नाशिक : शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना भाजपच्या मूळच्या कार्यकर्त्यांचा अचानक पुळका आला. पण त्यांना स्वतःच्याच पक्षात कार्यकर्ते टिकवता येईना!!, अशी राजकीय परिस्थिती पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये उद्भवली. Supriya sule
महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. हे कार्यकर्ते आमच्या मोठ्या निवडणुकांसाठी राबतात. त्यांच्या निवडणुका येतात त्यावेळी त्यांच्या मनासारखा निर्णय घ्यावा लागतो त्यामुळे सगळेच पक्ष आपापल्या सोयीनुसार तडजोडी करतात, अशी मखलाशी सुप्रिया सुळे यांनी केली होती, पण नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये त्या एकाही कार्यकर्त्याच्या प्रचारात फिरकल्या नव्हत्या. त्यांनी बारामती सारख्या पवारांच्या बालेकिल्ल्यात स्थानिक निवडणुकांची धुरा स्वतःच्या अंगावर घेतली नाही. ती निवडणूक त्यांनी युगेंद्र पवारांच्या गळ्यात घातली होती.
पण नगरपरिषदांचे निकाल लागताच याच सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या मूळच्या कार्यकर्त्यांविषयी पुतना मावशीचा पुळका आणत प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रात नगरपरिषदांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले, पण ते मूळच्या भाजपच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे नाही, तर ते इन्कमिंगवाल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे आहे. भाजपमध्ये जिथे तिथे जुने काँग्रेस वाले किंवा राष्ट्रवादी वाले दिसतात. त्यांनीच भाजपला यश मिळवून दिले, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.
राहुल कलाटे भाजपमध्ये
पण याच सुप्रिया सुळे यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये स्वतःच्या पक्षातले नेते आणि कार्यकर्ते टिकवता आले नाहीत. पिंपरी चिंचवड मध्ये काका – पुतण्यांच्या एकत्र येण्याची शक्यता लक्षात घेताच राहुल कलाटे यांनी भाजपमध्ये उडी मारली. त्यांचा आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार शंकर जगताप आणि बापू पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला.
– प्रशांत जगतापांनी सोडली साथ
पुण्यात माजी महापौर प्रशांत जगताप यांनी शरद पवारांच्या पक्षाची साथ सोडली. त्यांनी पक्षाचे शहराध्यक्ष पद आणि पक्षाचे सदस्यत्व या दोन्हींचा राजीनामा सुप्रिया सुळे यांच्याकडे दिला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ नको. त्यापेक्षा दुसरा पक्ष बरा, अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतली. ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत किंवा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता बोलली गेली.
– पवार काका – पुतण्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला
पवार काका पुतण्यांनी एकत्र येऊन ताकद वाढवायचा डाव खेळला. पण प्रत्यक्षात तो त्यांच्यावरच उलटला. दोन्ही पवारांनी राजकारणात आपापली सोय पाहिली पण त्यामुळेच पवार संस्कारित नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःची सोय पाहत पवार सोडूनचे इतर मार्ग निवडले. भाजपच्या कार्यकर्त्यांविषयी कळवळा आणून प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या सुप्रिया सुळे सुद्धा राष्ट्रवादीच्या मूळच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत टिकवून धरू शकल्या नाहीत. कारण नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना “देण्यासारखे” पवारांकडे काही उरले नाही.
Supriya sule couldn’t keep her folk together
महत्वाच्या बातम्या
- Udayanidhi : उदयनिधी म्हणाले- तामिळनाडूवर हिंदी लादण्याची परवानगी मिळणार नाही; केंद्रावर आरोप
- नगरपालिकांच्या विजयानंतर एकनाथ शिंदे लागले पुढच्या कामाला; महाविकास आघाडीचे नेते पत्रकार परिषदांमध्ये मग्न!!
- अजितदादा + भुजबळांच्या राष्ट्रवादीची नाशिक मध्ये फरफट; भाजपने महायुतीत घ्यावे म्हणून नेत्यांची धडपड!!
- Zelenskyy : झेलेन्स्की म्हणाले- अमेरिका व रशियासोबत त्रिपक्षीय चर्चेसाठी तयार; पण जमीन सोडणार नाही