण्यासाठी आणखी ३०-४० वर्षे जगतील अशी आशा बाळगतात. तिबेटी आध्यात्मिक नेते म्हणाले, ‘अनेक भविष्यवाण्या पाहून मला असे वाटते की मला अवलोकितेश्वराचे आशीर्वाद आहेत. मला आशा आहे की मी आणखी ३०-४० वर्षे जगेन.’