• Download App
    अस्वलांना प्रचंड बर्फातदेखील का वाजत नाही थंडीWhy don't bears get cold even in huge snow?

    विज्ञानाची गुपिते : अस्वलांना प्रचंड बर्फातदेखील का वाजत नाही थंडी

    थोडी थंडी पडली तरी आपले हात – पाय गारठतात. जगणे मुश्कील होवून जाते. आपण स्वेटर, मफलर, हातमोजे याचा आसरा शोधू लागतो. मात्र सतत बर्फात व जीवघेण्या थंडीत देखील काहाही संरक्षण नसताना पोलर बियर म्हणजे पांढरी शुभ्र अस्वले कशी काय टिकाव धरतात, मस्ती करतात, जिवंत राहतात हे पाहून आपल्याला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसतो.Why don’t bears get cold even in huge snow?

     

    बर्फाळ प्रदेशातील पोलर बियर्स म्हणजे निसर्गाची एक अद्भुद रचनाच म्हणावी लागेल. डिस्कव्हरीसारख्या टीव्ही वाहिन्यावंर आपण अनेकदा या अस्वलांना पाहिले असेल. पण निसर्गानेच या पोलर बिअर्सच्या शरीरात संरक्षणाची अनोखी व्यवस्था केलेली असते. त्यामुळे ते या विचित्र हवामानात तग धरुन राहू शकतात.

    प्रत्येक प्राण्याचे शरीरातील उष्णतामान कायम रहावे यासाठी निसर्गानेच स्वतंत्र रचना केलेली असते. शरीराच्या विशिष्ठ रचनेला होमिओस्टसिस असे म्हणतात. खूप जीवघेणी थंडी असेल तर या अस्वलांच्या शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्ताचा प्रवाह कातडीपर्यंत पोहचतच नाही.

    हे गरम रक्त जर कातडीपर्यत पोहोचले तर रक्त लगेच थंड होवूऩ शरीराचे उष्णनामानही तत्काळ कमी होईल. निसर्गाच्या या अनोख्या रचनेमुळे बाहेर कितीही थंडी असली तरी अस्वलाच्या शरीरातील रक्त उष्णच राहते. त्याचप्रमाणे या अस्वलांच्या कातडीखाली मोठ्या प्रमाणात चरबी साठविलेली असते. या चरबीच्या आवरणामुळे शरीरातील उष्णता बाहेर जात नाही ती कायम राहते.

    या अस्वलांच्या अंगावर प्रचंड प्रमाणात केस देखील असतात. या अतिकेसाळ व केसांच्या जाड आवरणामुळे बाहेरील थंडी शरीराच्या आत रक्तापर्यंत जात नाही व अस्वलाचे रक्त गरम राहते. त्यामुळे कितीही जीव गोठणारी थंडी असली तरी अस्वलावर त्याचा विपरित परिणाम होत नाही. त्यामुळे या अतिथंड वातावरणात केवळ पोलर बियरसारखे वेगळी शारिरीक रचना असलेले प्राणीच जगू शकतात. कारण यासाठी निसर्गाने त्यांच्या शरीराची रचनाच तशी केलेली आहे.

    Why don’t bears get cold even in huge snow?

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!