राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर वरील चर्चेला उत्तर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने सरकारवर केलेल्या टीकेला “मजबुरीने” उत्तर दिले. “मजबूरी” हा शब्द त्यांनी स्वतः वापरला आहे. Why cash on Congress in Modi’s speech ?; Does it have anything to do with the “balance of power” in the Uttar Pradesh elections?
त्याच वेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला कोरोना महामारीच्या मुद्यापासून ते “मेक इन इंडिया”, संरक्षण क्षेत्रातील देशांतर्गत खासगी गुंतवणूक या मुद्द्यांवर देखील घेरले. अनेक राज्यांमध्ये गेली अनेक दशके काँग्रेसचा पराभव झाला आहे, तरी देखील काँग्रेस नेतृत्वाचा अहंकार जात नाही, अशी शेरोशायरी करत मोदींनी काँग्रेस नेत्यांना ठोकले.
अपेक्षेप्रमाणे काँग्रेस नेत्यांनीही मोदींवर पलटवार चालवले आहेत. मोदींनी संसदेतल्या भाषणात काँग्रेसचा 50 वेळा उल्लेख केला, पण तीनच शब्दांमध्ये काँग्रेसने प्रत्युत्तर दिले, “खौफ अच्छा आहे”, अशा शब्दांत प्रसारमाध्यमांनी देखील काँग्रेसची भलामण केली आहे.
पण या सगळ्या राजकीय मशक्कतीचा नेमका अर्थ काय आहे?, मोदींनी सहजच “मजबुरी” म्हणून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे का? काँग्रेसवर टीकेची झोड उठविण्याखेरीज त्यांच्या भाषणात दुसरे कोणतेच मुद्दे नव्हते का? संसदेचे व्यासपीठ राजकीय कारणांसाठी वापरू नये, असा उपदेश काँग्रेसने केला आहे, तो मोदींना समजत नव्हता का? असे काय कारण आहे की मोदींनी काँग्रेसला टार्गेट केले??
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीशी त्याचा काही संबंध आहे का? उत्तर प्रदेशात काँग्रेस फारच मागे पडते आहे का? समाजवादी पक्षाशी टक्कर घेताना भाजपची दमछाक होते आहे का? त्यासाठी काँग्रेसच्या मतदानात काही टक्क्यांची वाढ होणे गरजेचे आहे का? मतांच्या टक्केवारीची “बॅलन्स ऑफ पॉवर” करण्यासाठी मोदींनी काँग्रेसला टार्गेट करून घेतले आहे का…?? या शंका राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे आणि त्यामध्ये नक्कीच तथ्य आहे…!!
संसदेचा वापर राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी किंवा राजकीय कारणांसाठी करण्यात येऊ नये, असा काँग्रेसने कितीही धोशा लावला तरी गेल्या 60 – 70 वर्षांमध्ये काँग्रेसने दुसरे काय केले होते? हाही प्रश्न परखडपणे त्यांना विचारला गेला पाहिजे. पंतप्रधान मोदींनी जर राजकीय कारणांसाठी संसदेचा वापर केला असेल आणि त्यांच्यावर टीका होत असेल आणि ती योग्य असेल तर काँग्रेस काय धुतल्या तांदळासारखी आहे का? तिच्यावर त्याच पद्धतीची टीका व्हायला नको का? या सवालांचीही स्पष्ट आणि नि:पक्षपाती उत्तरे मिळाली पाहिजेत अन्यथा “मोदींकडून काँग्रेसचा 50 वेळा उल्लेख, काँग्रेसचे तीनच शब्दात प्रत्युत्तर” अशी भलामण करणे ही काँग्रेसची चापलुसी करण्यासारखे ठरेल…!!
शिवाय मोदींवर काँग्रेसने जो पलटवार केला आहे त्याचे वैशिष्ट्य असे, की काँग्रेसने फक्त कोरोनाच्या मुद्द्यावर मोदींना घेरले आहे. मोदींनी उपस्थित केलेले दोन महत्त्वाचे मुद्दे काँग्रेसने पलटवारात टाळले आहेत. ते म्हणजे मेक इन इंडिया आणि संरक्षण क्षेत्रातील देशी गुंतवणूक यामुळे अनेकांची पोटदुखी वाढली आहे. अनेकांचे कमिशन बंद झाले आहे मागच्या दाराने संपत्ती मिळवण्याचे मार्ग बंद झाले आहेत, या मोदींच्या टीकेला काँग्रेसने उत्तर दिलेले नाही…!! काय कारण असावे याचे??
Why cash on Congress in Modi’s speech ?; Does it have anything to do with the “balance of power” in the Uttar Pradesh elections?
महत्त्वाच्या बातम्या
- आमदार नितेश राणे वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयामध्ये दाखल
- एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री ! ठाण्यात बॅनर झळकल्याने आश्चर्य; अक्षरे पुसून वाद मिटविण्याचा प्रयत्न
- यंत्रमाग धारकांना वीज बिलात देणार सवलत ; वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची माहिती
- लतादीदींच्या आयुष्यातील मौलिक क्षण!!
- २१ दिवसांच्या ‘फर्लो’वर गुरमीत राम रहीम कडेकोट बंदोबस्तात गुरुग्राम डेरामध्ये
- हरियाणात शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या मूडमध्ये
- पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका निव्वळ हताशेपोटी डॉ. नितीन राऊत यांची टीका
- दिल्ली ढगाळ ; पावसाची शक्यता