• Download App
    काँग्रेस हायकमांडने अशोक गेहलोत यांचे "कॅप्टन अमरिंदर" का केले नसावेत...?? । Why congress high command did not removed ashok gehlot as chief minister as captain amarinder Singh?

    काँग्रेस हायकमांडने अशोक गेहलोत यांचे “कॅप्टन अमरिंदर” का केले नसावेत…??

    राजस्थानात काँग्रेस श्रेष्ठींनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना “जोर का झटका धीरे से” दिलाय. त्यांचे निम्म्याहून अधिक मंत्रिमंडळ त्यांना बदलायला लावले आहे, पण त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविले नाही. थोडक्यात त्यांचा “कॅप्टन अमरिंदरसिंग” केला नाही. असे का घडले असेल? असे कोणते राजकीय बळ अशोक गेहलोतांकडे आहे की त्यांचा “कॅप्टन अमरिंदरसिंग” झाला नाही? की काँग्रेस हायकमांडचे स्वत:चे बळ अशोक गेहलोत यांच्यापेक्षा कमी पडले? या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. Why congress high command did not removed ashok gehlot as chief minister as captain amarinder Singh?

    खरे म्हणजे अशोक गेहलोत यांचा “कॅप्टन अमरिंदरसिंग” करायचे घाटतच होते. त्याशिवाय काँग्रेसच्या रँक्स अँड फाईल्समध्ये काँग्रेस हायकमांडचे महत्त्व अधोरेखित झालेच नसते. ही काँग्रेसची वर्षानुवर्षाची “राजकीय स्टाईल” आहे. पण राजस्थानात काँग्रेस हायकमांडने ती पुरती अमलात आणली नाही.

    अर्थातच त्यांना काही कारणे आहेत. एक तर कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याविरोधात नवज्योत सिंग सिद्धू यांनी ज्याप्रकारे जोर लावला होता, त्या प्रकारचा जोर सचिन पायलट यांना दाखविता आला नाही. त्यांचे गेल्या वर्षी एकदा बंड करून झाले होते. पण ते फसले. त्यामुळे पुन्हा त्या जोरात आणि जोमात त्यांना अशोक गेहलोत यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करता आली नाही.

    शिवाय त्यातला एक बारकावा असा कॅप्टन अमरिंदरसिंग हे खरे म्हणजे पहिल्यापासूनच काँग्रेस हायकमांडच्या डोळ्यातले कुसळ होते. सोनिया गांधी यांच्याशी त्यांनी जुळवून घेतले होते हे खरे, पण राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी त्यांचे जमत नव्हते. अशोक गेहलोत हे या राजकीय चातुर्यात अजिबात कमी पडले नाहीत. त्यांनी काँग्रेस हायकमांड म्हणजे सोनिया राहुल आणि प्रियांका हे गृहीत धरले होते. ते ते कधीच विसरले नाहीत. त्यामुळे अशोक गेहलोट यांचा “अमरिंदरसिंग” करण्याइतपत त्यांच्या विरोधात राहुल आणि प्रियांका गांधी यांची नाराजी नसावी. शिवाय कॅप्टन अमरिंदरसिंग हे काँग्रेस हायकमांडला जे हवे ते पोहोचवत नसावेत…!! अशोक गहलोत यांनी यात कसर सोडलेली दिसत नाही. त्यामुळे जर अशोक गेहलोत हे आपल्याला हवे ते पोहोचवत असतील तर त्यांना हात लावण्यात काय मतलब? असा विचारही काँग्रेस हायकमांडने केला असावा.

    अशा स्थितीत अशोक गेहलोत यांना जर पर्यायी नेतृत्व तयार नसेल तर केवळ सचिन पायलट यांच्या बळावर अवलंबून राहून अशोक गेहलोत यांचा “कॅप्टन अमरिंदरसिंग” करणे हे काँग्रेसला परवडणारे नाही, हे सोनिया गांधींनी ओळखले असावे. त्यामुळे कदाचित अशोक गेहलोत यांचे “कॅप्टन अमरिंदरसिंग” झाले नसावेत.

    – सचिन पायलट आनंदले!!

    अशोक गेहलोत यांना मंत्रिमंडळात फेरबदल करायला भाग पाडल्यानंतर अकरा नव्या मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. त्यामुळे काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आनंदले आहेत. त्यांनी स्वतःहून पत्रकार परिषद घेत नव्या मंत्रिमंडळाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहे.

    राजस्थानात बऱ्याच वर्षांपासून दलित मंत्री नव्हते. आता चार दलित नेत्यांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. ओबीसी वर्ग, अल्पसंख्यांक यांच्याकडेही लक्ष देऊन त्यांचे प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात वाढविण्यात आले आहे, अशी माहिती सचिन पायलट यांनी दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाची सचिन पायलट यांनी प्रशंसा केली आहे.

    सोनिया गांधी यांना मी मध्यंतरी भेटलो होतो. राजस्थानातील सर्व राजकीय परिस्थितीने त्यांच्या कानावर घातली होती. त्यांनी त्या परिस्थितीचे आकलन करून योग्य तो निर्णय घेतला. त्यामुळे आज मंत्रिमंडळात फेरबदल होऊन ते सर्वसमावेशक बनते आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व मला जी जबाबदारी देईल, ती मी समर्थपणे सांभाळीन, असा विश्वास सचिन पायलट यांनी व्यक्त केला आहे.

    मंत्रिमंडळ हे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असते. राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होत आहेत. परंतु त्याचे विश्लेषण आणि वैशिष्ट्यांचे वर्णन मात्र सचिन पायलट करताना दिसत आहेत. याचा सरळ राजकीय आज काँग्रेसमध्ये सचिन पायलट गटाला आता काँग्रेस श्रेष्ठींनी महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सचिन पायलट पुढे येऊन सध्या सगळे बोलत आहेत.

    काँग्रेस हायकमांडला पुरेसे पटवून सचिन पायलट यांना अशोक गेहलोत यांचा “कॅप्टन अमरिंदरसिंग” करणे सध्या जमले नसले तरी भविष्यावर डोळा ठेवून 2023 नंतर मुख्यमंत्रीपद मिळण्याची त्यांना आशा आहे. किंबहुना त्याच आशेवर त्यांचे पुढचे राजकारण सुरू राहील अशी चिन्हे दिसत आहेत.

    Why congress high command did not removed ashok gehlot as chief minister as captain amarinder Singh?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!