• Download App
    कोणाचा बाप काढणे महाराष्ट्रात यशवंतरावांच्या सभ्य राजकीय संस्कृतीत बसते...??|Whose fathering is in the civilized political culture of Yashwantrao in Maharashtra

    कोणाचा बाप काढणे महाराष्ट्रात यशवंतरावांच्या सभ्य राजकीय संस्कृतीत बसते…??

    राष्ट्रवादीचे नेते तपास संस्थानचे बाप का काढताहेत? अधिकाऱ्यांच्या हाती असे काय लागले आहे?Whose fathering is in the civilized political culture of Yashwantrao in Maharashtra


    महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या नेत्यांच्या आक्रमकतेमुळे विशिष्ट ओळख निर्माण करून आणि टिकवून आहे. महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही, असे ब्रीदवाक्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ट्विटर हँडलवर झळकत आहे. शरद पवारांनी साताऱ्यात पावसात भिजल्यानंतर महाराष्ट्र जो राजकीय चमत्कार घडला त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा अचानक लाभ घडला.

    यामध्ये राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांपेक्षा शरद पवारांचे राजकीय कर्तृत्व निश्चित अधिक आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवून आणलेले सरकार आता दोन वर्ष पूर्ण करत आले आहे. पण ते होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते आपल्या स्वभावा पलिकडे जाऊन अतिआक्रमक झालेले दिसत आहेत.



    परवाच सातारा जिल्ह्यातल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी केंद्रीय तपास संस्थांचा, सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचा बाप काढला. महा विकास आघाडीतील मंत्र्यांच्या विविध घोटाळ्यांच्या चौकशा आणि तपास सध्या केंद्रीय तपास संस्था करत आहेत त्याचा संताप शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

    प्राप्तीकर खात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही नातेवाईकांच्या आणि बहिणींच्या घरी छापे घातले. तेथे काही ही कागदपत्रे हस्तगत केली. जरंडेश्वर साखर कारखाना संदर्भातील काही गोष्टी प्राप्तीकर खात्याच्या हाती लागल्याचे सांगण्यात येते. नंतर प्राप्तीकर खात्याने काढलेल्या पत्रकात पुणे, बारामती, कोल्हापूर, जयपूर आदी सुमारे 70 शहरांमध्ये घातलेल्या छाप्यात मध्ये 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळल्यास नमूद केले आहे.

    यामध्ये फक्त प्राप्तीकर खात्याने गावांची नावे घातली आहेत. त्यामुळे चिडून जाऊन शशिकांत शिंदे यांच्यासारख्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने केंद्रीय तपास संस्थांच्या बाप काढला असावा का? की केंद्रीय तपास संस्थांच्या हाती असे काय लागले आहे की शशिकांत शिंदे हे त्यांच्यावर इतके संतापले…??

    शशिकांत शिंदे संतापून दोनच दिवस उलटतात ना तोच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा बाप काढला. त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विषयी अरे तुरे बोलत त्यांचा वरती बाप कोण बसला आहे?, अशा स्वरूपाची देखील भाषा वापरली. नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा खटला सुरू आहे. सध्या ते जामिनावर असले तरी त्या जामिनाचा विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई उच्च न्यायालयात गेली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा संताप अधिकच वाढला आहे का? आणि तो संताप बाप काढण्याच्या भाषेतून बाहेर पडला आहे का…??

    बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केल्यानंतर तर नवाब मलिक जास्त चिडले आहेत. दररोज ते पत्रकार परिषद घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर तोफा डागत असतात. पण आज पिंपरी-चिंचवडमध्ये या सर्व गोष्टीचा कडेलोट झालेला दिसला. त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या सारखीच बाप काढणारी भाषा वापरली. समीर वानखेडे यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकारी याविषयी अरे-तुरेची अनुदार भाषा वापरली.

    पण हे कशामुळे घडले असावे? अशा पद्धतीने तपास संस्थांचे बाप काढून कायदेशीर कारवाई कोणाला रोखता येऊ शकते का? जी कायदेशीर कोर्टापर्यंत गेली आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार प्रत्येक पावले उचलणे तपास संस्थांना भाग आहे, अशा स्थितीत तपास संस्थांचा किंवा अधिकाऱ्यांचा बाप काढून “उद्धार” करण्याने राष्ट्रवादीचे नेते खरेच असा कोणता राजकीय तीर मारत आहेत? की ज्याचा राजकीय फायदा राष्ट्रवादीला होणार आहे!!

    राष्ट्रवादीचे नेते आक्रमक आहेत. त्यांची ओळख तशी आहे हे खरे. पण एखाद्याचा बाप काढणे ही आक्रमकता आहे? की आक्रस्ताळेपणा? याचे भान राष्ट्रवादीच्या नेत्यांना उरले आहे काय?

    शरद पवारांची 50 वर्षांची राजकीय कारकीर्द आहे पण त्यांची भाषा घसरल्याची उदाहरणे क्वचित आहेत. ते नेहमी राजकीय नेत्यांना सभ्य भाषेत विरोध करण्याचा सल्ला देत असतात. यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसा ते सांगत असतात. कोणाचा बाप काढणे हा यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसा असल्याचे महाराष्ट्रात कोणीही म्हणणार नाही. यशवंतराव चव्हाण यांची राजकीय परंपरा ही सभ्य सुसंस्कृत आणि रॉय मतवादी अशी होती.

    राष्ट्रवादी काँग्रेस यशवंतरावांची परंपरा पाळण्याचा नेहमी दावा करत असते. या परंपरेत शशिकांत शिंदे आणि नवाब मलिक यांची बाप काढणारी वक्तव्ये बसतात का?, याचा विचार करण्याची गरज राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांना वाटत नाही का…??

    Whose fathering is in the civilized political culture of Yashwantrao in Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!