• Download App
    स्का दुर्बीण साधणार परग्रहाशी संवाद। The Ska telescope will interact with the planet

    स्का दुर्बीण साधणार परग्रहाशी संवाद

    पृथ्वीप्रमाणे अन्य कोणत्या तरी ग्रहावर माणसे राहतात का याचे कुतूहल त्याला सतत खुणावत असतेच. एलियन अर्थात परग्रहवासी खरोखर अस्तित्वात आहेत की नाहीत. ते जर अस्तित्वात असले तर त्यांच्याशी आपल्याला संवाद साधता येईल का या प्रश्नांची उत्तरे येत्या काही वर्षातच मिळणार आहेत. दीड अब्ज पौंड खर्चाच्या जगातील सर्वात मोठय़ा रेडियो दुर्बिणीची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली असून ही दुर्बीण तयार झाल्यावर 2024 मध्ये या सर्व प्रश्नांची उकल होणार आहे. The Ska telescope will interact with the planet

    स्क्वेअर किलोमीटर अरेु किंवा स्का या दुर्बिणीच्या मदतीने ही नवी आणि आश्चर्यकारक शक्यता प्रत्यक्षात येऊ शकेल. स्क्वेअर किलोमीटर अरे ही दुर्बीण तयार करण्याचे काम वेळापत्रकानुसार झाले तर ती 2024 मध्ये कार्यरत होईल आणि त्यामुळे कदाचित त्याच वर्षी अन्य ग्रहांवरील सजीवांशी संपर्क होऊ शकेल अशी आहे.

    या प्रकल्पानुसार आस्ट्रेलियातील बऱ्याच मोठय़ा भागासह पृथ्वीवर 4921 चौरस किलो मीटर क्षेत्रफळात रेडियो लहरी ग्रहण करणारे अंटेना बसवले जाणार आहेत. डोळ्यांनी निरीक्षण करण्याच्या दुर्बिणीपेक्षा ब्रह्मांडाचे अधिक व्यापक आणि वेगळे दृश्य त्यामुळे शास्त्रज्ञांना उपलब्ध होणार आहे. कोणत्याही शक्तिशाली दुर्बिणीपेक्षाही ही दुर्बीण पन्नास पट अधिक संवेदनशील असून ती दहा हजारपट अधिक गतीमान आहे. शंभर प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेल्या जीवनाचाही शोध लावण्याची क्षमता या दुर्बिणीमध्ये असणार आहे.

    The Ska telescope will interact with the planet

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    काँग्रेसला खरं तर अख्ख्या बिल्डिंग रीडेव्हलपमेंटची गरज; पण निदान आता प्लंबर तरी बोलवा!!