• Download App
    सहानुभूतीच्या भांडवलाची विरुद्ध बड्या नेत्यांच्या भाषणाची + क्लस्टर सिस्टीमने केलेल्या कामाची आज परीक्षा!! Western and southern maharashtra to vote today for 11 loksabha constituencies

    सहानुभूतीच्या भांडवलाची विरुद्ध बड्या नेत्यांच्या भाषणाची + क्लस्टर सिस्टीमने केलेल्या कामाची आज परीक्षा!!

     

    नाशिक : प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आज 7 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानातून सहानुभूतीच्या भांडवलाची विरुद्ध बड्या नेत्याच्या भाषणाची + क्लस्टर सिस्टीमने केलेल्या कामाची आज परीक्षा होणार आहे. बारामती, माढा, सोलापूर, लातूर, धाराशिव, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी – सिंधुदुर्ग, रायगड, हातकणंगले या मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. Western and southern maharashtra to vote today for 11 loksabha constituencies

    या सर्व मतदारसंघांमध्ये पवार नावाच्या ब्रँडची अग्निपरीक्षा होत आहे. बारामती, माढा, धाराशिव मध्ये पवार नावाचा ब्रँड जिंकेल, पण तो काकांचा असेल की पुतण्याचा असेल?? याचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे, तसेच पवार नावाच्या ब्रँडचा प्रभाव पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात नेमका खरंच किती उरेल?? याचाही फैसला आज होणार आहे. एका अर्थाने पवार ब्रँड जिथे “लिमिटेड” झाला आहे, तेवढ्या मतदारसंघांमध्येच आज परीक्षा आहे.

    शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने शरद पवारांच्या जवळ सहानुभूतीचे भांडवल आहे. ही सहानुभूती मराठी माध्यम निर्मित आहे, की खरंच जनमानसात पसरली आहे??, हे आज बारामतीत ठरणार आहे. तिथे काका विरुद्ध पुतण्या ही भाजपने लावलेली लढाई निर्णायक अवस्थेत पोहोचली आहे. शरद पवारांनी बारामतीत आजपर्यंत कधीही न वापरलेले सहानुभूतीचे भांडवल, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुरेपूर वापरून घेतले. शरद पवार आपल्या 50 वर्षांच्या संसदीय कारकीर्दीत ज्या दुष्काळग्रस्त गावांमध्ये गेलेही नव्हते, त्या प्रत्येक गावात पवारांनी पायधूळ झाडली.

    आता पवारांच्या या पायधुळीची किंमत मतदार चुकवतील की पवारांचा मूळ राजकीय संस्कार स्वीकारून भविष्यवेधी निर्णय घेतील??, हे आज ठरणार आहे. समाज परिवर्तनाच्या नावाखाली राजकीय सत्ता, आर्थिक सुधारणांच्या नावाखाली राजकीय सत्ता हे पवारांचे राजकीय संस्कार सूत्र राहिले. ते त्यांना यशवंतराव चव्हाणांकडून वारसा रुपाने मिळाले. ते पवारांनी आपल्या पुढच्या पिढ्यांच्या अंगात मुरवले. ते काही प्रमाणात बारामती मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये ही रुजवले. सत्तेशिवाय विकास होत नाही आणि विकासाशिवाय राजकारण होत नाही, पर्यायाने सत्तेशिवाय राजकारण होत नाही हे संस्कार सूत्र बारामतीकरांच्या मनात रुजवण्याचे सर्वात मोठे श्रेय शरद पवारांना आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मतदानात पवारांना पक्ष फुटीच्या सहानुभूतीचे भांडवल पुरेसे ठरणार की त्यांनीच बारामतीकरांच्या मनात रुजवलेले सत्ता संस्कार सूत्र काम करून जाणार??, हे आजच्या मतदानातून यंत्रामध्ये बंद होणार आहे, ज्याचा निकाल 4 जून 2024 रोजी लागणार आहे.



    बारामती वगळून बाकी सर्व मतदारसंघांमध्ये जिथे पवार ब्रँड काम करतो तिथे सहानुभूतीचे भांडवल आणि पवारांच्या फिरण्याचे भांडवल विरुद्ध भाजपच्या बड्या नेत्याच्या प्रचारांचे भांडवल आणि क्लस्टर पद्धतीने काम केल्याचे भांडवल ही खऱ्या अर्थाने लढाई होणार आहे.

    भाजपचे क्लस्टर म्हणजे संघ परिवाराचे कार्यकर्ते राम मंदिराच्या निर्मितीच्या ते प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या कालावधीमध्ये संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण देशातच आणि पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम केले, त्याचे राजकीय फळ पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रापुरते मिळण्याचा उद्याचा दिवस आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवार या सर्व फळीने केलेल्या भाषणांचा आणि घेतलेल्या सभांचा परिणाम आज मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे.

    लोकसभा निवडणुकीचे नॅरेटिव्ह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेट केले. त्या नॅरेटिव्हला ठाकरे – पवारांनी स्थानिक मुद्दे उचलून काटशह देण्याचे प्रयत्न केले, पण मोदी अब की बार 400 पार ही घोषणा करून ते थांबले नाहीत. निकाल काय लागायचा तो लागो, कामातली “कन्सिस्टन्सी” थांबता कामा नये, हे मोदींनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले. त्याचा परिणाम दुसऱ्या + तिसऱ्या फळीतल्या नेत्यांपासून ते आणि थेट क्लस्टर मधल्या छोट्या – छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचला, जो परिणाम शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांना आपल्या कार्यकर्त्यांच्या संख्याबळाअभावी अजिबात पोहोचवता येणे शक्य नाही, तो परिणाम भाजपने क्लस्टर सिस्टीमने काम करून साधून घेतला.

    दक्षिण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत क्लस्टर सिस्टीम मधून 10000 छोट्या – मोठ्या मीटिंग झाल्याचा आकडा समोर आला आहे, ज्या मीटिंगमध्ये किमान 20 ते 25 लोक हजर राहिलेत, अशा मीटिंगचा संघ परिवारातून आलेला हा आकडा आहे. हा फक्त दक्षिण महाराष्ट्रातला आकडा आहे. तो पश्चिम महाराष्ट्रातला आकडा नाही. पश्चिम महाराष्ट्रातला आकडा साधारण त्याच आसपासचा असणार आहे, किंबहुना थोडा जास्त असणार आहे. कारण दक्षिण महाराष्ट्रापेक्षा पश्चिम महाराष्ट्राचा विस्तार जास्त आहे. पण राजकीय मधमाशांचे पोवळे या पलीकडे याचे वेगळे वर्णन करता येणे कठीण आहे. या सगळ्याचा परिणाम आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.

    Western and southern maharashtra to vote today for 11 loksabha constituencies

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!